Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.8K photos
13.2K videos
2.68K files
7.51K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने आज मंत्रालय, मुंबई येथे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

ॐ शांति 🙏

#Maharashtra #DevendraFadnavis #JayantNarlikar
CMO Maharashtra Tweets:

'शिक्षणवेध 2047' त्रैमासिकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ‘शिक्षणवेध 2047’ च्या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या त्रैमासिकामध्ये विभागाच्या विविध योजनांचा आढावा, उपक्रमांची माहिती, धोरणांचे विवेचन, शिक्षण क्षेत्रातील यशोगाथा, तज्ज्ञांचे विचारमंथन तसेच विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कथा प्रकाशित केल्या जाणार आहेत. हे मासिक शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि नवप्रवृत्ती, आधुनिक दृष्टिकोन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार घडून येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे सहकार विभागाच्या 'e-QJ प्रणाली – प्रत्यय' या सेवाप्रणालीचे उदघाटन केले. या प्रणालीद्वारे सहकार विभागाच्या विविध सेवा आता डिजिटल माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे आज 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातील सर्वोत्तम राज्यस्तरीय महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय \ निमशासकीय संस्था, मंडळे व शासकीय कंपन्यांचा सत्कार करण्यात आला.

करण्यात आलेले सत्कार:
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA)
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (M.GENCO)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( PMRDA)
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, संबंधित अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #100DaysPlan
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर
'माझे घर-माझे अधिकार' हे ब्रीद. ₹70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार
(गृहनिर्माण विभाग)
बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार (नगरविकास विभाग)
उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच ₹1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी
(विध‍ि व न्याय विभाग)
सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या ₹5329.46 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी ₹2025.64 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला ₹6394.13 कोटींच्या रुपयांची प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला ₹4869.72 कोटींच्या प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)

#CabinetDecisions #मंत्रिमंडळनिर्णय