वेरूळ लेणी , छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र 🔱🚩
रावण अनुग्रह शिल्पांमध्ये रावण खाली एक गुडघा टेकून आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलवीत आहे, तर कैलास पर्वतावर शांत चित्ताने बसलेले शिव आणि भयभीत झालेली देवी पार्वती शिवाला बिलगली आहे. रावण कैलासपर्वत हलवीत असल्यामुळे घाबरून पळणारे शिवगण, डोंगरावरचे प्राणी यांची शिल्पे हा प्रसंग जिवंत करण्यामध्ये कलाकार यशस्वी झाले आहेत. यातील नाट्यमयता वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.

*lकुठे गेली ती माणसं.....?
-------------🌿-----------
कुठे गेली ती माणसं
दुःखाला सावरायची,
भांडणाऱ्याला आवरायची,
सुखाच्या एका तिळाला खायला
सात जणाला बोलवायची.
कुठे गेली ती माणसं
तहानल्याला पाणी द्यायची
भुकेल्याला घास द्यायची
सारं पुण्य मिळण्यासाठी
दोष असतात गिळण्यासाठी
असं मनातून म्हणायची.
कुठे गेली ती माणसं
सन्मान गावभर मिरवायची
अपमान क्षणात पचवायची
सारे आपण बहीण भाऊ
येथे गुण्यागोविंदाने राहू
कष्टानी कन्हायची पण
देवाला चांगलंच म्हणायची.
कुठे गेली ती माणसं
गावातलं भांडण पारावर
नाती आणायची धाऱ्यावर
लेकीबाळीला लावायची जीव
मुक्या प्राण्यांची यायची कीव
खायची चटणीभाकरी पण
इमाने इतबारे करायची चाकरी.
परत येतील का ती माणसं
जणू टच्च भरलेली कणसं
गाव बसावा पारावर
सुख नांदेल दारावर
परंपरा साऱ्या जपल्या जातील
चुका दुसऱ्याच्या लपल्या जातील
देवा माझा दे, मला परत गाव
नांदेल जिथे बालपणीचा बंधुभाव
-----------🌿---------
-------------🌿-----------
कुठे गेली ती माणसं
दुःखाला सावरायची,
भांडणाऱ्याला आवरायची,
सुखाच्या एका तिळाला खायला
सात जणाला बोलवायची.
कुठे गेली ती माणसं
तहानल्याला पाणी द्यायची
भुकेल्याला घास द्यायची
सारं पुण्य मिळण्यासाठी
दोष असतात गिळण्यासाठी
असं मनातून म्हणायची.
कुठे गेली ती माणसं
सन्मान गावभर मिरवायची
अपमान क्षणात पचवायची
सारे आपण बहीण भाऊ
येथे गुण्यागोविंदाने राहू
कष्टानी कन्हायची पण
देवाला चांगलंच म्हणायची.
कुठे गेली ती माणसं
गावातलं भांडण पारावर
नाती आणायची धाऱ्यावर
लेकीबाळीला लावायची जीव
मुक्या प्राण्यांची यायची कीव
खायची चटणीभाकरी पण
इमाने इतबारे करायची चाकरी.
परत येतील का ती माणसं
जणू टच्च भरलेली कणसं
गाव बसावा पारावर
सुख नांदेल दारावर
परंपरा साऱ्या जपल्या जातील
चुका दुसऱ्याच्या लपल्या जातील
देवा माझा दे, मला परत गाव
नांदेल जिथे बालपणीचा बंधुभाव
-----------🌿---------
📖✒️Don't be Perfect..just Be Real..✍️
आश्चर्य वाटल ना वाचून ?
"Don't be perfect...!!"
आपल्यापैकी बहुतेक जणांना "Perfect" पणाचा नाद असतो ना...!!
आता यापेक्षा समजा त्या वस्तूची जागा जरा बदलली तर असा काय गहजब होणार आहे का...
जी तऱ्हा वस्तूंची तिचं आयुष्याची! खास करून आपल्या मुलांचं शिक्षण "Perfect", त्यांची नोकरी "Perfect", येणारी सून "Perfect", मुलांचं वागणं "Perfect"...!!
सगळं कसं एकाद्या कथेसारख जिथल्या तिथे.. "Perfect" पणाच्या नादात अनेकदा मुलांना त्यांचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही.
"Perfect" असण्याच्या नादात खरा आनंद कुठेतरी हरवून तर जात नाहीये ना?
हे प्रश्न स्वत:ला विचारले तर मग आपण किती "Perfect" होतो याचीही उजळणी होईल .
"Perfect" असणं चांगल आहे पण त्याचं व्यसन नसावं इतकंच.
आयुष्यात सगळ्याच गोष्टी "परफेक्ट असतील असं नाही. त्यामुळे "Perfect" नसलेली परिस्थिती स्वीकारायची मानसिकता शिकवणही महत्वाचं आहे.
त्यासाठी "Be Real" असण्याची सवय असायला हवीच ना.....!!
✨✨✨
🎼श्रद्धा धनेश🎼

मला ना...
आनंद सापडायचाय किंवा मग तडफडायचंय त्या आनंदासाठी.. त्या आनंदातल्या समाधानासाठी...
जिन्दगी मुरांबा आहे, मला मुरायचंय तिच्यात, गोडवा वाढवायचाय स्वतःचा. नी त्या दोन रेषा आहेत ना ओठांच्या त्यांना आपोआप खुलवायचंय...
वेडं व्हायचंय, खुश व्हायचंय! आनंदी राहायचंय, आनंद जगायचाय, आनंद वाटायचाय, आनंद शिंपडायचाय..

शिवप्रताप घडला...........
आणि फाटलेल्या अंगरख्यातून रक्ताचं थारोळं बाहेर पडलं, खान धावत धावत पालखी जवळ करत होता त्या सांडलेल्या चिळकांड्या अवघ्या हिंदुस्थानच्या राजकारणावर पडल्या... दिल्लीची मोगलाई, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, शे दीडशे वर्षाहुन अधिक सत्ता भोगणाऱ्या अवघ्या हिंदुस्तानातल्या बलाढ्य सल्तनती हादरल्या, दर्यावर अमर्याद सत्ता गाजवणारे वलन्देज, इंग्रज साऱ्या साऱ्या जलचारांना कापरं भरलं, आणि हिंदुस्तानातील भूतलावरल्या सर्व सत्ताधीशांना आणि समुद्रावरील सर्व ताम्रांना हा सिंहासारखा अभेद्य सह्याद्री आयाळे फिंजारून सांगत होता..
माझ्या नरसिंहाने हिरण्यकशिपू फाडिला •राजियाने खासा अफजल जाया केला.
💪 ऊर्जास्थान ⚔️
छत्रपती शिवाजी महाराज 🔥
शिवप्रतापदिन
प्रतापगड