Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.4K photos
12.8K videos
2.58K files
7.35K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

- 232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले, आतापर्यंत 800 परत
- त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय


मुंबई, 25 एप्रिल
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. शत्रूचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात कायमच सर्व राजकीय पक्ष राहिले, असेच या देशात आजवर झाले. स्व. अटलजींनी स्व. इंदिराजींना संपूर्ण पाठिंबा दिला होता. पण, उबाठाने जे छोटे मन दाखविले, त्याला या देशातील जनता कधीच माफ करणार नाही.

दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर आज तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून 416 महाराष्ट्रातील पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवाय, सुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतील, तसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

भारतामध्ये असलेल्या 'त्या' पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द, तसेच त्यांना तात्काळ निघून जाण्याचे आदेश...

(माध्यमांशी संवाद | मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

भारत में रह रहें 'उन' पाकिस्तानी नागरिकों का वीजा रद्द, उन्हें तुरंत देश छोड़ने का आदेश...

(मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai #PahalgamAttack
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

काश्मीरमध्ये अडकलेल्या, घाबरलेल्या पर्यटकांना परत आणतो आहोत...

(मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai #PahalgamAttack
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

देशहित के मामले में विपक्षी पार्टियों को देश कभी माफ नहीं करेगा...

(मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

...अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणे आणि उपहास करणे, हे देशाची जनता माफ करणार नाही.

( मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जो कहते हैं, वो करते ही हैं!

( मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis chairs review meeting of the 'Brihanmumbai Electricity Supply and Transport (BEST) Undertaking' 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमा'च्या आढावा…
CMO Maharashtra Tweets:

बेस्टसाठी ‘नवा प्लॅन’ उत्पन्नवाढीपासून थिअटरपर्यंत बहुपर्यायी योजना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमा'ची आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेळेवर होण्यासाठी अत्याधुनिक व वातानुकूलित बससेवा, प्रवाशांना बस कुठे आहे याची थेट माहिती मिळावी यासाठी जीपीएस प्रणाली, आणि उत्पन्नवाढीसाठी विविध सुधारणा राबवण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, उत्पन्न वाढीसाठी वांद्रे, दिंडोशी आणि देवनार येथील बस डेपोचा पुनर्विकास करताना व्यावसायिक गाळे, रहिवासी प्रकल्प यांचा समावेश करावा. विशेषतः मराठी सिनेमासाठी पाच ठिकाणी थिएटर उभारणीचा विचारही यावेळी मांडण्यात आला. बेस्टच्या आर्थिक स्थैर्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतुकीसाठी किमान तीन टक्के निधी राखून ठेवण्याची शिफारसही करण्यात आली.

सध्या बेस्टकडे 2783 बस असून त्यापैकी 875 इलेक्ट्रिक आहेत. 2027 पर्यंत सर्व बस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा मानस असून, त्यासाठी आणखी 2400 बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बस किती वेळात येणार याची माहिती अ‍ॅपमार्फत मिळावी यासाठी बेस्ट गुगलसोबत जीपीएसकरता करार करणार आहे. याशिवाय मेट्रो, लोकल, मोनोरेल आणि बस यांना एकत्र जोडणाऱ्या एकत्रित मोबिलिटी प्लॅटफॉर्मचा लाभ बेस्टला मिळणार आहे. बैठकीत बेस्ट व्यवस्थापनाने टोल माफी, सरकारी करमाफी आणि कर्मचाऱ्यांच्या थकबाकीबाबतही मागण्या मांडल्या, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Chaired a meeting with the Maharashtra Airport Development Company (MADC) Board of Directors in Mumbai, today. The meeting focused on fast-tracking the expansion and modernisation of key airports across the state, including Shirdi, Amravati, Latur, Karad, Nanded, Chandrapur, and Gadchiroli.
This is important to strengthen regional connectivity, ensure seamless air services, and prepare for major events like the Kumbh Mela.

Approval was given for the construction of 2 helipads and 8 parking lots at Shirdi Airport, alongside a significant expansion in anticipation of the Nashik-Trimbakeshwar Kumbh Mela. Ozar and Shirdi would be key airports for Kumbh Mela.
Acknowledging the growing industrial importance of Amravati, directed the extension of the runway with a focus on boosting revenue.
Latur Airport will undergo rapid development, benefiting surrounding districts such as Beed and Dharashiv, while Karad Airport will be upgraded with night landing facilities to improve accessibility.

Additionally, highlighted the need to expand the runway for chartered aircrafts at Chandrapur Airport and explore alternative sites for Gadchiroli Airport.
Currently, Maharashtra operates 16 routes under the Regional Connectivity Scheme, with 8 new proposals already submitted to the Central Government. The meeting also included a review of progress on airports in Ratnagiri, Akola, Kolhapur, Nanded, Dhule, Solapur.

DCM Eknath Shinde ji, and other senior officials were present in this meeting.

#Maharashtra #Mumbai #Aviation

https://x.com/Dev_Fadnavis/status/1915804130670706900
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of Maharashtra Airport Development Company (MADC) Board of Directors 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची बैठक 🔸मुख्यमंत्री…
CMO Maharashtra Tweets:

शिर्डी विमानतळाचा कुंभमेळ्यासाठी विस्तार तर अमरावती, कराड विमानतळ प्रकल्पांना गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची 91 वी बैठक पार पडली.

बैठकीत शिर्डी, अमरावती, लातूर, कराड, चंद्रपूर व गडचिरोलीसह राज्यातील विविध विमानतळांच्या विस्तारीकरण व विकास कामांना गती देण्यावर भर देण्यात आला. कुंभमेळा, प्रादेशिक जोडणी योजना आणि हवाई सेवांची उपलब्धता लक्षात घेऊन विमानतळांमध्ये आधुनिक सुविधांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे 2 हेलिपॅड व 8 वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मान्यता दिली. अमरावती येथे वाढत्या औद्योगिक विस्तारामुळे धावपट्टी वाढवावी लागणार असून येथे महसूलवाढीच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

लातूर विमानतळाचा विकास करावा यामुळे बीड व धाराशिवसारख्या जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल, कराड येथील विमानतळाचा वेगाने विकास करून नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करावी. चंद्रपूर विमानतळावर चार्टर्ड विमानांसाठी धावपट्टी वाढविण्यात यावी आणि गडचिरोली विमानतळासाठी दोन-तीन पर्यायी जागांचा विचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यात सध्या प्रादेशिक जोडणी योजनेंतर्गत 16 मार्गांवर विमानसेवा सुरू असून 8 नवीन प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. यावेळी रत्नागिरी, अकोला, कोल्हापूर, नांदेड, धुळे आदी विमानतळांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding 'Unified Metropolitan Transport Authority (UMTA) Bill, 2025' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी (UMTA) बिल, 2025'च्या…
CMO Maharashtra Tweets:

शहरातील परिवहन सेवेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी (UMTA) बिल, 2025'च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.

नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनि फाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या प्राधिकरणाच्या कायद्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती घेण्यात येणार आहे.

राज्यातील महानगरांच्या शहरी क्षेत्रातील वाहतूक प्रकल्पांचे नियोजन, नियमन आणि बजेट तयार करण्याच्या पद्धतीमध्ये यूएमटीएची स्थापना एक परिवर्तनकारी पाऊल असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बऱ्याच कालावधीपासून शहरी वाहतूक व्यवस्था अनेक वेगेवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, मेट्रो आणि रेल्वे यांनी स्वतंत्रपणे आपापल्या व्यवस्था स्थापित केलेल्या आहेत. अनेक यंत्रणांच्या या बहुविविधतेमुळे अनेकदा जबाबदाऱ्यांमध्ये समन्वय, आव्हाने आणि प्रकल्प अंमलबजावणीत विलंब होतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये विविध यंत्रणांमार्फत कार्यरत असलेल्या परिवहन सेवा एकत्रित व सुसूत्र करण्यासाठी हे प्राधिकरण उपयुक्त ठरणार आहे. त्यात 'मुख्य कार्यकारी अधिकारी' स्वतंत्र पद असावे तसेच महापौर, मनपा आयुक्त यांच्याही त्यात समावेश असावा. या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध सेवा एकाच भाड्यात उपलब्ध होतील आणि नियोजन एकसंध राहील. हे करताना राज्य व केंद्र सरकारच्या नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

शहरातील सुरू असलेल्या प्रकल्पांना वेग देणे, एकच नियामक यंत्रणा तयार करणे आणि 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' सुनिश्चित करणे या प्राधिकरणाच्या कामाचे केंद्रबिंदू असतील. प्रत्यक्ष अंमलबजावणी महापालिकेकडे राहील, तर नियोजन आणि सल्लागार भूमिका हे प्राधिकरण पार पाडेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

UMTA for seamless city commutes

Chaired a review meeting regarding 'Unified Metropolitan Transport Authority (UMTA) Bill, 2025' in Mumbai today.

The establishment of UMTA will be a transformative step in the way we plan, regulate, and budget for multiple urban transport projects across our metropolitan regions. For years, the urban transport systems have been fragmented—managed separately by municipal corporations, state transport undertakings, metro rail corporations, and railways. This multiplicity of agencies has often resulted in overlapping responsibilities, coordination challenges, and delayed project execution.

With UMTA, we are introducing a unified institutional framework that will bring all these bodies under one umbrella. Our goal is to ensure seamless integration of various modes of transport, leading to smoother operations, a unified fare system, and enhanced service delivery for our citizens. It is a need for efficient, modern urban mobility.

Directed officials to move forward with the process of formal establishment of UMTA. A dedicated Chief Executive Officer (CEO) and an executive committee will be appointed to oversee the functioning of the authority.

One of the most vital aspects of UMTA will be its partnership with local governance.

With this initiative, we aim to eliminate institutional redundancies, streamline transport infrastructure, and most importantly, make urban commuting easier and more accessible for every citizen. UMTA will pave the way for a more connected, efficient, and citizen-centric transport ecosystem in Maharashtra.

DCM Eknath Shinde ji and other senior officials were present during this meeting.

#Maharashtra #Mumbai #UrbanTransport

https://x.com/Dev_Fadnavis/status/1915833977119871311
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 25 एप्रिल 2025

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता
https://mahasamvad.in/163409/

नागरिकांच्या 'इज ऑफ लिव्हिंग' साठी शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- शहरांमधील परिवहन सेवेच्या विकासासाठी स्वतंत्र एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण
- प्राधिकरण स्थापन करण्याचा कायदा करण्यापूर्वी हरकती,सूचना मागवा
https://mahasamvad.in/163400/

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून 'बेस्ट' व्हावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक
https://mahasamvad.in/163392/

२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/163457/

#Maharashtra #DevendraFadnavis