Devendra Fadnavis
4.22K subscribers
80.8K photos
13.6K videos
2.75K files
7.63K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

डिसेंबर 2025 पर्यंत प्रमुख सरकारी कार्यालयांमध्ये सोलर ऊर्जेचा वापर...
दिसंबर 2025 तक प्रमुख सरकारी कार्यालयों में सोलर ऊर्जा का इस्तेमाल...

(पुणे | 8-6-2025)
#Maharashtra #Pune #SolarEnergy
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

राहुल गांधी यांच्या लेखाचे उत्तर लेखानेच दिले असून, आता तरी राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्ये करणे थांबवतील...
राहुल गांधी के आर्टिकल का जवाब आर्टिकल से ही दिया हैं, अब तो राहुल गांधी इस प्रकार की बातें करना छोडेंगे...

(पुणे | 8-6-2025)
#Maharashtra #Pune #MediaByte
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

कोणत्याही विभागाचे पैसे वळवलेले नाहीत...
किसी भी विभाग का पैसा हस्तांतरित नहीं किया गया...

(पुणे | 8-6-2025)
#Maharashtra #Pune #MediaByte
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis visited the 'Pushpalata D. Y. Patil Hospital' in Talegaon, Pune, ahead of its inauguration. He reviewed the hospital’s infrastructure, cutting-edge medical facilities, and advanced treatment systems.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तळेगाव, पुणे येथे 'पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालया'च्या उदघाटनापूर्वी रुग्णालयाची पाहणी केली व अत्याधुनिक पद्धतीने उपचार करणाऱ्या वैद्यकीय यंत्रणांची माहिती जाणून घेतली.

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

कुसुम-3 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये महाराष्ट्र अग्रेसर...
कुसुम-3 मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना में महाराष्ट्र अग्रसर...

(महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन | पुणे | 8-6-2025)
#Maharashtra #Pune #SaurKrishiVahini
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे वीज बिल शून्यावर आणणार...
300 यूनिट तक बिजली का उपयोग करने वाले ग्राहकों का बिजली बिल शून्य किया जाएगा...

(महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन | पुणे | 8-6-2025)
#Maharashtra #Pune #ElectricityBill
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर शनिवारी सायंकाळी गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तेलंगणामधील 6 मुलांचा पाण्यात बुडून झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. सुमारे 12 तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर सर्व मुलांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले. ईश्वर त्यांच्या आत्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
ॐ शांति 🙏🏽

#Maharashtra #Telangana
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of the 'Pushpalata D. Y. Patil Hospital' at the hands of CM Devendra Fadnavis 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालया'चे उदघाटन 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'पुष्पलता…
CMO Maharashtra Tweets:

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तळेगाव, पुणे येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्जित आणि समाजसेवेच्या मूल्यांना समर्पित ‘पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालया’चे उदघाटन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, या परिसरातील सामान्य नागरिक, कामगार, औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि किफायतशीर आरोग्यसेवा पुरवणारे हे रुग्णालय खऱ्या अर्थाने एक वरदान ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 2014 मधील एक भावनिक आठवण सांगितली. "सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तिथे अनेक लहान मुले व त्यांच्या आई-वडीलांनी 'धन्यवाद मुख्यमंत्री काका' असे बॅनर घेत आमची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता, तुमच्यामुळे आमच्या मुलांची हृदय शस्त्रक्रिया पार पडल्याचे त्यांनी अश्रूपूर्ण डोळ्यांनी सांगितले", असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याचे श्रेय डॉ. विजय पाटील यांना दिले.

तेव्हापासून डॉ. विजय पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत 70 खाटा कायमस्वरूपी गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीने शिफारस केलेल्या किमान 12 ते 15,000 रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले आहेत. गरिबांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच आमच्या कार्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तो या माध्यमातून त्यांना आणि आम्हालाही मिळाला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

खरे मोठेपण इमारतींच्या उंचीत नव्हे, तर त्या इमारतीतून सामान्य माणसासाठी काय दिले जाते यावर ठरत असते. डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिलेले संस्कार आणि मूल्यांद्वारे हे मोठेपण आज डॉ. विजय पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या कार्यातून प्रकट होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ आणि केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’अंतर्गत प्रत्येकी ₹5,00,000 पर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. या योजनांमुळे गरजू नागरिकांना इन्शुरन्स आणि ॲशुरन्स दोन्ही मिळते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येत आहे. याद्वारे आरोग्य सुविधांचे मोठे जाळे निर्माण करून प्राथमिक आरोग्य सुविधेला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. तसेच द्वितीय स्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा आमचा संकल्प आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची निर्मिती होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुलींसाठी 100% आणि मुलांसाठी 50% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा विस्तार व गुणवत्ता दिसून येत आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाने अशा समाजोपयोगी उपक्रमांत सातत्य ठेवावे. त्यांना शासनाचे सर्व सहकार्य मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी खा. श्रीरंग बारणे, आ. सुनील शेळके व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
CMO Maharashtra Tweets:

Detailed information about Pushpalata D. Y. Patil Hospital in Pune, which stands tall as a hub of modern healthcare and dedicated social service.
पुणे येथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि समाजसेवेच्या कटिबध्दतेचे प्रतीक असणार्‍या पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाची सविस्तर माहिती सांगणारी ही चित्रफीत...

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis inaugurated 'The John Deere Intelligent Solutions Group (ISG factory)' in Sanaswadi, Pune. A cutting-edge manufacturing facility dedicated to advancing innovative solutions in the agricultural sector.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सणसवाडी, पुणे येथील कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देणाऱ्या 'द जॉन डीअर इंटेलिजेंट सोल्युशन्स ग्रुप (ISG फॅक्टरी)' या अत्याधुनिक उत्पादन सुविधेचे उदघाटन केले.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने पुणे स्थित सणसवाडी में कृषि क्षेत्र की नवाचारों को प्रोत्साहित करने वाली अत्याधुनिक उत्पादन इकाई 'द जॉन डीयर इंटेलिजेंट सॉल्यूशन्स ग्रुप (ISG फैक्ट्री)' का उदघाटन किया।

🕓 3.45pm | 8-6-2025📍Pune | दु. ३.४५ वा. | ८-६-२०२५📍 पुणे.

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune