Kartavya Sadhana | कर्तव्य साधना
189 subscribers
24 photos
433 links
कर्तव्य साधना
साधना साप्ताहिकाचे डिजिटल पोर्टल.
Website : kartavyasadhana.in
WhatsApp : 7058286750
Download Telegram
लोकसभा निवडणूक 2024

निवडणूक प्रचाराच्या अगदी सुरुवातीलाच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले. त्यामुळे दिल्लीतील मार्ग सुकर होईल अशी चर्चा केली जात होती. परंतु आपच्या निवडणूक प्रचार प्रमुखाने निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये यात्रा काढून लोकांना सांगितले की, ‘जेल का जवाब, वोट से देंगे’. ही घोषणा अगदी काही दिवसांतच लोकप्रिय ठरली. अनेक नेते आणि नागरिक यांनी व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स या समाजमाध्यमांवर अरविंद केजरीवाल यांचा जेलमध्ये असलेला फोटो डीपी म्हणून ठेवत त्यांचे समर्थन केले.

- राजेंद्र भोईवार

https://kartavyasadhana.in/view-article/rajendra-bhoiwar-loksabha-elections-2024
न मो ... न मो ... अर्थात नको मोदी नको मोदी! हा विचार वास्तवात येण्याची शक्यता आहे.

भाजपच्या सोयीसाठी सात टप्प्यांत मतदान घेण्याचे ठरवण्यात आले, हे सर्वमान्य आहे. कारण विश्वगुरुंना सर्वत्र संचार करता यायला हवा होता. पण आता मात्र याचा फायदा विरोधकांनाच मिळत आहे अशी धाकधूक भाजपच्या गोटात आहे. त्यातच आता त्यांचा मुख्य आधार जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तो आता प्रचारापासून दूर राहतो आहे किंवा त्याने प्रचारातून अंग काढून घेतले आहे असे जाणकार निरीक्षकांकडून बोलले जात आहे. खरोखरच तसे असेल तर भाजपसाठी परिस्थिती गंभीर आहे. कारण संघाला अंदाज आल्यानेच त्याने हा निर्णय घेतला असणार आणि संघाचा अंदाज क्वचितच चुकतो याची भाजपला जाण आहे.

- आ. श्री. केतकर

https://kartavyasadhana.in/view-article/a-s-ketkar-loksabha-election-2024
लोकसभा निवडणूक 2024

एकंदरीत राष्ट्रीय निवडणुकीतील मुद्दे काहीही असले तरीही जातीचा घटक सक्रीय असतो. फक्त तो किती प्रमाणात काम करतो हे त्या मतदारसंघातील परिस्थितीवर अवलंबून असते. जात या घटकाचे राजकीयीकरण झाले असल्याकारणाने जातीचे गतीतत्त्व अस्तित्वात असतेच. त्याचा प्रभाव किती असतो हा प्रश्न असतो. या निवडणुकीत मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न, जात जनगणना, संविधानबदलाची चर्चा यामुळे जात आणि धार्मिक अस्मिता चर्चेत राहिल्या.

- शिवाजी मोटेगावकर

https://kartavyasadhana.in/view-article/shivaji-motegaonkar-caste-politics-in-elections
हिंदू-पॉपचा विषय, आशय आणि सादरीकरण हे कुठल्याही विवेकी, तर्कनिष्ठ विचाराला कडवे आव्हान बनून उभे आहे..

व्हॉट्सअ‍ॅप हे संपर्क व संवादाचे माध्यम झाले आहे. युट्युब हा मनोरंजनाचा एक प्रमुख स्रोत आहे. आज ही दोन्ही माध्यमे एकमेकांची सहजीवी बनली आहेत. युट्यूबवरील कंटेंट व्हॉट्अ‍ॅपद्वारे प्रसारित होतो. हिंदू-पॉपच्या प्रसाराचे मूळ यातच दडलेले आहे. समाजमाध्यमांद्वारे हिंदू पॉप आता दृकश्राव्य अवतारात प्रेक्षकांना उपलब्ध झाले आहे. हिंदू-पॉपमध्ये पारंपरिक आणि डीजे संगीताची सरमिसळ दिसते. यामुळे गाण्यांना ‘रिच’ (reach) आहे. अक्षरशः संमोहित करणारा इलेक्ट्रॉनिक स्वरकंपा, थिरकणारा ताल आणि सतत येणारे उत्तेजित करणारे शब्द यांमुळे उन्मादी वातावरण निर्माण होते.

- डॉ. अजिंक्य गायकवाड

https://kartavyasadhana.in/view-article/ajinkya-gaikwad-on-h-pop-and-politics
आताची निवडणूक धर्मग्रस्तता विरुद्ध सर्वधर्मसमभाव या दोन बाजूंत झाली. पहिलीचे नेतृत्व मोदींनी तर दुसरीचे राहुल गांधींनी केले.

जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा तिला आपले प्रश्न इतरांच्या, म्हणजे देवाधर्मांच्या प्रश्नांहून मोठे व महत्त्वाचे वाटू लागतात. मग तिला महागाई भेडसावते, बेरोजगारी दिसू लागते, सभोवतीचे दारिद्र्य आणि काही थोड्या माणसांचे वाढलेले वैभवही समजू लागते. स्वतःच्या प्रश्नात अडकलेला माणूस पोथ्या-पुराणांकडे सजगपणे, म्हणजे निराशा वाट्याला येईपर्यंत वळत नाही. अशा वेळी ही लढाई खरेतर वर्तमान व भूतकाळ यांच्यातील होते. माणसांचे प्रश्न आणि ज्यांना प्रश्न पडतच नाहीत ते ईश्वर यांच्यातच ती जुंपण्याचा प्रयत्न जनतेला दिसू लागतो.

- सुरेश द्वादशीवार

https://kartavyasadhana.in/view-article/suresh-dwadashiwar-elections-2024
दोन निरपराध व्यक्तींच्या मृत्यूला कारणीभूत होऊनही चिकन बर्गर खाण्याची लालसा बाळगण्याचा उद्दामपणा ज्या कुटुंब आणि शाळेतून येतो ते कुटुंब आणि शाळा राज्यसंस्थेचा अविभाज्य भाग असतात.

घडलेल्या घटनाक्रमाकडे आणि एकंदरीतच घटितातील तुकड्या-तुकड्यांकडे पाहून वस्तुस्थितीचे पूर्ण आकलन होणार नाही! कल्याणीनगरच्या घटनेकडे एकूणच समकालीन ‘राज्यसंस्था’ कशी काम करते, हे समजून घेण्याच्या दृष्टीकोनातून आपण पाहिले पाहिजे! पोलिसयंत्रणा, न्याययंत्रणा, राजकीय यंत्रणा, बाजारयंत्रणा, माध्यमे इत्यादी संस्था कशा समन्वयीत रूपात अस्तित्वात असतात, हे बघणे आवश्यक आहे. 

- दिलीप चव्हाण

https://kartavyasadhana.in/view-article/pune-porsche-car-accident
"Arvind Kejriwal, who must have had ample time for ‘chintan’ of late, has come up with an ingenuous prediction - NaMo will soon be 75 and will have to hand over charge to someone younger (Shah / Yogi? God forbid!) because the BJP constitution says no posts after 75. Is Kejriwal naïve or has he lost his bearings? Can’t the BJP change its own constitution when it’s talking day and night of changing the constitution of the country?"

- Vinay Hardikar

https://www.kartavyasadhana.in/view-article/landscape-during-and-after-the-battle
पं. नेहरूंच्या लढाऊ जीवनाचा आदर्श - एस. एम. जोशी
https://www.weeklysadhana.in/view_article/the-ideal-of-nehrus-fighting-life-article-by-s-m-joshi

पंडित नेहरू : इन्द्रवज्र की इन्द्रचाप? - नानासाहेब गोरे
https://www.weeklysadhana.in/view_article/pandit-nehru-indravajra-ki-indrachap

हे चित्र पाहा - वसंत बापट
https://www.weeklysadhana.in/view_article/vasant-bapat-on-the-occasion-of-birthday-of-pandit-nehru-and-indira-gandhi

पं. नेहरूंचे शैलीदार व्यक्तित्व - नरहर कुरुंदकर
https://www.weeklysadhana.in/view_article/article-about-pandit-neharu-by-narhar-kurundkar

नेहरूंच्या विचारांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन - राम जोशी
https://www.weeklysadhana.in/view_article/ram-joshi-on-book-by-s-r-gadgil-on-pandit-nehru

राष्ट्रवाद : नेहरूंचा आणि आमचाही! - रामचंद्र गुहा
https://www.weeklysadhana.in/view_article/Nationalism-Nehru's-and-ours-too

नरेंद्र मोदींच्या चीनविषयक धोरणात नेहरूंचे प्रतिध्वनी - रामचंद्र गुहा
https://www.weeklysadhana.in/view_article/ramchandra-guha-on-nehruvian-echoes-of-modi's-china-policy

नेहरूंची भारतीय दृष्टी आणि संघाचा राग - पुरुषोत्तम अगरवाल
https://www.weeklysadhana.in/view_article/purushottam-agraval-neharu's-vision-and-anger

आजच्या पिढीला पंडित नेहरू समजलेत का? - दत्तप्रसाद दाभोळकर
https://www.weeklysadhana.in/view_article/dattprasad-dabholkar-on-new-generation's-understanding-of-Nehru

नेहरू आणि हत्ती - ज्ञानेश्वर मुळे
https://www.weeklysadhana.in/view_article/nehru-and-elephant-article-by-dnyaneshwar-mulye

गांधी-नेहरू यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ - विनोद शिरसाठ
https://www.weeklysadhana.in/view_article/editorial-on-gandhi-and-nehru-correspondence

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांना पत्रं - विनोद शिरसाठ
https://weeklysadhana.in/view_article/editorial-letters-prime-minister-to-chief-ministers
Part 1/4 : व्हिडिओ 1 तास 12 मिनिटांचा

प्रिय वाचक,
1863 ते 1939 असे 76 वर्षांचे आयुष्य सयाजीराव महाराज गायकवाड यांना लाभले. तब्बल 64 वर्षे ते बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. बुद्धिवान, प्रतिभावान व कर्तबगार या तिन्ही निकषांवर त्यांची गणना अव्वल स्थानी केली जाते.

अशा या सयाजीरावांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. आतापर्यंत 60 पेक्षा अधिक ग्रंथ, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित झालेले असून, आणखी 40 ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

असे हे सयाजीराव, बडोद्याच्या राजगादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने बाबा भांड यांची दीर्घ मुलाखत 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. प्रत्येकी एक तासाच्या चार भागांत ती प्रसिद्ध करीत आहोत. आपण या मुलाखतीच्या लिंक्स आपल्या मित्रपरिवाराला जरूर फॉरवर्ड करू शकता. Thanks..

- संपादक, साधना

https://youtu.be/iCggrHFswU8
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-one
Part 2/4 : एक तासाचा व्हिडिओ

प्रिय वाचक,
सयाजीराव महाराज गायकवाड तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. ते बडोद्याच्या राज गादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.

सयाजीराव महाराज यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत (चार भाग असलेली), 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. त्यातील हा दुसरा भाग आहे. Thanks.

- संपादक, साधना

https://www.youtube.com/watch?v=ODGBuMmi_F8
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-two
Part 3/4 : व्हिडिओ 1 तास 12 मिनिटांचा..

प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड, 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राजगादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.

त्यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत (चार भाग असलेली), 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. त्यातील हा तिसरा भाग आहे. या मुलाखतीच्या लिंक्स आपण आपल्या मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks.

- संपादक, साधना

https://youtu.be/kASnS1nzC7U
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-three
Part 4/4 : व्हिडिओ 1 तास 7 मिनिटांचा

प्रिय वाचक,
तब्बल 64 वर्षे बडोदा संस्थानचे अधिपती राहिलेले सयाजीराव महाराज गायकवाड, 27 मे 1875 रोजी बडोद्याच्या राजगादीवर दत्तक म्हणून गेले; त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.

त्यांचे विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत, साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतली आहे. त्यातील हा चौथा व अखेरचा भाग आहे. या मुलाखतीच्या लिंक्स आपण आपल्या मित्रपरिवाराला जरुर फॉरवर्ड करू शकता. Thanks.

- संपादक, साधना
https://youtu.be/MoxzUMNpRgk
https://kartavyasadhana.in/view-article/baba-bhand-interview-part-four
"आम्ही ज्या टेकडीपासून आमचं काम सुरू केलं, ती टेकडी वनविभागाच्या हद्दीत येते. स्वतः वनविभागच तिकडे कचरा करायचा. काही वर्षांपूर्वी वनविभागाने एक प्रकल्प हाती घेतला होता. ग्लिरिसिडिया या विदेशी झाडाच्या ठिकाणी देशी झाडं लावण्याचा. ते जी रोपं आणायचे, त्याच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जिथे काढतील तिथेच टाकून द्यायचे. ते प्लॅस्टिक पिशव्यांचं प्रमाण खूपच जास्त होतं. तो सगळा कचरा आम्ही गोळा करायचो. मग आम्ही एकदा ठरवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना वारंवार विनंती केली, वारंवार पत्रव्यवहार केले आणि काही काळाने आमच्या त्या प्रयत्नांना यश आलं. त्यांचं तसं प्लॅस्टिक कचरा टेकडीवर सोडून जाणं, आणि प्लॅस्टिक जाळणंही पुष्कळ कमी झालं."

- ओजस फाटक

https://www.kartavyasadhana.in/view-article/environment-day-ecoforce-dhyas-nisarga-swachchhatecha
'बलसागर भारत होवो'चा पुढचा प्रयोग उद्या (11 जून) सायंकाळी 7.30 वाजता 'द बॉक्स' येथे होतो आहे.

प्रयोगाची संहिता डॉ. माधवी वैदय यांची असली, तरी यातील शब्दन् शब्द साने गुरुजींचा आहे. त्यातून गुरुजींच्या संवेदनशील मनाचे अनेक हळुवार कंगोरे दाखवण्याबरोबरच त्यांच्यातल्या योद्‌ध्याचे लढाऊपण, कठोर निर्णय घेणारी निश्चयी वृत्ती ठळकपणे अधोरेखित करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. साने गुरुजींच्या संघर्षलढ्यातील करारीपणा व ठामपणा श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे अभिवाचक धीरज जोशी, सानिका आपटे, ओंकार गोवर्धन यांचेही विशेष कौतुक केले पाहिजे; कारण गुरुजींच्या संघर्षयात्रेतील अनेक पात्रांचा संवाद या तिघांच्या तोंडून ऐकताना ती ती पात्रे प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभी राहतात.

- माधव राजगुरू

https://kartavyasadhana.in/view-article/madhav-rajguru-balsagar-bharat-hovo
"So there are two types of crying – the cries of the scared, the helpless, the depressed and the pitiful; and the cries born in idealism, sacrifice, loyalty, compassion and determination. The grief in Sane Guruji’s literature is of the second kind, and unfortunately his critics have failed to understand it. They just generalise all crying, not knowing the nuances."

~ Narhar Kurundkar

https://kartavyasadhana.in/view-article/sane-guruji-literarture-narhar-kurundkar
कंगनाला मिळालेली चपराक एकट्या कुलविंदरची नसून साऱ्या देशाची होती हे लक्षात घ्यायचे.

कुलविंदरचा निरोप ऐकल्यानंतर माझ्या मनातला तिच्याविषयीचा अभिमान अनेक पटींनी वाढला. खऱ्या अर्थाने ती शेतकरी वर्गाची प्रतिनिधी आहे आणि तिच्या मनातील देशभक्तीही मोठी आहे हे ध्यानात आले. त्याचवेळी अशी लढाऊ महिला मला बहीण म्हणून मिळाली याचाही मला आनंद झाला. कुलविंदर या प्रकरणात अपराधी ठरली तर तिला पाठिंबा देणारा म्हणून तिच्यासोबत राहायला मलाही आवडेल.

- सुरेश द्वादशीवार

https://kartavyasadhana.in/view-article/suresh-dwadashiwar-kangana-ranaut-kulvinder-kaur
डॉ. विश्वास पाटील लिखित 'स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी' या पुस्तकाचा परिचय

केवळ मते वा सिद्धांत यांच्या जंजाळात अडकून पडणारी ही व्यक्तिमत्त्वे नव्हती तर प्रत्यक्ष कार्यावर त्यांचा भर होता असे लेखक मांडतो. आजकाल पुरोगामी विचारांवर लंबेचवडे भाष्य करणाऱ्यांची फौज राजकारणात आणि राजकारणाबाहेरही काही कमी नाही पण प्रत्यक्ष कृतीचा अभाव मात्र जाणवतो. स्वामीजींनी आणि गांधीजींनी अनुक्रमे अध्यात्म आणि राजकारण यांचा विचार प्रसारीत करतानाच जातीयतेचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. पण आजचे राजकारण असो वा धर्मकारण, माणसामाणसांतील भेद अधिक गडद होताना दिसतात ही दुर्दैवी बाब आहे.

- अद्वैत धोंडीराम जोशी

https://kartavyasadhana.in/view-article/advait-joshi-swami-vivekanand-and-gandhiji
True, the NEET Paper Leak scandal has brought the Indian education system in limelight for all the wrong reasons, but importantly, it has also ignited a nationwide student awakening and a significant movement demanding reforms. Students’ initial reactions to the scam were a mix of shock, disbelief, and frustration. But soon, spurred a wave of protests, marches, and it turned into a full fledged movement of fighting for their educational rights and of seeking justice for themselves.

~ Rucha Mulay

https://www.kartavyasadhana.in/view-article/neet-scam-students-protests