Devendra Fadnavis
4.2K subscribers
80.1K photos
13.3K videos
2.71K files
7.55K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸 राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठ येथील 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचा उदघाटन' कार्यक्रम

🔸 राज्यपाल सीपी राधाकृष्णन इनकी अध्यक्षता में एवं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में मुंबई विश्वविद्यालय में 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास एवं संशोधन केंद्र का उदघाटन' कार्यक्रम

🕜 दु. १.१५ वा. | २७-५-२०२५📍मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महान देशभक्त, सामाजिक समरसतेचे पुरस्कर्ते, स्वातंत्र्यवीर सावरकर हे 'व्यक्ती नाही एक संस्था...'

(स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उदघाटन | मुंबई | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #SwatantryaveerSavarkar
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच,पदांना मान्यता. (दिव्यांग कल्याण विभाग)

मा. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता. (विधि व न्याय विभाग)

इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला ₹657 कोटी , जालन्याला ₹392 कोटी पाच वर्षांत मिळणार (वित्त विभाग)

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ. (महसूल विभाग)

पत्रकार क्लब ऑफ नागपूर, नागपूर यांना देण्यात आलेल्या जमीनीबाबतच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता. (महसूल विभाग)

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. (FDCM Ltd.) मधील 1 हजार 351 पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजुरी (वने विभाग)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता. (शालेय शिक्षण विभाग)

आशियाई विकास बैंक (ADB) सहाय्यित "महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प" संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार. (पणन विभाग)

कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्या पदनामात "उप कृषि अधिकारी" व "सहायक कृषि अधिकारी" असा बदल (कृषि विभाग)

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6 व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर (वस्त्रोद्योग विभाग)

#CabinetDecisions #Maharashtra #मंत्रिमंडळनिर्णय
CMO Maharashtra Tweets:

खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये विजेतेपदाची हॅट्रिक करणार्‍या महाराष्ट्राच्या संघाचे अभिनंदन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पाडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये विजेतेपदाची हॅट्रिक करणार्‍या महाराष्ट्र संघाच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. 7व्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाने तब्बल 9 स्पर्धांमध्ये विक्रम नोंदवत, 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य अशी एकूण 158 पदके पटकावण्याची केलेली कामगिरी सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे!

#Maharashtra #DevendraFadnavis #KheloIndia
CMO Maharashtra Tweets:

“अनादि मी, अनंत मी...” स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी लेखणीतील हे अमर गीत, राष्ट्रभक्तीच्या सागरात लाट उठवणाऱ्या शब्दांना आज मानाचा मुजरा! हे गीत प्रेरणादायक गाथा ठरली! या गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सावरकर कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी इतिहास घडला!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार आणि अनेक मान्यवरांच्या साक्षीने सावरकरांच्या स्मृतींना अजरामर करणारा क्षण!”

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रती मा. अमितभाई शाह यांची प्रचंड निष्ठा...
स्वातंत्र्यवीर सावरकर इनके प्रति मा. अमितभाई शाह इनकी अपार निष्ठा...

(स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उदघाटन | मुंबई | 27-5-2025)
#Maharashtra #Mumbai #SwatantryaveerSavarkar