वास्तव (सत्य की आभास)©®
3.21K subscribers
7.82K photos
45 videos
16 files
92 links
मराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही.....

Contact to Admin👉 @Vastav_bot
(For Promotion and others)
Download Telegram
नियतीचा डाव

आयुष्याच्या सारीपाटावर
मांडावा लागतो डाव
ठराविक चाकोरीत
ठरलेल्या वेळेत
फिरावे लागते ठराविक अंतर
ठरली आहेत सगळ्यांची कामे
करता येत नाही बदल
कुणीही कुणाची जागा
नाही घेऊ शकत
सर्व आधीच ठरलेले
काही पुढे जातात जोरात
काहींना मागे सरकावे लागते
कोणी सरळ तर कोणी तिरका
कोणी आपल्या जागेवरच
शेवटपर्यंत घट्ट उभा
आपल्याच तत्वांशी चिकटून
कोणी जिंकतात तर कोणी हरतात
काही सोडतात डाव अर्धवट
तर कोणी पुर्ण खेळतात
कोणी मांडतात नवा डाव
कोणाला जमतोही चेकमेट
आयुष्यात असे बरेच
खेळावे लागतात डाव
शेवटी तो गुंडाळावा लागतो
सर्वजण आपण आहोत
पटावरील सोंगट्या
निर्जीव तरीही कितीतरी बोलक्या

सौ. विनया दळी.
किंमत..

"फळं, माणसं,
काही फळ गावात मोफत मध्ये मिळतातं तर त्याच फळासाठी शहरात किंमत मोजावी लागतात....

किंमत फक्त योग्य जागी भेटतात, मग ते फळाला असो की माणसानां. किंमत मिळण्यासाठी शोधावी लागतात फक्त ती योग्य जागा...!"

✍️
मनातलं युद्ध संपलं की मन बुध्द होत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांच्यासह शेकडो बौद्ध भिख्खूंना त्याने श्रीलंका, म्यानमार (ब्रह्मदेश) आणि लगतच्या अन्य देशांत पाठवले. ज्या वेळी अशोकपुत्र महेंद्र भिक्षू बनून श्रीलंकेत गेला, तेव्हा तेथील राजा देवानांप्रिय तिष्ण याने महेंद्रासोबतच्या काषायवस्त्र परिधान केलेल्या भिक्षूंकडे बोट दाखवून विचारले, ‘‘भारतात आणखी असे भिक्षू आहेत?’’ त्यावर महेंद्र उत्तरला, ‘‘जम्बूद्वीप (भारताचे प्राचीन नाव) अशा काषायवस्त्रधारींनी उजळून काढलेले आहे.’’ म्हणजे त्या काळी गावोगावी, प्रत्येक नगर परिसरात बौद्ध धम्माच्या भिक्षू, उपासकांचे ठळक अस्तित्व जाणवत होते.
बुद्ध तत्त्वज्ञानातील "अनित्य" हा अत्यंत महत्त्वाचा विचार सांगतो की, कुठलीही गोष्ट कायम स्थिर नसते... वर उल्लेखलेली गोष्ट आणि आजची श्रीलंका किंवा आपला आजचा भारत पाहिल्यावर ते लक्षात येतं.
बुद्धाचे तत्त्वज्ञान चिकित्सेवर आधारित आहे. तथागत प्रवचनांमध्ये आपल्या अनुयायांना स्पष्टपणे सांगत, ‘कोणतीही गोष्ट मी सांगतो म्हणून मान्य करू नका. तर्काच्या आधाराने जर ती बाब तुम्हाला पटली तरच तिचा स्वीकार करा. जसे बीजातून फळ व फळातून बीज निघते, तसेच कर्मातून निश्चित फळ व फळातून कर्म निघते’..
तथागत बुद्ध हे अलौकिक व्यक्तिमत्व होते. त्यांनी समाजाच्या सर्व थरातील लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी करुणा आणि प्रेमाचा वर्षाव केला. आणि अवघ्या भारतवर्षात एक सामाजिक सौख्याचे, सद्भावाचे आणि समृद्धीचे पर्व निर्माण केले होते. हे हे सुख समृद्धीचे पर्व अगणित परकीय आक्रमणानंतरही, अगदी सोळाव्या शतकापर्यंत टिकले होते. खरंतर भारताचे भौतिक, नैतिक आणि वैचारिक ऐश्वर्य त्यामुळेच अबाधित होते ... आहे !
आज आम्ही त्यांनी सांगितलेले पंचशील आणि अष्टशील विसरलो आहोत, अगदी स्वत:ला बौद्धधर्मीय म्हणवणारेही बुद्धविचारांचा आदर करताना दिसत नाहीत, आचरण करणे ही तर फार पुढची गोष्ट. आम्ही सारे भारतीय बुद्धविचार विसरलो, त्यामुळे देशातील समाजस्वास्थ्य बिघडले आहे...धर्मचक्र प्रवर्तन थांबल्यामुळे भारतीयांचे वर्तन बिघडले. आज आपल्याकडे मुली-महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झालेली दिसते. भ्रष्टाचारात तर आम्ही जगात आघाडीवर आहोत, गरिबी, दु:ख आणि दैन्य यामुळे भारतातील ७० टक्क्यांहून अधिक जनता हैराण झालेली दिसते. या पीडितांच्या दु:खमुक्तीसाठी भारतात पुन्हा एकदा ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ कार्य सुरू झाले पाहिजे. आपण सारे जाणतोच की , तथागत बुद्ध यांच्या सारनाथ मधील पहिल्या धर्मप्रवचनापासून, अखेरच्या यात्रेपर्यंत सोबत असणाऱ्या शिष्यमंडळीत तत्कालीन उच्चवर्णीय अभिजनांचा अधिक भरणा होता. तथागतांची शिकवण आत्मसात करून याच अभिजन वर्गाने बौद्ध धम्म जगभर पसरवला. आजवर जपला. ही गोष्ट लक्षात घेऊन, आज भारतीय समाजातील ज्ञानी-विचारवंतांनी मैत्री आणि करुणेने प्रेरित होऊन देशातील राजसत्तेला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे...
तथागतांचे याहून चांगले दुसरे स्मरण किंवा पूजन कोणते असेल ?

महेश म्हात्रे
ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात. महात्मा फुले🙏🏻
संकट आल्यास लोक अक्षरशः वेडे पिसे होतात पण अगोदर आपण साधना करत राहिल पाहिजे हा विचार कधीच मनाला त्यांच्या स्पर्श करत नाही.

गरज पडल्यास तात्पुरती मलमपट्टी करण्यात धन्यता मानायची आणि पुढे जायच पण कायमस्वरूपी इलाज नाही करायचा. पुन्हा समस्या आली आली की तेच करायच अस अजिबात करु नका. अगोदर पासूनच गुरूमंत्र जप, कुलाचार आणि पितृकर्म करत रहा तुम्हाला कुठेही जायची वेळ येणारच नाही.

अगोदर समजुन घ्या जी मी काय बोलत आहे. काही जणांना खरोखरच लक्षात पण येत नाही की नेमक काय सुरु झाल आहे जीवनात. समोरचा माणुस बोलत एक असतो आणि यांच दुसरच चालू होत. काही गोष्टी मानवी हातात नसतात. शरण जा त्या सर्वोच्च शक्तीला आणि मग चमत्कार पहा.
भर उन्हात..

"वार्‍यावरून आल्या हाका...
चाहूल लागली तू येण्याची,
भर वैशाखात बहरलोय मी ,
आता चर्चा नको उन्हाची...!
🍁
बोलण...
✍️"आजकाल कोणाला काही बोलण पण चूक वाटतं, विश्वास नावाची गोष्ट नसल्यात जमा झाली आहे.. दोन व्यक्ती काय बोलतात हे लगेच तिसऱ्याला माहिती पाठवणारी विचित्र मानसिकता तयार झाली आहे.. त्यामुळे दोन व्यक्तीमधील सवांदामध्ये कोणतीही सुरक्षा राहिलेली नाही..."
आपल्या आवडत्या व्यक्तीने दिलेली
परकेपणाची वागणुक
आपण मेल्यापरी असते...
नाते हे आता सिगारेट सारखे झाले आहे थोड्या थोड्या वेळाने फुंकर नाही मारली तर विझून जाण्याची भीती असते💔💫
पुरुषाला बायको नसली तरी जग त्याला सावरुन घेतं पण स्त्रीला नवरा नसेल तर तिचं जगणं हरवून जातं.
इस्लामी आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या देशभरातील अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदूंचा स्वाभिमान जपणाऱ्या धर्माभिमानी, हिंदू संस्कृतीचा जीर्णोद्धारकर्त्या, थोर शिवभक्त, प्रजेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रशासका पैकी एक उत्कृष्ट महिला प्रशासक ...

पुण्यश्लोक राजमाता अहिल्या बाई होळकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन ..! 💐
स्वराज्याची रणरागिणी, रयतेची पालनहार, साधी राहणी अन् लोककल्याणकारी विचारसरणी हे ब्रीद ठेवून आपल्या बुद्धीने आणि बाणेदारपणे तब्बल ३० वर्ष राज्यकारभार करीत समर्थपणे शासन यंत्रणा राबवित क्रांतिकारक कार्य करणार्‍या महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदूंचे धार्मिक अधिष्ठान बळकट करणाऱ्या तर दुसरीकडे आपल्या राज्यात सती प्रथा, अस्पृश्यता, हुंडा पद्धती सारख्या अनिष्ट रूढी परंपरांना बंदी करत अंतर जातीय विवाहांना प्रोत्साहन देत सामाजिक सुधाराचा पाया रचणाऱ्या भारतीय इतिहासातील उत्तम प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.💐🙏✨️💛🌸
जेव्हा स्वतःच्या खंबीर पायावर विश्वास असतो ना तेव्हा आयुष्याची सायकल सुद्धा तुमच्या समोर शुन्य असते..!
Tension, Problems सगळ्यांनाच असतात. द्या सोडून सगळं. एखादा दिवस तुमच्या मनासारखा जगा.
घरात दिवे असुनही निरांजनातुन मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो… सहवासातील माणसांचं देखील तसेच असतं..!
तुझ्याच छायेत वाढलो रे वृक्षा,
अन् तुझ्याच छायेत खेळलो मी...
नि तुझीच कत्तल करून रे वृक्षा,
जणू स्वतःचे शरण रचून आलो मी....

वृक्षतोड
#savetreessavelife
#SaveTreeSaveNature
चार आणे एक तास...ते पण मिळणे कठीण,अवघड होते पण मिळाले की,दप्तर दारातच टाकून पहिले सायकलचे दुकान...!
3 जून जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!! 💐🌹
Happy World Bycycle Day...! 💐🌹
बापाचा हात उशाला असेपर्यत आयुष्याला गादीची गरज पडत नाही.