Devendra Fadnavis
4.22K subscribers
80.9K photos
13.6K videos
2.76K files
7.64K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

नव-नवीन संशोधनामार्फत लोकांना मधुमेहाच्या भीतीतून बाहेर काढण्याचे काम...
नए-नए अनुसंधानों के कारण लोगों को डायबिटीज के डर से बाहर निकालने का काम...

(हेलो डायबिटीज कॉन्क्लेव | नागपुर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #DiabetesAcademia2025
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

संपूर्ण पिढी 'मधुमेह आणि उच्च रक्तदाब'ने ग्रस्त होत आहे...
'डायबिटीज और हाइपरटेंशन' से पूरी पीढ़ी हो रही है ग्रसित...

(हेलो डायबिटीज कॉन्क्लेव | नागपुर | 7-6-2025)
#Maharashtra #Nagpur #DiabetesAcademia2025
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आपल्या इनोव्हेशनमधून देशसेवा करणार्‍या डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन...
अपने इनोवेशन से देश की सेवा करने वाले डॉ. प्रमोद चौधरी इनके पुस्तक का प्रकाशन...

('पैलतीरावरून...' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 7-6-2025)
#Maharashtra #Pune #BookLaunch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पुस्तकाच्या माध्यमातून आपली वाटचाल अतिशय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न...
पुस्तक के माध्यम से अपनी यात्रा को बेहद प्रामाणिकता से प्रस्तुत करने का प्रयास...

('पैलतीरावरून...' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 7-6-2025
#Maharashtra #Pune #BookLaunch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

20% इथेनॉल ब्लेंडिंगमार्फत ₹1 लाख कोटींच्या परकीय चलनाची बचत...
20% इथेनॉल ब्लेंडिंग के माध्यम से ₹1 लाख करोड़ के फॉरेन एक्सचेंज की बचत...

('पैलतीरावरून...' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 7-6-2025
#Maharashtra #Pune #ForeignExchange
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

साखर उद्योग वाचविण्यामागे 'प्राज इंडस्ट्री'चे योगदान...
शक्कर उद्योग को बचाने में 'प्राज इंडस्ट्री' का योगदान...

('पैलतीरावरून...' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 7-6-2025)
#Maharashtra #Pune #SugarIndustry
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

ग्रीन इथेनॉल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) क्रांतीच्या पाठीशी...
ग्रीन इथेनॉल और कॉम्प्रेस्ड बायोगैस क्रांती (CBG) के पीछे...

('पैलतीरावरून...' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 7-6-2025
#Maharashtra #Pune #GreenEthanol
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

साखरेपासून जैवविघटनशील प्लॅस्टिकची निर्मिती भविष्यासाठी महत्वाची...
शक्कर से बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बनाना भविष्य के लिए महत्वपूर्ण...

('पैलतीरावरून...' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 7-6-2025
#Maharashtra #Pune #BiodegradablePlastic
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

भारताच्या तंत्रज्ञानातील वाटचालीचा 'रोडमॅप'!
'जे पुढच्या पिढ्यांसाठी काही करून जातात त्यांनाच जग लक्षात ठेवते...!'

भारत की तकनीकी यात्रा का 'रोडमैप'!
'जो आने वाली पीढ़ियों के लिए कुछ करके जाते हैं, उन्हीं को दुनिया याद रखती है...!'

('पैलतीरावरून...' पुस्तकाचे प्रकाशन | पुणे | 7-6-2025
#Maharashtra #Pune #BookLaunch
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of 'Hello Diabetes 12th Academia 2025 International Conclave' at the hands of CM Devendra Fadnavis 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'हॅलो डायबिटीजच्या 12 व्या ॲकॅडेमिया 2025 इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह'चे उदघाटन 🔸
CMO Maharashtra Tweets:

नव्या संशोधनाच्या आधारे होईल मधुमेहाचे व्यवस्थापन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘'हॅलो डायबिटीज 12 व्या ॲकॅडेमिया 2025 इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह’ या मधुमेहावरील जागतिक आरोग्यसंवादाचे उदघाटन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मोहीम व इतरही अनेक उपक्रम सुरु केले, बालकांच्या लठ्ठपणावर, बालकांच्या आहारसवयींवर कार्यक्रम सुरु केले, हे महत्त्वाचे आहे. कारण, आपल्या पारंपरिक जीवनपद्धतीच्या अवतीभवती आपली आहारपद्धती तयार झाली होती. पण आपली पारंपरिक जीवनपद्धती बदलल्यानंतर आहारपद्धतीही बदलली. यामुळे शरीरावर परिणाम होऊन मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे.

मधुमेहाच्या बाबतीत जवळपास रुग्ण डिनायल मोडमध्ये असतात. पण, अन्य एखाद्या आजाराच्या उपचारावेळी रक्तातील शर्करेचे प्रमाण तपासले जाते तेव्हा संबंधितांना मधुमेह असल्याचे समजते. मात्र, संबंधित रुग्ण ते मान्य करायला तयार नसतात. खरे म्हणजे मधुमेह व्यवस्थापन करता येण्यासारखा आजार आहे. योग्य औषध, योग्य अन्न, योग्य पोषक घटकांचे सेवन केल्यास मधुमेहाचे व्यवस्थापन आपण करु शकतो. पण यासंदर्भातील जनजागृतीमध्ये मोठी कमतरता जाणवते. मधुमेहामुळे इतरही अनेक आजार होतात व ते रुग्णाला आतून पोखरतात. त्यामुळे याबाबतीत जनजागृतीचे कार्य केले पाहिजे. गरोदर स्त्रियांना व त्यातून पुढे नवजात बालकांना होणारा मधुमेह रोखण्याचे आव्हान तज्ज्ञांसमोर आहे. येथील चर्चेद्वारे सकारात्मक निष्कर्ष प्राप्त झाल्यास येणारी पिढी निश्चितच मधुमेहमुक्त राहील.

मधुमेह व जीवनपद्धतीशी संबंधित आजारांबाबत मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असून लोकांना त्याचा फायदा होत आहे. यामुळे लोकांना 'डिनायल मोड'मधून, भीतीमधून बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. शहरीकरणामुळे मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या आजारांनी संपूर्ण पिढ्या ग्रासल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘12 व्या हॅलो डायबिटीज ॲकॅडेमिया 2025 इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये मधुमेहावर व्यापक चर्चा होईल, नवे संशोधन, नव्या उपचारपद्धती सामायिक केल्या जातील व मधुमेहाविरोधातील लढाईत एक पाऊल पुढे टाकले जाईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी ‘12 व्या हॅलो डायबिटीज ॲकॅडेमिया 2025 इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #DiabetesAcademia2025