" छञपती श्री शिवाजी महाराज "
3.35K subscribers
4.05K photos
116 videos
458 files
3.24K links
Download Telegram
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 २१ ऑगस्ट इ.स.१६६१
सण १६६१ च्या एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी पालवणच्या जसवंतराव दळवी आणि त्याचा आश्रयादाता शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे यांचा बंदोबस्त केला. महाराजांच्यासोबत यावेळी १५ हजारांची पायदळ सेना होती.पुढे या सूर्यराव सुर्वेला आश्रय देणारे कुडाळकर लखम सावंतही महाराजाच्या भीतीने कुडाळ सोडून डोंगरात निघून गेले. तेथील व्यवस्था लावून महाराज महाडला आले. राजापूराच्या महाराजांच्या कैदेत असणारे परकीय कैद्यांच्या सुटकेसंदर्भात सुभेदार रावजी पंडित यांना सूचना देऊन महाराज शाहिस्तेखानाच्या हालचालीना पायबंद घालण्यासाठी कल्याणला आले.पण त्यांना त्यात अपयश आले. पावसाळ्याच्या पूर्वी महाराज राजगडावर आले आणि प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत शामराज निळकंठ रांझेकर यांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवेपद दिले तर अनाजीपंताना वाकेनिस पद दिले. याबरोबरच सर्व मंत्र्यांना पालखीचा मान दिला. राजगडावर झालेल्या या बदलाची तारीख होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 २१ ऑगस्ट इ.स.१६८२
"किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने कील्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ ऑगस्ट इ.स.१६८८
ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता, पुरंदरच्या तहात तो पुन्हा मोगलांकडे गेल्यावर १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभुराजेच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखानाने माहुलीचा किल्लेदार द्वारकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले. त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वारकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की,'साल्हेरचा किल्लेदार आसोजीप्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन,आणि ४० हजार रुपये,१० घोडे,खिलत,इनाम आणि राहण्यासाठी जुन्नरजवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन.'किल्लेदार द्वारकोजी अब्दुल कादिरला भेटला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २१ ऑगस्ट इ.स.१७११
चंद्रसेन जाधवरावांच्या ह्या उघड बंडाने महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण केली. ताराबाईनी चंद्रसेन जाधवांचे सहर्ष स्वागत केले. छत्रपती शाहू राजांची बाजू यावेळी फारच कमकुवत होती. चंद्रसेन जाधवरावांच्या अगोदर सावंतवाडीचे सावंत, आंग्रे, खंडेराव दाभाडे अशी मातबर मंडळी ताराबाईना मिळाली होतीच. चंद्रसेन जाधवांनी हैबतराव निंबाळकरास चिथावून त्यास ताराबाईंच्या पक्षास आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा वेळी परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर हे दोन सरदार शाहू राजांच्या बाजूचे राहिले, पण ते खानदेशकडे होते. शाहू राजांचा पक्ष फारच कमकुवत झाला होता. मोठी दुरावस्था प्राप्त झाली होती. तरी शाहू महाराज राजे डगमगले नाहीत. त्यांनी चंद्रसेन जाधवांकडील सेनापतीपद काढून ते ता. १ ऑक्टोबर १७११ रोजी त्यांचे बंधू संताजी यास दिले बाळाजी विश्वनाथांनी यावेळी पुढे सरसावून शाहू राजांची बाजू सावरून धरली. बाळाजींनी पिलाजी जाधव, पुरंदरे यांच्या सहाय्याने सावकारांकडून कर्ज काढले. फौज उभी केली. हीच फौज पुढे “हुजूर फौज”, “हुजूर पागा” म्हणून प्रसिद्ध पावली. सावकारांच्या कर्जास तारण पाहिजे म्हणून शाहू राजांकडून बाळाजींनी पंचवीस लाखाचा सरंजाम करून घेतला (२१ ऑगस्ट १७११). याच सुमारास शाहू राजास बातमी समजली की, आपल्याकडील परशुरामपंत
प्रतिनिधीसुद्धा ताराबाईच्या पक्षास मिळण्याच्या बेतात आहे, तेव्हा प्रतिनिधींना कैद करून (२० नोव्हेंबर
१७११) त्यांचा सरंजाम, घर, जिंदगीसुद्धा जप्त केली. चंद्रसेन जाधवांचा फितवा हेच शाहू राजांवर आलेले सर्वात अरिष्ट होय. या अरिष्टाची उठावणी दाऊदखान पन्नीच्या कारवाईने सिद्ध झाली. ताराबाईंनी त्यांत भर घातली आणि शाहू राजांवर नाराज झालेले खटावकर, थोरात, चव्हाण इत्यादी सरदारांना उठाव करण्यास राणीनी प्रोत्साहन दिले, मोठा पेच उत्पन्न झाला. त्यास शाहू राजांनी धिमेपणानें तोंड देऊन सर्वाच्या बंडाचा उपशम वर्ष सहा महिन्यात केला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 २१ ऑगस्ट इ.स.१७३३
रोजी विश्वासराव बाजीराव पेशव्यांना लिहितात, “अंजनवेलीत अडकलेला सिद्दीसात पुन्हा जंजीऱ्यात न्यावा आणि अंजनवेलीत संबूळला ठेवावं असा व विचार झाला आहे” (पेशवे दफ्तर ३ लेखांक ६९). मध्यंतरी सेखोजी आंग्रे यांचा मृत्यू झाल्याने अंजनवेलच्या कामात थोडा ढिलेपणा आला. याचा फायदा प्रतिनिधींनी घेतला आणि त्यांनी आपली माणसं अंजनवेलच्या मोर्चावर बसवली.
त्यात प्रतिनिधींनी साताऱ्यात शाहू महाराजांना लिहिलं की, “अंजनवेली घेऊन तरीच उठोन, अन्यथा उठतो ऐसे नाही”, आणि म्हणूनच महाराज प्रतिनिधींवर खुश होते. यानंतर अचानक प्रतिनिधींनी आपला मुक्काम चिपळूणच्या प्रदेशातून हलवला, बाजीरावांना स्वतःलाही उत्तरेच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करावं लागलं आणि मोहीम जवळपास स्थगित झाल्यासारखी झाली. इ.स. १७३५ मध्ये चिमाजीअप्पा, नारोराम मंत्री वगैरे लोक पुन्हा फौजेनिशी कोकणात उतरल्यावर मोहिमेला पुन्हा तरतरी आली. एप्रिल १७३६ मध्ये खास जंजिरेकर सिद्दी सात हा मारला गेला. हि खबर साताऱ्यात शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांनी तोफा उडवण्याची आणि नौबत वाजवण्याची आज्ञा दिली, म्हणाले, “सिद्दीसातासारिखा गनीम मारिला, हे कर्म सामान्य न केले” (पेशवे दफ्तर ३ लेखांक १८२). अप्पांना वस्त्रं, तलवार आणि बहुमान तसेच मानाजी आंग्रे यांनाही वस्त्रं आणि पदक पाठवलं. बाजीरावही म्हणतात, “राजश्री स्वामींचे (शाहू महाराज) प्रतापे व कैलासवासी नानाचे (बाळाजी विश्वनाथ) आशीर्वादे व स्वामींचे (ब्रह्मेंद्र) आशीर्वादे राजश्री आपास यश थोर आले”

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

📜 २१ ऑगस्ट इ.स.१८५७
जोधपूर राज्यातील एरिनपूरा छावणीतील देशी सैनिकांनी विद्रोहाची ज्वाला प्रज्ज्वलित केली. त्या सैनिकात बहुसंख्य राजपूत सैनिक होते . "चलो दिल्ली - मारो फिरंगी" अशा घोषणा देत सैन्य दिल्लीकडे निघाले. त्यांचा पहिला पडाव मारवाडमधील आहुजा नगरीजवळ पडला. तेथिल ठाकूर कुशलासिंह चंपावत या राजाने त्या सैनिकांचे नेतृत्व स्विकारले. आसोप, गुलर आणि आलनियावास येथले ठाकूरही आपल्या सैन्यांसह त्यांना येऊन मिळाले. तेव्हा त्या सैनिकांची संख्या सहा हजारापर्यंत झाली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 २२ आॅगस्ट इ.स.१६३२
निजामशाहीत तयार करण्यात आलेली सर्वात अवजड तोफेपैकी एक असणारी ५५ टन वजन असलेली मुलुख मैदान तोफ अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीतून परांड्याचा किल्ल्यावर नेण्यात आली. पुढे हा किल्ला आदिलशाही वजीर मुरार जगदेव याने घेतला आणि ती तोफ त्याने विजापूरला नेली. या संदर्भातील नोंद,'यापूर्वी आकारीनबाजी म्हणोन बुऱ्हाण निजामशाहीचे तर्फेने परांड्याचे किल्ल्याचे बंदोबस्ताचे कामावर नेमला होता. निजामशाहीचे राजधानीत व मुलुखात धांदल झाली तेव्हा आदिलशहाशी मिळाला आणि आदिलशहाचे सेवेची साखळी आपल्या गळ्यात घालून म्हणजे आदिलशहाचे सवेत वागोन परांड्याचा किल्ला आदिलशहाचे हवाली केला. सांप्रत मुरारराव परांड्याचे किल्ल्यावर राहिला.मुरारराव याने मुलुख मैदान तोफ विजापुरास पाठवली ता. १५ माहे सफर सन १०४२. (म्हणजे २२ ऑगस्ट १६३२) रोजी बुरुजावर ठेवली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 २२ ऑगस्ट इ.स.१६८२
औरंगाबाद ही मुघलांची दक्षिणेतील राजधानी.औरंगजेब दख्खन मोहिमेवर आल्यापासून म्हणजे १६८१ पासून ते १६८३ पर्यंत मराठे मुघलांच्या आक्रमणाला तोंड देण्यासोबतच मुघल प्रदेशात हल्ले करून त्या भागाची लुटही करत असत. १६८१ च्या मे महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद परिसरात लूट करून तो प्रदेश उध्वस्त केला होता. त्यासोबतच १६८२ च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद पासून जवळच असणारे जालना शहर लुटले होते. ऑगस्ट १६८२ च्या अश्याच एका हल्ल्यात औरंगाबाद पासून जवळच असणाऱ्या कन्नडचा ठाणेदार शहा अलीलनरा जखमी होऊन मराठ्यांच्या हाती लागला. मराठ्यांनी त्याला कैद करून ताब्यात घेतले.पुढे तो ऑगस्ट महिन्यात मराठ्यांच्या ताब्यातून सुटला आणि मुघल सरदार खानजहान बहाद्दूरला जाऊन मिळाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २२ ऑगस्ट इ.स.१६८७
मोगलांच्या सोबत सुरू असलेल्या जीवनमरणाच्या संघर्षातही संभाजीराजे राज्यकारभारात किती तत्पर होते ते त्याच्या पत्रावरून लक्षात येते. शिवाजी महाराजांनी वाई प्रांतातील कसबे निंब येथील श्री सदानंद गोसावी यांना मठातील अन्नछत्रासाठी दरसाल रकमेची तरतूद करून दिली होती. पण तेथील कारकून ही रक्कम देण्यास हयगय करत असल्याचे तक्रार राजश्री आनंदगिरी गोसावी यांनी संभाजीराजेच्याकडे केली.त्यामुळे राजेंनी तेथील कारकुनाला जरबेचे पत्र लिहिले, "पहिले पासून अन्नछत्र चालिले असता मध्ये ऐवजाबाबे कुसुर करावया गरज काय? या उपरी ऐवज पाववावया बाबे सुस्ती न करणे. पाहिले पासून द्यावयाचा मोईन असेल तेंण्हे प्रमाणे पाववीत जाऊन अन्नछत्र चालो देणे. धर्मकार्यास खलेल न करणे.जाणिजे. अन्नछत्राचा मामला पूर्वीपासून सालगुदस्ता चालिला असेल ते मनास आणून त्याप्रमाणे चालवणे. उजूर न करणे.लेखनालंकार."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २२ ऑगस्ट इ.स.१७३३
इ.स १७१३ च्या कान्होजी आंग्रे आणि शाहू छत्रपती यांच्यामधील तहामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीचा काही भाग छत्रपतींनी कान्होजी आंग्रे यांस दिला त्यामुळे अधूनमधून या भागात सिद्धी कुरापती काढण्याचा प्रयत्न सातत्याने करतच असे. सिद्दीचा पाडाव करावा असा छत्रपतींचा मनोदय त्यात त्याचा या भागात होणारा पुंडावा या सगळ्या कारणां मुळेच सिद्दीविरुद्ध मोहीम निघावी ह्याविषयीची खलबतं चालू झाली...
समुद्री मोहीम म्हटल्यावर आंग्रे घराण्याशिवाय मोहीम पुढे हालणारचं कशी तेव्हा जानेवारी १७३२ मध्ये खुद्द बाजीराव सेखोजींना भेटण्यासाठी कुलाबा येथे आले त्यांच्या भेटीचा उपयोग झाला,आणि सेखोजींनी ही मोहीम अंगावर घ्यायचे असे ठरवले शिवाय जंजिरेकरा विषयी पूर्ण माहिती असलेला आणि आरमारी लढाईत कुशल असा बांकाजी नाईक महाडिक नावाचा आपला एक प्रसिध्द सरदार सैन्यासह बाजीरावाचे स्वाधीन केला तसेच आपला भाऊ मानाजी यासही या मोहिमेवर जाण्यास सांगितले. इ.स १७३३ एप्रिलमध्ये श्रीनिवासराव प्रतिनिधी बाजीराव आणी फत्तेसिंग भोसले ही मोहीम चालू करण्यासाठी कोकणात आले आंग्ऱ्यांचा सरदार महाडिक आणि सिद्दीसात यांचे चिपळूणजवळ युद्ध झाले त्यात सिद्दी सातची दाणादाण उडाली. या मोहिमेची सुरवात झाल्यावर सिद्दी रसूल याकूतखान मृत्यू पावला व त्याच्या सात मुलांमध्ये यादवी सुरु झाली यात त्याचा ज्येष्ठ मुलगा मारला गेला सिद्दी अब्दुल रहिमान गादीवर बसला तो सेखोजींच्या मताप्रमाणे वागत होता त्यामुळे बाजीरावाविरुद्ध लढू नये, असे त्याचे मत होते परंतु त्याचा सरदार मंडळाला हे मान्य नव्हते त्यांनी सिद्दी रसूल याकूतखानच्या सिद्दी हसन या मुलाला गादी वर बसविले आणि ही मोहीम लढण्यास त्यांनी सुरवात केली.२२ ऑगस्ट १७३३ पर्यंत जंजिरा आणि अंजनवेल हे वगळता सिद्दीची बाकीची सर्व ठाणी मराठ्यांच्या ताब्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 २३ ऑगस्ट इ.स.१६६६
( भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १५८८, संवत्सर पराभव, गुरुवार )

कवी परमानंदांना अटक :-
या दिवशी राजांनी अधिकृत दस्तके दाखवून नरवर घाटी पार केल्याचे फौलाद खानाने वकील गिरीधारीलाल याला सांगितले. मात्र दस्तके नीट न तपासण्याचा आरोप ठेवत औरंग्याने नरवरचा फौजदार ईबादुल्ला खान याची मनसब ५०० घोडेस्वारांनी कमी केली. मात्र याच दिवशी कवी परमानंद यांना दौसा येथे मोगल सैनिकांनी पकडले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 २३ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या राजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘शिवाजी येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, शिवाजीला ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व राजा विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाजीला दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्तंबातमी असते. तेव्हा या बाबतींत सत्यता अजमावण्यासाठी तो कुमाराच्या छावणीत आला..’’

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ ऑगस्ट इ.स.१६८०
(भाद्रपद शुक्ल नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)
शिवरायांच्याच्या अकाली निधनानंतर शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज गादीवर आले. १८ जुन इ.स.१६८० ला रायगडी गेल्यावर आणि थोडी स्थिरता आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडच्या भवानी आईला १० हजार होणांची सनद करून दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ ऑगस्ट इ.स.१७०९
बाळाजी विश्वनाथांस पेशवेपद मिळाले तेव्हा धनाजी जाधवांचा मृत्यू होऊन ५ वर्षे झाली होती (धनाजी जाधव, मृत्यू ९ जुलै १७०८); १७१० मध्ये शाहू महाराजांचा सहाय्यक परसोजी भोसले निवर्तले व त्यांचा पुत्र कान्होजी कारभारावर दाखल झाले. छत्रपती शाहू महाराजांचा मुख्य सरदार रायभानजी भोसले हे २३ ऑगस्ट १७०९ रोजी मरण पावल्यावर शाहू महाराजांची मोठी हानी झाली. यावेळी चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, सिधोजी, हिंदुराव घोरपडे वगैरे सरदारांची मने द्विधा होऊन शाहू राजास आपला जम बसण्याची विवंचना निर्माण झाली. ह्या सरदारांची समजूत काढण्याचा शाहू राजांनी फार प्रयत्न केला. पण ते शाहूस महाराजांस सोडून गेलेच. चंद्ररावाचा व रावरंभा निंबाळकर यांचा पंडावा मोडून आपली बाजू सावरण्यासाठी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांची पेशवेपदी नेमणूक केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ ऑगस्ट इ.स १७७०
माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव मोठे झाले होते. नुकत्याच झालेल्या कर्नाटक मोहिमेत नारायणरावांना सहभागी करून त्यांना लढाईचे प्रत्यक्ष मैदानावरील डावपेच शिकवायला माधवरावांनी सुरुवात केली होतीच, परंतु दि. २३ ऑगस्ट सन १७७० रोजी माधवरावांनी सखारामबापू बोकील यांची दिवाणगिरी नारायणरावांना बहाल केली आणि बापूंना मुतालकीची वस्त्रे दिली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीसच नागपूरकर जानोजी भोसले माधवरावांच्या भेटीकरता पुण्यात आले. ही केवळ सदिच्छा भेट होती. माधवरावांनी सेनासाहेब सुभा असलेल्या जानोजी भोसल्यांची उत्तम सरबराई केली. मेजवान्या आणि भेटीदाखल नजराणे दिले गेले आणि ऑक्टोबर महिन्यात जानोजी परत नागपुरास फिरले. माधवरावांची तब्येत अजूनही नादुरुस्तच होती. म्हैसूरचा हैदरअली दिलेली वचने पाळत नव्हता म्हणून माधवरावांनी आपली थोडी फौज हरिपंततात्या फडक्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कर्नाटकात पाठवली. (अंदाजे १७७१ च्या सुरुवातीला). या फौजेने हैदरला पुन्हा हादरा देऊन ३६ लाख रुपये रोख, कर्नाटकातला इतर पूर्वी स्वराज्यात असलेला मुलुख मान्य करून घेतला. शिवाय दरसाल १४ लाख रु. खंडणी भरण्याचे हैदरला ठणकावून सांगितले. कर्नाटकात ही मोहीम सुरू असतानाच माधवरावांनी उत्तरेत असलेल्या महादजी शिंद्यांना दिल्लीवर स्वारी करण्यास सांगितले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २३ ऑगस्ट इ.स.१९५८
महिला समाजसुधारक चिमणाबाई सयाजीराव गायकवाड ( बडोदा ) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
देवास येथील श्रीमंत सरदार बाजीराव अमृतराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेल्या गजराबाई या युगदृष्ट्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसर्या पत्नी व राजमाता जमनाबाई राणीसाहेब यांच्या स्नुषा होत्या.चिमनाबाई राणीसाहेब व महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विवाह सन.१८८५ मधे झाला . नेहमीच सांगितले जातेकी प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्री असते,त्याप्रमाणे श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या मागे चिमणाबाई राणीसाहेब या भक्कमपणे ऊभ्या होत्या. महाराजांप्रमाणे चिमणाबाई या स्वप्नाळू राणी होत्या. चिमणाबाई राणीसाहेबांनी बडोद्याच्या प्रमुख महिला नेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
त्यांनी आपले पती श्रीमंत सयाजीराजे यांच्या सोबत काम केल्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या वर्षापासूनच प्रगतिशील विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी स्त्रियांवर एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचे नाव" भारतीय जीवनातील स्थिती" असे होते.या पुस्तकात त्यांनी महिलांना ज्ञान देण्याच्या अनेक योजनांच्या अपयशावर प्रकाश टाकला होता.
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात चिमणाबाई राणीसाहेबांचे कार्य व योगदानामुळे संपूर्ण गुजरात मध्ये याची पायाभरणी झाली. या सर्व गोष्टींमुळे चिमणाबाई राणीसाहेबांना गुजरात मधील लोकांच्या हृदयात स्थान मिळाले.चिमणाबाई राणीसाहेब यांनी आपले आयुष्य स्रियांच्या शिक्षणासामधे वाहून घेतले आणि पुरूष प्रणाली व बालविवाह नाकारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.चिमणाबाई राणीसाहेब या उत्तम शिकार करत होत्या.सन.१९०० मधे चिमणाबाई राणीसाहेबांनी रेवा संस्थानला भेट दिली असता तेथे त्यांनी वाघाची शिकार केली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष


📜 २५ ऑगस्ट इ.स.१६२९ 

जाधवरावांसारखे मातबर सरदारांचा बंदोबस्त निजामशहाने करावा असा गुप्त सल्ला जाधवरावांच्या विरुद्ध असलेल्या सरदारांनी निजामशहास दिला. असे होऊ नये म्हणून निजामशहाने त्यांना पकडून अटकेत ठेवण्याचा विचार केला. जाधव मंडळीस त्याने दौलताबादचे किल्ल्यावर दिनांक २५ ऑगस्ट १६२९ रोजी भेटीस बोलाविले. त्यास पकडीत असता विलक्षण दंगल माजली, तीत खुद्द लखूजी जाधवराव, त्यांचे दोघे पुत्र अवलोजी आणि राघोजी व नातू यशवंतराव इतके पुरुष मारले गेले. लखूजीची बायको गिरजाबाई, भाऊ जगदेवराव व मुलगा बहादूरजी एवढे बचावून सिंदरखेडच्या गढींत आश्रयास गेले. बादशहा शहाजनास हा प्रकार कळल्यावर त्याने ह्या जाधव मंडळीस नोकरींत घेऊन मनसबी ठरवून दिल्या. आपल्या सासऱ्याचा दग्याने खून केलेला पाहून निजामशाहीत यापुढे राहणे धोक्याचे आहे तसेच आपल्याला निजामशाहीत परत आणण्याचा जो प्रयत्न झाला त्यांत काहीतरी कुटील कारस्थानाचा भाग असला पाहिजे असा शहाजीराजांचा समज झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 २५ ऑगस्ट इ.स.१६५७

कोकणातील किल्ले जंजिरा या जलदुर्गावर मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यात किल्ल्याच्या तटाला मोठ्या हिमतीने शिड्या लावलेल्या श्यामरावांचा आणि बाजी घोलप यांचा शिवरायांनी सन्मान केला. रघुनाथपंतांनी तळे-घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिद्द्याकडुन जिंकला व नंतर जंजिरा घेण्याचाही प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ ऑगस्ट इ.स.१६६५

कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!

           व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेले इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत दुटप्पीपणे वागत होते.महाराजांच्या विरोधात ते सिद्दी, मोगल आणि अदिलशाहीला छुपी मदत करत असत.प्रगत इंग्रजांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा व आधुनिक शस्त्रे होती. पण असे असले तरी महाराजांच्या पुढे त्यांची मात्रा चालत नसे. महाराजांच्या स्वारीवेळी त्यांना सुरक्षित आसरा शोधावा लागे. प्रसंग होता शिवाजी महाराजांच्या पहिल्या नौका रोहणाचा(८ फेब्रुवारी १६६५)आणि त्याद्वारे बसरूर आणि कारवार वर केलेल्या स्वारीचा.महाराज ५ ते ६ दिवसांचा समुद्रप्रवास करून १३ किंवा १४ फेब्रुवारी ला बसरूरला आले होते.महाराजांच्या स्वारीच्या भीतीने हुबळी आणि कारवारलाही घबराट पसरली होती. तेथील इंग्रजानी महाराजांच्या भीतीने शेरखानाकडे आश्रय मागितला होता. त्या परिस्थितीत कारवारच्या इंग्रजानी सुरतेला पत्र पाठवले होते,"अश्या परिस्थितीमुळे आम्ही बकांपुरचा सुभेदार शेरखान कडून परवानापत्र घेऊन ठेवले आहे,जेणेकरून वेळ पडली तर तेथे आम्हला जाता येईल,मालक बहलोलखान होता."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ ऑगस्ट इ.स.१६७४

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभानंतर अवघ्या काहीच दिवसात पाचाड मुक्कामी जिजाऊंच्या झालेल्या निधनाने फक्त महाराजच नव्हे तर अवघा मुलुख उदास झाला होता.असे असले तरी महाराज आपले दुःख बाजूला सारून स्वराज्याचाच विचार करत होते.याच काळात फोंडयाचा आदिलशाही सुभेदार महंमदखान स्वराज्याच्या हद्दीत येऊन कुरापती काढत होता.त्याने स्वराज्यातील गावातून एका श्रीमंत व्यापाऱ्याला कैद करून नेले होते. महाराजाना ही बातमी समजताच ते संतप्त झाले. महाराजांच्या रागावल्याची गोष्ट कळताच महमदखान घाबरला.महाराजांच्या स्वारीच्या धाकाने त्याने इंग्रजांकडून दारुगोळा व तोफा मागवल्या.पण महाराजांच्या भीतीने इंग्रजानी नकार दिला. चिडलेल्या महाराजांनी अण्णाजीपंताना सैन्य देऊन फोंडयावर रवाना केले.पण अनपेक्षितपणे ही बातमी खानाला समजली.तो सावध राहिल्याने अण्णाजीपंताना अपयश आले. आण्णाजीपंताना महाराजानी फोंडा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते ते ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ ऑगस्ट इ.स.१६७६

सण १६७ च्या नारळी पौर्णिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा मोहीम हाती घेण्याचे ठरवले.त्यासाठी महाराजानी स्वराज्याचे पेशवे मोरोपंत यांना 10 हजार फौज देऊन जंजिऱ्यावर पाठवले.सिद्दी यावेळी सुरतेत होता.मोरोपंत निघाल्याचे कळताच तोही आपल्या सैन्यासह जंजिऱ्याकडे निघाला.मोरोपंतांनी बरेच प्रयत्न केले पण यश मिळत नव्हते.त्यांनी एक दिवस पद्मदुर्गावर असणाऱ्या सोनकोळी लोकांना बोलवून त्यांचा प्रमुख लाय पाटील यांना जंजिरा मोहिमेत मदत करण्यास सांगितले.लाय पाटलांनी होकार देताच त्यांना अंधाऱ्या रात्री जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावण्याची कामगिरी देण्यात आली.ठरलेल्या दिवशी लाय पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडली पण पहाट होत आली तरी मोरोपंत आले नाहीत त्यामुळे लाय पाटील परत गेले.मोहीम अपयशी झाली.मोरोपंतांनी रायगडी जाताच लाय पाटलांचा पराक्रम महाराजाना सांगितला.महाराजानी त्यांना पराक्रमाबद्दल छत्री,निशाण आणि पालखी
देऊ केली पण पाटलांनी ती नाकारल्याने त्यांना पालखी नावाचे गलबत बांधून दिले.त्याचबरोबर महाराजानी पद्मदुर्गाच्या हवालदार,सरनौबत यांचाही सन्मान केला.पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ ऑगस्ट इ.स.१६९७

शाहूराजे कैदेत असताना राजाराम महाराज ज्येष्ठ व तद्नंतर महाराणी ताराबाईंनी राज्य सांभाळणे हे परिस्थितीनुसार अनिवार्य होते. पण आता शाहूराजांची सुटका झालीय. मराठ्यांच्या सिंहासनावरचा त्यांचा हक्क त्यांना मिळावयास हवा. परंतु, मराठी राज्य अत्यंत निर्वाणीचा पेच इथे निर्माण झाला. शाहूंची सुटका झाल्याचे ऐक जळफळाट झाला. कारण संभाजीराजांच्या मृत्यूनंतर राजारामांना मिळालेली गादी पुढे त्यांचेच वंशज चालवणार होते. पण शाहू राजे सुटल्यामुळे आता राज्याचा सारा कारभार आपल्याला सोडावा लागणार या एकाच विचाराने ताराबाईंना हैराण करून सोडले. इ. स. १६७९ मध्ये स्वराज्य सोडून मोंगल सरदार दिलेरखानाला मिळालेल्या व पुन्हा स्वराज्यात आलेल्या युवराज संभाजीराजांना थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावर एकांती समजावले होते. त्यांच्यासमोर स्वराज्याच्या वाटणीचा प्रस्तावही मांडला होता. परंतु, त्यानंतर संभाजीराजांनी नम्रपणे उत्तर दिले की, "आपणांस साहेबांचे पायाची जोड आहे. साहेबांचे (शिवरायांचे) पायाशी इमान वाहून दूधभात खाऊन राहू." याचाच अर्थ संभाजीराजांना राजपदाची अभिलाषा नव्हती. पण याचबरोबर राजारामांची मनस्थिती तपासून पाहिली पाहिजे. दि. २५ ऑगस्ट १६९७ च्या एका पत्रात उल्लेख आहे की, "चिरंजीव शाहू कालेकरून तरी श्री देशी आणिल, तेव्हा संकटी जी माणसे उपयोगी पडली, त्यांच्या तसनसी आम्ही करविल्या, याचा चित्ती द्वेष यावा हे तरी अविचाराचे कलम. शाहू राज्यास अधिकारी, आम्ही करतो ते तरी त्यांचेसाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकांस त्याज कडेच पाहणे आहे. हे कारण ईश्वरेच नेमिले असेल..." याचाच अर्थ असा आहे की, राजाराम महाराज हे स्वतःला शाहूंचाच प्रतिनिधी समजत होते व राज्यकारभार चालवत होते. परंतु हा उद्देश अथवा ही पोच ताराबाईंच्या मनात अजूनही रुजली नव्हती. हाती सत्ता आल्यावर अन् मराठ्यांच्या सर्वोच्चपदाचा मान मिळाल्यावर ताराबाईंना इतर काही सुचेनासे झाले. राजारामांच्या अकस्मात मृत्यूनंतर ताराबाईंनीच गादी चालवून मराठी राज्य सावरले ही गोष्ट जरी खरी असली तरी आता त्यांना आपल्यावर अन्याय (?) होतोय असे वाटू लागले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


📜 २५ ऑगस्ट इ.स.१८०५

१८०५ त समेटाची जागा संबळगड सोडून यशवंतराव मेवाड, मारवाड, दिल्ली, अशा ठिकाणी फिरत राहिले. पुष्कर, अजमेर हे त्यांचे या दिवसांत एक प्रकारे मुख्य ठाणे होते. येथे येऊन यशवंतराव इंग्रजांच्या लष्करी हालचालींच्या बातम्या काढीत होते. इंग्रजानाही भरतपूरच्या लढाईनंतर आपल्या फौजेची जुळवाजुळव करण्यास सवड हवी होती. पण त्यांना यशवंतरावांचा पिच्छा सोडावयाचा नव्हता. यशवंतराव त्यांचा सदर हेतू ओळखून होते. पंजाब हा त्यानी दौडीचा प्रदेश ठरवून पंजाबातील शीख व त्यांच्या पलिकडील अफगाण यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरु होता. दिनांक २५ ऑगस्ट १८०५ रोजी यशवंतराव राजस्थानच्या बाजूस, दिल्लीच्या अलिकडे असलेल्या रेवाडी नांवाच्या गांवाहून निघाले. मीरखान तीन चार दिवस मागे राहिला होता. शिंद्यांना सामील करून घ्यावे या उद्देशाने तो रेवाडीहून हालला नाही. यशवंतरावानी शिखांशी संधान बांधून त्यांना अनुकूल करून घेतले होते. त्यांचे फ्रेंच व पोर्तुगिज गोवेकर यांची मदत मिळविण्याचे प्रयत्न चालले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष


📜 २४ ऑगस्ट इ.स.१६५७ 
(श्रावण वद्य दशमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार सोमवार)

विजापुर-मोगल तह !
          महमद आदिलशहा १६५६ त मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नीने बेगम साहेबिणीने आपल्या पसंतीच्या तरण्या मुलाचे अली नाव ठेवून त्यास विजापूरच्या गादीवर बसविले. तो एकोणीस वर्षांचा होता. खरा कारभार त्याची आई साहेबीण पाहू लागली. मोऱ्यांचा निकाल छत्रपती शिवाजीराजांनी लावल्यापासून विजापूर दरबारावर संकटांची मालिका कोसळू लागली. औरंगजेबाने विजापूरवर आक्रमण करून त्यांना राज्य वाचविण्यासाठी मोगलांशी तह करण्यास भाग पाडले. त्याप्रमाणे २४ ऑगस्ट १६५७ रोजी आदिलशहाने औरंगजेबाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या. दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/shivhindvi
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 २४ ऑगस्ट इ.स.१६७७
मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
          आपली दक्षिण दिग्विजय मोहीमेत शिवाजी महाराजांनी विजापुरकरांचा बराचसा मुलुख आणि कावेरी नदीच्या उत्तर भागातील असा मिळून १९ हजार चौरस मैलांचा अतिशय सुपीक भाग जिंकला. त्याचा वार्षिक महसूल २० लाख होनापेक्षाही जास्त होता. महाराज यानंतर उत्तर कर्नाटकात आले.त्याबद्दलची इंग्रजांची नोंद,"शिवाजी सध्या ऊर्ध्व कर्नाटकात,जेथे जिंजी,तंजावर,पिलकुंडा हे मजबूत व अन्य अनेक किल्ले त्याने घेतले असून मुसलमानांचा लज्जास्पद पराभव त्याने केला आहे आणि त्याने श्रीरंगपट्टण लुटले आहे असे मानले जाते. तेथून त्याने प्रचंड संपत्ती सोबत नेली असे म्हणतात. परतताना ब्रिदरूर घेण्याचे व त्याद्वारे कॅनरा प्रांत नव्याने जिंकलेल्या त्याच्या राज्याला जोडण्याचे त्याचे नियोजन आहे.


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ ऑगस्ट इ.स.१६८०
(भाद्रपद शुद्ध १०, दशमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

संभाजीराजांचे दानपत्र!
           संभाजीराजांनी कुडाळ येथील रहिवासी बाकरेशास्त्री यांना प्रतिवर्षी दहा हजार होनांचे दानपत्र करून दिले. हे दानपत्र संस्कृतमधे असुन त्यातील अक्षर सुंदर आहे तसेच, सुरूवातीला शंकरादी देवांना वंदन करून पुढच्या दोन ओळी स्वतः संभाजीराजांच्या हस्ताक्षरातील आहेत त्या पुढीलप्रमाणे:

।। मतं मे श्रीशिवराजपुत्रस्य श्री शंभुराज।।
।।छत्रपते: यदत्रोपरिलेखितं।।
अर्थ: यापुढे मी जे लिहिले आहे ते शिवाजीराजांचा राजपुत्र असलेल्या मला (संभाजीराजांना) संमत आहे.

या वेळेपर्यंत अजुन संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता. तो त्यांनी पुढे पाच महिन्यांनी करवून घेतला. शिवाजीराजे साधुसंतांना इनाम करून देत असत त्याप्रमाणेच हे दानपत्र संभाजीराजांनी कुडाळच्या बाकरेशास्त्री या मांत्रिकाला दिले. हे दानपत्र खुप मोठे आहे. त्यात काही ठिकाणी संभाजीराजांनी काही लोकांचे उल्लेख केले आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते पुढीलप्रमाणे-

*शिवाजीराजांच्या पराक्रमाचे केलेले वर्णन
*शिवाजीराजांनी अफजलखानाला मारताना बिचवा हे शस्त्र वापरले
*सोयराबाईंचे मन हे स्फटिकमण्याप्रमाणे स्वच्छ आहे मात्र प्रबळ व दुष्ट मंत्र्यांच्या सल्ल्यामुळे सोयराबाईंच्या मनात सापत्नभाव तयार झाला आहे आणि त्यामुळे शिवाजीराजेही त्यांच्या पित्रुकर्तव्याला चुकले आहेत.
*औरंगजेबाच्या सेनापतीने (दिलेरखान) भुपाळगड जिंकुन देण्यासाठी संभाजीराजांपुढे हात टेकले
हे वरील उल्लेखांबरोबरच संभाजीराजांनी स्वतःच्या व शिवाजीराजांचे पराक्रम, तसेच देवांची स्तुती अलंकारित भाषेत वर्णिली आहे.

या दानपत्रातुन संभाजीराजांच्या मनात स्वतः विषयी व शिवाजीराजे, सोयराबाई, मंत्रीगण, औरंगजेब व इतर शत्रूंबद्दलचे विचार व्यक्त होतात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ ऑगस्ट इ.स.१६८०
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीचे वर्णन करणारे पत्र टोपीकर ब्रिटिशांच्या कागदपत्रात आढळतात. ब्रिटिशांच्या राजापूर वखारीतून सुरतच्या वखारीला पाठवलेले आहे तर दुसरा संदर्भ (२४ ऑगस्ट १६८०) कोलंबो मधल्या ब्रिटिशांच्या दस्तऐवजा मधील आहे.
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पत्रातून संभाजी महाराजांच्या स्वभावाच्या अनेक पैलूंचे वर्णन केले आहे - हे वर्णन समकालीन असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. 
२० जुलै १६८० संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी 'राजा' झाल्याचे जाहीर केले .या संदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे -
"जून-जुलै छत्रपती शिवाजी राजा मरून संभाजी राजाला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते, आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात." परंतु त्याचा स्वभाव अधिक नरम असुन आपल्या कंपनीबाबत त्याच्या मनात तिटकारा नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ ऑगस्ट इ.स.१६९९
औरंगजेबने बऱ्याच सरदारांना वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी दिली व त्यांना निक्षून पुन्हा सांगितले की मराठ्यांना आपल्या हद्दीत राहू देऊ नये, तसेच त्यांना छावणी करू देऊ नये व २४ ऑगस्ट १६९९ रोजी औरंगजेबास समजले की सहा हजार मराठे स्वारांनी येरवळ व कंधार (नांदेड जिल्हा) येथे छावणी केली तेव्हा औरंगजेबने नांदेड सुभेदार व धारूर किल्लेदार यांना लिहून कळविले की त्यांचे पारिपत्य करणे. याचवेळी वऱ्हाडांत परसोजी भोसले मोगलांविरुद्ध हालचाली करत होता. आज्जमगड पुरंदर भागात मराठा सरदार परशुराम हा दोन हजार स्वार घेऊन दंगल करीत होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २४ ऑगस्ट इ.स.१९०८
 स्वातंत्र्यवीर हुतात्मा राजगुरु यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 
          राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे २४ आॅगस्ट १९०८ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात राजगुरू आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लहानपणी म्हणजे वयाच्या १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले.आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयात, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने - वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणातच जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती,आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते.मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री.हनुमान आखाड्यात 

  व्यायाम विशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशी येथे परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला ,आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले. त्या क्रांतिमय वातावरणामधे वावरताना राजगुंरुमधील क्रांतिकारकं घडत गेला.कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती. आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूं यांच्याजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिववर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने वर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले,आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरुळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरुळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती.

राजगुरू यांची सहनशीलता दाखवणारे प्रसंग अनेक होते. २३ मार्च १९३१ या दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग, राजगुरु,आणि सुखदेव 
 यांना फाशी देण्यात आले. हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेले.स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे हे थोर क्रांतिकारक होते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩⚔️ हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.⚔️🚩