Devendra Fadnavis
4.22K subscribers
94.7K photos
17.7K videos
3.75K files
9.6K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाच्या शिक्षण, आरोग्य आणि उत्पन्न या गरजांची जाणीव अमरीशभाई पटेल यांसारख्या नेत्यांच्या विचारांतून प्रभावीपणे पुढे आली आहे.

प्रत्येक व्यक्ति के लिए महत्वपूर्ण शिक्षा, स्वास्थ्य और आय जैसी आवश्यकताओं का बोध अमरीशभाई पटेल जैसे नेताओं के विचारों से प्रभावी रूप से सामने आया है।

(विविध शैक्षणिक संस्था व औद्योगिक उपक्रमांचे उदघाटन व भूमिपूजन | धुळे | 25-4-2026)
#Maharashtra #Dhule #VileParleKelavaniMandal
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

गेल्या दीड वर्षांमध्ये धुळे जिल्ह्यात ₹40,000 कोटींची गुंतवणूक आणली.

पिछले डेढ़ वर्ष में धुले जिले में ₹40,000 करोड़ रुपये का निवेश लाया।

(विविध शैक्षणिक संस्था व औद्योगिक उपक्रमांचे उदघाटन व भूमिपूजन | धुळे | 25-4-2026)
#Maharashtra #Dhule #VileParleKelavaniMandal
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration and BhoomiPujan of various educational, industrial and other initiatives undertaken by Shri Vile Parle Kelavani Mandal at the hands of CM Devendra Fadnavis. Inauguration, stone plaque unveiling and Inspection of the…
CMO Maharashtra Tweets:

शिरपूरमध्ये आधुनिक शिक्षण व आरोग्य सुविधा; विकासाला मिळणार नवी गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज धुळे येथे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक, औद्योगिक व इतर उपक्रमांचे उदघाटन व भूमिपूजन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अन्न, वस्त्र आणि निवारा यांसोबतच आजच्या काळात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या गरजाही तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत आणि या सर्व गरजांची पूर्तता आमदार अमरीश पटेल यांनी शिरपूरमध्ये करून दाखवली आहे. शिरपूरमधील शाळा आणि महाविद्यालये अत्यंत आधुनिक व दर्जेदार आहेत. 21व्या शतकात उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज असते आणि शिरपूरसारख्या भागातून उत्कृष्ट मानव संसाधन घडवले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात अनेक अत्याधुनिक रुग्णालये आहेत आणि आता शिरपूरमध्येही आधुनिक सुविधा असलेले रुग्णालय सुरू झाले आहे. आदिवासी समाजाच्या कल्याणाची संकल्पना अमरीश पटेल यांच्या शैक्षणिक उपक्रमांतून प्रभावीपणे राबवली जात आहे. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होते आणि हीच क्षेत्रे विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. तसेच, जलसंधारणाचे आदर्श मॉडेल शिरपूरने महाराष्ट्राला दिले आहे.

शिरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल. धुळे जिल्ह्यात सुमारे ₹40,000 कोटींची गुंतवणूक आणली असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. पुढील औद्योगिक केंद्र म्हणून धुळे आणि नंदुरबार उदयास येतील. गुंतवणुकीसाठी अनेक उद्योगसमूह पुढे येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धुळे जिल्ह्यात ग्रीन पॉवर निर्मितीवर भर दिला जात आहे. आदिवासी बांधवांना मिळालेल्या वनजमिनीच्या पट्ट्यांबाबत निर्णय घेऊन, महसुली जमिनीप्रमाणेच सर्व शासकीय योजनांचा लाभ वनपट्ट्यांनाही मिळेलअसा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. तसेच एमआयडीसीसाठी पुढाकार घेतला जाईल आणि अरुणावती नदीवर बंधारे उभारण्याच्या मागणीला मान्यता दिली जाईल.

यावेळी मंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिश पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Dhule
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

From Education to Employment: Shirpur’s Integrated Development Story

Inaugurated and performed the BhoomiPujan of various educational, industrial and other initiatives undertaken by Shri Vile Parle Kelavani Mandal in Dhule today. Addressed the gathering on this occasion.

In today’s times, along with food, clothing and shelter, education, healthcare and employment have become equally essential. MLA Amrishbhai Patel has effectively fulfilled these needs in Shirpur. Shirpur’s schools and colleges offer modern infrastructure and high-quality education.

In the 21st century, industries require skilled manpower and Shirpur is creating excellent human resources through its strong education ecosystem.
Shirpur now has a modern hospital with advanced facilities. These initiatives are effectively advancing the vision of tribal welfare. Education and healthcare sectors are also generating large-scale employment opportunities.

Shirpur has given Maharashtra an ideal model of water conservation.
Will extend full support for the overall development of Shirpur taluka. Brought in investments worth approximately ₹40,000 crore to Dhule district, which will generate significant employment. Dhule, along with Nandurbar, will emerge as a major industrial hub, with several industry groups coming forward to invest.

Minister Jaykumar Rawal, Minister Sanjay Savkare, MLC Amrishbhai Patel and other dignitaries were present.

#Maharashtra #Dhule #IndustrialDevelopment

https://x.com/Dev_Fadnavis/status/2048105414001360975?s=20
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 25 एप्रिल 2026

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/198893/

कुंभमेळा विकासकामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/198888/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे शैक्षणिक व औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन
https://mahasamvad.in/198951/

#Maharashtra #DevendraFadnavis