TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
UPSC अपयशी उमेदवारांनाही मिळणार नोकरीची संधी. UPSC Pratibha SeTU Portal . लिंक:- https://upsconline.gov.in/miscellaneous/pdoiac/ महाराष्ट्र सरकारने पण असा निर्णय घ्यायला हवा. Join @tcs_pattern
एमपीएससीच्या अपयशी पण गुणवत्ता असलेल्या उमेदवारांसाठी “प्रतिभा सेतू योजना” सारख्या उपक्रमाची गरज आहे.
यूपीएससीने अलीकडेच “प्रतिभा सेतू” नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेतून यूपीएससीच्या अंतिम टप्प्यात (मुख्य परीक्षा किंवा मुलाखत) पोहचलेले पण अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची माहिती एकत्र करून खासगी आणि सरकारी संस्थांशी शेअर केली जाते. यामुळे त्या उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
यूपीएससीप्रमाणेच एमपीएससी परीक्षाही अत्यंत स्पर्धात्मक आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी राज्यसेवा, गट-ब, गट-क अशा विविध परीक्षांसाठी अर्ज करतात. परंतु, अंतिम निवड फक्त काहींचीच होते. मुलाखतीपर्यंत पोहचलेले किंवा अंतिम यादीत थोडक्याने मागे राहिलेले अनेक उमेदवार अत्यंत गुणवत्ता असलेले असतात. अशा उमेदवारांचा वापर इतर सरकारी व खाजगी क्षेत्रात करणे शक्य आहे.
एमपीएससीने देखील एक “उमेदवार माहिती पोर्टल” विकसित करावे.
या पोर्टलमध्ये खालील सुविधा असाव्यात:
• राज्यसेवा/गट ब/गट क परीक्षेतील मुख्य परीक्षा किंवा मुलाखत दिलेले पण अपयशी ठरलेले उमेदवारांची माहिती एकत्र करणे.
• उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौशल्ये, परीक्षा टप्पे, रँक इत्यादी माहिती संकलित करणे.
• ही माहिती खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था, CSR प्रकल्प, सरकारी कंत्राटी भरती संस्था, महापालिका/जिल्हा परिषद/सहकारी संस्था इत्यादींशी शेअर करणे.
• तात्पुरत्या/कंत्राटी/प्रकल्प आधारित भरतीसाठी या माहितीचा उपयोग करणे.
उदाहरणार्थ:
1. राज्यसेवा मुलाखत दिलेली पण अंतिम यादीत न आलेली विद्यार्थ्यांची माहिती - ही माहिती महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, CSR प्रकल्प, सहकारी संस्था यांना दिली जाऊ शकते.
2. गट-क मधील लेखनिक/क्लर्क पदांसाठी थोडक्याने अपयशी उमेदवार - यांना कंत्राटी पदासाठी प्राधान्य देता येईल.
यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने देखील अशा गुणवत्तावान पण थोडक्याने अपयशी उमेदवारांचा मानवी संसाधन (HR) बँक तयार करावी. यामुळे उमेदवारांचा मनोभंग होणार नाही, राज्याच्या प्रशासनात दर्जेदार मनुष्यबळ वापरता येईल, आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सक्षम अधिकारी/कर्मचारी निर्माण होतील.
~निलेश निंबाळकर
#mpsc #upsc #jobsearch @highlight
Join @tcs_pattern

❤1