" छञपती श्री शिवाजी महाराज "
3.28K subscribers
4.05K photos
116 videos
458 files
3.24K links
Download Telegram
आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

📜१४ ऑगस्ट इ.स.१६४९
पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली....

शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला....

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १४ आॅगस्ट इ.स.१६५७
"किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १४ ऑगस्ट इ.स.१६६०
शास्ताखानाने किल्ले चाकणवर सुरुंगामार्फत हल्ला केला, किल्ल्याचा बुरुज ढासळला व लढाईस तोंड फुटले.

राजं तीकडं पन्हाळ्यावर अडकून पडल्याती, इकडे या खानाने रयतेत डुकरावाणी हैदोस घातलायती त्यामुळे रसद मिळत न्हाय किल्लेदार. बातमी घेऊन आलेल्या नाईकांच्या माणसाने फिरांगोजीना बातमी दिली. स्वराज्य दुहेरी संकटात सापडले होते विजापुरी सरदार सिद्दी जौहर. पन्हाळ्याला वेडा देऊन बसला होता, आणि औरंगजेबाचा मामा शास्ताखानाने चाकणच्या संग्रामदुर्गाला वेटोळे मारले होते. पुण्यापासून चाकण पावेतो सर्व भाग शास्ताखानाने व्यापला होता. त्यामुळे चाकण किल्ल्याला (किल्लेदार-फिरांगोजींना). मदत मिळत नव्हती. राजगडावर जिजाऊ साहेब चिंतेत होत्या. शास्ताखानास संग्रामदुर्गाला वेढा देऊन ५०चे वर दिवस झाले होते. पण किल्ला तो वश होत नव्हता. जमिनीवरील हा किल्ला, किल्ला किल्ला तो कसला ती एक गढीच. जास्तीत जास्त ४०० - ५०० मावळे राहू शकतील एवढे ते आवार, हा छोटेखानी एक दिवसात घेऊ याच ऐटीत २१ जून १६६० रोजी खानाने वेढे दिले पण किल्ल्यातील मराठ्यांनी मोगलांशी एकाकी झुंज मांडली होती. मराठ्यांचे धैर्य तिळमात्र ही कमी झाले नव्हते. किल्लेदार फिरंगोजी मोठ्या धीराचा माणूस. कुठलीही मदत न मिळता, हा माणूस इतके दिवस तग धरून होता. मोगल आणि मराठे यांच्यात सतत छोटीमोठी झुंबड होत असे. पण आता शास्ताखानाने कच खालली होती. अल्लाला दोष देण्याच्या कार्यक्रमाचा त्याचा सपाटाच चालू होता. "या अल्ला इतने दिन हो गये लेकिन ये छोटासा किला हासिल नही होता तो उस सिवाजी के पहाडी किले तो हमारी जान निकाल देंगे". एक दिवस त्याने आपल्या शामियान्यात प्रमुख सरदारांसमवेत एक गुप्त मसलत केली. बेत ठरला किल्ल्याच्या एका बुरुजापर्यंत गुप्त सुरंग खोदून त्यात दारू भरायची आणि बार उडवून टाकायचाअसा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे ते काम मात्र मोगल सैनिकांनी अतिशय शिस्तीत केले. किल्ल्यातील मराठ्यांना याची काडीमात्र खबर नव्हती. मंगळवार दि. १४ ऑगस्ट १६६०. रोजी सुरुंगात दारूगोळा भरला आणि आणि दिली वात पेटवून सुरसुर करत ती वाताडी पेटत बुरुजाच्या दिशेने निघाली. आणि क्षणार्धात एकच धमाका उडाला. बुरुजावरील मराठे आकाशात उडाले. हे पाहून शास्तेखानाला स्फुरण चढले. त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली. खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. खानच्या सैन्यास ते पुढे सरकू देत नव्हते. मारःयान्नाचा आवेश एवढा विलक्षण होता की, अशा विपरीत व प्रतिकूल स्थितीतही पुढे येण्याची हिंमत नव्हती. उण्यापुर्‍या ३०० ते ५०० मावळ्यांनी २०००० पेक्षा जास्त सैन्याला समोरासमोरच्या युद्धातही १२ तासांपेक्षा जास्त वेळ. थोपवून ठेवले. शमसुद्दीन खान व राव भावसिंह यांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण मराठ्यांनी या दिवशी संग्रामदुर्ग हातातून जाऊन दिला नाही. पराक्रमाची शर्थ व प्रयत्नांची शिकस्त करूनही आता मराठा लढू शकत नव्हता अन् समोरून येणारा. लोंढा कमी होत नव्हता. राजे म्हणत,'आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी' जणू हे शब्दच फिरांगोजींना आठविले असावेत. आणि म्हणूनच फिरंगोजी नरसाळा यांनी भावसिहांच्या मध्यस्तीने १५ ऑगस्ट १६६० रोजी किल्ला खानाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. सर्व फौजेला घेऊन ते थेट राजगडी आले. महाराज तोपर्यंत वेढ्यातून सुटून राजगडी पोचले होते. किल्ला हातचा गेला तरी राजे फिरांगोजींवर नाराज झाले नाहीच उलट आनंदाने, त्यांची पाठ थोपटून त्यांचे सांत्वन केले आणि भूपाळगडाची किल्लेदारी राजेंनी फिरांगोजीस बहाल केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ ऑगस्ट इ.स.१६६६
शिवाजीराजांची 'मिठाई'
तिथीने त्या दिवशी श्रावण वद्य नवमी होती. श्रीकृष्णजन्मोत्सव चालुच होता. त्यानिमित्ताने शिवाजीराजांनी ते जिथे कैद होते तिथुनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आग्र्यामधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली. एवढेच काय तर बादशाही वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली. मात्र त्याआधी अर्थातच बादशहा औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली. बादशहाने पहार्यावरच्या दरोग्याला विचारले 'सीवा मिठाई कशाबद्दल वाटणार आहे?' त्यावर उत्तर मिळाले की,'सीवाचे पुर्वीपासुनच व्रत चालु आहे. अटकेत असला तरी तो ते व्रत पाळतो. बादशहांनी परवानगी दिली तर ठीक नाहीतर तो ते व्रत नाही पाळणार'

औरंगजेबाला काय वाटले कोण जाणे पण, त्याने ही परवानगी लगेच दिली. 'शुभश्च: शिघ्रम' लगेच पेटारे बाहेर जायला सुरूवात झाली. एक माणुस आत सहज बसु शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायची. पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहार्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडुन पाहिले. त्यात खरच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले. १७ तारखेपर्यंत असे किती वेळा मिठाईचे पेटारे तिथुन बाहेर गेले हे नेमक समजत नाही पण, पहारेकरी फक्त पहिले एक दोनच पेटारे उघडून पहायचे. थोडक्यात पेटार्यांकडे मुघलांचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शिवाजीराजांचे मात्र या पेटार्यांकडे बारीक 'लक्ष' होते. ९ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगसोबत रोज दरबारात जातच होते.
ही खाल्लेली मिठाई मुघलांना आत्ता जरी गोड लागत असली तरी, लवकरच ती त्यांना 'बाधणार' होती. काहींना तर ती न खाताच बाधणार होती.
याच सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडजवाहीर व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच मूलचंद सावकाराच्या लोकांसोबत इकडे राजगडावर रवाना केले. त्याकाळी असे व्यवहार देशभर होयचे. तसेच, शिवाजीराजांनी कवींन्द्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती, घोडे, पालख्या पाठवुन दिल्या. याच परमानंदांनी पुढे 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातुन आपल्याला शिवचरित्राची महत्वाची माहिती मिळते.
औरंगजेब हे सगळ होऊ देत होता कारण जितके महाराज व संभाजी एकटे पडतील तितके त्याच काम सोप होणार होत.
महाराजांची आता तयारी चालु झाली होती. 'मुहुर्तघटिका' जवळ आली होती. आता फक्त नियोजन कस करणार यावरच, शिवाजीराजे, संभााजीराजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १४ ऑगस्ट इ.स.१६७९
खांदेरी किल्ला बांधकामास सुरुवात
जंजिऱ्याचा सिद्दी आणि इस्ट इंडिया कंपनीचे मराठ्यांविरोधात कायमच सख्य असे. या दोन रिपु सत्तांमध्ये पाचर मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी १४ ऑगस्ट १६७९ रोजी खांदेरी वर किल्ला बांधयास सुरुवात केली. यावरून मराठे आणि इस्ट इंडिया कंपनीमध्ये नाविक युद्ध भडकले.
हे युद्ध जानेवारी १६८० पर्यंत चालू होते. सिद्दी व इंग्रज या दोन्ही आरमाराना तोंड देत देत अखेर मराठ्यांनी खांदेरी बेट जिंकलेच व तिथे किल्ला बांधला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १५ ऑगस्ट इ.स.१६५६
छत्रपती शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! छत्रपती शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक. या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई. हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला.
छत्रपती शिवाजीराजांना सकवारबाईंपासुन कमलाबाई नावाची एक मुलगी होती. महाराजांना त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाईंपासुन एक मुलगी होती तिलाही सकवारबाई किंवा सखूबाई असे म्हणत.गायकवाड घराण्यातील सकवारबाई या शिवाजीराजे व त्यांच्या इतर सात राण्यांच्या निधनानंतरही हयात होत्या. नोव्हेंबर १६८९ मधे मुघलांनी रायगड जिंकल्यानंतर राजपरिवारातील जी लोक कैद झाली त्यात सकवारबाईही होत्या. त्या पुढे तब्बल ३० वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या.१७१९ मधे मराठ्यांनी जी दिल्लीवर स्वारी केली त्यादरम्यान सकवारबाईंची सुटका झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १५ ऑगस्ट इ.स.१६६०
दख्खनच्या सुभेदारीवर आलेल्या शाहीस्तेखानने आल्या आल्या चाकणच्या भुईकोट किल्ल्याला वेढा दिला होता. खानाच्या प्रचंड सैन्यबळामुळे किल्ल्याला कोणतीही रसद पुरवता येणे शक्य नव्हते.तरीही अवघ्या ५०० सैन्यानिशी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला महिना उलटून गेला तरी लढत ठेवला होता. हतबल झालेल्या खानाने १४ ऑगस्टला ईशान्येकडील बाजूने एक भुयार खणून त्यात दारूगोळा भरून त्याला बत्ती दिली,त्यासरशी प्रचंड स्फोट होऊन बुरुज उडाला, बुरुजावरील मराठे मारले गेले,पडलेल्या भगदाडातून आत शिरू पाहणाऱ्या २० हजार पेक्षा जास्त मोगली सैन्याला अवघ्या ५०० मावळ्यांनी १२ तासापेक्षा जास्त वेळ थोपवून धरले.दुसरा दिवस उजाडला,मुघलांनी निर्वाणीचा हल्ला केला,कडवा प्रतिकार करूनही बरेच मराठे सैनिक मारले गेले.तरीही त्यांनी २६८ मुघल सैन्य ठार केले तर ६०० च्या वर जखमी केले होते.अखेर ५५ दिवसांनी फिरंगोजीनी नुकसान टाळण्यासाठी भावसिंहाच्या मध्यस्तीने किल्ला खानाच्या हवाली केला.खानाने किल्ला ताब्यात घेऊन उझबेगखानाला किल्ल्याची जबाबदारी दिली.चाकणचा संग्रामदुर्ग मुघलांच्या हाती गेला ती तारीख होती १५ ऑगस्ट इस.१६६०

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १५ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्रा कैदेत छत्रपती शिवाजी महाराजांना बादशहाच्या अंतस्थ गोटातून बातमी समजली की त्यांना विठ्ठलदासच्या हवेलीत नेऊन मारण्यात येणार आहे.बातमी समजताच महाराज कैदेतून निसटण्याची योजना तयार करू लागले.श्रावण जन्माष्टमी ची रात्र संपून वद्य नवमी उजाडली.महाराजांनी आपल्या योजनेप्रमाणे बादशहाची परवानगी घेऊन मिठाईचे पेटारे शहरातल्या प्रतिष्ठित लोक आणि दरबारातील वजिराकडे पाठवणे सुरू केले.सुरुवातीला पहारेकऱ्यांनी चौकशी केली पण नंतर ती गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली.या दरम्यानच महाराजांनी आपल्याजवळील किमती जडजवाहीर,मोती,सोन्याच्या मोहरा,होन या वस्तू मुलचंद सावकारामार्फत राजगडाकडे पाठवून दिले. आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या ती तारीख होती श्रावण वद्य नवमी म्हणजे बुधवार १५ ऑगस्ट १६६६

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १५ ऑगस्ट इ.स.१७९७
तुकोजीराव होळकरांचे निधन
मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च इस १७६७ रोजी मरण पावल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी त्यांची आई अहिल्याबाई (कार. १७६७–९५) यांच्यावर पडली. त्यांनी स्वामिनिष्ठा, कर्तव्यतत्परता, धर्मशीलता इत्यादी गुणांच्या साह्याने संस्थानचे रक्षण करून मल्हाररावाचा मानसपुत्र तुकोजीराव यांस सेनापतिपद दिले. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानची सर्वांगीण प्रगती झाली. तुकोजीरावांनी पेशव्यांना १७६९ च्या जाट व रोहिल्यांविरुद्ध, १७७८-७९ च्या इंग्रजांविरुद्ध, १७८६ च्या टिपूविरुद्ध, १७९५ च्या निजामाविरुद्ध, या मोहिमांत नुसती मदतच केली असे नाही, तर काही वेळा सेनानायक हे पदसुद्धा भूषविले. पेशवाईच्या उत्तरार्धात तर त्यांनी बारभाईंच्या कारस्थानात प्रत्यक्ष भाग घेऊन मराठी साम्राज्याची घडी पूर्ववत बसविण्याचे प्रयत्न केले. पुण्याजवळील वानवडी येथे १५ ऑगस्ट १७९७ रोजी ते मरण पावले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १५ आॅगस्ट इ.स.१९४७
#भारतीय_स्वातंत्र्य_दिन
१५१ वर्षे गुलामगिरीच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला भारत देश असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे स्वतंत्र झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १६ ऑगस्ट इ.स.१२७५
श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन
दि.१६ आॅगस्ट इ.स.१२७५ रोजी मराठी भाषेतील श्रेष्ठ तत्वज्ञ आणि प्रतिभावंत कवी श्री. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्याकाठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्तघेतले. [१]
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्य रचना करताना बापविठ्ठलसुत, बापरखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावे ही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी: आदिनाथ >मच्छिंद्रनाथ >गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तीनाथ > ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी , भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्वज्ञ होते. भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) अमृतानुभव ,चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्य रचना आहेत. अध्यात्म आणि तत्वज्ञानविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना अध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १६ ऑगस्ट इ.स.१६६२
१६६१ साली दसरा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज विश्रांतीसाठी श्रीवर्धनगडावर गेले.विश्रांतीनंतर नोव्हेंबर महिन्यात ते राजगडावर परत आले.स्वराज्यात धुमाकूळ घालणाऱ्या शाहिस्तेखानाच्या फौजेवर सुपे भागात सरनौबत नेताजी पालकर गनिमी काव्याने हल्ला करत होते.स्वतः शिवाजी महाराज मुघलांच्या ताब्यात गेलेली कल्याण भिवंडी परत घेण्याचा प्रयत्नात होते.कल्याणला यावेळी नामदारखान हा मोगली सुभेदार होता.महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला पण महाराजाना तिथून मागे फिरावे लागले.महाराजांनी एप्रिल महिन्यात राजगडावर आल्यावर आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत मोरोपंत पिंगळे याना पेशवेपद दिले तर निळोपंतांना मुजुमदारी दिली.तर पावसाळ्याच्या मध्यावर आणखी एक बदल करत अनाजी दत्तो प्रभुनीकर यांना सुरनिशी दिली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ ऑगस्ट इ.स.१६६६
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यामधून पलायन करण्याचा दिवस आणि वेळ ही नियोजित करून ठेवली होती. हा बेत फक्त मोजक्याच मंडळींना माहीत होता. दि.१६ ऑगस्ट इ.स.१६६६ रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, सीवा मनसब कबूल करील अशातऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे.औरंगजेबचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर दिले.मला वतनावर पाठवावे, मग जो हुकूम होईल तो मान्य करीन.
महाराजांनी पाठवलेला हा निरोप औरंगजेबास शेवटचा होता.कारण यानंतर जे घडणार होते ते संपूर्ण मुघल सलतनतीस अनपेक्षितच होते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ ऑगस्ट इ.स.१६८१
इंग्रजांच्या सहकार्याने मुंबई बंदरात आणि उंदेरीवर राहून सिद्दी मराठी मुलखात लूटमार करत असे. नोव्हेंबर १६८० मध्ये संभाजीराजेनी आपल्या वकिलामार्फत इंग्रजांना धमकीचे पत्र दिले होते की त्यांनी सिद्दीला मदत करणे थांबवले नाही तर संभाजीराजे मुंबईवर स्वारी करतील. संभाजीराजेनी दिलेल्या धमकीने घाबरून इंग्रजानी आपले कॅप्टन गॅरी आणि रॉबर्ट थारवीन याना सिद्दीकडे पाठवून त्याला दम दिला. तरीही सिद्दीच्या हालचाली सुरूच होत्या. त्याने मुंबईला जाणारी मराठ्यांची २ गलबते आणि ४ माणसे पकडली होती. सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी मराठ्यांच्या आरमारी तुकडीने १८ जुलैला पहाटे उंदेरीवर हल्ला केला. सतत ४ तासांच्या लढाईनंतर सिद्दीने उंदेरीवरील हा हल्ला परतवून लावला. १६८१ च्या पावसाळ्यानंतर मराठी मुलखाला उपद्रव देणारा सिद्दी आश्रय देणाऱ्या इंग्रजांनाही त्रास देऊ लागला. 'त्याने इंग्रज दलालाकडून पैशाची मागणी केली व इंग्रजांच्या मुंबई वखारीची नासधूस केली. 'सिद्दीचे हे कारनामे मुंबईकर इंग्रजानी आपल्या सुरतेच्या वखारीला पत्राने कळवली होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ ऑगस्ट इ.स.१७००
बादशहाचे हाल पाहून मराठ्यांना जास्तच चेव चढला. सभोवार घिरट्या घालून त्यांनी शक्य तितक्या उच्छाद चालवला. हनुमंतराव निंबाळकराने १६ ऑगस्ट रोजी “खटाव” ठाणे काबीज केले व तेथे मोगलांच्या बाजूने असणार्या मराठी अधिकार्याला ठार मारले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ ऑगस्ट इ.स.१७८३
शके १७०५ श्रावण व.४ फिरंगी दि.१६ ऑगस्ट इ.स.१७८३ या दिवशी पानिपतच्या संग्रामात धारातीर्थी पडलेले सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई निधन पहिल्या.सवाई माधवराव यांच्या बालपणात यांनीच त्यांची काळजी घेतली होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ ऑगस्ट इ.स.१७८९
शके १७११ श्रावण व.१० दि. रोजी१६ ऑगस्ट १७८९ रोजी नागपूरकर मुघोजी भोसल्यांचे चिरंजीव खंडोजी उर्फ चिमणाजी भोसले यांचे निधन झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १८ ऑगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य १३, त्रयोदशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)
औरंगजेब बादशहाच्या मगरमिठीतून सह्याद्रीचा सिंह निसटला हे फुलादखानाच्या लक्षात आले. सूर्योदयाच्या थोड्या आधी (झुंजूमुंजू लागते वेळी), पुरोहित बळराम आत डोकावून गेला. "महाराज" स्वस्थ झोपलेले असल्याचे त्याने पाहीले. सकाळी नेहमीप्रमाणे "महाराजांनी सुका मेवा मागवून खाल्ला देखील! दिवस थोडा वर आला. थोड्या वेळाने मदारी व हिरोजी महाराजांचे शिर दुखते. कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मना करणे. आपण औषध घेऊन येतो. दोघेही छावणी बाहेर पडले. आता सर्वत्र शांतता होती." सह्याद्रीचा सिंह केव्हाच मोगलांच्या हातावर तुरी देऊन निसटला हे फुलादखानाच्या लक्षात आले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १८ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजाडला. दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्थ झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्याच्या सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी आत बिछान्याजावळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. महाराजांची पादत्राणे पलंगाखाली पडलेली होती तर त्यांचा मंदिल व एक आरसा बिछान्यावर होता.छावणीत फक्त ३ घोडे, २ पालख्या व एक तबेल्याचा नोकर एवढेच होते. हा हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली. रामसिंह आणि फौलादखानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली. चिडलेल्या औरंगजेबाने रामसिंहाला महाराजांचा तपास करून त्यांना हजर करण्यास सांगितले. वाटेवरील फौजदारांना जागरूक राहण्यास सांगण्यात आले. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित, रामकीशन, जिवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांना कैद करण्यात आले. दुपारच्या सुमारास परतीतराय हरकाऱ्याच्या घरात लपून बसलेले रघूनाथपंत, त्रंबकपंत व इतर दोन चाकर हेही फौलादखानाच्या हाती सापडले.औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ सुरु केल.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १८ ऑगस्ट इ.स.१६८०
मुंबई बंदरात राहून मराठा मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजीराजेनी सिद्दीला धडा शिकवण्याचे ठरवले. १८ ऑगस्ट १६८० च्या आधी थोडे दिवस मराठा आरमाराच्या २०० लोकांनी रात्री गुप्तपणे उंदेरी बेटावर हल्ला केला. अंधार आणि बेटावरील खाणाखुणा अपरिचित असल्याने मराठे आल्याची चाहूल सिद्दीला लागली. सावध झालेल्या सिद्दीने मराठ्यांवर हल्ला केला,प्रतिकूल परिस्थितीमुळे मराठ्यांचा टिकाव लागला नाही. सिद्दीने पराभूत मराठा सैन्यांपैकी ८० सैनिकांची मुंडकी कापून ती मुंबई बेटावर नेली.मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नर ने ती शिरे किंवा कैदी मुंबई बेटावर उतरू दिली नाहीत.सर्व डोकी भाल्यावर टोचून त्यांचे किनाऱ्यावर प्रदर्शन करण्याचा सिद्दीचा अमानुष प्रयत्न मुंबईकरांनी सिद्धीस जाऊ दिला नाही.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १८ ऑगस्ट इ.स.१६८३
मुघल आणि सिद्दी याच्याबरोबरच संभाजीराजेना पोर्तुगीजांचाही सामना करावा लागला. पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला घेण्यासाठी शंभुराजेंनी ६ हजार पायदळ व २ हजार घोडदळ घेऊन जून १६८३ मध्ये चौलवर हल्ला केला.ही स्वारी जवळपास ६ महिने सुरू होती. या स्वारीत पुढे निळोपंत पेशव्यांनी दमण ते चौल पर्यंतचा मुलुख ताब्यात आणला. स्वतः शंभुराजेंनी चौलच्या ठाण्यास वेढा घालून तटबंदीवर तोफाचा मारा केला.पोर्तुगीज सैनिक सततच्या लढाईने थकून गेले. मराठ्यांनी माघार घ्यावी म्हणून पोर्तुगीजानी 'मेरी व्हर्जिन' व 'सेंट स्टीफन' यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ठाण्याच्या कॅप्टनने तर 'सेंट अँथनी' ची प्रार्थना करून त्याच्या पायाशी ६० आश्रफ्या ठेवल्या पण मराठे काही मागे हटले नाहीत.शंभुराजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी चौलच्या ठाण्यावर हल्ला केला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १८ ऑगस्ट इ.स.१७००
बाजीराव बल्लाळ अर्थात राऊसाहेबांचा जन्म..
शके १६२२, विक्रमनाम संवत्सर,भाद्रपद शुद्ध १५ या तिथीला बाजीरावांचा जन्म झाला. त्यांचे जन्मस्थान कोणते याबद्दल दुर्दैवाने नेमका पुरावा सापडत नाही. राऊंचे पाळण्यातले नाव विश्वनाथ उर्फ विश्वासराव होते. तसेच लहानपणी त्यांना विसाजी असेही हाक मारत. बाजीरावांची मुले त्यांना बाबासाहेब म्हणत. 'बाजीराव' हे नाव का ठेवले याबद्दल एक उल्लेख आहे. बाजीरावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील त्यांनी स्वतः लिहिलेली एक बखर वाचत होते. त्या बखरीत पुर्वी जे 'बाजी' नावाचे नावाचे पराक्रमी लोक होऊन गेले त्यांची माहिती होती. ही बखर वाचत असतानाच बाळाजींना मुलगा झाल्याची बातमी समजली म्हणून त्या मुलाचे नाव बाजीराव असे ठेवले. पुढे जाऊन हेच नाव जास्त प्रसिद्ध झाले. बाजीरावांचे हे भट आडनावाचे घरणे मुळ कोकणातील श्रीवर्धनचे होते. पुढे ते काही कारणाने देशावर आले.
कालांतराने राजाराम, ताराबाई, शाहू या कालखंडात बाळाजी पराक्रम गाजवत १७१३ साली पेशवेपदावर पोचले. बाळाजींचा मुक्काम सासवडला होता. पुढे बाजीरावांच्या काळात तिथुन सातारा व नंतर पुण्यात शनिवारवाड्यात स्थलांतर केले. १७२० मधेच बाजीरावांची बाळाजींच्या जागेवर पेशवेपदावर नेमणूक झाली व पुढे अनेक पराक्रम गाजवत बाजीरावांनी हिंदवी साम्राज्य व्रुद्धिंगत केले.
१७२९ साली बाजीरावांच्या जीवनात मस्तानी आली. यावरुन पुढे काही वाद झाले. तसेच पुढे बाजीरावांचा दाभाडे सरदारांशी संघर्ष झाला. हे दोन अपवाद सोडले तर बाजीरावांची कारकीर्द पराक्रम व राजकारणाने भरली आहे.
१७१३ सालची पांडवगडाची चकमक,१७२० मधे निजामाचा केलेला पराभव, १७२१ मधे दाऊदखान पन्नीचा पराभव, १७२२ चा पोर्तुगीजांशी केलेला तह, १७२४ ला उज्जैनला दयाबहाद्दूराचा केलेला पराभव, १७२५ ते १७२७ दरम्यान चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणची यशस्वी मोहिम, १७३७ मधे दिल्लीवर मोहिम काढुन तिची केलेली दुर्दशा या आणि अनेक मोहिमांत बाजीरावांनी पराक्रम केला. १७२८ मधे बाजीरावांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव केला. त्या लढाईतील बाजीरावांचे युद्धकौशल्य बर्नार्ड मॉन्टेगमरी या इंग्रज सेनानीला पुढे अनेक वर्षांनी इतके भावले की त्याने त्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. यावेळी भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता हे विशेष.
बर्नार्ड म्हणतो त्यातील काही वाक्ये:
"The way Bajirao outgenerelled Nizam-Ul-Mulk at the Battle of Palkhed was the Masterpiece of Strategic Mobility ...."
इस १७२८ मधे बुंदेलखंडचे छत्रसाल बुंदेला यांच्या जैतापूरच्या राज्यावर मोहंमद बंगशने आक्रमण केले. सुरूवातीला छत्रसालांनी प्रतिकार केला मात्र नंतर बंगश वरचढ ठरू लागला तेव्हा छत्रसालांनी बाजीरावांकडे मदत मागितली. त्यासंदर्भात छत्रसाल काय म्हणाले याचा एक उल्लेख आहे 'जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज ।। बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज ।। '
बाजीरावांनी तिथेही मोठा पराक्रम गाजवत बंगशाला नामोहरण करत शरण यायला भाग पाडले. छत्रसालांचे राज्य वाचले व खुष होऊन त्यांनी बाजीरावांना मुलगा मानून त्यांच्या राज्याचा तिसरा हिस्सा देण्याचे जाहिर केले. त्याच वेळी छत्रसालांनी त्यांची एक दासीकन्या बाजीरावांना नजर केली. तिच पुढे बाजीरावांशी जन्मभर जोडली गेली व 'मस्तानी' या नावाने ओळखली गेली. इस १७२२ साली बाजीराव पेशव्यांनी स्वतः चा शिक्का तयार केला. त्यात शाहुराजांबद्दल आदरभाव व्यक्त होतो.
"श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान।।"
आपल्या पराक्रमाने मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, निजाम व काही आपल्याच फितुरांना नामोहरण करणार्या राऊंना इतिहास कायम लक्षात ठेवेल ही अपेक्षा!!

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १८ आॅगस्ट इ.स.१७००
हणमंतराव निंबाळकर यांनी खटाव जिंकले

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १८ ऑगस्ट इ.स.१९४५
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ?
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्दचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १९ ऑगस्ट इ.स.१६००
बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १९ ऑगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य १४, चतुर्दशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)

शिवाजीराजे निसटल्याची बातमी संपूर्ण आग्रा शहरात!
"फौलादखानी" चौकशीत गुन्हेगाराचा साथीदार सापडला होता. पण शिवाजीराजे हजार शाही सैनिकांच्या डोळ्यादेखत काय हुन्नर करून निघून गेले हे गूढ मात्र औरंगजेब बादशहाला व त्यांच्या बुद्धिमान वजिरांना काही केल्या उलगडेना. महाराज निसटल्याची बातमी कळल्यापासून या रहस्याचाही शोध घेणे सुरुच होते. अखेर बरेच डोके खाजविल्यानंतर शाही आधिकारी अचूक निर्णयावर येऊन पोहोचले की, "शिवाजीराजेंच्या डेऱ्यातून जे मोठमोठे मिठाईचे पेटारे जात होते त्यातच बसूनच वार रविवार दि. १९ ऑगस्ट इ.स.१६६६ शिवाजीराजे पळून गेले. प्रत्येक जण आपापल्या परीने "काहीही बोलु लागले. होते.‌ "नेतोजी पालकर यांना पकडण्याचे फर्मान निघाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜१९ आॅगस्ट इ. स. १६८०

संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन!
छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताचे देशाधिकारी विनायक उमाजी यांना भाद्रपद शुद्ध ५, पंचमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार गुरुवार, म्हणजेच आजच्या दिवशी, एक खास पत्र लिहिले आणि या पत्रानुसार संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन इनाम करून दिले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १९ ऑगस्ट इ.स.१६८९
मराठ्यांच्या दक्षिणेतील जिंजी भागाच्या कारभाराची प्रमुख जबाबदारी शंभुराजेंचे मेहुणे आणि पराक्रमी सेनानी हरजीराजे महाडिक यांच्यावर होती. मुघल फौजा कर्नाटकात जाणार हे ओळखून संभाजीराजेनी हरजीराजेच्या मदतीसाठी आपले विश्वासू केसो त्रिमल पिंगळे यांना १२००० फौज देऊन हरजीराजेच्या मदतीला पाठवले होते. या दोन्ही सरदारांच्या फौजांनी अर्काट,कांजीवरम,चित्तापेठ व कावेरीपाक ही ठिकाणे काबीज केली. पण १६८९ च्या मार्च महिन्यात औरंगजेबाने शंभुराजेंची क्रूर हत्या केली,या घटनेने मराठेशाहीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुमारास कर्नाटकात एक अफवा पसरली की सुभेदार हरजीराजे मुघलांना सामील होणार आहेत. पण ही अफवा खोटी होती कारण मुघलांच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून त्यांनी आपली ठाणी व किल्ले मजबुत करण्यास सुरुवात केली. एव्हढ्यानेच न थांबता मराठ्यांची आघाडी भक्कम व्हावी म्हणून आपल्या कैदेत असणाऱ्या केसो त्रिमल व त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्त केले. पडत्या काळात मराठेशाहीची धुरा सांभाळनाऱ्या हरजीराजे महाडिक यांनी केसो त्रिमल याना कैदेतुन मूक्त केले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १९ ऑगस्ट इ.स.१७५३
नजीबखानाच्या आमंत्रणावरून अहमदशहा अब्दाली १७५१ च्या अखेरीस पंजाब पर्यंत आला,आणि पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत त्याने बळकावले. तेवढ्यावर समाधान मानून उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तो काबूलला परत गेला.अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांना घेऊन वजीर सफदरजंग दिल्लीला आला. पण अब्दाली परत गेल्याने मराठे परत दक्षिणेकडे फिरले. यानंतर दिल्ली दरबारात सफदरजंग व बादशहा यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले,युद्धजन्य परिस्थितीमुळे बादशहाने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून मराठ्यांची मदत मागितली. आणि त्या बदल्यात मराठ्यांना १ कोटी रुपये आणि अयोध्या व अलाहाबाद हे दोन प्रांत देण्याचे कबुल केले.त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव व शिंदे-होळकर या सरदारांना बादशहाच्या मदतीस पाठवले. रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 २० ऑगस्ट इ.स.१६४३
अदिलशहाचे राजे शहाजीराजे यांना हुकुमनामा पत्र!
रणदुल्लाखान मृत्यू पावताच विजापुर दरबारात राजे शहाजीराजे यांचा पक्ष दुर्बळ झाला. तर त्यांच्या वाईटावर असलेल्या मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे इत्यादी मुत्सद्यांचे पारडे जड झाले. रणदुल्लाखानाची दौलत आता त्याचा खिजमतगार असलेल्या अफजलखानाकडे आली. तो त्यावेळी राजे शहाजीराजे यांच्या बरोबर कर्नाटकातच होता. अफजलखान राजे शहाजीराजे यांच्या कट्टर दुष्मनांपैकी एक होता. स्वाभाविकपणेच राजे शहाजीराजे यांना तो पाण्यात पाहू लागला. अफजल खानानेच चंदीच्या राचेवर मराठ्यांना राजे शहाजीराजे फितूर असल्याची "बदगोह" (अफवा) विजापूर दरबारला लिहून कळविली. या किंवा अशाच स्वरूपाच्या काही अन्य तक्रारींवरून आदिलशहाचे मत राजे शहाजीराजे यांच्या विरुद्ध कलुषित झाले. २० आगस्ट इ.स.१६४३ एका पत्रावरून काही दिवसांपूर्वी राजे शहाजीराजे यांना आपली जमात आदिलशहाकडे हजर करण्याचा हुकुम झाल्याचे कळते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 २० ऑगस्ट इ.स.१६६६
( श्रावण अमावस्या, १५८८, संवत्सर पराभव, सोमवार )

औरंग्याचे मिरझा जयसिंगला फर्मान :-
रामसिंगाने फितुरी करून शिवरायांना जाऊ दिले व त्याबदल्यात मात्र, औरंग्याने रामसिंगला शिक्षा करण्यास फर्मावले. त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराजांचे दोन विश्वासू साथीदार रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबक डबीर, फुलाद खानाच्या धरपकडीत सापडले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २० ऑगस्ट इ.स.१६८३
औरंगजेबने दिनांक २० ऑगस्ट १६८३ रोजी शहाजादे अजम व त्याचा मुलगा बेदारबख्त यांची विजापुरच्या मोहिमेवर नेमणूक केली. ऑक्टोबरला अजम आपल्या फौजेसह मोहिमेवर निघाला. या मोहिमेचा मूळ हेतू विजापुराकडील छत्रपती संभाजी राजांकडे असलेला मुलूख काबीज करणे हा होता. इ. स. १६८४ च्या सुरुवातीस ह्या फौजेस रसद न मिळाल्यामुळे फारच हालांत दिवस काढावे लागले. ही दैन्यावस्था औरंगजेबस समजताच त्याने ४ फेब्रुवारी १६८४ रोजी अजम व बेदारबख्त भेटावयास आले असता त्यांस विजापुरांकडील मुलूख लुटण्याचा हुकूम दिला. त्या आज्ञेवरून त्यांनी सर्व मुलूख लुटून धारवाडच्या किल्ल्यांवर हल्ला चढविला आणि थोड्याच दिवसांत तो किल्ला फत्ते करून माघारे छावणीस गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजी महाराजांचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २० ऑगस्ट इ.स. १७६१
पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर माधवराव पुण्यात आले आणि पहिल्यांदा नजर वळविली ती निजामाकडे. निजामाने मराठे आता पुरते मोडले आहेत, असे समजून घोरपडे, जाधव, घाटगे अशा मराठा सरदारांना पेशव्यांविरुद्ध फितवले आणि नळदुर्ग काबीज केल्यानंतर तो थेट पुण्याच्या रोखाने निघाला. इकडे माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ ला निजामावर स्वारी करायचे ठरले. परंतु नुकत्याच पानिपतच्या युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले. निजामाचा भाऊ सफदरजंगही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता. या मोहिमेत आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते. ते शनिवारवाड्यातच होते. निजाम मार्गावरची मंदिरे फोडत, जाळपोळ करत पुण्याच्या आग्रेयेस असलेल्या 'उरूळी- कांचन' या गावापाशी येऊन पोहोचला. निजामाच्या या हल्ल्यामुळे राघोबादादा गांगरून गेले. कारण यावेळेस निजामाला तोंड देण्याकरता पुण्यात फारशी फौजच नव्हती. आता लवकर हालचाल केली नाही तर निजाम पुणेही जाळेल, ही भीती वाटल्याने दि. २९ डिसेंबर १७६१ या दिवशी रघुनाथरावांनी निजामाशी घाईघाईने तह केला व त्या अन्वये २७ लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुखही तोडून देण्याचे कबूल केले. जानेवारी १७६२ मध्ये माधवरावांना या तहाची बातमी मिळाली. आता काहीही करता येऊ शकत नव्हते. शेवटी नाईलाजाने माधवराव पुण्यास परतले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩