TCS IBPS Pattern सरळसेवा 2025
5.44K subscribers
1.12K photos
27 videos
687 files
192 links
नगर परिषद , तलाठी वनरक्षक भरती 🔥
TCS IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा
#जिल्हा_परिषद
Download Telegram
स्पर्धपरिक्षा एक स्वप्न होतं,
रात्रं-रात्र जागून जोपासलं होतं.
विचार एकच-यशाची दारं,
पण हातात आलं अपयशाचं वारं…

थरथरलं मन, डोळ्यांत पाणी,
“मीच कमी का?” ही मनी कहानी.
घरची अपेक्षा, समाजाचा भार,
स्वतःवरच राग, मनात अंधार…

क्षणभर थांबव विचारांचं दळण,
एका अपयशाला नको ठरवूस शेवटचं वळण.
हे तर फक्त एक पान आहे, संपूर्ण पुस्तक नाही,
हे काय आयुष्याचं प्रगतीपुस्तक नाही...

आईचे अश्रू, बाबांची नजर,
त्यांचं अस्तित्व धरूनच उभं असतं घर.
पुन्हा स्वप्न पाहा, पुन्हा अभ्यास सुरू कर,
यशाचं आकाश अजून आहे उघडं भरभर...

परीक्षेत अपयशी झालास म्हणून,
जगणं कधीच अपयशी होत नाही.
थोडं थांब, थोडं समजून घे —
कारण तुझं आयुष्य, अजून संपूच शकत नाही...!!!

एका परीक्षेचं अपयश, तुमचं आयुष्य संपवण्याचे कारण बनू शकत नाही...!!!

कालच मला ट्विटर वरील एका बंधूंनी ह्या विषयावर लिखाण करावयास सांगितले.

विषय अतिशय गंभीर, संवेदनशील आणि हृदयद्रावक आहे, तो म्हणजे 'MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत अपयशामुळे होणाऱ्या आत्महत्यांमधली वाढ'

MPSC ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कठीण परीक्षा. हजारो तरुण मुलं-मुली वर्षानुवर्ष मेहनत करतात, झोप विसरतात, आयुष्य झिजवतात, नातेसंबंध तोडतात.

फक्त एका उद्देशासाठी, एक अधिकारी होण्यासाठी. समाजसेवेसाठी. घरच्यांचा मान वाढवण्यासाठी.

पण जेव्हा निकाल लागतो आणि जर का अपेक्षेपेक्षा तो वेगळा असतो,
तेव्हा काही जण खचतात…काही जण आत्मविश्वास गमावतात. काही दिशा गमावतात...काही रडतात… आणि काहीजण स्वतःचं आयुष्यदेखील संपवतात.

हे खरंच योग्य आहे का?

एक अपयश म्हणजे सगळं संपलं असं होऊ शकतं का? एका परीक्षेचा निकाल मानवी जीवनापेक्षा मोठा आहे का? एक अपयश-तुमचं सर्व मूल्य, तुमची क्षमता, तुमची स्वप्नं पुसून टाकण्यासाठी पुरेसं आहे का?

तर, नाही! कधीच नाही!

आपलं मूल्य, आपली ओळख, आपल्या स्वप्नांचं जग — एका परीक्षेच्या मार्कावर कशी ठरू शकते?

तुमचं मूल्य, तुमचं स्वप्न, तुमचं आयुष्य — हे सगळं एका निकालावर नाही, तर तुमच्या ध्येयावर आणि जिद्दीवर ठरतं.

मित्रांनो, आयुष्य हे स्पर्धा परीक्षा नाही.
आयुष्य म्हणजे एक संधी-
शिकण्यासाठी, चुकण्यासाठी, पुन्हा उभं राहण्यासाठी.

अहो, एका परीक्षेत उत्तीर्ण झाला नाहीत, तरी दुसरी वाट उघडेलच की.

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यात अपयशी आहात. याचा अर्थ असा की फक्त या वेळेस यश मिळालं नाही किंवा हा मार्ग सध्या तुमच्यासाठी खुला नाही - कदाचित एक चांगला मार्ग तुमची वाट पाहत देखील असेल.

भल्या भल्या लोकांना अपयशाचा सामना करावा लागला. पण त्यांनी हार मानली नाही.
मग तुम्ही का हार पत्करताय?

स्वतःला संपवणं हे धैर्य नाही, ते दु:खाचं टोक आहे.
खरं धैर्य- परत उभं राहणं. लढत राहणं. पुन्हा प्रयत्न करणं.

जीवन हा एक प्रवास आहे - कधीकधी कठीण, कधीकधी सुंदर - परंतु नेहमीच जगण्यासारखं...

आत्महत्या हा उपाय नाही. तो एका तात्पुरत्या समस्येवर कायमचा उपाय आहे.

तुमच्या आईवडिलांनी, तुम्हाला एका परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून उमेद हरण्यासाठी २०-२५ वर्षे वाढवलं नाही.

स्वतःला संपवून तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी करायचीय का? तुमच्या भावंडांचा, शिक्षकांचा, मित्रांचा जीव तोडायचा का? एका अपयशासाठी एवढं मोठं आयुष्य संपवायचं का?

स्पर्धा परीक्षेत नापास झाल्यावर आईवडील, भावंड, मित्र मैत्रिणी, शिक्षक, नक्कीच नाराज होऊ शकतात. पण, टोकाचं पाऊल उचलताना ते सर्व तुमच्यावर प्रेम करतात, विश्वास ठेवतात, हे ही लक्षात घ्या की राव...

जे सध्या संघर्ष करत आहेत त्यांना - मी असं सांगू इच्छितो:
दुःखी होणं ठीक आहे.
रडणं देखील ठीक आहे.
पण हार मानणं ठीक नाहीय.

मित्रांनो, यश मिळेलच, आज नाही तर उद्या. पण त्यासाठी जगणं गरजेचं आहेच ना. अपयश आलं म्हणून आत्महत्या नको, कारण पुढचं पान तुमच्या यशाचं असू शकतं.

माझी तुमच्याकडे विनंती आहे:

जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर कुणाला तरी सांगा. मनात अंधार आहे, मदत मागा. विश्रांती घ्या. स्वतःला अजून एक संधी द्या. पुन्हा उभं राहा.

परीक्षेत नापास होणं म्हणजे 'नापास व्यक्ती' होणं नाही. तुम्ही गुणपत्रिकांपेक्षा जास्त आहात.

जर कोणीही तुम्हाला सांगितलं नसेल - तर मी तुम्हाला सांगतो: तुम्ही खूप मौल्यवान आहात. तुम्ही सक्षम आहात. तुम्ही एकटे नाही आहात.

आपल्या यशाचं एक दार बंद झालं तर दुसरं नक्की उघडेलच की राव.

शेवटी, एवढंच सांगतो:

परीक्षा म्हणजे शेवट नाही, आत्महत्या म्हणजे उपाय नाही,
कारण आयुष्य खूप सुंदर आहे… फक्त थोडं थांबून तर बघ.

"पिक्चर तो अभि बाकी हैं मेरे दोस्त"...!!!

जॉइन @tcs_pattern
5👌4
आज महाराष्ट्रभर इंजीनियरिंग विद्यार्थ्यांचा संघर्ष दिसून येतोय...
आपल्यातर्फे त्यांना शुभेच्छा लढ्याला यश येओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏

जॉईन @tcs_pattern
👍2
टंकलेखन मंजूर पदे 5223


१८/७/२०२५ रोजी काही अटींच्या अधीन राहून ५,२२३ टंकलेखक पदांच्या निर्मितीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

हा प्रस्ताव आता उच्चाधिकार समितीसमोर ठेवण्यात येईल आणि उच्चाधिकार समिती दोन आठवड्यांच्या आत सदर प्रस्ताव मंजूर करू शकते.

ही पदे भरण्यासाठी, उच्च न्यायालयाकडून नियम तयार करावे लागतील आणि त्यानंतरच ही पदे भरता येतील.



Join @tcs_pattern
2👌2
Who among following does not have members of national development council?
Anonymous Quiz
13%
Prime minister
47%
Chairman of finance commission
36%
Stare governors
4%
Minister of finance minister
खालीलपैकी कोणते कलम हे भारतीय आणीबाणीशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
7%
कलम ३४५-३५१
23%
कलम ३५२-३६२
70%
कलम ३५२-३६०
1%
कलम ३३४-३३८
2
कोणी स्त्रियांना भारतीय चळवळीत आणण्याचे कार्य केले?
Anonymous Quiz
20%
महात्मा फुले
36%
सरोजिनी नायडू
26%
महात्मा गांधी
17%
ऍनी बेझंट
१८५७. च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकाचे हिंदू सैनिकाशी ठेवलेलं प्रमाण किती होते
Anonymous Quiz
29%
१::२
37%
१::४
17%
१::८
17%
१::३
2
महाराष्ट्र मंत्रिमंडळात खात्यांचे फेरबदल.

कृषीमंत्री : दत्तात्रय भरणे

क्रीडा व युवक कल्याण मंत्री : माणिकराव कोकाटे.

आता मंत्री महोदयांनी रमी हा क्रीडा प्रकार अतिशय महत्त्वाचा क्रीडा प्रकार आहे असा GR काढू नये...🙏🙏

दुसरे म्हणजे माननीय मंत्र्यांचे खातेच क्रीडा असल्यामुळे रमी क्रीडा खेळणे हे त्या मंत्र्याचे इती कर्तव्य आहे असे समजावे... धन्यवाद
join @tcs_pattern
👌42
कोणती कंपनी किती कर्मचाऱ्यांना काढणार?

एकदा व्यवस्थित आकडेवारी पाहून घ्या. 😳

त्याच्यामुळे जीव तोडून अभ्यास करा. कारण प्रामाणिकपणे अभ्यास करून एकदा महाराष्ट्र शासनाचा Tag लावून घ्या . ❤️

जॉइन @tcs_pattern
👍71
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा कुणाचाच होत नाही किंबहुना किमानही होत नाही. परंतु जे करतात त्यांचे SELECTION मात्र फिक्स असतात...🙏🙏

मनातलं @tcs_pattern
🔥11💯2
आज थोडं Combine Group_B जाहिराती बद्दल बोलू..

आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या काही पद्धती आहेत.त्या पद्धती बाबतीत आपण आज थोडक्यात बोलू.

1. जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवसापासून अभ्यासाला लागणारे..

2. आयोगाने जेव्हापासून अंदाजित वेळापत्रक जाहीर केलं. तेव्हापासूनच अभ्यासाला लागलेलो..

3. आणखीन अभ्यास सुरू केला नाही. जोपर्यंत PSI,SR च्या जागा येत नाहीत. जागा आल्यानंतर अभ्यास सुरू करणार..

तुम्हाला काय वाटतं वरील 3 पर्यायांपैकी पुढे जाऊन कोण बाजी मारेल. तुम्ही वरील पर्यायांपैकी निवडला असेल असं अपेक्षित धरू. विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या जागा येणारच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सध्या अभ्यासावर लक्ष द्या. ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करायचे आवश्यकता आहे त्या गोष्टींसाठी एकजुटीने प्रयत्न करा. परंतु इतर गोष्टींसाठी वायपट वेळ खर्च करू नका. जर तुम्हाला या क्षेत्रात खरंच यश मिळवायचे असेल तर लक्षात असू द्या.

काळ्याकुट्ट अंधारात प्रकाशाची वाट पाहायची नसते. उलट प्रकाशालाच काळ्याकुट्ट अंधारात खेचून आणायचं असतं. म्हणजे आयुष्य प्रकाशमय होऊन जातं.🔥

बघा ज्याला पटतंय त्यांनीच घ्या.

join @tcs_pattern
5
राज्यभरात १५ ऑगस्टला माऊली महोत्सव
🔥21
OLD Reexam Team आज MAT मध्ये HEARING आहे. Update +ve
येतील अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
👍👍

सात जनतेची, विश्वासांचा महाराष्ट्राचा.
सदैव सोबत @tcs_pattern
1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

गट क मुख्य 2024 – 51 दिवस

MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस

गट ब पूर्व 2025 – 100 दिवस

गट क पूर्व 2025 – 120 दिवस

UPSC CSE 2026 – 297 दिवस


जॉइन @tcs_pattern
1
आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीवरील उमेदवारांच्या खात्याच्या केवायसीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
#STI
ओपन च्या 179 रिक्त.
किमान 100 येतील
असा प्राथमिक अंदाज आहे.👍👍👍

जॉईन @tcs_pattern
1👍1
महाज्योती MPSC सराव पेपर.pdf
26.5 MB
महाज्योती MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता 2023 मधे झालेल्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका

👉 एकूण 8 प्रश्नपत्रिका with answer मध्ये दिलेल्या आहेत

👉 येणाऱ्या सारथी,अमृत,बार्टी,टीआरटीआय,महाज्योती,या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत..

🔔 बरेच प्रश्न रिपीट होतात.

जॉईन @tcs_pattern
1