Devendra Fadnavis
4.23K subscribers
80.9K photos
13.6K videos
2.76K files
7.64K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
#LIVE
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. अनेक मंत्रीही उपस्थित होते.
त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे:

( माहितीसाठी पत्रकार परिषदेची लिंक : https://youtu.be/SdLJM33X-3I )

➡️ नागपुरात सर्वांचे अतिशय स्वागत करतो.विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि संपूर्ण विरोधी पक्षाचे नागपुरात स्वागत करतो.
3वर्षानंतर त्यांनाही नागपुरात येण्याची संधी मिळाली.आमचे सरकार आले नसते तर याहीवर्षी नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने कोरोना वर आला असता;अधिवेशन झाले नसते.

➡️ मला आज आनंद वाटला की अजितदादांना विदर्भाची आठवण आली. हीच आठवण त्यांना गेली 3 वर्षे आली असती तर? म्हणजे मुंबईत कोरोना नव्हता त्यामुळे अधिवेशन होत होते. पण त्याचवेळी नागपुरात कोरोना होता त्यामुळे अधिवेशन होत नव्हते, अशी विडंबना देखील त्या ठिकाणी आपण मागच्या काळात बघितलेली आहे.

➡️ आत्ताच मंत्रीमंडळाची बैठक झाली. दोन महत्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत.

➡️ विशेष उल्लेख केला पाहिजे - सातत्याने माननीय आण्णा हजारे हे मागणी करत होते की ज्या प्रकारे केंद्रात लोकपाल विधेयक झाले, तसा महाराष्ट्राचा लोकायुक्ताचा कायदा झाला पाहिजे. त्यासंदर्भात मागच्या काळात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना अण्णांना प्रमुख बनवून एक समिती तयार केली होती.

➡️ ती समिती काही सूचना करणार होती. मध्यंतरीच्या काळात सरकार बदलल्यानंतर गांभीर्याने त्यावर काम झालेले दिसत नाही. आता मात्र नवीन सरकार आल्याबरोबर आम्ही त्या समितीला चालना दिली. माननीय आण्णा हजारे यांच्या समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने स्वीकारला.

➡️ त्यानुसार नवीन लोकायुक्त कायदा तयार करण्याच्या विधेयकाला आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

➡️ आता याच अधिवेशनात नवीन लोकायुक्ताचे विधेयक मांडणार आहोत. पहिल्यांदा महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना देखील लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचे काम हे सरकार करणार आहे. मंत्रीमंडळ देखील लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहे.

➡️ आत्तापर्यंत अस्तित्वात असणारा लोकायुक्त कायदा होता,या कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा समावेशच नव्हता. त्यामुळे अँटीकरप्शन अँक्टला देखील या कायद्याचा भाग केले आहे. लोकायुक्त हे हायकोर्टचे जज किंवा हायकोर्टचे चीफ जस्टिस किंवा सुप्रीम कोर्टचे जज असतील.

➡️ त्यात आणखी दोन हायकोर्ट जज असणार आहेत. लोकायुक्तांची एक समिती तयार होईल. दोन जणांचा बेंच त्यात असेल. त्यामुळे राज्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासंदर्भात अतिशय महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

➡️ विदर्भाचा अनुशेष कोणी वाढवला या संदर्भातले सगळे आकडे या अधिवेशनातच मांडणार आहोत. पण एकच आकडा सांगतो. सुधीरभाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री असताना विदर्भातल्या जिल्ह्यांचे जे डिस्ट्रिक्ट प्लॅन होते, दरवर्षी डिस्ट्रिक्ट प्लॅन वाढला पाहिजे.

➡️ २०१९-२०चा जो डिस्ट्रिक्ट प्लॅन विदर्भाचा होता,7जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट प्लॅन हे अजितदादा पवार अर्थमंत्री झाल्यानंतर कमी केले. त्यानंतर परत कमी केले. त्यामुळे अन्यायाची मालिका तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि अजितदादा पवार अर्थमंत्री झाल्यानंतरच सुरु झाली.

➡️ मला आश्चर्य वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मांडणारे मांडीला मांडी लावून बसतात. आणि महापुरुषांच्या अपमानाबद्दल हे बोलतात?
वारकरी संतांबद्दल अतिशय हीन दर्जानी बोलले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, हे देखील माहिती नाही.

➡️ या संदर्भात बोलण्याचा अधिकार हा तुम्हाला नाही. महापुरुषांचा अवमान कोणीही करू नये. कोणीही नाही. छत्रपती शिवराय आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. आणि त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

➡️ या अधिवेशनात विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, मागास भागातल्या प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा होईल. आम्हाला चर्चा करायची आहे. विरोधकांना गोंधळ घालायचा असेल तर आम्ही चर्चेचा आग्रह लावून धरू. कारण इथे चर्चा झाली पाहिजे.

➡️ या अधिवेशनाकरता विरोधी पक्षाचे जे काही विषय असतील त्या विषयांना अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. नीट चर्चा करू. विदर्भ-मराठवाड्याला न्याय मिळवून देऊ.

➡️ गोसीखुर्दला टाईमबाऊंड पद्धतीने पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारने पैसा दिला. पहिल्यांदा गोसीखुर्द धरण पूर्ण भरले. त्याची सगळी कामे आपण सुरु केली. ती निर्धारीत वेळेत संपवत आहोत. काही कामे नंतर वाढली कारण मागण्या वाढल्या.
➡️ #LIVE:
DCM #DevendraFadnavis replied to various issues raised by many members in #VidhanSabha
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विविध विषयांवर उपस्थित केलेल्या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे:

( माहितीसाठी भाषणाची लिंक : https://youtu.be/hoes1iIYwvI )

➡️ विरोधी पक्षनेत्यांचे भाषण मी ऐकले, ते त्यांचे कमी आणि जयंत पाटील यांनी लिहून दिलेले अधिक होते.

➡️ How couldn’t you find that GR?
I had tweeted too. Now, you start following me on Twitter,Ajit dada.
वीज न तोडण्याचा आदेश तुम्हाला का नाही सापडला दादा, तो तर मी ट्विट केला होता.
आता तुम्ही मला ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे सगळी
माहिती तुम्हाला मिळेल.

➡️ आम्ही आमच्या काळात विदर्भासाठी काय केले?
गोसीखुर्द, टेक्सटाईल पार्क, दूध संकलन वाढले, विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना वीज सवलत, 27 पुलांची कामे, मेट्रो, आयआयएम आणि अन्य संस्था अशी कितीतरी कामे झाली.

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1171687863453268

➡️ Who had the possession of 3 district banks which got shut? Enquiry of scams of crores of rupees is on.
ज्या तीन जिल्हा बँका बंद पडल्या, त्या कुणाच्या ताब्यात होत्या.
हजारो कोटींचे घोटाळे त्यांनी केले, चौकशी सुरू आहे.यात विदर्भातील जनतेचा दोष नाही.

➡️ समृद्धी महामार्गाला जागा मिळते आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी नाही,असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला.
पण तो तर त्यांनी स्वतःला विचारायला हवा होता. त्यांच्या 2.5वर्षात एक जागा मिळाली नाही.आता आम्ही जागा शोधल्या आहेत.

➡️ Decision for use of DBT for OBC Community is being taken.
ओबीसीसाठी DBT ची योजना सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
वसतिगृह खाजगी व्यक्तीला चालवायला देणार नाही.

➡️ Why does Shri Bhujbal have so much objection against Vijay Wadettiwar? All his allegations are on Wadettiwar.
भुजबळांचा विजय वडेट्टीवार यांच्यावर इतका आक्षेप का? त्यांनी जे सर्व आरोप केले, ते सर्व विजय वडेट्टीवार यांच्यावरील.

➡️ सरासरी बिल पाठविण्याच्या प्रक्रियेत दुरुस्ती केल्यामुळे वसूली 7952 कोटी रुपयांनी वाढली.

➡️ ₹15,625 crore will be spent for electricity generation. ₹9842 for distribution infra.
9842 कोटी रुपयांची कामे वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रारंभ करण्यात आली आहेत.
15,625 कोटी रुपये निर्मितीसाठी खर्च होणार आहे.

➡️ All efforts are being made on priority basis, by this State Government to make electricity available to farmers in in day time too.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न राज्य सरकार करते आहे.

➡️ विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचे अतिशय चांगले काम आम्ही केले.
बळीराजा जलसंजीवनी योजना, केंद्र सरकारने मोठी मदत केली, सर्वाधिक प्रकल्प राज्याला मिळाले. केंद्राने मोठा निधी दिला.

➡️ 6 प्रकल्पांना सुप्रमा, 5 मंत्रिमंडळापुढे.
आपण 2.5 वर्षात एकही सुप्रमा दिली नाही.
कोरोनात सुप्रमा द्यायला काय हरकत होती?

➡️ MIHAN:Land is given to 49 projects. 80,000 people are given jobs. New airport too coming up.
मिहान: 49 प्रकल्पांना जमीन देण्यात आली आहे.
80,000 लोकांना आतापर्यंत रोजगार देण्यात आला आहे. नवीन विमानतळ हा मिहानचा महत्वाचा टप्पा, येत्या काळात ते काम सुरू करणार आहोत.

➡️ No stone will be left unturned for development of Vidarbha & Marathwada. Our Govt is determined for all round devpt!
विदर्भ आणि मराठवाडा विकासात एक रुपया सरकार कमी पडू देणार नाही.
सर्वांगिण विकासासाठी आमचे सरकार कटिबध्द असेल.

#WINTERSESSION #WinterSession2022 #WinterSession #DevendraFadnavis #AjitPawar #Maharashtra #Vidarbha #Marathwada
#LIVE:
DCM #DevendraFadnavis replied to various issues raised by many MLCs in #VidhanParishad
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विविध विषयांवर उपस्थित केलेल्या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे :

( माहितीसाठी भाषणाची लिंक : https://youtu.be/c9gcNyUTdS4 )

➡️ विदर्भाच्या विकासासाठी प्रस्ताव आणला आणि त्यावर अतिशय व्यापक चर्चा झाली, याबद्दल मी सर्वांचा अतिशय आभारी आहे.

➡️ मुंबई महाराष्ट्राला मिळण्यात जसे मुंबईचे योगदान आहे, तसे मुंबई महाराष्ट्रात येण्यात विदर्भाचे सुद्धा मोठे योगदान आहे.

➡️ 2014 ते 2019 या काळात विदर्भाला मोठा न्याय देण्याचा प्रयत्न केला. गोसीखुर्द पूर्णत्वास नेण्यासाठी मोठे योगदान दिले. 20 वर्षांपासून प्रलंबित प्रकल्पांना पूर्णत्वाकडे नेले.

➡️ समृद्धी महामार्ग करू, असे म्हटले तेव्हा लोकांनी प्रश्न उपस्थित केले. पोर्ट जोडणी हा विचार त्यामागे होता. विक्रमी काळात जमीन अधिग्रहण केले. 4-5 पट पैसे देऊन थेट जमीन खरेदी केली. बँकांनी निधी दिला. पुढच्या 4वर्षात विदर्भाचे चित्र पालटले असेल. हा संपूर्ण राज्याच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असेल. विदर्भ-मराठवाड्याची तर ती जीवनवाहिनी असेल.

➡️ गेल्या 6 महिन्यात अनेक निर्णय केले.
विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय मिळाला, तो वैधानिक विकास मंडळांमुळे. पण गेल्या सरकारने ते बंद केले. आता आम्ही ते पुनर्जिवित करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

➡️ ₹70,000 crore investment came into our #Maharashtra in last 6 months; I am happy to share that out of that, ₹44,000 crore investment is in Vidarbha and major part is in naxal affected Gadchiroli district.

➡️ गेल्या 6 महिन्यात राज्यात जी 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली, त्यातील 44,000 कोटी रुपयांची गुंतवणूक विदर्भात आली आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. यातील मोठी गुंतवणूक ही नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आहे.

➡️ Our next project is Nagpur to Goa Mahamarg, just like #SamruddhiMahamarg. Marathwada region will be its biggest beneficiary. All remaining Marathwada districts will be connected to it.

➡️ समृद्धीप्रमाणे आता नागपूर ते गोवा महामार्ग आपण बांधत आहोत. याचा सर्वात मोठा लाभ मराठवाड्याला मिळणार आहे. समृद्धी महामार्गापासून वंचित मराठवाड्यातील सारे जिल्हे यात जोडले जाणार आहेत.

➡️ शेतीशी संबंधित अनेक कंपन्या स्थापन करण्यात येणार; यासाठी ₹3000 कोटी.
पुढच्या 3 वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम.

➡️ 5220 गावात नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना तयार केली. 4000 कोटी रुपयांचा पहिला टप्पा झाल्यावर दुसऱ्या टप्प्यासाठी आता ₹6000 कोटी वर्ल्ड बँक देणार.

➡️ पैनगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्प आता आपण हाती घेत आहोत. अगदी बुलढाणा जिल्ह्यात पाणी पोहोचणार आहे. ₹82,000 कोटींच्या घरात हा प्रकल्प असेल. पुढील 3 महिन्यात परवानगी आणि 6 महिन्यात निविदा काढणार आहोत.

➡️ नवीन वस्त्रोद्योग धोरण राज्य सरकार तयार करणार आहे. विशेष वीज पॅकेज हा या धोरणाचा भाग असेल.

➡️ मागास भागातील उद्योगाचा अनुशेष दूर करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमून ती विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांचा अभ्यास करेल.

➡️ अतिवृष्टीची 6500 कोटी रुपयांची नुकसानभरपाई आपल्या सरकारने दिली. कदाचित आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी मदत आहे.

➡️ सिंदखेडराजा येथील आई राजमाता जिजाऊ प्राधिकरणासाठी कितीही निधी लागला तरी तो देण्यात येईल. निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

#DevendraFadnavis #WinterSession #VidhanParishad #Mumbai #Maharashtra #Vidarbha #SamruddhiMahamarg #investment #agriculture