Devendra Fadnavis
4.2K subscribers
80.2K photos
13.4K videos
2.71K files
7.56K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding Dharavi redevelopment project 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में…
CMO Maharashtra Tweets:

धारावीचा आत्मा जपत होणार समृद्ध भविष्याकडे वाटचाल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक’ संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीची खरी ओळख म्हणजे इथला कुशल श्रमशक्तीवर आधारित अर्थव्यवस्थेचा अनोखा चेहरा. लाखो कारागीर, लघुउद्योग, वंचित घटक यांचा जीव की प्राण असलेल्या या भागाचा आत्मा कायम राखतच पुनर्विकास व्हावा, हे प्राधान्याने अधोरेखित करण्यात आले.
धारावी हा देशाचा आर्थिक नकाशा बदलणारा पट्टा आहे. त्यामुळे येथील पुनर्विकास पर्यावरणस्नेही, सर्वसमावेशक आणि संवेदनशील पद्धतीने व्हावा. प्रत्येक धारावीकराला या प्रकल्पात सामावून घेण्याची जबाबदारी प्रशासनाने नाकारू नये, यावर भर देण्यात आला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्थानिक व्यवसायांचे पुनर्वसन मूळ जागेच्या सन्मानासह व्हावे, ही अट बंधनकारक ठरवली आहे. व्यवसायांची पारंपरिक ओळख कायम राहावी आणि पुनर्विकासाचा भाग होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेतले जावे, यासाठी समन्वय आणि संवेदना यांची सांगड घालण्याचे निर्देश देण्यात आले.

धारावीचा आत्मा जपणाऱ्या आणि भविष्याच्या शक्यता उलगडणाऱ्या या ऐतिहासिक प्रकल्पाची कार्यवाही अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा बैठकीतून व्यक्त करण्यात आली.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Redevelopment
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired review meeting on the 'water supply scheme for Chhatrapati SambhajiNagar city'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजने' संदर्भात आढावा बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'छत्रपति संभाजीनगर शहर की जलापूर्ति योजना' के संदर्भ में समीक्षा बैठक

ऑक्टोबरपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये 'जलक्रांती!'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणीपुरवठा योजने'संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस 100% कार्यान्वित करावी. अपूर्ण कामाचे टक्केवारी-आधारित उत्तर स्वीकारार्ह नाही; नागरिकांना दिलासा मिळवण्यासाठी योजना पूर्णत्वास नेणे हेच एकमेव लक्ष्य आहे. कंत्राटदारांना काम करताना येणाऱ्या अडचणी महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात आणि कंत्राटदारांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलचे काम वेळेत संपवून पाणी उपसा सुरू करणे, 26 एमएलडीचा टप्पा जूनअखेर पूर्ण करणे, पाईपलाईनमधील रिकामे अंतर भरण्यासाठी 15 जूननंतर शटडाऊन घेऊन ऑगस्टअखेर काम संपवणे, आरओडब्ल्यूचे प्रश्न आठवड्यात सोडवणे आणि किमान 35 ईएसआर आणि जीएसआर टाक्या तसेच हायड्रोलिक टॅप सुरू ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर देण्यात आली आहे. प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्व-अभियांत्रिकी पद्धतीला मान्यता द्यावी, तर महापालिकेला ₹822 कोटींच्या कर्ज उभारणीसाठी त्वरित मंजुरी देऊन त्यावरील वाढीव व्याज शासनाकडून भरपाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले, ज्यामुळे कामात कोणताही खंड पडू नये आणि ऑक्टोबरमध्ये शहराला अखंड, विश्वसनीय जलपुरवठा मिळावा.

बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🕒 3.10pm | 28-5-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.१० वा. | २८-५-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Chaired a review meeting on the 'water supply scheme for Chhatrapati SambhajiNagar city' at Sahyadri Guest House, Mumbai today.

Directed key departments to ensure 100% operationalisation of the project by the end of October. No partial completion based on percentage will be accepted. The only goal is to provide relief for citizens through the completion of the project.

The Municipal Commissioner was instructed to intervene personally to resolve any on-ground issues faced by contractors. Contractors must deploy sufficient manpower and machinery to complete the work on time.

Outlined key milestones:

Complete Jackwell construction and initiate water extraction on schedule
Finish the 26 MLD phase by the end of June
Fill pipeline gaps by taking a shutdown after June 15 and finish by August end
Resolve ROW (Right of Way) issues within a week
Ensure at least 35 ESR and GSR tanks and hydraulic taps remain operational

Further directives:
Maharashtra Jeevan Pradhikaran to adopt pre-engineering methods to speed up project execution.
Municipal Corporation to receive immediate approval for ₹822 crore loan, and the State Government will compensate the additional interest, ensuring uninterrupted progress.

The objective is to have an uninterrupted and reliable water supply for Chhatrapati Sambhajinagar starting this October.

Minister Gulabrao Patil, Minister Sanjay Shirsat, Minister Atul Save, Additional Chief Secretary, Principal Secretary, officials from all related departments, and other dignitaries were present at the meeting.

#Maharashtra #Mumbai

https://x.com/Dev_Fadnavis/status/1927762182155964592
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Annapurna Devi released the coffee table book 'Lokmata Ahilyabai Holkar - An Eternal Flame'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते 'लोकमाता अहिल्याबाई होळकर - अ‍ॅन इटरनल फ्लेम' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी इनके करकमलों से 'लोकमाता अहिल्याबाई होलकर - एन इटरनल फ्लेम' इस कॉफी टेबल पुस्तक का विमोचन

🕣 8.25pm | 28-5-2025📍NCPA, Mumbai | रा. ८.२५ वा. | २८-५-२०२५📍एनसीपीए, मुंबई.

#Maharashtra #DevendarFadnavis #Mumbai