युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.62K subscribers
453 photos
5 videos
154 files
132 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
मुख्य परीक्षा - #SSM & #CSM

1) #GS3 मधील अंतर्गत सुरक्षा या विषयातील सायबर गुन्हेगारी या घटकाच्या अंतर्गत ही बातमी महत्त्वाची आहे.

2) #GS2 राष्ट्र पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताची अधिकृत भूमिका यात परराष्ट्रमंत्र्यांनी मांडलेली आहे.

UPSC पूर्व परीक्षा - #CSP

1) दहशतवाद विरोधी समिती UN च्या कोणत्या अंगाच्या अंतर्गत कार्य करते. - UNSC

राज्यसेवा पूर्व परीक्षा - #SSP

1) UNSC दहशतवाद विरोधी समितीची बैठक कोणत्या शहरात पार पडली. - मुंबई आणि दिल्ली.

2) भारताने UN च्या दहशतवाद विरोधी विश्वस्त निधीत किती आर्थिक सहाय्य करायची घोषणा केली. - 5 लाख USD

Join @UPSCin_Marathi
#GS2

मुख्य परीक्षा -

1) समान नागरी कायदाची वाटचाल.

2) समान नागरी कायदा आणि अल्पसंख्याक.

पूर्व परीक्षा -

1) समान नागरी कायदा संविधानाच्या कोणत्या भागात समाविष्ट आहे. - DPSP


2) समान नागरी कायदा हा शब्द मूळ संविधानात नमूद आहे का? - YES

Join
@UPSCin_Marathi
पूर्व परीक्षा -

राज्यसेवा -
#SSP

1) 53 वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? - उत्तरप्रदेश

2) राणीपूर व्याघ्र प्रकल्प हा उत्तरप्रदेश मधील कितवा व्याघ्र प्रकल्प आहे. - चौथा

UPSC -
#CSP

1) व्याघ्र प्रकल्प मंजुरी कोणत्या कायदा अंतर्गत मंजूर करतात. - वन्यजीव संरक्षण कायदा - 1972

2) खालील पैकी कोणता व्याघ्र प्रकल्प उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी जंगलात आहे. - राणीपूर

Join
@UPSCin_Marathi
निबंध लेखनाच्या संदर्भात आपण लवकरच एक बॅच सुरू करणार आहोत त्याची पूर्ण माहिती लवकरच आपल्या सोबत शेअर करणार आहोत.

या संदर्भात हळू हळू लेखन क्षमता वृद्धी, तसेच टप्प्याटप्प्याने निबंध लेखनाची शब्द मर्यादा कशी वाढवता येईल
, या संदर्भात आपण तयारी करून घेणार आहोत.

मागील वर्षीच्या टॉपिक वर चर्चा तसेच तुम्ही लिहलेले निबंध देखील तपासून दिले जातील.

पुढील माहिती लवकरच आपल्या
@EssayInMarathi चॅनल वर शेअर करण्यात येईल.

धन्यवाद 🙏🏾
आधुनिक आणि नवअभिजात उदारमतवाद

या विचारप्रणाली वर विस्तृत चर्चा या लेक्चर मध्ये करण्यात आली आहे.

लिंक - https://youtu.be/IxJY9Aerlfk

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध या बॅचचे पुढील लेक्चर सह्याद्री आयएएस अकॅडमी च्या अॅपवर बघायला मिळतील. App डाऊनलोड लिंक -

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.kzgwo

#PSIR
बॅचचे पूर्वीचे लेक्चर खालील लिंक वर बघू शकता.

Lecture 1 - https://youtu.be/Lt_RcxTlTRo

Lecture 2 - https://youtu.be/1cTlk_2fpAs

Lecture 3 - https://youtu.be/ZSHsOCpv5Dw

Lecture 4 - https://youtu.be/etpFkShZxeE

Join @PSIRin_Marathi
#GS1 - भारतीय समाज

1) स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या मुद्द्यांतर्गत आपण या उदाहरणाला वापरू शकतो.

#GS2 - भारतीय संविधान

1) संविधानाच्या अनुच्छेद 39(D) अंतर्गत समानतेच्या तत्वाला अनुसरून ही कृती आहे. त्यामुळे मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये एखादा प्रश्न आल्यास त्याच्या उत्तरात या उदाहरणाला वापरता येऊ शकते.

#GS3 - मानवी संसाधन आणि समावेशक विकास

1) समाजातील श्रमशक्तीला योग्य प्रकारे वापरून देशाच्या आर्थिक वृद्धीला हातभार लावण्यासाठी समान काम समान वेतन देऊन स्त्रियांचे आर्थिक समावेशन करणे गरजेचे आहे.

हे विधान तुम्ही सर्व समावेशक विकास संदर्भातील प्रश्नांच्या उत्तरात लिहू शकता.

#GS4 - संकल्पना

1) समानभूती या मूल्याची व्याख्या लिहून त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपण या घटनेचा उल्लेख करू शकतो.

Join @UPSCin_Marathi
इस्रायलचे माजी प्रधानमंत्री बेन्यामिन नेत्यानाहू यांच्या नेतृत्वाखालील उजवी-धार्मिक आघाडी विजयी झाली असून, नेत्यानाहू पुन्हा एकदा इस्त्रायलच्या प्रधानमंत्री पदी विराजमान होतील.

जागतिक पटलावर दक्षिण अमेरिकेतून डाव्यांचा उदय सोडला तर इतरत्र उजव्या आणि कडवट राष्ट्रवादी नेत्यांचे आणि पक्षांचे सरकार येत आहेत.

तुम्ही हे विचारप्रणालीच्या अंत या संदर्भात येणार्‍या प्रश्नाच्या उत्तरात लिहू शकता.

विचारप्रणालीचा अंत | End of Ideology लेक्चर -
https://youtu.be/1cTlk_2fpAs

Join
@PSIRin_Marathi
#GS2
न्यायालयीन दिरंगाईच्या अनुषंगाने या खटल्याकडे बघता येईल.

#GS4
तसेच वकिलाची कर्तव्यनिष्ठ देखील यातून अधोरेखित करता येईल.

Join
@UPSCin_Marathi
समाजवाद | Socialism

या लेक्चर मध्ये सामाजिक उदारमतवादाच्या विचारांवर प्रथम चर्चा करण्यात आली आहे. तसेच त्यानंतर समाजवाद विचारसरणीची निर्मिती प्रक्रिया तसेच त्याचे विविध प्रकार आणि कार्ल मार्क्स यांच्या अगोदरचे आणि नंतरचे समाजवादी विचार यावर सविस्तर चर्चा या व्हिडिओ मध्ये करण्यात आली आहे.

Join
@PSIRin_Marathi

https://youtu.be/5p_9ZRUcFvo
#GS3

दिल्लीचे वायू प्रदूषण आणि त्याचे परिणाम यासंदर्भामध्ये यूपीएससी नेहमी प्रश्न विचारते. त्यामुळे सध्याची हवेची परिस्थिती व त्यावरील तातडीचे उपाय आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.

#GS2

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एकंदरीत परिस्थितीची दखल घेऊन, दिल्ली, हरियाणा राजस्थान आणि पंजाबच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे मानवाधिकार आयोगाचे कार्यक्षेत्र, अधिकार, कर्तव्य आणि त्या संदर्भात चर्चेत असलेले विषय, आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

Join
@UPSCin_Marathi
तसं माझं मूळ तर इंजीनियरिंगचं आहे, परंतु स्पर्धा परीक्षामुळे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (#PSIR) या विषयाला जवळून अभ्यासायची संधी मिळाली.

कालांतराने पोस्ट ग्रॅज्युएशन पार पडले व नेटची परीक्षा देखील दिली. त्याच काळात upsc मुख्य परीक्षा असल्यामुळे नेटचा अभ्यास काही करता आला नाही. Upsc च्या अभ्यासावर माझी नेट तर आरामशीर निघाली पण JRF (Junior Research Fellowship) 1.07 percentile ने हुकली. अर्थातच तेव्हा संमिश्र भावना होत्या, कारण एका बाजूला नेट निघाल्याचे सुख तर दुसर्‍या बाजूला JRF न मिळाल्याचे दुःख.

त्यामुळे तेव्हाच ठरवले की एकदा तरी थोडा व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा देऊया. यंदा शिकवण्याच्या प्रक्रियेतून मिळेल तसा वेळ काढून अभ्यास केला व परीक्षा दिली. कालच या परीक्षेचा निकाल लागला आणि मी 99.50% percentile मिळवून JRF पास झालो.☺️ यासर्व प्रक्रियेत अर्थातच #upsc च्या तयारीचा खूप मोठा फायदा मला झाला. तसेच या निकालाच्या नंतर शिकवण्यासाठी आणखी जास्त हुरूप देखील आले आहे.🤩

या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असलेले माझे कुटुंबीय आणि सर्व मित्र-मैत्रिणींचे मी या सुखद क्षणी आभार मानतो. धन्यवाद 🙏🏾

- ज्ञानेश्वर
केनियातील दुष्काळ

केनियामध्ये गेल्या 40 वर्षांतला सर्वांत भीषण दुष्काळ सध्या पडला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की देशातल्या दुसऱ्या सर्वांत मोठ्या, अँबोसेली राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांचे मृतदेहच आढळत आहेत. कुठे महाकाय हत्ती, कुठे जिराफ, कुठे झेब्रा मृतावस्थेत आढळत आहेत.

"जेव्हा असे महाकाय प्राणी मरण पावतात, तेव्हा खूप भयंकर काहीतरी घडतंय, असं मासई समाजात मानलं जातं," एका वनाधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं.
केन्याच्या पर्यटन मंत्रालयाने सांगितलं की या दुष्काळात आतापर्यंत 205 हत्ती, 500 वाईल्डेबीस्ट, 400 झेब्रा आणि 50 म्हशी मरण पावल्यात.

सरकार या परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न करते आहे - कुठे पाण्याचे तलाव भरले जात आहेत तर कुठे प्राण्यांना चारा पुरवला जातोय. पण नैसर्गिक अधिवासही असा नैसर्गिकरीत्याच धोक्याचा होत चालला आहे, यामुळे चिंता वाढली आहे.

(ही बातमी BBC ने केली आहे, त्यातील फोटो मन विचलित करणारे आहेत. त्यामुळे ते मुद्दाम येथे टाकले नाहीत.) पर्यावरण हा UPSC साठी इतका महत्त्वाचा घटक का आहे, याची जाणीव आपल्याला अशा बातम्या वाचून होते.

@UPSCin_Marathi
आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या #EWS आरक्षणाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या चर्चा गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत.

त्यातील UPSC/MPSC च्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे खाल्ली प्रमाणे आहेत.

मुख्य परीक्षा -

1) आरक्षणाचा आधार सामजिक असावा की आर्थिक?

2) आरक्षणाच्या तत्त्वाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे का?

3) SC & ST मध्ये नॉन क्रिमेलियर सारखे तत्त्व लागू करावे का? (UPSC मुलाखतीत हा प्रश्न भरपूर जणांना विचारण्यात आला आहे.)

4) सामजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरण यातील नेमका फरक काय आहे?

पूर्व परीक्षा -

1) EWS घटनादुरुस्ती कोणती आहे - 103

2) 103 CA पास होण्याचे वर्ष कोणते आहे? (विशेषतः राज्यसेवा) - 2019

Join @UPSCin_Marathi
आज देशाच्या 50 व्या सरन्यायाधीश पदाचा पदभार न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी स्विकारला.

DYC नी अनेक महत्त्वाच्या खटल्यात मांडलेली भूमिका वाचनीय आहे.

@UPSCin_Marathi
या बॅचच्या संदर्भात काम चालू आहे. 15 नोव्हेंबर पासून बॅच सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

बॅचची वैशिष्ट्ये -

1) 300, 600, 900, 1200 शब्द अशी लिखाण क्षमता वृद्धी करून घेण्यात येईल.

2) एकूण वरील चार आणि एक 250 गुणांचा निबंधाचा पेपर तपासून मिळेल.

3) निबंध लेखनासाठी वर्क बूक देण्यात येणार आहे.

4) Telegram channel च्या माध्यमातून audio lectures मधून दीड महिन्यात निबंध लेखनाची तयारी करून घेण्यात येईल.

5) बॅच ची फी माफक असेल.

6) विचार क्षमता वृद्धीसाठी विशेष चर्चा सत्र देखील घेण्यात येतील.

Join @EssayInMarathi
#GS1 - भारतीय समाज
#GS3 - मानवी संसाधने

घटक - लोकसंख्यिकी लाभांश

➡️ आकडेवारी - विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, 2022-23 दरम्यान भारतातील सरासरी वय 28 वर्षे असेल, याउलट चीनमध्ये ते 37 तर पश्चिम युरोपमध्ये 45 असेल.

➡️ उत्तर लिखाणात वापर -

1) भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

2) जागतिक स्तरावरील सर्वात मोठे मनुष्यबळ उपलब्ध असलेली अर्थव्यवस्था.

Join @UPSCin_Marathi
#GS2

1) H1B व्हिसा - हा परदेशस्थ भारतीयांच्या (Indian Diaspora) संदर्भात महत्त्वाचा मुद्दा आहे.

2) खासगीपणाचा हक्क (अनुच्छेद २१) - ॲपलच्या धोरणातील बदलाचा मेटाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे.

#GS3

1) जागतिक आर्थिक मंदीचे सावट आणखी गडद होतांना दिसत आहेत. तसेच यामुळे भारतातील कुशल मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतांना दिसत आहेत.

2) परकीय गंगाजळीवर देखील याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

Join
@UPSCin_Marathi
#GS2 - सामाजिक न्याय

#EWS आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्याचा राज्याच्या सकारात्मक कृती (Affirmative Action) वर होणारा दीर्घकालीन परिणाम या लेखात चर्चिला आहे.

Join
@UPSCin_Marathi
डिजिटल रुपयाच्या संदर्भात केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे हा घटक upsc च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे.

यात
#mpsc पूर्व च्या दृष्टीने कधी डिजिटल रुपी सुरू करण्यात आले ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे. (1 नोव्हेंबर - आंतरबँक व्यवहार)

Join
@UPSCin_Marathi