Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Shivraj Singh Chouhan chaired the review meeting regarding the 'Maharashtra State Rural Development and Agriculture Department' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान…
CMO Maharashtra Tweets:
कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहीमेला गती देण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे 'महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व कृषी विभागाची आढावा बैठक' पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागपूर येथील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेत कृषी आणि ग्रामविकास विभागांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हवामानानुसार पीक वाण विकसित करणे, प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, स्मार्ट सिंचन, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला. शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी सक्तीचा करण्याचे निर्देश दिले आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.
मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, कमी पर्जन्यमानाच्या भागांसाठी अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करावेत आणि राज्यासाठी सर्वोत्तम पीक पद्धती तयार कराव्यात. तसेच राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांचे उदाहरण देत त्यांच्या यशोगाथा देशभर पोहोचवण्याचे निर्देश दिले. यावेळी ग्रामविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेताना प्रधानमंत्री आवास, जनमन, ग्रामसडक योजना, मनरेगा यांचे सादरीकरण करण्यात आले. मनरेगातील प्रगतीबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री यांनी 'माझी लाडकी बहीण' योजनेतून महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगून ‘लखपती दीदी’ योजनेंतर्गत एक कोटी महिलांना स्वावलंबी करण्याचे लक्ष्य जाहीर केले. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील उपक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
या बैठकीला मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

🔸Dedication and inauguration of various works at 'Government Medical College and Hospital, Nagpur' at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर' येथे विविध कामांचे लोकार्पण व उदघाटन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'सरकारी मेडिकल कॉलेज एवं अस्पताल, नागपुर' में विविध कामों का लोकार्पण और उदघाटन
'शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर' येथे विविध कामांचे लोकार्पण व उदघाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर' येथे विविध कामांचे लोकार्पण व उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक सोयी-सुविधा व व्यवस्थांचा अभाव असल्याने शिक्षण व रुग्णसेवेच्या दृष्टीने सेवा-सुविधांचे स्टेट ऑफ द आर्ट पद्धतीने अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी राज्य शासनाद्वारे ₹1000 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या नसतील तर आजच्या स्पर्धात्मक युगात खासगी वैद्यकीय महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या तुलनेत शासकीय महाविद्यालये मागे राहू शकतात. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळणारे एक्सपोजर अन्य कुठेही मिळत नाही. पण पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले तर महाविद्यालयाचा दर्जा कमी होतो. या पार्श्वभूमीवर ऑडिटोरियम, स्कायवॉक, स्पोर्टस फॅसिलिटी, कॅथ लॅब, रोबोटिक सर्जरी युनिट अशा सोयी-सुविधा उभारण्यात आल्या व आणखीही बांधकामे सुरु आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी वर्षभरात येथील सर्व कामे हातावेगळी झाली पाहिजे व वैद्यकीय महाविद्यालय लोकांच्या सेवेत आले पाहिजे. येथे सिकलसेल व थॅलेसेमिया प्रकल्प, बोनमॅरो ट्रान्सप्लांटसंदर्भातील व्यवस्था उभारण्याबाबात निर्णय घेऊ. दंतवैद्य महाविद्यालयाचे काम सुरु आहे, ते वेगाने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. प्रविण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. कृपाल तुमाने, आ. संदिप जोशी, आ. अभिजित वंजारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕖 6.45pm | 18-5-2025📍Nagpur | संध्या. ६.४५ वा. | १८-५-२०२५📍नागपूर.

🔸CM Devendra Fadnavis at 'NAREDCO Vidarbha - Change of Guard Ceremony'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'नरेडको विदर्भ - चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम' येथे प्रमुख उपस्थिती
रियल इस्टेट क्षेत्राकडे गांभिर्याने पाहणे काळाची गरज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'नरेडको विदर्भ - चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन हा नरेडकोचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. नरेडको संस्था विकासक, सरकार आणि ग्राहक अशा सर्वांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सातत्याने काम करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'नरेडको विदर्भ - चेंज ऑफ गार्ड कार्यक्रम' येथे पदग्रहण केलेल्या, जेन नेक्स्ट आणि वुमन्स विंग या सर्वांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर, मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये, वेगवेगळ्या पॉलिसी इंटरव्हेन्शनमध्ये नरेडकोने चांगली भूमिका निभावली. रेरा कायदा महाराष्ट्रात सर्वात आधी लागू करण्यात आला व नंतर संपूर्ण देशाने त्याचे अनुकरण केले. या सर्व कालावधीमध्ये नरेडको व रियल इस्टेट क्षेत्रामधील अनेक संस्थांशी विस्तृत चर्चा केली, मंथन करण्यात आले. महाराष्ट्रात रेरामुळे रियल इस्टेट क्षेत्रामध्ये नवीन विश्वासार्हता तयार झाली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने विकसित होत असून रियल इस्टेट क्षेत्र सर्वाधिक वेगाने विकसित होणारे व रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्राकडे गांभिर्याने पाहणे काळाची गरज आहे. एस्पिरेशनल, मध्यम वर्गाची लोकसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत परवडणारी, सुनियोजित घरे देणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शहरे विकासाची ग्रोथ इंजिन असून देशाचा 65% जीडीपी शहरांत तयार होतो. म्हणून शहरांत ईज ऑफ लिव्हिंग असले पाहिजे. घनकचरा, द्रवकचरा व्यवस्थापन योग्य झाले पाहिजे. हरित बांधकामाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नरेडकोसारख्या संस्था विकासकांना एकत्र करत आहेत. या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे काम करायचे आहे, त्यात आपण सहभागी होत आहोत, अशा विचाराने मंथन व चिंतन झाले पाहिजे, असे आवाहन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रियल इस्टेट क्षेत्रातील समस्या, अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही सांगितले. तसेच, महाराष्ट्रामध्ये रेरा नोंदणीकृत प्रकल्पांची संख्या 50,000 इतकी देशात सर्वाधिक असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. प्रविण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. संदिप जोशी, नरेडको विदर्भ संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕗 7.55pm | 18-5-2025📍Nagpur | संध्या ७.५५ वा. | १८-५-२०२५📍नागपूर.