" छञपती श्री शिवाजी महाराज "
3.31K subscribers
4.05K photos
116 videos
458 files
3.24K links
Download Telegram
आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

📜 ५ मार्च इ.स.१६५९
#छत्रपती_शिवरायांच्या_तलरीचा_खरा_इतिहास
छत्रपती शिवजी महाराजांच्या हातात जी तलवार होती तीच तलवार म्हणे छत्रपती शिवरायांना आई भवानी ने दिली ??
तस काही नाही. शिवरायांनी हिंदूधर्म नुसार शस्त्र पुजन करून तिचे नाव ठेवले भवानी तलवार
तलवारीचा खरा इतिहास असा......
दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार युरोपियन व्यापाऱ्याने विक्रीस ठेवली होती. या तलवारीची खासियत छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती. तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते... अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती. याशिवाय तलवारीची धार अफलातून होती. तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची. वजनाने हलकी, धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती. त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली. (३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार, तिची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते (इन्कम अॅन्ड एक्स्पेंडीचर अकौंट) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबाद गोंधळ माजू नये, भाकड कथा रचल्या जाऊ नये यासाठी प्रबंध करून ठेवला आहे...
पण तरीही प्रतीक्रांतीवाद्यानी छत्रपती शिवरायांचे दैवीकरण केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/kSSOHFnib3M

📜 ५ मार्च इ.स.१६५९
कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कुडाळकर सावंतांमधील तहनामा -
ता. ५ मार्च १६५९
श्री
सन १०६८ फसली
तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ
प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे. कलम १
किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे. कलम १
स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे. कलम १
प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे. कलम १
प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. कलम १
शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१६६०
पन्हाळ्यात सिद्दी जौहरने वेढा घातला तेव्हा इंग्रज अधिकारी हेन्रीने आपल्या बरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जौहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या स्वत: तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता. नंतर यांचाच काटा काढण्यासाठी १८५२ च्या फाल्गुन वद्यात महाराजांनी राजापुरावर स्वारी करून ते लुटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१६६६
(फाल्गुन शुद्ध नवमी, शके १५८७, संवत्सर विश्ववसू, वार सोमवार)

महाराज आग्रा येथे जाण्यास निघाले. मिर्झाराजे जयसिंगच्या सवे महाराजांना स्वराज्याची आणखी नासाडी होऊ नये यासाठी तह स्विकारावा लागला.
हा तह पक्का होण्यासाठी व औरंगजेबाच्या ५०, व्या वाढदिवसानिमित्त हजर राहण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग यांनी महाराजांना गळ घातली ती आग्रा येथे जाण्याची! धोका ओळखूनही महाराजांनी ती स्वीकारली आणि महाराज अवघ्या ९, नऊ वर्षांच्या युवराज शंभुराजेंसह आग्रा येथे जाण्यास निघाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१६६७
( फाल्गुन शुद्ध नवमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, सोमवार )

महाराज आग्र्याला शंभुराजांसह निघाले :-
मिरझाच्या सवे शिवरायांना स्वराज्याची आणखी नासाडी होऊ नये यासाठी तह स्वीकारावा लागला. हा तह पक्के होण्यासाठी व औरंग्याच्या ५०व्या वाढदिवसाला हजर राहण्यासाठी मिरझाने गळ घातली ती आग्र्याला जाण्याची. धोका ओळखूनही महाराजांनी ती स्वीकारली व आजच्या दिवशी अवघ्या ९ वर्षांच्या शंभूराजे ह्यांना घेऊन आग्र्याला निघाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१६७३
कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली. ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१६७६
बंगलोरास राहून शहाजीराजे आपल्या कर्नाटकातील जहागिरीचा कारभार पाहत होते. तंजावरचे राज्य प्रथम शहाजी राजांनी विजापूरच्या तर्फेने १६५९ च्या मार्चमध्ये जिंकले. तेव्हापासून दोन वर्ष तो प्रदेश शहाजीराजांच्या ताब्यात होता. त्यानंतर विजापुरी लष्करात तंटे होऊ लागल्यामुळे शहाजी राजे तंजावर सोडून बंगलोरास आले. शहाजी राजांची पत्नी तुकाबाई यांनी एकोजी राजे नावाच्या मुलास जन्म दिला (१६३१). एकोजीराजे अतिशय शूर व कर्तृत्ववान होते. बहुश्रुतही होते. वडलांच्या मृत्यूनंतर बंगळूरच्या जहागिरीची मालकी एकोजीराजाकडे आली. शहाजी राजांचे पहिले कारभारी नारो त्रिमल हणमंते होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र रघुनाथ नारायण हणमंते हे शहाजीराजांचा कारभार पाहू लागले. एकोजी राजे विजापूर दरबारची चाकरी इमाने इतबारे करीत होते. दरबारच्या हुकूमावरून एकोजी राजानी मदुरेच्या चोक्कनाथ नायकाचा पराभव केला व तंजावर शहर जिंकले (दिनांक १२ जानेवारी १६७६). तंजावर ही विजयराघव राजाची राजधानी होती. एकोजीच्या मनांत शिवाजी महाराजांसारखे आपणही स्वतंत्र राजा होऊन राज्याभिषेक करवून घ्यावा असे होते. त्याप्रमाणे एकोजी राजांनी समारंभपूर्वक तंजावरात सिंहासनारोहण केले. (दिनांक ५ मार्च १६७६) तदनंतर कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांजकडून एकोजीराजे यानी कारभार काढून घेतला. हलके आणि सामान्य लोकांना जवळ करून त्यांच्या तंत्राने ते वागू लागले. तेव्हा रघुनाथपंत महाराष्ट्रात शिवाजी महाराजांस भेटावयास आले ते कर्नाटकांतील राज्य विस्ताराची मौल्यवान राजकारणे घेऊन. रघुनाथपंत साताऱ्यास आले कारण महाराज सातारा किल्ल्यावर विश्रांती घेत होते. महाराजांना भेटले. काही दिवसांनी ते पन्हाळ्यास महाराजांबरोबर गेले व त्यांजबरोबर ते रायगडास जून १६७६ च्या प्रारंभी आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१६७७
(फाल्गुन शुद्ध एकादशी, शके १५९८, संवत्सर नल, वार सोमवार)

महाराजांनी मादण्णापंतांच्या मातोश्रींची भेट घेतली.
महाराजांना मादण्णापंतांनी आग्रहाने आपल्या घरी नेले. आकण्णापंत व मादण्णापंत यांच्या मातोश्री भागम्मादेवी यांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून महाराजांना भोजन वाढले. महाराजांच्या महत्वाच्या मुत्सद्दयांनाही भोजनार्थ निमंत्रित केले गेले होते. त्याचबरोबर साऱ्यांचा अलंकार, वस्त्रे, घोडे देऊन आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सत्कार केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१७०७
शहजादा आझमने स्वतःला बादशहा घोषित केले
औरंगजेबाला जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला. मराठ्यांच्या समशेरींनी त्याची झोप उडविली. तब्बल २६ वर्षानंतर, २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला आणि स्वराज्यावरचा मुघली फास सुटला. आता औरंगजेबाच्या मुलांत यादवी युद्ध होणे अटळ होते. शहजादा आझम याने ५ मार्च १७०७ रोजी स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. येसूबाई, शाहू राजे व इतर कबिला बरोबर घेऊन तो दिल्लीला जाण्यास सिद्ध झाला. नर्मदा पार केल्यावर सिरोंचे येथे छावणीचा तळ पडला, झीनत बेगमेच्या मध्यस्थीने अखेर आझम शाहूस सशर्त सोडण्यास तयार झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१७७८
कोल्हापूरकरांचा तह
फेब्रुवारीमध्ये सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले.
शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ५ मार्च इ.स.१८७९
१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी १८७९ मध्ये लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩
आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

📜 ६ मार्च इ.स.१६६६
(फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार)

औरंगजेबाचे अभयपत्र!
महाराजांना जिविताची हमी देणारे अभयपत्र मिळाले. महाराजांनी बिनघोर आग्रा येथे यावे हा औरंग्याचा डाव मात्र केवळ स्वराज्याखातर आणि मिर्झाराजे जयसिंगच्या शब्दावर विसंबून महाराजांनी जिवाचा धोका पत्करला होता. स्वतःबरोबर युवराज शंभुराजेंना घेऊन जात दुहेरी धोका महाराजांनी स्विकारला होता. नियती मात्र महाराजांची परीक्षा घेत होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/JBUYfYogGv4

📜 ६ मार्च इ.स.१६७२
१६७२ मध्ये घोडबंदरवर स्वारी करून पोर्तुगीझांची वसाहत काबीज करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसी प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईकर इंग्रज घाबरून शिवाजी महाराजांची मर्जी संपादण्याच्या उद्योगास लागले. सख्य जोडण्यासाठी मिस्टर उस्टिक यास रायगडावर पाठविण्याचे कंपनीने ठरविल. राजापूरलुटीची भरपाई करून घेणे, हा तहाचा एक हेतु होता. २२ फेब्रुवारी रोजी मुंबईकरांनी ठरविले की शिवाजी महाराजांस स नजराणा देण्यासाठी ६०० रु. व शिवाजीच्या सरकारकुनांसाठी १५० रु. खर्च करावेत. उस्टिकने आपल्याबरोबर दहा भंडारी, दोन इंग्रज, दोन घोडे, पालखीचे भोई व दोनशे रुपये रोकड घ्यावी. उस्टिक रायगडावर का जात आहे, या बाबत गुप्तपणा राखावा; जाहीर करणेच झाले, तर राजापूरच्या वखारीची व गलबतांची नुकसानभरपाई करून घेण्यासाठी त्यास पाठवीत आहोत, एवढेच सांगावे असे कंपनीने ठरविले. उस्टिकने ६ मार्च १६७२ रोजी रायगडवर जाण्यास मुंबईहून निघाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ६ मार्च इ.स.१६७३
विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात आहे हे कळल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाठविले. कोंडाजींनी आपल्या बरोबर मर्द मराठे ६० मावळे घेतले. दिनांक ६ मार्च १६७३ रोजी रात्री ते दोऱ्यांवरून किल्ल्यावर चढले. भेद यशस्वी होऊन ते वर जाऊन पोचले, तेव्हा किल्ल्यांतील लोक सावध होऊन त्यांजवर चालून आले. इतकी कडी गस्त ठेऊनही शत्रू आला कसा हेच कोणाला समजेना. शत्रू अफाट असावा असे त्यांस वाटले. भयंकर लढाई जुंपली. कोंडाजींनी एकदम किल्लेदारावर तलवार उगारून चाल केली. दोघांचे अटीतटीचे तुंबळ युद्ध झाले. कोंडाजींनी किल्लेदाराचे मुंडके उडविले. किल्लेदार गडावरच्या राजवाड्यापुढे ठार होऊन पडला. अवघ्या दोन-तीन तासात पन्हाळा किल्ला मराठ्यांनी जिंकला. स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या ‘पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान' या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. महाराज रायगडावर होते. त्यांजकडे जासूद पाठविला. ही आनंदाची बातमी महाराजांस २ दिवसांनी कळली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ६ मार्च इ.स.१७२८
#निजामाचा_पराभव, मराठ्यांबरोबर मुंगी-शेगावचा तह
निजाम-उल-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या....
निजामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे
लक्षात येऊन निजामाच्या सैन्याने त्यांचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला....
असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निजामाचा हा डाव पूर्ण होत आला होता बाजीरावांनी त्यास भीक न घालता निजामालाच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निजामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली....
निजामास ही खेळी अनपेक्षित होती त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते आता बाजीरावांच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निजाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला....
बाजीरावांनी औरंगाबादचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसन होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावांनी निजामास नाशिककडे ओढत नेले अवजड तोफखाना, बोजड चिलखती घोडदळ यामुळे निजामाचा तोटाच झाला....
राऊंनी अगदी नियोजन बद्धतेने निजामाला पालखेडला आणले पूर्वनियोजित योजने प्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह बाजीरावांनी पालखेडला बोलून घेतले होते....
आता मराठ्यांकडे अंदाजे ५०००० सैन्य जमले होते नगर पासून मराठा हेरांच्या टोळ्या निजामाच्या आस-पास होत्या त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर बाजीरावांना टाकोटाक मिळत होती....
पालखेड वैजापुरच्या पूर्वेला १२ मैल तर औरंगाबाद पासून २८ मैलावर आहे पूर्वेला पाण्याचा साठा आहे त्याच बाजूला आपले सैन्य घेऊन राऊ होते Horse Shoe अर्थात घोड्याच्या नालेसारखी व्यूह रचना करून निजामाला खेचत आणून कोंडीत पकडले....
औरंगाबादकडे झेपावणारे बाजीराव (राऊ) आणि त्यांना तेथे पोहचण्या अगोदर रोखण्याच्या इराद्याने निघालेला निजाम यांची टक्कर २५ फेब्रुवारी १७२८ ला पालखेडला झाली मराठ्यांनी निजामाचे पाणी रोखले, रसद तोडली....
अर्जुनाच्या दिव्यास्त्रां प्रमाणे प्रभावी असलेला निजामाचा प्रसिद्ध तोफखाना नगरला गंजत पडला होता आता त्याचा ह्या आणीबाणीत निजामाला काहीच उपयोग नव्हता मराठ्यांना तोफांनी भाजण्याचे स्वप्न मनात मांडे खाणाऱ्या निजामाचे पुर्णपणे भंगले होते....
आणि भयानक वास्तव मृत्यू बनून पालखेडला त्याच्या समोर उभे होते पालखेडला कोंडीत सापडलेल्या निजामाचे अनन्वित हाल होऊ लागले भूक, तहान आणि समोर असलेले मराठे यांच्या कात्रीत सापडलेल्या निजामावर आणि त्याच्या फौजेवर जिवंतपणीच स्वतःचीच कबर खोदण्याचा प्रसंग आला....
या सर्व बिकट परिस्थितीमुळे अखेर निजामाने ईवाझखाना मार्फत तहाचे बोलणे चालवले अखेर ६ मार्च १७२८ मुंगी-शेवगावला तह झाला....
त्यानुसार निजामाला खालील अटींचे पालन करणे बंधनकारक होते -
१.छत्रपती शाहूराजे हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निजामाने व पर्यायाने मोघल सम्राटाने मान्य केले....
२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला....
३.मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या....
४.महसूलाची थकलेली रक्कम निजामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले....
https://youtu.be/JBUYfYogGv4
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ६ मार्च इ.स.१७३९
चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इ.स १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रयामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते... १२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला....
वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना “धारावी किल्ला” जिंकून घेणे आवश्यक होते म्हणून ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला त्यानंतर पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८ च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला पुन्हा चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला....

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ६ मार्च इ.स.१७७५
रघुनाथरावांनी दि. ६ मार्च १७७५ रोजी इंग्रजांशी पेशवाई पुन्हा मिळवून देण्याबाबत तह केला. यानुसार इंग्रजांना त्यांनी वसई, साष्टी, ठाणे इ. प्रदेश देण्याच्या करारावर सह्या केल्या. हाच तो दुर्दैवी असा प्रख्यात 'सुरतेचा तह'!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

📜 ७ मार्च इ.स.१६४७
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/aeUa842wATA

📜 ७ मार्च इ.स.१६४७
आदिलशाहीशी आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादाजींना स्पष्ट दिसत होते. मनातून ते निराश झाले होते. राजांच्या किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण होत आले होते. रोहिडेश्वरांची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यांवरच्या तोफांनी बुरूज सजले होते. राजांची शिबंदीही आता मोठा आकार घेत होती. रोहिडेश्वरावर जमा केलेली हजार-बाराशे मावळेफौज पाच-सहा हजारावर गेली होती. व्याप वाढत होता. त्याबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. मुख्य चिंता होती दादाजींच्या आजारपणाची. दादाजींचे वय झाले होते. आणि आजारपण चालू होते. त्यांना रात्रीची झोप लागत नसे. दादाजींना आठवले की आपण पारस परगण्याचे मलठाण गावचे हिशेबनीस. शहाजीराजांनी आपल्या कारभारासाठी आपणांस उचलले. महाराज साहेबांचा विश्वास बसला, पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादाजींना आज्ञा केली. शहाजीराजांच्या ह्या विश्वासामुळे आदिलशाहीच्या दरबारचासुद्धा दादाजींच्यावर भरवसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींना आपले मरण जवळ आल्याचे समजले, त्यांनी जहागिरीच्या हिशेबांच्या वह्या शिवाजीराजांस दाखविल्या. हळूहळू ते थकत चालले. अंथरुणातून उठण्याची शक्तीसुद्धा त्यांच्यात राहिली नाही. दादोजी घाबरे झाले आणि त्यांनी प्राण सोडला. (इ. स. ७ मार्च १६४७)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ मार्च इ.स.१६७३
#वीर_कोंडाजी_फर्जंद_यांचा_महापराक्रम
किल्ले पन्हाळा जिंकण्यासाठी केवळ ६० मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूच्या २५०० ते ३००० फौजेविरूद्ध लढा देऊन फक्त ३ तासात ती लढाई व किल्ला जिंकणारे वीर कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा...
जगाच्या इतिहासात एवढ्या कमी सैन्याने एवढ्या जास्त सैन्याचा कमीत कमी वेळेत केलेला हा एकमेव पराक्रम...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ७ मार्च इ.स.१६८०
( फाल्गुन वद्य द्वितीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, रविवार )

राजाराममहाराजांची मुंज झाली :-
दिलेर खान प्रकरणानंतर शंभूराजे स्वराज्यात परतले. शंभुराजांची पन्हाळगडावर भेट घेऊन सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढे काय आणि कसे करायचे याच विचारात शिवरायांनी पन्हाळगड सोडला व समर्थांना भेटायला सज्जनगडावर गेले. भेट घेऊन महाराज रायगडावर परतले आणि आजच्या दिवशी राजाराममहाराजांची मुंज महाराजांनी उरकून घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜७ मार्च इ.स.१७६०
मराठ्यांचा दक्षिणेतून उत्तरेकडे प्रवास
काबूलच्या अब्दालीचा पराभव करण्यासाठी, पेशव्यांनी (नानासाहेबांनी), एक मोहीम आखली, आणि या मोहिमेच नेतृत्व शूरवीर व राजनीतीधुरंधर श्रीमान सदाशिवरावभाऊ यांना दिलं. दि. ७ मार्च १७६० ला, सदाशिवरावभाऊ ४८ हजार फौझेसह, फ्रेंच्याच्या आधुनिक तोफखान्यासह आणि विश्वासू सरदारांसह दिल्लीच्या संरक्षणासाठी निघाले. मार्गात सैन्य जमा होत होतं.
https://youtu.be/aeUa842wATA
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

📜 ८ मार्च इ.स.१६७०
( फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, मंगळवार )

किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल :-
आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर सुमारे तीन वर्षे महाराजांनी कोणतीही हालचाल केली नाही. मात्र १६७० नंतर तहात गेलेले सर्व किल्ले परत घेण्याचा निश्चय केला व सिंहगडापाठोपाठ आजच्या दिवशी पुरंदर स्वराज्यात दाखल झाला. किल्ले पुरंदर पुन्हा जिंकला तो निळोपंत काकांनी!
व्हय पासष्टी-सत्तरीच्या घरात पण मावळी मनगट अजूनही पोलादी असलेलं. ह्या वयातही काकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमावर महाराज बेहद्द खुश झाले!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtu.be/aTXiwGaM8mQ

📜 ८ मार्च इ.स.१६७३
नरवीर कोंडाजी फर्जंद...🚩
इ.स ८ मार्च १६७३ रोजी रायगड येथे कोंडाजींनी पन्हाळा फत्ते केल्याची बातमी जासुदामार्फत कळाली कोंडाजींच्या शूरत्वाची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर दाखल झाले कोंडाजींची पन्हाळगडावरील तीन दरवाजा नजीक असलेल्या तुपाच्या विहिरी जवळ त्यांनी गळाभेट घेतली छत्रपतींनी कोंडाजींचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोंडाजींनी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांना मोलाची साथ दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ मार्च इ.स.१६८९
मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी छत्रपती राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ मार्च इ.स.१६९४
औरंगजेबने शहाजादा मुअज्जमचा मुलगा शहाजादा मुइजुद्दीन याला नोव्हेंबर, १६९२ त पन्हाळगडाविरुद्ध रवाना केले. शहाजादा मुइजुद्दीन याने पन्हाळ्याला वेढा घातला. पण किल्ला जिंकून घेण्याचे त्याला जमेना. ऑक्टोबर १६९३ मध्ये रामचंद्रपंत, शंकराजी आणि धनाजी जाधव हे पन्हाळगडाला मदत करण्यासाठी चालून आले. २० ऑक्टोबरपासून चकमकी सुरू होऊन त्या काही दिवस चालू राहिल्या. मराठ्यांनी किल्ल्यात रसद आणि कुमक पोहचविली. याच वर्षी बारामतीचा, मोगलांतर्फे
असलेला ठाणेदार हणमंतराव निंबाळकर हे मराठ्यांना येऊन मिळाले. इ. स. १७०४ मध्ये याचा मृत्यू होईपर्यंत याने मोगलांस सळो की पळो करून सोडले. इ. स. १६९४ त पन्हाळगडचा वेढा मोगलांकडून चालूच होता. औरंगजेबाने ७ मार्च १६९४ रोजी पन्हाळ्याकरिता मोगलांना आणखी ६ हजार सैन्याची कुमक पाठविली. पण ती पोचण्यापूर्वीच शहाजादा मुइजुद्दीन हा पन्हाळा सोडून ८ मार्च १६९४ रोजी निघाला होता. हे समजल्याबरोबर औरंगजेबाने शहाजादा अज्जमचा मुलगा बेदारबख्त, यास पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी पाठविले. तरीही मोगलांस पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही. म्हणून औरंगजेबने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यास ३१ ऑक्टोबर १६९९त ताकीदवरपत्र लिहिले, ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक याने भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असता धनाजी जाधवांनी बाहेरून मोगलांचा अतिशय उच्छेद केला.
https://youtu.be/aTXiwGaM8mQ
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ मार्च इ.स.१७३५
राधाबाईंनी १४ फेब्रुवारी १७३५ ला काशीविशेश्वराच्या यात्रेकरिता पुणे सोडले आणि त्या ८ मार्चला बु-हाणपूरला आल्या. त्यांच्याजवळ काही खास फौज वगैरे नव्हती. शे-पन्नास लोक असतील त्याहून जास्त नाही. बुन्हाणपूर सोडताना येथील मुघल सुभेदाराने प्रवासखर्चासाठी काही रक्कम, तसेच वाटेत रक्षणाकरिता २०० स्वार दिले, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हिंदुस्थानात आपल्या पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या प्रतापसूर्य श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आईसाहेबांचा पाहुणचार करण्याची आलेली संधी उदेपूरच्या महाराणा प्रतापच्या गादीवरील त्याचा वंशज जगतसिंग याने वाया जाऊ दिली नाही, बाईंचा खूप आदरसत्कार केला. त्यांचे आशीर्वाद मिळवले. प्रवासासाठी रोख रक्कम, तसेच हत्ती, घोडे, सोने-नाणे देऊ केले. उदेपूरचा दिवाण बहिरदास यानेदेखील राधाबाईंना प्रवासासाठी काही रोख रक्कम नजर केली. शाही उमरावांनीदेखील वाटेत जागोजागी राधाबाई यांना नजराणे, आहेर दिले, मेजवान्या दिल्या आणि आपल्या हद्दीतून त्यांना सुखरूप जाऊ दिले. या सर्व यात्रेत बादशाहकडून किंवा कोणत्याही शाही अंमलदारांकडून, सरदारांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही. किंबहुना त्यांच्याकडून राधाबाईंची चांगली बडदास्त ठेवण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ८ मार्च इ.स.१७५८
मल्हारराव कुंजपुऱ्यावर चालून गेले. तेव्हा बरोबर कुरुक्षेत्र यात्रेसाठी जनानखाना व परिवार होता पलिकडे सरहिंद येथें अबदालीच्या तर्फेने अदुसमदखान बंदोबस्तास होता, त्याने होळकराच्या मंडळीवर चाल करून अटकावून ठेविले पण होळकराच्या संरक्षकांनी अफगाण पहारेकऱ्यास कापून बायकास सोडवून परत नेले. नंतर एक दिड महिना आपले बेत ठरविण्यास घेऊन रघुनाथराव, मल्हारराव वगैरे पुढे चाल करून गेले. ते तारीख ८ मार्च स. १७५८ ला सरहिंद येथे पोचले. तेथे त्यांना अलाजाठची शीख फौज सामील झाली. त्यांनी सरहिंदला वेढा घातला. लढाई चालू झाली. अब्दालीचे सरदार अब्दुस्समदखान व जंगबाजखान यास जखमा लागल्या धरून आणून वस्र भूषणे देऊन आपल्यापाशी ठेविले. शहर लुटून घेतलें. श्रीमंतांनी अबदालीची दहा हजार फौज बुडविली. त्याचा सूड घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 ८ मार्च इ.स.१७७९
इष्टुर फाकड्यास मारून तळेगावावर इंग्रजांस जेर करणारा शूर पुरुष भिवराव पानसे तोफखान्याचा कामदार थोडा ताप येऊन एकाएकी मरण पावला.......``
मराठेशाहीत तीन व्यक्तींचा फाकडा ( पराक्रमी,शूर,वीर) म्हणून उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात केलेला आढळतो.इष्टुर शिवाय मानाजी शिंदे व कोन्हेर त्रिंबक एकबोटे हे अन्य फाकडे आहेत
जेम्स स्तुअर्ट ला त्याच्या पराक्रमामुळे कौतुकाने फाकडा म्हटले जाते. रणांगणात शत्रूने दाखविलेल्या पराक्रमाला दिलदारपणे दिलेली ति दाद आहे अण कि शत्रूचे कौतुक !

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १२ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य चतुर्थी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)

#छत्रपती_शिवरायांची_ऐतिहासिक_आग्रा_भेट
स्वतः रामसिंग महाराजांकडे गेला व स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी 'दिवाण-ए-आम' या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज पोहोचण्या अगोदर 'दिवाण-ए-आम' मधील औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस संपला होता.

छत्रपती शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोहोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, होते.

औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेतोड उत्तर देऊन त्याची खिल्लत उडवून देऊन त्याचाच जबरदस्त पानउतारा केला.
औरंगजेबसमोर येताना चेहर्‍यावर फडके (रुमाल) धरून येण्याची आणि जाताना तसेच मागे फिरत पाठ न दाखवता जाण्याची प्रथा होती...
अशा वेळी क्रूर औरंगजेबच्या दरबारात त्याचाच अपमान करून हिंदुस्थानचे दोन छत्रपती कडाडले...

खामोश.. कुंवर रामसिंह.. खामोश... सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना... या उपरी आमच्या रक्ताने न्हाऊ घातलेल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजी राजे तसूभर हि कसूर करणार नाहीत..

साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या इतिहासाने या आधी कधी पाहिला नव्हता आणि या पुढे ही पाहणार नाही..

#शेरास_सव्वा_शेर_छत्रपती_नडले
औरंगजेब स्वत:ला आलमगीर आणि शेर म्हणवून घेत असे.

त्याला त्याच्याच दरबारात सव्वाशेरानी मात दिली तो सुवर्ण दिन...

महाराजांच वय त्यावेळी ३६ वर्ष होतं आणि शंभूराजे त्यावेळी ९ वर्षाचे होते ...

म्हणजे १ पूर्णशेर ३६ वर्षे..
व् दूसरा शेर १/४ म्हणजेच ९ वर्षे..

अशा प्रकारे स्वत:ला हिन्दुस्तान चा शेर म्हणवून घेणाऱ्या औरंगजेबाला महाराष्ट्राचे सव्वा शेर नडले..

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/fmo7bxiiu4M?feature=share
📜 १२ मे इ.स.१६८२
(वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार शुक्रवार)

किल्ले रामसेजच्या मदतीसाठी रुपाजी भोसले यांची कुमक!
किल्ले रामसेजच्या किल्लेदारांच्या मदतीसाठी (बहुतेक किल्लेदाराचे नाव रंभाजी पवार असावे) रुपाजी भोसले नाशिकच्या आसमंतात उतरला. रुपाजी भोसलेंबरोबर मानाजी मोरेही होते. रुपाजी भोसले व मानाजी मोरेची खबर लागताच नाशिकच्या पश्चिमेस असलेल्या गणेश गावाजवळ शहाबुद्दीन फिरोजजंग अटकाव करण्यासाठी पुढे सरसावला. मात्र हर हर महादेवाच्या घोषणा देत मराठ्यांनी शहाबुद्दीन फिरोजजंगाच्या मोगली सेनेवर इतक्या प्रखरपणे हल्ला चढवला की, मराठ्यांच्या घणाघाती हल्ल्यापुढे शहाबुद्दीन फिरोजजंगाची डाळ शिजली नाही. फिरोजजंग या जंगात पराभूत झाला. ५०० घोड्यांचा पाडाव करून मराठ्यांनी विद्युत वेगाने माघार घेतली. मराठ्यांचा हेतू साध्य झाला होता.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ मे इ.स.१७३९
दोन वर्षे चाललेली वसईची मोहीम मराठ्यांना दणकेबाज विजय मिळवून देऊन संपली. मराठ्यांनी वसईचा ताबा १२ मे १७३९ रोजी घेतला आणि वसई किल्ल्याच्या तटावरून भगवा झेंडा मोठ्या समारंभपूर्वक सुमुहूर्त पाहून तारीख २३ मे रोजी फडकाविला. पोर्तुगीज सत्ता लयास जाऊन मराठ्यांची राजसत्ता आसमंतात आल्याची जाणीव ह्या फडफडणाऱ्या झेंड्याने परिसरांतील जनमानसात रूजविली. पश्चिम किनारा व्यापार उद्योगासाठी पोर्तुगिजांच्या ताब्यात दोन शतके होता. या तहाने पोर्तुगिजांचा समुद्र काठचा अंमल नाहीसा झाला. फक्त गोवा, दीव व दमण एवढीच ठिकाणे पोर्तुगिजांच्या ताब्यात राहिली. मराठ्यांच्या या विजयाने मुंबईकर इंग्रजांच्या छातीत धडकी भरली. मराठ्यांशी दोस्ती न राखल्यास मुंबईची वसई व्हावयाची अशी शंका त्यास जाचू लागली. म्हणून त्यांनी कॅ. इंचबर्ड यास जून १७३९ त चिमाजी अप्पांच्या भेटीस पाठविले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १२ मे इ.स.१७४१
श्रीमंत वबाजीराव पेशव्यानी छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणानुसार माळवा प्रांताचे सुभेदारीची व काशी, प्रयाग, गया आणि मथुरा या हिंदूंच्या पवित्र क्षेत्रांची मागणी मोगल बादशहाकडे केली होती. निजामाने या मागणीस बादशहाची मान्यता मिळवून देण्याचे कबूल केले होते. पण ही मागणी पूर्ण होण्यापूर्वीच बाजीराव पेशवे तारीख २८ एप्रिल १७४० रोजी मरण पावले.
तेव्हा ही अपुरी कामगिरी पार पाडण्याची कामगिरी श्रीमंत बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांस करावी लागली. पेशवे बाळाजी बाजीरावानी तारीख २१ ऑक्टोबर १७४० रोजी पुण्याहून उत्तरेस जाण्याकरिता निघून माळवा प्रांतावर चढाई केली. बादशहाने प्रयागचा सुभेदार व अयोध्येचा सुभेदार ह्यांना सवाई जयसिंगास मराठ्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी हुकूम सोडिले. वरील दोन्ही सुभेदारांनी सवाई जयसिंगाच्या मदतीस जाण्यास कुचराई केली. सबब मराठ्यांचा पराभव आपल्या एकट्याच्याने होणे नाही हे सवाई जयसिंगास कळून चुकल्यामुळे त्यानी मराठ्यांशी धोलपूर मुक्कामी तह केला. पेशवे व सवाई जयसिंग ह्यांच्या भेटी तारीख १२ मे १७४१ रोजी झाल्या. त्या समयी सवाई जयसिंगानी मराठ्यांना माळवा प्रांताच्या सुभेदारीची सनद बादशहाकडून सहा महिन्यात मिळवून द्यावी असे ठरले. ही स्वारी तारीख ११ जून १७४१ रोजी संपली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

📜 १६ मे इ.स.१६४०
(ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, शके १५६२, संवत्सर विक्रम, वार गुरुवार)

महाराज व सईबाईसाहेब यांचा विवाह !
सईबाईसाहेब व महाराजांचा पुणे येथे लालमहाली समंत्रक विवाह संपन्न. महाराजांच्या आयुष्यात सईबाईसाहेब यांना फार वेगळे स्थान होते. सईबाईसाहेब व महाराजांचा विवाह संपन्न झाला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/bNm2k-iijJE?feature=share

📜 १६ मे इ.स.१६४९
( जेष्ठ पौर्णिमा, शके १५७१, संवत्सर विरोधी, गुरुवार )

शहाजीराजांची सुटका :-
घोरपडे, अफझल आणि इतर सरदारांनी शहाजीराजांचे दरबारातील महत्व कमी व्हावे म्हणून खोटेनाटे आरोप करून आबासाहेब शहाजीराजेंना झोपेत अटक करवली. मात्र आजच्या दिवशी आदिल शहाने सन्मानपूर्वक आबासाहेबांची सुटका केली. शिवरायांनी १९व्या वर्षी प्रचंड मुत्सद्देगिरी दाखवत सिंहगड किल्ला देऊन व थोरले बंधू संभाजीराजांनी बंगळूर जहागिरीच्या किल्ल्याचा ताबा आदिल शहाला देऊन सुटका करून घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१६६५
मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण
दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला,
“अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !”
पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले.
आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ? तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले.
या लढाईत मुरारबाजींसह ३०० मराठे धारातिर्थी पडले. हे सर्व मावळे चिव्हेवाडी या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या एकाच गावातील होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य अष्टमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार बुधवार)

महाराजांसाठी रामसिंह जामीन राहीला.
औरंगजेबाने रामसिंगास शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा १३ मे रविवारी रामसिंग शंभूराजांसह बादशहाच्या दरबारी गेला व शिवाजी महाराजांना ताप आल्यामुळे ते आज दरबारी हजार राहू शकत नसल्याचे बादशहास निवेदन केले. बादशाहने शंभूराजांस सरोप्याची वस्त्रे , रत्नजडीत खंजीर व मोत्यांचा हार दिला. महाराजांच्या या वागण्यामुळे राजा जसवंतसिंह, बेगम जहांआरा, जाफरखान व दरबारातील इतर उमराव यांनी शिवाजी महाराजांच्या या उद्धट व अपमानकारक वर्तणुकीबद्दल बादशाहाकडे नाराजी व्यक्त केली. महाराजांच्या या अरेरावी व उन्मत वागणुकीबद्दल शिक्षेची मागणी केली. औरंगजेबाने शिवाजीला काय शिक्षा करावी मृत्यूदंड कि कैद हे ठरवण्यासाठी सिद्धी फौलादखानाला महाराजांना राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जाण्याची आज्ञा केली. रामसिंगास हि बातमी कळताच त्याने औरंगजेबास कळवले कि “बादशाहने महाराजांस मारण्याचा विचार केला आहे परंतु महाराजांना माझे वडिल मिर्झाराजांनी त्यांच्या जीविताची हमी दिली आहे व त्या वचनाच्या कौलावर महाराज येथे आले आहेत. बादशाहने पहिले मला व माझ्या मुलाला ठार मारावे नंतर महाराजांना जीवे मारावे." शिवाजी महाराजांना तत्काळ शिक्षा केल्यास मिर्झा राजे व कुंवर रामसिंग यांचा विरोध सहन करावे लागेल हे ओळखून औरंगजेबाने रामसिंगास महाराजांसाठी जमीन राहण्यास सांगितले. १५ मे मंगळवारी महाराज रामसिंगाकडे आले व त्यांनी शपथपूर्वक आपल्या चांगल्या वर्तणुकीची हमी रामसिंगास दिली. रामसिंगाने निश्चिंत होऊन जामीनपात्र औरंजेबास दिले. १६ मे बुधवार रोजी औरंगजेबाने रामसिंगास शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा दिली.
औरंगजेब आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याची जाणीव महाराजांना झाली व त्यांनी काबुल मोहिमेवर जाण्यास नकार दिला. महाराजांनी वजीर जाफरखान व अन्य बादशाही सरदार व उमराव यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी नजराणे व काही द्रव्य व रक्कम देण्यास सुरवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/bNm2k-iijJE?feature=share
📜 १६ मे इ.स.१६८२
(वैशाख वद्य पंचमी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार मंगळवार)

छत्रपती संभाजी महाराजांची आरमारी शक्ती!
महाराजांनी इ.स.१६५६ पासूनच मराठ्यांच्या आरमाराचा पाया रचला आणि आपले बळकट आरमार समुद्रावर उभे केले. जे महाराजांचे धोरण तेच धोरण पुढे छत्रपती शंभुराजेंनी सुरू ठेवले. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहीलेले एक पत्र इतिहासात उपलब्ध असून त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमारी शक्तीचा उल्लेख आढळतो.
तो असा
छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ ८५‌ गलबते, ५ माणसे, मायनाक भंडारीचा व सिद्दी संबळचा मुलगा हाताखाली आहेत. छोट्या होड्या वगळून ५८ मोठ्या युद्धनौका, ५०००‌हजार सैनिकांचे तळ, ३० ते १५० टनांची मोठी गलबते, ३ शिडांची गुराबे इतकी आरमारी ताकद उपलब्ध आहे. यावरून छत्रपती संभाजी महाराजांनीही राज्य कारभाराच्या सुरूवातीपासून आरमारी शक्ती सदृढ करण्याकडे भर दिला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१७३९
वसई मोहिम
पोर्तुगीच गव्हर्नर नो. द. कुन्या याने २० जानेवारी १५३३ ला गुजरातच्या बहादुरशहाचा सरदार मलिक तुग़लक याचा पराभव करुन वसई जिंकले. बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिचानकड़े आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारन मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिचानी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त कर, हिन्दू पूजा व उत्सवाना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली. आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यानी मोहिम सुरू केली.
३० मे १७३७ वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला.
चिमाजी आप्पानी १९३९ च्या फेब्रुवारी ला वसईत तल ठोकला व ख-या अर्थाने लढाई सूरू झाली. अप्पांच्या कुशल नेतृत्वखाली मराठयानी जोरदार हल्ले केल्यानंतर ३० एप्रिलपासून वसईच्या शेवटास सुरवात झाली. मराठे किल्ल्यात घुसले. आखेर ४ मे १७९३ मधे फिरंग्यानी तहाचे निशान फडकावले आणि १६ मे १७३९ रोजी किल्ला मराठयांन कड़े सुपूर्द केला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १६ मे इ.स.१७५१
दाभाडे घराणे नजरकैदेत
सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढे ही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १६ मे इ.स.१८१८
इंग्रजांचा मालेगावच्या किल्ल्याला वेढा
नारोशंकर यांनी अठराव्या शतकात मालेगावचा भुईकोट बांधला. सातारा छत्रपती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे याने त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता होती. १६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी मालेगावच्या किल्ल्याला वेढा घातला. जवळजवळ एक महिना ३००-३५० अरबांनी मालेगावच्या किल्ल्याच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. १०जुम १८१८ ला इंग्रजांच्या तोफ़ांच्या मार्‍य़ात किल्ल्यातील दारुकोठाराचा स्फ़ोट झाल्याने १३ जून रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩