Devendra Fadnavis
4.39K subscribers
83.9K photos
14.7K videos
3K files
8.08K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between:
🤝 MoU 1
School Education Department, Government of Maharashtra and the Sri Sri Rural Development Programme Trust (SSRDPT)

🤝 MoU 2
School Education Department, Government of Maharashtra and Khan Academy India

Minister Dadaji Bhuse, MoS Adv Ashish Jaiswal, MoS Dr Pankaj Bhoyar and other concerned officials were present.

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेले सामंजस्य करार:
🤝 सामंजस्य करार 1
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्री. श्री. ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट (SSRDPT)

🤝 सामंजस्य करार 2
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि खान अकॅडमी इंडिया

यावेळी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

ऑपरेशन सिंदूर पर कांग्रेस का पाकिस्तान के सुर में सुर!

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कल सिलसिलेवार तथ्यों के साथ ‘ऑपरेशन सिंदूर’ की सच्चाई पूरे देश के सामने रखी। चौंकाने वाली बात यह है कि कांग्रेस के नेता वही शब्द, वही तर्क दोहरा रहे हैं, जो पाकिस्तान के नेता बोलते हैं।
प्रधानमंत्री मोदी जी ने जो कहा था, वह सच साबित हो रहा है। देश जान चुका है कि राष्ट्रीय सुरक्षा से जुड़े मुद्दों पर भी कांग्रेस की सोच कितनी भ्रमित और आत्मघाती है।

(पत्रकार परिषद | मुंबई | 30-7-2025)

#Maharashtra #BJP #OperationSindoor
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding important projects of the Water Resources Department. Minister Girish Mahajan and Minister Radhakrishna Vikhe Patil and other concerned officials were also present. 🔸मुख्यमंत्री…
CMO Maharashtra Tweets:

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे जलसंपदा विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक पार पडली.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करत आहे. शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांसाठी तब्बल 18 वर्षांनंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करून शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच पुनर्वसन झालेल्या गावातील अंतर्गत रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी रस्ते सिमेंट काँक्रीटचे करावेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंद नाले असावेत. तसेच, भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पाण्याच्या स्रोतांचे योग्य नियोजन करून योजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले. यासोबतच पुनर्वसित गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधा दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करावी, अशा सूचनाही दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील काळू नदी प्रकल्प हा महानगरांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे काम वेगाने पूर्ण करावे, जेणेकरून शाश्वत पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल. प्रकल्पामध्ये येणाऱ्या वनजमिनींसाठी पर्यायी जमिनींचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी यांनी सादर करावेत. तसेच झाडांच्या नुकसानीचा सर्वे करून त्या बदल्यात संबंधित जिल्ह्यात वनीकरण करावे.

जिल्हाधिकारी यांनी प्राधान्याने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी भूसंपादनाला गती द्यावी. प्रकल्प पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार असून शेतीला दीर्घकाळासाठी सिंचन मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होईल. तसेच, जिगाव प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांचा थोडक्यात आढावा

राज्यात जलसंपदा विभागांतर्गत सध्या 57 प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी एकूण 1,06,513 हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यापैकी 27,755 हेक्टर जमिनीचे भूसंपादन प्रलंबित आहे. या प्रकल्पांमुळे एकूण 210 गावठाणांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. यापैकी 116 गावठाणांचे पुनर्वसन पूर्ण झाले असून, उर्वरित 94 गावठाणांमध्ये पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात 6,68,267 हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण होणार असून 78.90 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होईल.

या बैठकीस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरिश महाजन व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Driving Progress That Strengthens Farmers !

Chaired a review meeting regarding important projects of the Water Resources Department in Mumbai, today.
The strength of Maharashtra lies in its farmers and the prosperity of its villages. To take this strength further, key irrigation projects are being taken up with urgency and focused planning. Fresh tenders have been issued and clear instructions given to ensure swift execution and lasting support where it matters most in the fields.

District collectors have been directed to expedite land acquisition, with special focus on the next phase of the Jigaon Irrigation Project.
The Kalu River Project in Thane is being advanced to meet the growing water needs of urban areas, while across the State, 57 major irrigation works are in progress to strengthen rural Maharashtra. From forest clearances to afforestation, all related matters are being addressed to ensure timely progress. These efforts will bring more water, better harvests, and lasting support to both cities and villages.

In rehabilitated villages, lasting solutions are being prioritised. Internal roads will be built with cement concrete, closed drainage systems will ensure proper sanitation, and water supply is being carefully planned to avoid future water scarcity. A new approach is also being adopted to complete all civic amenities with quality and help families settle with stability.

This is how transformation is being driven. With speed, focus, and a strong resolve to improve every farmer’s life.

Minister Girish Mahajan, Minister Radhakrishna Vikhe Patil ji and other concerned officials were also present.

#Maharashtra #Irrigation #Mumbai

https://x.com/Dev_Fadnavis/status/1950556543948345728
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹20,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आमदार सत्यजित देशमुख यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹1,10,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund