CMO Maharashtra Tweets:
🔸Inauguration of 'Shri Arya Chanakya Nagari Sahakari Patsanstha Pradhan Karyalay' at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया'चा उदघाटन सोहळा
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालय' का उदघाटन समारोह
🕜 1.40pm | 23-5-2025📍Ichalkaranji, Kolhapur | दु. १.४० वा. | २३-५-२०२५📍इचलकरंजी, कोल्हापूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Kolhapur

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🪷 BJP Karyakarta Samwad Melava
🪷 भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा
🕓 4.05pm | 23-5-2025📍Sangli | संध्या. ४.०५ वा. | २३-५-२०२५📍सांगली.
#Maharashtra #Sangli #BJP

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired the 'Sangli District Police' review meeting 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'सांगली जिल्हा पोलीस' आढावा बैठक 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'सांगली जिला पुलिस' समीक्षा…
CMO Maharashtra Tweets:
"नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून 'कन्व्हिक्शन रेट' वाढवावा"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली येथे, 'सांगली जिल्हा पोलीस' आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून 'कन्व्हिक्शन रेट' वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. खटल्यांमधून आरोपी निर्दोष सुटण्यामागच्या कारणांचा अभ्यास करून, त्यातील त्रृटी दूर कराव्यात. आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पोलीस ठाण्यांचा आढावा घेत, यातील त्रृटी दूर कराव्यात. त्यासाठी सरकारी वकिलांची बैठक घ्यावी. ई-समन्सची नियमित प्रभावी अंमलबजावणी करावी. यामुळे वेळ व पैसा वाचतो. सर्व उपाय करून कन्व्हिक्शन रेटचे प्रमाण वाढले पाहिजे.
मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत केलेला माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना औद्योगिक क्षेत्रातील बंद रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण करून तपासणी करावी. यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना सूचित करावे."
बेपत्ता महिलांसंदर्भातील गुन्ह्यांचा पूर्ण तपास आणि कार्यवाही होईपर्यंत पाठपुरावा करावा. यासंदर्भात दाखल गुन्हे, त्यातील किती महिला परत आल्या याचे पोलीस ठाणे निहाय ट्रॅकिंग करावे. यासंदर्भात विशेष मोहीम राबवावी. मोटार वाहन कायद्याखालील केसेससाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करा, असे त्यांनी संबंधीतांना सूचित केले.
दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याचे व गुन्हे 'कन्व्हिक्शन रेट'चे प्रमाण वाढवावे, असे सूचित करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन फौजदारी कायद्यांच्या माध्यमातून दोषारोपपत्र दाखल होण्याची गती वाढवावी. 60 ते 90 दिवसात दोषारोपपत्र दाखल करावेत तसेच आरोपीच्या गैरहजेरीमध्येही खटले चालवावेत. नवीन फौजदारी कायद्यामुळे पुरावे स्वीकारार्हतेची कक्षा वाढल्याने त्याचा फायदा घ्यावा. झिरो एफआयआरचे नियमित एफआयआरमध्ये रूपांतरण करावे, असेही ते म्हणाले.
कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावर्षी 117% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूरमधील 2019च्या महापुराचा धोका लक्षात ठेवून, त्याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, लोकांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Sangli

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🪷 BJP Karyakarta Samwad Melava 🪷 भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा 🕓 4.05pm | 23-5-2025📍Sangli | संध्या. ४.०५ वा. | २३-५-२०२५📍सांगली. #Maharashtra #Sangli #BJP
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा”
सांगली येथे आज भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून, सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ता बंधू-भगिनी यांच्याशी संवाद साधला.
दोन्ही नूतन शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. आपल्या पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून मनस्वी समाधान वाटले.
आपल्या सरकारच्या पहिल्या 6 महिन्यांचा कार्यकाळात 100 दिवसांचा कार्यक्रम आखून प्रशासकीय यंत्रणेला जवळपास 12,000 कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा नागरिकांना सुलभतेने उपलब्ध करून दिल्या. या गतिशील कार्यक्रमांमुळे प्रशासकीय यंत्रणेला लक्षात आले कि, आता राज्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील लोकाभिमुख सरकार स्थापन झाले आहे.
याचबरोबर 150 दिवसांचा कार्यक्रम देखील आपण हाती घेतलेला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचे जे लक्ष्य ठेवलेले आहे, त्यामध्ये हा कार्यक्रम 3 टप्प्यांच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा आपण तयार करत आहोत. सरकारच्या 100% सेवा ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत असा प्रयत्न राज्य शासनाचा आहे. ई - गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या सर्व सेवांचा लाभ यामुळे मिळेल.
2014 - 2019 कार्यकाळात सर्वसामान्य लोकांच्या हिताचे अतिशय महत्त्वाचे आणि विकासाच्या दृष्टीने दूरगामी परिणामकारक ठरतील असे निर्णय घेतले.
पण, दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर तत्कालीन सरकारने आम्ही सुरू केलेल्या लोकोपयोगी कामांना स्थगिती दिली. एक ‘इन्स्टिट्यूशन’ म्हणून सरकारने काम केले पाहिजे, विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचावी यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्यासाठी आपले सरकार सदैव तत्परतेने कार्यरत राहणार आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर समस्येबाबत राज्य शासनाच्या सुरु असलेल्या विविध उपाययोजनांचाही विस्तृत आढावा यावेळी घेतला. तसेच ‘फ्लड डायव्हर्जन स्कीम’मुळे भविष्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पुराच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
सांगली जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत अतिशय अभूतपूर्व अशी कामगिरी केली. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे याप्रसंगी अभिनंदन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी पूर्ण जोमाने करावी, अशी सूचना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केली.
यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सत्यजित देशमुख, सांगली (शहर) भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली (ग्रामीण) भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

पोलीस गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून अभूतपूर्व काम..!
पुलिस गृह निर्माण विभाग के माध्यम से अभूतपूर्व कार्य..!
(पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उदघाटन | सांगली | 23-5-2025)
#Maharashtra #Sangli #SangliPolice