ती मुक्त झाली......
सूर्य डोईवर आला आणि तिला जाग आली. तिला आश्चर्य वाटले,'हे काय दिवस उजाडला तरीही तिला आज कोणी उठवलं नाही, कसला गोंधळ नाही, कसला कोणाचा राग नाही, मार नाही, कसली धावपळ नाही ,नक्की घडतंय तरी काय? तिला प्रश्न पडला.
ती उठली, पाहिलं तर घरात कोणीच नव्हतं. तिला आश्चर्य वाटलं. तेवढ्यात, तिची नजर घराच्या बाहेर अंगणात पडली. "हा काय गोंधळ आहे, एवढी गर्दी माझ्या घराच्या अंगणात नक्की झाले तरी काय?"ती तशीच चालत बाहेर आली तिथे पाहिले दारात कोणाचं तरी शव होतं,पण नक्की कोणाचा असेल? ती जरा
भीत-भीतच समोर गेली समोर जाताच "आ....." मटकन खाली बसली समोर पडलेल्या स्वतःच्या देहाला पाहून तिला हुंदका फुटला, पण फक्त एकाच क्षणासाठी.....
तिने एका कोपऱ्यात पाहिलं सासू डोळ्यात खोटे आसू आणून रडत होती. नवरा एका बाजूला रडायचं नाटक करत होता.अचानक तिला आठवलं कालच्या रात्री सासूने नवऱ्याला सांगून त्याच्या हातून तिला मार बसवला होता. तिने समोर पाहिले एका सौभाग्यवतीचा शृंगार तिच्यावर चढवला होता. त्यामुळे काल रात्रीचे पडलेले डाग झाकून गेले होते.पुढे जाऊन त्या देहाला हात लावला, शरीर थंडगार पडलं होतं.तिला मनोमन आनंद झाला. नवरा रडत होता, सासू रडत होती, शेजारी, नातेवाईक, सगळे रडत होते. पण, ती एकटीच हसत होती.कारण, ती आता मोकळी झाली होती.आता कसलीच बंधन नव्हती. कोणी मारणार नव्हतं. आता देहाबरोबरच मनाची सुद्धा सुटका झाली होती.त्या जाचातून मुक्तता झाली होती. ती हसत होती. नाचत होती. आनंद व्यक्त करत होती. स्वतःच्या मृत्यूचा आनंद नव्हे,..... स्वतःच्या स्वातंत्र्याचा आनंद, गुलामीच्या बेड्यातून सुटल्याचा आनंद, ती मनोमन आभार मानत होती, त्या संपलेल्या श्वासांचे,ती धन्यवाद देत होती,त्या थंड पडलेल्या देहाला,ती पुढे निघून गेली.
मोकळ्या आकाशात ती स्वतंत्र झाली. जबरदस्तीच्या नात्यातून आणि त्या गुलामीच्या जाचातून ती मुक्त झाली.
वैभवी कु. आ. सातपुते ✍
परभणी GKD ISAD ❤️

मराठी सुविचार संग्रह
Total Pages - 71
Price - R̶s̶.̶9̶9̶.̶0̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह. (ebook)
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1