Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.7K photos
13.2K videos
2.67K files
7.49K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Met and interacted with my 1051 Nagpurkar brothers and sisters during Janta Durbar, at Nagpur today.
नागपूर येथे आज जनता दरबारात एकूण 1051 नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली. तसेच संबंधित विभाग प्रमुखांना त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले..!

(📍Nagpur | 17-5-2025📍नागपूर )
#Maharashtra #Nagpur #JantaDurbar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'ऑपरेशन सिंदूर' बाबत जनतेच्या सकारात्मक प्रतिक्रिया...

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' बाबत जनतेने दर्शवला मा. मोदी जी यांच्या प्रति विश्वास...

ऑपरेशन सिंदूर' को लेकर जनता की सकारात्मक प्रतिक्रिया...
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में आतंकवादी हमलों के जवाब स्वरूप चलाए गए 'ऑपरेशन सिंदूर' को लेकर जनता ने मा. मोदी जी के प्रति जताया गहरा विश्वास...

#Maharashtra #Nagpur #OperationSindoor
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the presentation of 'Gorewada Native Biodiversity Park, Nature Interaction & Experience Center'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'गोरेवाडा स्थानिक जैवविविधता उद्यान, निसर्ग संवाद आणि अनुभव केंद्रा'च्या सादरीकरणासंदर्भात बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'गोरेवाड़ा स्थानीय जैवविविधता उद्यान, प्रकृति संवाद और अनुभव केंद्र' की प्रस्तुतिकरण के संदर्भ में बैठक

🕢 7.30pm | 17-5-2025📍Ramgiri Bungalow, Nagpur | संध्या. ७.३० वा. | १७-५-२०२५📍रामगिरी निवासस्थान, नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis inspected the Solid Waste Management project at Bhandewadi. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडेवाडी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होने भांडेवाड़ी में ठोस कचरा…
CMO Maharashtra Tweets:

भांडेवाडीतील घनकचरा प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी येथील एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. 1000 मेट्रिक टन/दिवस क्षमतेचा हा प्रकल्प नेदरलँडच्या सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीने डिझाईन, फायनान्स, बांधणी, स्वमालकी, वापर आणि हस्तांतरण मॉडेलवर स्वखर्चाने उभारला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी महापालिकेकडून कोणतेही टिपिंग शुल्क घेतले जात नाही. . नोव्हेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

प्रकल्पांतर्गत 30 एकर जागेवर बायोगॅस, सेंद्रिय खत, आरडीएफ यांसारख्या उपयुक्त उत्पादने तयार केली जातील. SusBDe कंपनीला यांची विक्री करण्याचे अधिकार आहेत. याशिवाय 9 एकर अतिरिक्त जागा फ्रेश वेस्ट प्रोसेसिंगसाठी देण्यात आली असून, तिथे पायलट प्रोजेक्ट सुरू आहे.
ड्राय फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीवर आधारित हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे आणि तो नागपूरसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जातो. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त तथा प्रशासक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the presentation of 'Gorewada Native Biodiversity Park, Nature Interaction & Experience Center' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'गोरेवाडा स्थानिक जैवविविधता उद्यान…
CMO Maharashtra Tweets:

'निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्य'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे, 'गोरेवाडा स्थानिक जैवविविधता उद्यान, निसर्ग संवाद आणि अनुभव केंद्रा'च्या सादरीकरणासंदर्भात बैठक संपन्न झाली.

निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी गोरेवाडा परिसरातील सुमारे 3 लाख स्केवर मीटर क्षेत्रावर प्रस्तावित बायोडायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याच्या निर्मितीसाठी लागणारा काही निधी शासनाकडून व काही निधी सीएसआरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

असा असेल बायोडायव्हर्सिटी पार्क

हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्त्वांवर उभारला जाईल. यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाची, शिक्षणाची संधी मिळेल. कृषी, विज्ञान, वन, जैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल. पूर्वापार चालत आलेली व या मातीत एकरुप असलेली विविध प्रकारची झाडी इथे लावली जाईल. सुमारे 150 पेक्षा अधिक बांबूच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केले जाईल.

आध्यात्मिक अनुभूतीसह या पार्कमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धनावर भर राहील. देवराई वन, नक्षत्र वन, राशी वन, औषधी वनस्पती संशोधन व संवर्धन, फुलपाखरु व काजवे असलेले वन, विविध मातींचे वैविध्य जपणारे दालन, पर्जन्यमापन, दिशाशास्त्र, योगा झोन, पीस झोन, फॅमिली झोन, मानसशास्त्र, आरोग्य या प्रमुख घटकांशी अंतर्मुख करणारा हा पार्क राहील.

या बैठकीस आ. संदीप जोशी, मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Met and interacted with my Nagpurkar brothers and sisters during Janta Durbar, at Nagpur today, where received 1,051 requests from citizens. Reviewed every single request carefully, and directed the concerned departments to take swift, decisive action.

As part of our ‘Housing for All’ initiative, also distributed initial land ownership rights to 21 residents from 7 different slum areas. For years, many in Nagpur have dreamt of having a home they can call their own — and through this initiative, we are transforming that dream into reality now.

Also, met delegations from the National Health Mission Contractual Officers and Employees Adjustment Action Committee, as well as from the Maharashtra Prantik Tailik Mahasabha. Both groups submitted their requests and concerns, which were received with due seriousness and commitment.

MLA Pravin Datke, MLC Sandeep Joshi and other senior officials were present.

#Maharashtra #Nagpur #JantaDurbar

https://x.com/Dev_Fadnavis/status/1923802535502151717
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

State’s first DFBOOT Waste Management Project nears completion in Nagpur

Visited and inspected the Solid Waste Management project at Bhandewadi, Nagpur today. Directed officials to ensure its completion by November.

This 1,000 MT/day capacity project, spread across 30 acres, is being developed under the DFBOOT model—Design, Finance, Build, Own, Operate, and Transfer in collaboration with the Netherlands-based SusBDe and the Nagpur Municipal Corporation. It will produce biogas, organic fertiliser, and Refuse Derived Fuel (RDF), making it India’s only dry fermentation-based waste processing plant.

An additional 9 acres has been allocated for processing fresh waste during development, where a pilot project is already operational. This initiative reflects our commitment to sustainable urban development and sets a benchmark for waste management nationwide.

MLA Krishna Khopde, MLA Pravin Datke and other senior officials were present.

#Maharashtra #Nagpur #SolidWasteManagement

https://x.com/Dev_Fadnavis/status/1923803712469991821
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Offered my humble tributes to senior BJP leader, Dr. Ramdas Ambatkar ji, at his Nagpur residence today. Met his family and expressed my deepest condolences. His contributions to the party over the decades remain unparalleled.

भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. रामदास आंबटकरजी यांचे नुकतेच निधन झाले. आज त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली व कुटुंबियांचे सांत्वन केले. डॉ. रामदास आंबटकरजी यांनी गेली अनेक दशके पक्षासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.

भाजपा के वरिष्ठ नेता डॉ. रामदास आंबटकर जी का हाल ही में निधन हो गया। आज उनके नागपुर स्थित निवास पर जाकर उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित की और परिजनों को सांत्वना दी। डॉ. रामदास आंबटकर जी का पिछले कई दशकों से पार्टी के लिए दिया गया योगदान अतुलनीय है।

#Maharashtra #Nagpur