Devendra Fadnavis
4.22K subscribers
80.8K photos
13.6K videos
2.75K files
7.62K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Charting Gadchiroli’s Future: A Strategic Review Under CM Devendra Fadnavis CM Devendra Fadnavis leads a strategic review meeting to present a comprehensive development roadmap for Gadchiroli district, paving the way for its all-round…
CMO Maharashtra Tweets:

शासनाच्या सर्व विभागांनी गडचिरोलीला अग्रक्रमावर ठेऊन काम करावे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आराखडा मांडणारी धोरणात्मक आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अचानकपणे पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही, यावर लक्ष ठेवावे. यासंदर्भात राज्य व जिल्हा स्तरावर समन्वय साधण्यासाठीची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. ही व्यवस्था योग्यप्रकारे चालली पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. पूर परिस्थितीमुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक गरजांची व्यवस्था प्रत्यक्षात झाल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच यादरम्यान गर्भवती महिलांच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. सोबतच, गावांचा संपर्क तुटू नये यासाठी 5 टप्प्यातला कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यातील किमान 2 टप्पे यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे व आगामी 3-4 वर्षात उर्वरित टप्पे पूर्ण करावे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीदरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, एनएचआय यांनी लोकाभिमुखता राखून प्रकल्प पूर्ण करावे, प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश दिले. तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे प्रकल्पासाठीचे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करावे. माझ्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमाने असून शासनाच्या सर्व विभागांनीदेखील गडचिरोली जिल्हा अग्रक्रमावर ठेऊन काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. डॉ. मिलिंद नरोटे, आ. धर्मरावबाबा आत्राम व इतर अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli #NaxalFreeBharat
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Chaired a strategic review meeting today to outline the comprehensive development plan for the Gadchiroli district and shared key directives with the concerned authorities.

In this meeting, emphasised the importance of ensuring that flood situations don’t arise unexpectedly during the monsoon. To manage this, we've set up a coordination system at both the State and District levels, and it must work smoothly. Also, instructed officials to make sure that the basic needs of villages at risk of being cut off due to floods are taken care of, with extra attention given to the needs of pregnant women. To prevent villages from getting isolated, we’re rolling out a 5-phase program. At least 2 phases will begin this year, with the remaining phases to be completed in the next 3-4 years.

Also, directed the Public Works Department, Forest Department, and NHAI to prioritise public welfare in their projects and speed up progress. Land acquisition for railway projects should be completed as soon as possible. Gadchiroli district is high on my agenda, and I have instructed all Government Departments to give it top priority in their work.

#Maharashtra #Gadchiroli #NaxalFreeBharat

https://x.com/Dev_Fadnavis/status/1931051842034872367
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत नरहरी विष्णूशास्री उर्फ दाजी पणशीकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, दाजी पणशीकर हे भारतीय संस्कृती, संत साहित्य, वेद आणि शास्त्र यांच्या अभ्यासातून सिद्ध व्यासंगी, सडेतोड आणि आजन्म ग्रंथोपासक विचारवंत होते. त्यांच्या जाण्याने एक महत्त्वाचा वैचारिक दुवा हरपला आहे. त्यांनी वेदाभ्यास, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, महाभारत भाष्यातून वैदिक ज्ञान परंपरेचा अभ्यास तर केला, पण तो आधुनिक पिढीसमोर अतिशय समर्पकपणे मांडला. त्यांचे व्याख्यान, लेखमालांमधून दिलेले विवेचन हे वाचकांमध्ये विचार जागवणारे होते. मुख्यमंत्री यांनी शोकाकुल पणशीकर कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

#EidAlAdha wishes to all!
ईद मुबारक!

#EidMubarak #EidAlAdha #Maharashtra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मनापासून धन्यवाद, महाराष्ट्र!

आपल्या विश्वासामुळेच समृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न साकार करता आलं.
ही तर सुरुवात आहे — आपली साथ अशीच राहू द्या, आपण मिळून प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करत राहू!

2014 साली प्रथमच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने मनात अनेक स्वप्नं आणि दृढ संकल्प होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी एकदा म्हणाले होते, “अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत, तर येथील रस्ते चांगले आहेत म्हणूनच अमेरिका श्रीमंत आहे.” कधीकाळी वाचलेलं हे वाक्य कायमचं मनावर कोरलं गेलं होतं, राज्याचा विकासासाठी चांगले रस्ते आवश्यक असल्याची जाणीव झाली... हाच विचार मनात ठेवून आपल्या महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांचा विकास साधत महाराष्ट्राची विकासगाथा रचण्याचा प्रवास आपण सुरू केला... यावेळी एक स्वप्न होते, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरसह अनेक जिल्ह्यांना व शेकडो गावांना मुंबईच्या आणि विकासाच्या जवळ आणण्याचे. या स्वप्नाची पायाभरणी 31 जुलै 2015 रोजी विधानसभेत नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग (समृद्धी महामार्ग) उभारण्याची घोषणा करून केली होती.

या दूरदर्शी संकल्पाची पूर्तता होताना मनात आनंद आणि समाधान आहे की, 701 किमी लांबीचा हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांमधून जात राज्याच्या विकासाचा कणा ठरणार आहे. कृषी बाजारपेठांना जोडत निसर्ग-संवर्धन, डिजिटायझेशन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसारख्या क्षेत्रांमध्ये समृद्धी महामार्गाने नवे मापदंड निर्माण केले आहेत. हे केवळ महामार्गाचे लोकार्पण नसून, हे महाराष्ट्राच्या विकासगाथेच्या सुवर्ण अध्यायाचे लोकार्पण आहे. समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेले हे ऐतिहासिक पाऊल आहे!

जिथे एक स्वप्न होतं, तिथे आज महामार्ग आहे, हा महामार्ग आपल्या पुढच्या पिढ्यांना नवी स्वप्नं पाहण्याची भरारी देईल.

#Maharashtra #SamruddhiMahamarg
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

A salute to the valour of C-60 commandos, the surrender of Maoists, and the modernisation of the police force — powerful moments that reflect the transformation of Gadchiroli into a prosperous and progressive district on the path of development.

C-60 जवानांच्या शौर्याचा गौरव, माओवाद्यांचे आत्मसमर्पण, पोलीस दलाचे आधुनिकीकरण... विकासाच्या वाटेवरील बदललेल्या, नव्या गडचिरोलीतील सर्वार्थाने समृद्ध करणारे काही क्षण..!

(गडचिरोली | 6-6-2025)
#Maharashtra #Gadchiroli #Glimpses
काल रात्री गडचिरोली दौऱ्यावर असताना स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांचे स्वागत केले.

#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli #BJP
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

अन्नदाता के सशक्तिकरण के 11 स्वर्णिम वर्ष! 🌾

मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी नेतृत्व में, बीते 11 वर्षों में देश के अन्नदाताओं के जीवन में ऐतिहासिक परिवर्तन आया है। केंद्र सरकार द्वारा शुरू की गई किसान हितैषी योजनाओं ने न सिर्फ किसानों को आत्मनिर्भर और सशक्त बनाया, बल्कि उनके जीवन से अभाव और अंधकार को दूर कर सम्मान का प्रकाश फैलाया।

🔹 अब तक का सबसे बड़ा कृषि बजट – 480% की ऐतिहासिक वृद्धि
🔹 प्रधानमंत्री फसल बीमा योजना – फसल नुकसान पर सुरक्षा कवच
🔹 किसान क्रेडिट कार्ड – आसान ऋण सुविधा
🔹 एफपीओ (FPOs) – सशक्त हुए किसान

इन 11 वर्षों की उपलब्धियाँ केवल संख्याएँ नहीं, बल्कि देश के अन्नदाताओं के जीवन में आया सम्मान, सुरक्षा और समृद्धि का नया युग हैं। इस ऐतिहासिक उपलब्धि पर मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई!

#11YearsOfKisanSamman #ViksitBharat