Devendra Fadnavis
4.21K subscribers
80.3K photos
13.4K videos
2.72K files
7.57K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा विकासपर्व जाहीर सभा, परभणी येथे आज डॉ. सुजित देशमुख प्रकाशित 'देवेंद्र फडणवीस : स्टार्टअप मिशन गाईड'चे प्रकाशन केले. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendarFadnavis #Parbhani
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Big News !

Record-breaking Foreign Direct Investment (FDI) in Maharashtra!
In 2024–25, the state has attracted 40% of the country’s total FDI, and 32% more than last year!

I am extremely delighted to share that the statistics for the final quarter (January to March 2025) of the financial year 2024–25 have also been released. Maharashtra has attracted ₹1,64,875 crore in foreign investment over the full year. This amounts to 40% of the total FDI received by the country this year, which stands at ₹4,21,929 crore.

Compared to last year, Maharashtra has received 32% more investment this year.
In the final quarter alone, the state received ₹25,441 crore in FDI.

This year has set a record for Maharashtra over the last 10 years in terms of FDI inflow. In fact, we had already broken this record within the first 9 months of the year.

Heartiest congratulations to the people of Maharashtra.

Driven by the collective efforts of my colleagues DCM Eknathrao Shinde ji and Ajitdada Pawar, and the Cabinet, Maharashtra’s momentum will certainly continue.

FDI inflow in Maharashtra over the years:

2015–16: ₹61,482 crore
2016–17: ₹1,31,980 crore
2017–18: ₹86,244 crore
2018–19: ₹57,139 crore
April to October 2019: ₹25,316 crore
2020–21: ₹1,19,734 crore
2021–22: ₹1,14,964 crore
2022–23: ₹1,18,422 crore
2023–24: ₹1,25,101 crore
2024–25: ₹1,64,875 crore

#Maharashtra #FDI
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली येथे आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान जीवनकार्यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उदघाटन केले, त्यावेळी त्यांच्या वेशभूषेत सजलेल्या लहानग्या लाडक्या बहिणींनी भेट दिली. या चिमुकल्यांसोबतचा एक गोड, प्रेमळ क्षण...

#Maharashtra #DevendraFadnavis #AhilyadeviHolkar
Devendra Fadnavis
CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🪷 BJP Vikasparv Jahir Sabha at Parbhani 🪷 परभणी येथे भाजपा विकासपर्व जाहीर सभा 🕑 2pm | 29-5-2025📍Parbhani | दु. २ वा. | २९-५-२०२५📍परभणी. #Maharashtra #Parbhani #BJP
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

परभणीच्या जनतेने भाजपाची नेहमीच साथ दिली, भाजप परभणीच्या समग्र विकासासाठी कटीबद्ध 🪷

परभणीच्या जनतेने नेहमीच भाजपाच्या पारड्यात आपली मते भरभरून टाकली. आता भाजपा परभणीच्या विकासासाठी कटीबद्ध असेल, परभणीकरांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भाजपा विकासपर्व जाहीर सभेला आज परभणी येथे संबोधित केले. याप्रसंगी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपासह महायुतीला प्रचंड विजय मिळवून दिल्याबद्दल समस्त परभणीकरांची कृतज्ञता व्यक्त केली.

गेल्या 10 वर्षांत परभणीला आयात पालकमंत्रीपदाची सवय लागली होती. पण, विधानसभा निवडणुकीत परभणीकरांच्या आशीर्वादाने मेघनाताई बोर्डीकर चांगल्या मतांनी निवडून आल्या. म्हणूनच त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, परभणीला केवळ स्थानिक लोकप्रतिनिधी पालकमंत्रीपदी देऊन आपण थांबणार नाही तर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून जिल्हा आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम करणार आहोत, याची खात्री देतो.

परभणीकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचंही आज त्यांना उत्तर मिळालं असेल, त्याची इतक्या वर्षांची प्रतिक्षा आज पूर्ण झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे आज भूमिपूजन केले. तसेच कॅन्सर केअर सेंटरची मागणी करण्यात आली असून ती व्यवस्थाही टप्प्याटप्प्याने उभी केली जाईल. आजच सेलू येथे महापारेषणाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन केले. सध्याच्या घडीला राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज दिली असून डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना वर्षाचे 365 दिवस दिवसा 12 तास वीज द्यायचा संकल्प केला आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीअंतर्गत ₹21,000 कोटींच्या खर्चाची कामे केली जात असून यामुळे शेतकऱ्यांना पुढची 25 वर्षे मोफत वीज मिळणार आहे.

परभणीमध्ये कृषीमाल प्रक्रिया क्लस्टरची मागणी करण्यात आली असून यासाठी मागितलेली जागा राज्य सरकारद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची मदतही देण्यात येईल. परभणीला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे परभणी कनेक्टिव्हिटीच्या नकाशावर येईल. तसेच यामुळे उद्योग, उद्योजकही परभणीमध्ये येतील. राज्य सरकारने शासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता. त्याच्या यशस्वीतेनंतर आता शासकीय कार्यालयांना 150 दिवसांचा कार्यक्रम देण्यात आला असून याद्वारे जनकेंद्रित व्यवस्था तयार करण्यात येणार आहे.

एप्रिल महिन्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांची हत्या केली. त्याला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने मेक इंडिया व ‘आत्मनिर्भर भारत‘अंतर्गत निर्माण केलेल्या शस्त्रास्त्रांद्वारे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत जबरदस्त प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने केवळ 23 मिनिटांत पाकिस्तानमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले व 150 पेक्षा जास्त दहशतवादी यमसदनी धाडले. यासाठी भारतीय सैन्याचे अभिनंदन. पण, पाकव्याप्त काँग्रेस यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तथापि, संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठीशी उभा आहे.

पुन्हा एकदा सर्व परभणीकरांचे आभार मानतो आणि आगामी काळात विकसित भारतासह, विकसित महाराष्ट्र व विकसित परभणी तयार होईल, असा विश्वास व्यक्त करतो.

यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, खा. अजित गोपछडे, आ. संजय केणेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #Parbhani #BJP
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महाराष्ट्रात आजपासून केंद्र सरकारच्या 'विकसित कृषी संकल्प अभियाना'चा शुभारंभ!
महाराष्ट्र में आज से केंद्र सरकार के 'विकसित कृषि संकल्प अभियान' का शुभारंभ!

(संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीचे उदघाटन | परभणी | 29-5-2025)
#Maharashtra #Parbhani #ViksitKrishiSankalpAbhiyan
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

शासकीय योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्राला भेडसावणाऱ्या 'या' दोन आव्हानांना दूर करण्याचा प्रयत्न!
सरकारी योजनाओं के माध्यम से कृषि क्षेत्र को प्रभावित करने वाली 'इन' दो चुनौतियों को दूर करने का प्रयास!

(संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीचे उदघाटन | परभणी | 29-5-2025)
#Maharashtra #Parbhani #ViksitKrishiSankalpAbhiyan