युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.57K subscribers
466 photos
5 videos
158 files
133 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
यंदाचा शांततेचा नोबेल दोन संस्था आणि एक मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यात विभागून देण्यात आला आहे. सध्याच्या युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर ही गोष्ट अपेक्षित होती. युद्धाच्या काळात नागरी समाज आणि मानवी हक्क संघटना तसेच कार्यकर्ते काय भूमिका बजावतात याकडे जगाचे लक्ष लागून असते. यंदाच्या शांतता नोबेल निवडीवर या पार्श्वभूमीचे प्रतिबिंब दिसून येते.

UPSC/MPSC च्या दृष्टीने विचार केला असता आपल्या लक्षात येईल की
#GS2 आणि #PSIR मध्ये नागरी समाज, मानवी हक्क आणि मानवी हक्क चळवळी यांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने करणे अपेक्षित आहे.

Join
@UPSCin_Marathi
चॅनल विषयी माहिती

या चॅनल वर नवीन असणार्‍यांसाठी किंवा जुन्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो या चॅनल च्या माध्यमातून आपण नेमके काय करण्याचा प्रयत्न करतोय या विषयी थोडक्यात.

उद्दिष्ट -🎯🎯🎯

1) मराठी माध्यमातून तयारी करणार्‍यांसाठी दर्जेदार माहिती उपलब्ध करून देणे.

2) दररोजच्या बातम्यांच्या संदर्भात पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने कसा अभ्यास करावा यासाठी दररोज माहिती.

3) परीक्षेच्या प्रवासात आपल्याला होईल तितकी मदत करणे, तसेच या प्रक्रियेची माहिती सोप्या शब्दात आपल्या पर्यंत पोहचवणे.

हे करण्या मागचा उद्देश काय? 🤔🤔🤔

1) मला #upsc मुख्य परीक्षा देतांना आलेल्या अडचणी आपणास येऊ नये.

2) मराठी माध्यमातून तयारी करणार्‍यांना ही प्रक्रिया सुलभ व्हावी.

3) #cse मध्ये मराठी माध्यमातून परीक्षा देणारा विद्यार्थी किमान पहिल्या पन्नास मध्ये यावा यासाठी मदत व्हावी.

हे चॅनल कोण चालवते - 🧐🧐🧐

अर्थात मी कोण आहे?(😁) तर माझे नाव ज्ञानेश्वर जाधव आहे. स्पर्धा परीक्षा मध्ये CAPF मुलाखती साठी मी पात्र झालो होतो (इंग्रजी माध्यम 😊), तीन वेळा cse मुख्य परीक्षा मराठी माध्यमातून दिली आहे, निबंधात तिन्ही वेळा 130+ गुण मिळाले होते, #GS चा जुगाड काही जमला नाही आणि ऑप्शनल #PSIR.

@UPSCin_Marathi सोबत आपले @PSIRin_Marathi आणि @EssayInMarathi असे दोन वेगळे चॅनल आहेत. तसेच YouTube च्या माध्यमातून देखील आपण हे काम असेच पुढे चालू ठेवणार आहोत. (लिंक - https://youtu.be/v7GLbsqW8ys). या चॅनल ला नक्की जोडले जा कारण येथे आपण आता नियमित video टाकणार आहोत. तसेच या ग्रुपमध्ये देखील मी voice chat च्या माध्यमातून आपल्याशी नियमित संपर्क साधत राहील.

💯 शेवटी एवढेच सांगेल मेहनत करत रहा, एक दिवस आपल्या पैकीच कोणीतरी मराठी माध्यमातून परीक्षा देऊन पहिल्या पन्नासमध्ये असेल. 💯

धन्यवाद.

धन्यवाद 🙏🏾
#PSIR

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील पेपर-1 भाग-अ मध्ये राजकीय विचारप्रणाली हा घटक चॅप्टर सात आणि आठ अंतर्गत येतो.

सदर लेक्चर मध्ये विचारप्रणाली या संकल्पनेचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा आणि वैशिष्टय़ शिकवण्यात आले आहे. तसेच विचारप्रणाली या संकल्पनेकडे बघण्याचे विविध आयाम देखील चर्चिले आहेत.

https://youtu.be/Lt_RcxTlTRo
#PSIR Lecture - 2

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयातील पेपर-1 भाग-अ मध्ये राजकीय विचारप्रणाली हा घटक चॅप्टर सात आणि आठ अंतर्गत येतो.

सदर लेक्चर मध्ये विचारप्रणालींचे स्थित्यंतरे तसेच विचारप्रणालीचा अंत या संकल्पनेचा वाद प्रतिवादाची चर्चा आपण केली आहे.

Join @PSIRin_Marathi

https://youtu.be/1cTlk_2fpAs
चीन मध्ये एका मागोमाग एक प्रधानमंत्री बदलत असल्याने #GS2 मधील विविध देशांच्या संविधान आणि सत्ता संरचनेच्या तुलनात्मक अभ्यासाच्या घटकाच्या अनुषंगाने इंग्लंड महत्त्वाची केस स्टडी आहे.

तसेच
#PSIR ऑप्शनल मध्ये दुसर्‍या पेपर च्या तुलनात्मक राजकारण या घटकासाठी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

Join
@UPSCin_Marathi
आधुनिक आणि नवअभिजात उदारमतवाद

या विचारप्रणाली वर विस्तृत चर्चा या लेक्चर मध्ये करण्यात आली आहे.

लिंक - https://youtu.be/IxJY9Aerlfk

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध या बॅचचे पुढील लेक्चर सह्याद्री आयएएस अकॅडमी च्या अॅपवर बघायला मिळतील. App डाऊनलोड लिंक -

https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.kzgwo

#PSIR
बॅचचे पूर्वीचे लेक्चर खालील लिंक वर बघू शकता.

Lecture 1 - https://youtu.be/Lt_RcxTlTRo

Lecture 2 - https://youtu.be/1cTlk_2fpAs

Lecture 3 - https://youtu.be/ZSHsOCpv5Dw

Lecture 4 - https://youtu.be/etpFkShZxeE

Join @PSIRin_Marathi
समाजवाद | Socialism

या लेक्चर मध्ये सामाजिक उदारमतवादाच्या विचारांवर प्रथम चर्चा करण्यात आली आहे. तसेच त्यानंतर समाजवाद विचारसरणीची निर्मिती प्रक्रिया तसेच त्याचे विविध प्रकार आणि कार्ल मार्क्स यांच्या अगोदरचे आणि नंतरचे समाजवादी विचार यावर सविस्तर चर्चा या व्हिडिओ मध्ये करण्यात आली आहे.

Join
@PSIRin_Marathi

https://youtu.be/5p_9ZRUcFvo
तसं माझं मूळ तर इंजीनियरिंगचं आहे, परंतु स्पर्धा परीक्षामुळे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (#PSIR) या विषयाला जवळून अभ्यासायची संधी मिळाली.

कालांतराने पोस्ट ग्रॅज्युएशन पार पडले व नेटची परीक्षा देखील दिली. त्याच काळात upsc मुख्य परीक्षा असल्यामुळे नेटचा अभ्यास काही करता आला नाही. Upsc च्या अभ्यासावर माझी नेट तर आरामशीर निघाली पण JRF (Junior Research Fellowship) 1.07 percentile ने हुकली. अर्थातच तेव्हा संमिश्र भावना होत्या, कारण एका बाजूला नेट निघाल्याचे सुख तर दुसर्‍या बाजूला JRF न मिळाल्याचे दुःख.

त्यामुळे तेव्हाच ठरवले की एकदा तरी थोडा व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा देऊया. यंदा शिकवण्याच्या प्रक्रियेतून मिळेल तसा वेळ काढून अभ्यास केला व परीक्षा दिली. कालच या परीक्षेचा निकाल लागला आणि मी 99.50% percentile मिळवून JRF पास झालो.☺️ यासर्व प्रक्रियेत अर्थातच #upsc च्या तयारीचा खूप मोठा फायदा मला झाला. तसेच या निकालाच्या नंतर शिकवण्यासाठी आणखी जास्त हुरूप देखील आले आहे.🤩

या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असलेले माझे कुटुंबीय आणि सर्व मित्र-मैत्रिणींचे मी या सुखद क्षणी आभार मानतो. धन्यवाद 🙏🏾

- ज्ञानेश्वर
नव-मार्क्सवाद

नव-मार्क्सवादी विचार प्रवाह हा मार्क्सवादी विचार प्रवाहातील महत्त्वाच्या उणिवा अधोरेखित करताना दिसतो. तसेच त्या उणीवा भरून काढण्याकरिता आपण कोणत्या कृती कार्यक्रमाला हाती घेतलं पाहिजे, आणि ते कसे करणे शक्य आहे. ते या लेक्चर मध्ये बघितले आहे.

या अगोदरच्या काही लेक्चर तुम्हाला युट्युब वर मिळणार नाहीत, ते सर्व लेक्चर आमच्या सह्याद्री आयएएस अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत. तुम्ही ते ॲप गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता.

Join @PSIRin_Marathi

https://youtu.be/uIRfMmaBQ1w
#GS2 #निबंध

भारताची #G20 अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारताचे जी भूमिका आहे, ती या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.

यात भारतासंदर्भातील मांडणी आपण निबंधात वापरू शकतो.

तसेच जीएसच्या उत्तरांमध्ये देखील यातील काही माहितीचा आपल्याला उपयोग होणार आहे.

#PSIR राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या वैकल्पिक विषयात आपण यातील काही उदाहरणे थेट कोट करू शकतो.

Join @UPSCin_Marathi
✴️ सुचना -

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध
#PSIR या वैकल्पिक विषयाशी निगडित सर्व माहिती @PSIRin_Marathi या आपल्या telegram चॅनल वर टाकत आहोत. ती आजपासून इकडे टाकली जाणार नाही.

धन्यवाद!

Join
@UPSCin_Marathi
#PSIR (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध) ऑप्शनल असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी @UPSCin_Marathi चा नवीन उपक्रम.

#UPDATE

मराठी माध्यमात प्रश्न तपासून मिळणे थोडे कठीण असते. याचा अनुभव मी स्वतः देखील घेतला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक आठवड्याला upsc च्या मागील वर्षांच्या प्रश्नातून एक प्रश्न देणार आहोत. तसेच पुढील प्रश्न टाकायच्या अगोदर आलेले उत्तरे तपासून देणार आहोत.

त्यामुळे सर्वांना दिलेल्या वेळेत आपापली उत्तरे तपासून घ्यावीत.

फायदे -

1) उत्तरे कसे लिहायची ते समजेल.

2) लिखाणाची भीती कमी होईल.

3) मराठी भाषेतील संज्ञा आपणांस समजतील.

4) पूर्व परीक्षेच्या नंतर आपल्याला उत्तर लिखाणाचा दबाव येणार नाही.

Join @PSIRin_Marathi