Kartavya Sadhana | कर्तव्य साधना
189 subscribers
24 photos
433 links
कर्तव्य साधना
साधना साप्ताहिकाचे डिजिटल पोर्टल.
Website : kartavyasadhana.in
WhatsApp : 7058286750
Download Telegram
सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने बांगलादेशचा उत्कंठावर्धक सामन्यात पराभव केला आणि आपल्या इतिहासात पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. गेली काही वर्षे अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ सातत्याने उत्तम क्रिकेट खेळत आहे. याच स्पर्धेत, याच संघाने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला धूळ चारली होती. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानात क्रिकेटचा उदय कसा झाला आणि किती विपरीत परिस्थितीत तो संघ बांधला गेला हे समजून घेण्यासाठी संकल्प गुर्जर यांचा हा लेख वाचायला हवा :
https://kartavyasadhana.in/view-article/sankalp-gurjar-on-afgan-cricket-team
युनेस्कोकडून ‘सिटी ऑफ लिटरेचर’ असा सन्मान लाभलेले हे भारतातील पहिलेच शहर ठरले आहे.

ब्रिटिश काळात केरळमध्ये कम्युनिझमची मुळे रोवली गेली. ही विचारसरणी मूलतः चळवळींवर अवलंबून असल्याने त्यांनी केरळमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आपली विचारसरणी वाढवताना वाचन संस्कृती वाढवण्याचे प्रयत्न केले. 1961 मध्ये केरळमध्ये मल्याळी वाचकांसाठी प्रति हजारी 32 दैनिके वितरित होत. त्याच कालावधीत भारतातील विविध भाषांमधील हा दर जवळपास 11 इतका होता. 1989 मध्ये केरळमधील हाच आकडा 61 वर गेला, तर इतर भारतीय भाषांमधे तो सरासरी 28 वर होता. यावरून आज कोझिकोडेला युनेस्कोने पुरस्कृत करण्यामागे किती मोठी चळवळ आहे हे लक्षात येते.

- शशिकांत हिवरकर

https://kartavyasadhana.in/view-article/kozhikode-declared-first-city-of-literature-in-india
असेही विद्वान (5/20)

डांग्यांनी म्हटले, "तुमचा रशियन लेखकांच्या आत्महत्येबद्दलचा लेख मी वाचला. तुम्हाला हे माहीत नाही का की, आत्महत्या करण्याची प्रथा रशियन लेखकांत फार पूर्वीपासून सुरू आहे?"
स्टालिनच्या राजवटीत लेखकांवर असा काही वरवंटा फिरवण्यात येऊ लागला की, कवींनी आत्महत्या केली आणि गद्यलेखकांनी लेखनसंन्यास घेण्यास सुरुवात केली, अशा अर्थाचा तो लेख होता. त्याला उद्देशून डांगे बोलत होते. एका शिस्तबद्ध कम्युनिस्टाचा स्टालिनची तरफदारी करण्याचा तो प्रयत्न होता.
मी म्हटले, "आत्महत्या करण्याची मानवजातीची जुनीच खोड आहे. पण प्रत्येक आत्महत्येला कारण कुठले झाले, याला महत्त्व असते. आज रशियात होत असलेल्या कवींच्या आत्महत्यांची कारणमीमांसा मी केली आहे."

ऑडिओ : 10 मि.

- प्रभाकर पाध्ये

https://youtu.be/-vNMvdIfyxs
https://kartavyasadhana.in/view-article/asehi-vidwan-part-five
व्हिडिओ : 2 तास 10 मिनिटांचा

प्रिय वाचक,
24 जून 2024 रोजी विनय हर्डीकर यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने, त्यांची दोन पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली. 'एक्स्प्रेस पुराण' हे नवे पुस्तक आणि 'जनांचा प्रवाहो चालिला' या पुस्तकाची चाळीस वर्षांनंतर आलेली नवी आवृत्ती..

या दोन पुस्तकांचे प्रकाशन आणि विनय हर्डीकर यांची आनंद आगाशे व राजन गवस गवस यांनी घेतलेली मुलाखत, असा एक कार्यक्रम 24 जून रोजी, पुणे येथील पत्रकार भवन मध्ये झाला. त्या संपूर्ण कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. धन्यवाद!

- संपादक, साधना

https://youtu.be/lirlB8YfeUA
लेखक आणि पुस्तक : 27 मिनिटांचा व्हिडिओ

प्रिय वाचक,
डॅनियल मस्करणीस व डॉ. ऐश्वर्या रेवडकर हे दोन युवा लेखक, साधना साप्ताहिकाला 2018 मध्ये अगदी अचानक सापडले. त्या वर्षी डॅनियलने 'मंच' ही लेखमाला लिहिली आणि ऐश्वर्याने 'बिजापूर डायरी'. दोन्ही लेखमालांची पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली, ती त्यांची पहिली पुस्तके. आता त्या दोन्ही युवा लेखकांचे दुसरे पुस्तक गेल्या महिन्यात प्रकाशित झाले आहे. डॅनिअलचे पुस्तक वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे, ते मनोविकास प्रकाशनाकडून आले आहे, त्या पुस्तकाच्या निमित्ताने ऐश्वर्याने घेतलेल्या डॅनियलच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे. आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. धन्यवाद.

- संपादक, साधना

https://www.youtube.com/watch?v=z4g__0KyQOk
https://kartavyasadhana.in/view-article/daniel-mascarenhas-interview-by-ayshwarya-revadkar
Will Rahul Gandhi Rise To Full Glory From Ashes?

The same Rahul who was disqualified from the Lok Sabha in March 2023 through conspiracies is now the Leader of the Opposition in the same house a little over a year later. The same Rahul who was evicted from his official residence is now granted a cabinet-rank bungalow. The CBI and ED hounded him for years, but he will now be a member of the 3-member committee that oversees the appointments of the chieftains of the ED and the CBI.

~ Editor

https://www.kartavyasadhana.in/view-article/rahul-gandhi-chakravyuha-bested-part-one
ज्या मातीवर भारतीय संघाने वर्ल्डकप मिळवला, तेथील माती रोहित शर्माने आदराने चाखली. मातीला आईच्या ठिकाणी मानणाऱ्या आपल्या संस्कृतीचं दर्शन त्याने घडवलं..

प्रत्येक खेळाडूच्या हातात देशाचा सुंदर ध्वज होता आणि ते मोकळेपणाने आपल्या भावना, आपला आनंद व्यक्त करत होते. याच वेळी मैदानावर काही खेळाडू टूर्नामेंट ब्रॉडकास्टरशी संवाद साधत होते. त्यावेळी हार्दिकदेखील ‘स्टार स्पोर्ट्स’च्या प्रतिनिधीशी बोलत होता. मात्र त्याच इंटरव्ह्यूदरम्यान जे घडलं ते पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. हार्दिकचा इंटरव्ह्यू सुरू असतानाच रोहित अचानक मध्ये घुसला आणि त्याने कोणताही संकोच न बाळगता सरळ हार्दिक पांड्याला घट्ट पकडलं, त्याच्या गालावर किस करून आनंद व्यक्त केला आणि त्याला मिठी मारली.

- आशिष निनगुरकर

https://kartavyasadhana.in/view-article/ashish-ningurkar-cricket-t-twenty-world-cup
मजूर पक्ष डावीकडे झुकलेला समजला जात असला तरी स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली तो खरोखरच तसा असेल काय असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

स्टार्मर यांनी सत्ता मिळविली आहे पण त्यांना जनमताचा फार मोठा पाठिंबा आहे अशातली बाब नाही. मते फारशी वाढली नाहीत पण जागा प्रचंड प्रमाणात कशा काय वाढल्या असा प्रश्न कोणालाही पडेल. त्याचे कारण युनायटेड किंगडममधील प्रचलित निवडणूक पद्धती. एक सदस्यीय मतदारसंघात ज्या कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळतात - मग त्यांचे प्रमाण किती का असेना - तो निवडून येतो. आघाडीच्या पहिल्या दोन पक्षांना या पद्धतीचा फायदा होतो आणि छोट्या पक्षांना तोटा होतो. यामुळेच युनायटेड किंगडममध्ये अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात असले तरी तेथे द्विपक्षीय पद्धत आकाराला आली आहे.

- अभय दातार

https://kartavyasadhana.in/view-article/abhay-datar-uk-elections-part-one
आर्थिक प्रश्न आणि अस्मितावादी प्रश्न यांची सांगड घालताना अस्मितावाद वरचढ ठरणार नाही याची काळजी स्टार्मर यांना घ्यावी लागेल.

डावीकडे झुकलेल्या पक्षांमध्ये मजूर पक्ष हाच प्रमुख आहे. त्याला सशक्त राजकीय पर्याय अद्याप तरी नाही. पण पक्षाच्या गाझा प्रश्नावरील भूमिकेच्या विरोधातील पक्षाच्या समर्थकांचे बंड आणि ग्रीन पार्टीला मिळालेली लोकप्रियता पाहता तो उभा राहणारच नाही असे म्हणता येत नाही. स्टार्मर यांची आर्थिक धोरणे पुरेशा प्रमाणात मूलगामी नसतील तर असा पर्याय उभा राहण्याची शक्यता वाढू शकते. तसा तो उभा राहिला तर या निवडणुकीतून सुरू झालेल्या पक्ष-पद्धतीच्या विघटनाच्या प्रक्रियेला अधिक गती येईल आणि नजीकच्या भविष्यकाळात युनायटेड किंगडममध्ये राजकीय अस्थिरता अवतरेल.

- अभय दातार

https://kartavyasadhana.in/view-article/abhay-datar-uk-elections-part-two
Rahul - PM Aspirant or Charismatic People's Leader?

Rahul Gandhi's emphatic rebuttal, "Narendra Modi is not the entire Hindu community, BJP is not the entire Hindu community, RSS is not the entire Hindu community," will continue to reverberate in the Lok Sabha for a long time. . The echoes of this statement will keep ringing in Prime Minister Modi’s ears.

~ Editor

https://www.kartavyasadhana.in/view-article/does-rahul-want-to-be-pm-or-gandhi
डॉ. नितीन हांडे लिखित 'सायंटिस्ट खोपडी : बेलपासून नोबेलपर्यंत' या पुस्तकाचा परिचय

या पुस्तकात अलेक्झांडर ग्रॅहम बेल, रॉबर्ट बॉयल, बेंजामिन फ्रँकलीन, मायकेल फॅरेडे, निकोला टेस्ला, लिओनार्दो दा विंची, शंकर आबाजी भिसे, नरिंदरसिंह कपानी, रुचिराम साहनी, वसंत खानोलकर, वर्गीस कुरियन, सत्येंद्रनाथ बोस, गिरींद्रशेखर बोस, होजे डेलगाडो, जॅक पार्सन्स, डॉ. वामन कोकटनूर, होरेस वेल्स, निकोलाय वाव्हिलोव्ह, ज्युलियन हक्सले, पॉल डिरॅक, मॅक्स प्लॅन्क, नील्स बोहर, वर्नर हाईझेनबर्ग, हेडी लमोर, जेम्स वॉट, रिचर्ड फाइनमन आणि आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांच्या आयुष्यातील लहानपणापासूनच्या महत्त्वाच्या घटना-गोष्टींची धमाल मजा वाचायला मिळते.

- राहुल माने

https://kartavyasadhana.in/view-article/scientist-khopadi-book-review
ललित साहित्य : भाग 1 / 2 : एक तास बारा मिनिटांचा व्हिडिओ

*मिलिंद बोकील* यांनी ललित व ललित वैचारिक म्हणजे fiction व nonfiction या दोन्ही प्रकारातील मिळून दोन डझन पुस्तके लिहिली आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या दोन दीर्घ मुलाखती साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतल्या आहेत. त्यातील ललित साहित्याच्या संदर्भातील मुलाखत मराठीतील ज्येष्ठ साहित्य समीक्षक *रेखा इनामदार* यांनी घेतली आहे, ती दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत. ही मुलाखत आपण मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता.

- संपादक, साधना

https://www.youtube.com/watch?v=Cm4GbVuYYP0
https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-interview-rekha-sane-part-one
मिलिंद बोकील यांच्या साहित्यावर एक दिवसभराचे चर्चासत्र 16 ऑगस्ट 2024 रोजी, पुणे येथे आयोजित केले आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणून हे व्हिडिओ जरुर पाहा.
43 मिनिटांचा व्हिडिओ

मिलिंद बोकील यांनी ललित व ललित वैचारिक म्हणजे fiction व nonfiction या दोन्ही प्रकारातील मिळून दोन डझन पुस्तके लिहिली आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या दोन दीर्घ मुलाखती साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतल्या आहेत. त्यातील ललित साहित्याच्या संदर्भातील मुलाखत मराठीतील ज्येष्ठ साहित्य समीक्षक रेखा इनामदार - साने यांनी घेतली आहे, ती दोन भागांत प्रसिद्ध करीत आहोत.

मिलिंद बोकील यांच्या साहित्यावर एक दिवसभराचे चर्चासत्र 16 ऑगस्ट 2024 रोजी, पुणे येथे आयोजित केले आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणून हे व्हिडिओ जरुर पाहा, मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा.

- संपादक, साधना

https://youtu.be/cr5d7CCap1M
https://kartavyasadhana.in/view-article/milind-bokil-interview-rekha-sane-part-two
विरोधकांना सतत उपदेशामृत पाजणारे सभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनुराग ठाकूर यांना मात्र त्यांच्या विधानांबाबत खडसावल्याचे ऐकिवात नाही..

हिंदू एकता ही मुळात कमकुवत आहे कारण भाजप आणि संघ यांच्या धोरणाने समाजाच्या मोठ्या वर्गाला अधिकार मिळालेले नाहीत आणि जातीभेदाबाबतही काही उत्तर मिळत नाही. सुस्थितीतील लोकांना अनुराग ठाकूर यांच्या ‘जाती का पता नही’ या टोमण्याचा अर्थ कळतो, मात्र त्याचा खरा अर्थ आणि त्यामागचा हेतू समजत नाही. निवडणुकीत भाजपने हिंदू-मुस्लीम या विभागणीला 80-20 असे रूप दिले पण राहुल-अखिलेश जोडीने वंचित समाज आणि मान असणारा आणि धनाढ्य अभिजन समाज ही विभागणीदेखील 80-20 अशीच आहे असा दावा प्रचारात करून भाजपचा डाव उलटवला होता.

- आ. श्री. केतकर

https://kartavyasadhana.in/view-article/a-s-ketkar-rahul-gandhi-anuraag-thakur-om-birla
'माकप'चे ज्येष्ठ नेते आणि प. बंगालचे भूतपूर्व मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे 8 ऑगस्ट रोजी निधन झाले, त्यानिमित्ताने लिहिलेला लेख..

साहित्य आणि कलांत रस असल्यामुळे ते आपल्या धकाधकीच्या राजकीय कामातून वेळ काढून ‘कॉलेज स्ट्रीट’ येथील ‘कॉफी हाऊस’मध्ये आपल्या साहित्यिक-कलाकार मित्रांसमवेत अड्डा करायला आलेलेही मी पाहिले आहे. कॉफी हाऊसमधील मॅनेजमेंट व कामगारांच्या वादात त्यांनी हस्तक्षेप केला आणि त्यामुळे कामगारांच्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडे कॉफी हाऊसचा कारभार सोपवण्यात आला! ‘कॉफी हाउस’सारख्या जागेत समाजवादी तत्त्वज्ञानाचा एवढा आदर्श प्रयोग भट्टाचार्यांना करता आला, पण मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्यात हा प्रयोग त्यांना का नाही करता आला?

- डॉ. सुरेश खैरनार

https://kartavyasadhana.in/view-article/suresh-khairnar-on-budhhadev-bhattacharya
या ऑलिंपिकमध्ये स्पर्धा शर्यतींत एकूण 13 जागतिक आणि 47 ऑलिंपिक विक्रमांची नोंद झाली. ते तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, कॅनुइंग, ट्रॅक सायकलिंग, शूटिंग, स्पोर्टस क्लाइंबिंग आणि जलतरण यांत नोंदवले गेले. लक्षणीय बाब म्हणजे तिकिटविक्रीही विक्रमी – 9 लाख 50 हजारांपेक्षा जास्त झाली. यजमान देश वगळता जगभरातून 1 लाख 45 हजार प्रेक्षक आले होते. रस्त्यावरील सायकल शर्यत दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिली. बीच व्हॉलीबॉललाही साडेचार लाख प्रेक्षक मिळाले. स्टेडियमधील स्पर्धांत रग्बीला 5 लाख 30 हजार, हॅन्डबॉलला पाच लाख अशी विक्रमी उपस्थिती होती. स्पर्धाधिकारी, स्वयंसेवकांत महिला आणि पुरुषांची संख्या सारखी होती. इतकेच काय 195 देशांच्या पथकांतही ही समानता होती.

- आ. श्री. केतकर

https://kartavyasadhana.in/view-article/a-s-ketkar-paris-olympics-2024
एक हिन्दी लघुकथा

जब सरकार ने उन्हें कैम्प से बाहर निकालकर इस छोटे गांव में बसने भेजा, तो वैसे तो उन्हें बड़ी ख़ुशी हुईं। लेकिन एक तरफ बचपन की वो यादे, अपने गांव से बिछड़ने का ग़म उन्हें हमेशा बेचैन करता रहता। अपनी ख़ुद्दारी और मेहनत से, छोटे-छोटे काम कर के उन्होंने एक दिन ख़ुद की एक दूकान शुरू की थी। जगह, वही कुम्हारो की बस्ती के पास, बड़े-बड़े मकानों के पिछवाड़े में। वैसे गांव मे हर दूकान को अपना एक नाम था। जैसे की ‘गुप्ता जनरल स्टोअर्स’। किसीने अपने खानदान का नाम दूकान को दिया था, तो कई दूकानों के नाम कुछ अंग्रेजी लफ़्ज़ों के इस्तेमाल से सजाएं गए थे। दादाजी ने भी दूकान का नाम रख़ा तो था लेकिन उनकी दूकान को सब एकही नाम से जानते थे – ‘शरणार्थी की दूकान’।

- सलील जोशी

https://kartavyasadhana.in/view-article/salil-joshi-sharanarthi-ki-dukan
25 ऑगस्ट हा गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यावर टाकलेला दृष्टिक्षेप..

गाडगीळ ज्या काळात लिहीत होते, त्याच काळात अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, पु. भा. भावे, शांताराम आणि सदानंद रेगे हेही कथालेखन करत होते. या काळात ‘सत्यकथा’ आणि ‘अभिरुची’ या वाङ्मयीन नियतकालिकांनी नवसाहित्याचा कैवार घेतला. केवळ कथाच नव्हे तर अन्य साहित्यप्रकारांतही नवे प्रवाह आले. वास्तविक, गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक. त्यांनी सुरत येथे अर्थशास्त्राचे अध्यापन केले. त्यानंतर, मुंबईतील पोतदार कॉलेज, सिडनहॅम कॉलेज आणि रूपारेल कॉलेज येथेही अध्यापन केले. आपटे उद्योग समूह आणि वालचंद उद्योग समूह यांचे ते सल्लागार होते.

- सोमनाथ कोमरपंत

https://kartavyasadhana.in/view-article/somanath-komarpant-on-gangadhar-gadgil