Devendra Fadnavis
4.39K subscribers
83.8K photos
14.7K videos
3K files
8.07K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

अंधेरी पश्चिम येथील जुन्नत नगर, समता नगर, खजुरवाडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यात येईल.
(विधानसभा । दि. 25 मार्च 2023)

#MahaBudget2023 #mahabudgetsession2023 #BudgetSession2023 #Maharashtra #adhiveshan #vidhanbhavan #andheri #mumbai #slum #redevelopment
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या बैठकीत खालील निर्देश दिले -

🏠गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रस्तावांना 3 महिन्यात परवानगी देण्यासाठी मुंबई महापालिकेने एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी.

🏠स्वयंपुनर्विकासाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांसाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य सहकारी बँकेसह अन्य सहकारी बँकांनाही अनुमती देण्यात यावी. त्यासाठी प्रस्ताव सादर करा.

🏠गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्व्हेयन्स प्रमाणपत्र देणे, नोंदणी करणे, मालमत्ता पत्रकात नोंद करणे, स्टॅम्प अडज्युडीकेशन देण्याची प्रक्रिया गतिमान आणि कालबध्द करण्यात यावी.

🏠मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयांच्या अधिन 21 वार्ड आहेत. यापैकी 7 कार्यालये संबंधित वॉर्डांमध्ये आहेत. मुंबईकर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उर्वरीत 14 वॉर्डांमध्येही तातडीने कार्यालये स्थापन करावीत.
#DevendraFadnavis #redevelopment #Mumbai #Maharashtra

https://twitter.com/Devendra_Office/status/1655593065191559168
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

ओनरशिपमधील इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार !
विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाची तरतूद.

#मंत्रिमंडळ_निर्णय #CabinetDecision #Maharashtra #महाराष्ट्र #Mumbai #redevelopment #RealEstate #housing
'स्वयंपुनर्विकासाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजाश्रय दिला'

#Maharashtra #mumbai #DevendraFadnavis #redevelopment
CM Shri Devendra Fadnavis speech begins

🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

LIVE | मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उदघाटन व चावी वाटप

🕗 रा. ८.१४ वा. | २५-२-२०२५📍कांदिवली, मुंबई.

#Maharashtra #Mumbai #Redevelopment

https://www.youtube.com/live/8Ib2CA7jQiM?si=BFOUXTd9VBMAQU8S

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/617847744372654

https://x.com/Dev_Fadnavis/status/1894398140007993434
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

A truly inspiring day at 'CSR for Change' to uplift Scheduled Tribes and inauguration of the self-redeveloped Charkop Shwetambara Cooperative Housing Society in Mumbai...
राज्यातील शेवटच्या माणसाच्या विकासाला सुनिश्चित करणारा आणि स्वयंपुनर्विकसीत गृहनिर्माणाला चालना देणारा दिवस...

( मुंबई | 25-02-2025)
#Maharashtra #TribalDevelopment #Redevelopment
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

For the first time in the Dharavi redevelopment project, even ineligible residents will be given rental housing. No one will be left homeless, and after 12 years, the rental housing will be transferred to their name.

धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये प्रथमच अपात्र लोकांनाही रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतरित करत आहोत. कोणालाही बेघर न करता, 12 वर्षांनंतर त्यांचे रेंटल हाऊसिंग त्यांच्या नावावर करण्याची व्यवस्था केली आहे.

(विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2025)
#Maharashtra #MahaBudgetSession2025 #Redevelopment
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding Dharavi redevelopment project
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'धारावी पुनर्विकास परियोजना के संदर्भ में समीक्षा बैठक'

🕓 3.50pm | 28-5-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.५० वा. | २८-५-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Redevelopment
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding Dharavi redevelopment project 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में…
CMO Maharashtra Tweets:

धारावीचा आत्मा जपत होणार समृद्ध भविष्याकडे वाटचाल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक’ संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीची खरी ओळख म्हणजे इथला कुशल श्रमशक्तीवर आधारित अर्थव्यवस्थेचा अनोखा चेहरा. लाखो कारागीर, लघुउद्योग, वंचित घटक यांचा जीव की प्राण असलेल्या या भागाचा आत्मा कायम राखतच पुनर्विकास व्हावा, हे प्राधान्याने अधोरेखित करण्यात आले.
धारावी हा देशाचा आर्थिक नकाशा बदलणारा पट्टा आहे. त्यामुळे येथील पुनर्विकास पर्यावरणस्नेही, सर्वसमावेशक आणि संवेदनशील पद्धतीने व्हावा. प्रत्येक धारावीकराला या प्रकल्पात सामावून घेण्याची जबाबदारी प्रशासनाने नाकारू नये, यावर भर देण्यात आला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्थानिक व्यवसायांचे पुनर्वसन मूळ जागेच्या सन्मानासह व्हावे, ही अट बंधनकारक ठरवली आहे. व्यवसायांची पारंपरिक ओळख कायम राहावी आणि पुनर्विकासाचा भाग होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेतले जावे, यासाठी समन्वय आणि संवेदना यांची सांगड घालण्याचे निर्देश देण्यात आले.

धारावीचा आत्मा जपणाऱ्या आणि भविष्याच्या शक्यता उलगडणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पाची कार्यवाही अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा बैठकीतून व्यक्त करण्यात आली.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Redevelopment
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Paving the Way for Mumbai’s Housing Transformation through Self-Redevelopment!

Chaired a meeting for the presentation of the 'Cooperative Housing Societies Self-Redevelopment – Cluster Self-Redevelopment Study committee' report at Vidhan Bhavan, Mumbai today.
MLC Pravin Darekar submitted the 'Cooperative Housing Societies Self-Redevelopment – Cluster Self-Redevelopment Study committee – Darekar Committee Report', a significant step toward streamlining and accelerating self-redevelopment projects across the State.

The committee was appreciated for submitting its report ahead of schedule. Its recommendations will now be sent to the Housing, Cooperation, and Urban Development Departments for their views. Based on this, a proposal will be placed before the Cabinet, followed by Government Resolutions on approved points. A progress report will be tabled in the Winter Session.

This report will fast-track pending housing projects while safeguarding residents’ interests. Since the self-redevelopment policy’s launch in 2019, 18 of 19 major demands have been fulfilled. To address evolving needs, this study committee was formed in April 2025, offering clear, practical recommendations.

The Mumbai District Cooperative Bank was appreciated for actively supporting proposals. With 1600+ proposals pending, timely financial assistance is crucial, and the committee has proposed clear financing solutions and policy guidelines.
Reforms related to financing, slum rehabilitation, cess and non-cess building redevelopment, Airport regulations, and deemed conveyance have also been suggested.

A proposal for financial support through NCDC has been sent to Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah. This initiative will help thousands of families in Mumbai turn their dream of a better, modern home into reality.

Legislative Council Chairman Prof Ram Shinde , Legislative Assembly Speaker Adv Rahul Narwekar, DCM Eknath Shinde ji , BJP State President MLA Ravindra Chavan, Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Ashish Shelar, Minister Babasaheb Patil, MoS Pankaj Bhoyar, MLC Pravin Darekar, and senior officials were present.

#Maharashtra #Redevelopment #Mumbai

https://x.com/Dev_Fadnavis/status/1944826029715210304