Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.6K photos
13.1K videos
2.66K files
7.47K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸Inauguration of the 'Milan Old-Age Home' at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मिलन वृद्धाश्रमा'चे उदघाटन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'मिलन वृद्धाश्रम' का उदघाटन

🕛 12.05pm | 15-5-2025📍Mandangad, Ratnagiri | दु. १२.०५ वा. | १५-५-२०२५📍मंडणगड, रत्नागिरी.

'वयस्कर लोकांच्या समस्यांसंदर्भात उपायोजना करण्याची गरज'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकेडे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशनद्वारे निर्मित व संचालित 'मिलन' वृद्धाश्रमाचे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आनंदही व्हावा आणि खंतही वाटावी अशाप्रकारचे काही कार्यक्रम असतात. आनंद यासाठी की, महाराष्ट्रातील पहिल्या 4 ते 5 वृद्धाश्रमात गणना व्हावी असा वृद्धाश्रम डॉ. जलील पारकर यांनी याठिकाणी तयार केला आहे. खंत याची की, अलीकडच्या काळामध्ये कुटुंबातील ओलावा कमी झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृद्धाश्रमांची गरज भासायला लागली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात कुटुंब संस्कृती इतकी उत्तम होती की वृद्धाश्रम ही संकल्पनाही बराच काळ नव्हती. पण समाज जेव्हा एखादे आव्हान उभे करतो, त्यावेळी त्या आव्हानाचा सामना करण्याकरिता डॉ. पारकर यांच्यासारखे कुणीतरी पुढे येते आणि व्यवस्था उभे करते. डॉ. पारकर कोव्हिडमुळे आजारी असतानादेखील त्यांनी जी रुग्णसेवा केली, ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशाचे येणाऱ्या 20 वर्षांनी सरासरी वय हे 85 वर्ष होणार आहे. 2035 नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे. आपल्याला देश म्हणून, राज्य म्हणून, वयस्कर लोकांच्या समस्या, त्यांच्या संदर्भातल्या उपाययोजना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश कदम, खा. सुनिल तटकरे, आ. प्रसाद लाड, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी फाऊंडेशनचे विश्वस्त, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Ratnagiri
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Caring for Our Elders – A Responsibility, Not a Favour!

Inaugurated Milan Old Age Home at Mandangad, Ratnagiri.

Some events fill you with both joy and sorrow. There’s joy in seeing Dr Jalil Parkar establish such a thoughtful and well-designed old age home—among the earliest in Maharashtra. It’s a truly commendable effort. Yet, there’s a quiet sadness too. Families today are smaller, life’s pressures heavier, and emotional bonds not as strong. That’s why the need for such homes is steadily growing—a reminder of both progress and shifting social dynamics.

India once held family values so deeply that old age homes were almost unheard of. But when society changes, someone always steps up. Dr Parkar is one such person. He built this facility with care and commitment. Always accessible, even during his own illness from COVID, he continued to serve selflessly. His dedication deserves deep appreciation.

In the next 20 years, our average age is expected to reach 85, with the elderly population rising steadily after 2035. As a country, and as individual states, we must now prioritise elderly care—creating the right systems and specialised services not as a luxury, but as a necessary response to our changing times.

Minister Adv Ashish Shelar, MoS Yogesh Kadam, MP Sunil Tatkare, MLC Prasad Lad, Habitat for Humanity Foundation Trustee & Officials and other dignitaries were present.

#Maharashtra #Ratnagiri #OldAgeHome

https://x.com/Dev_Fadnavis/status/1922953993984295249?t=y9vjApag16oBpeY8hj7X7A&s=19
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिलन वृद्धाश्रमाच्या उदघाटन कार्यक्रमा'दरम्यान 28 खोल्यांच्या या अद्यावत सुविधांनी परिपूर्ण वृद्धाश्रमाची पाहणी केली. यावेळी मंत्री अॕड. आशिष शेलार, मंत्री योगेश कदम, खा. सुनिल तटकरे, आ. प्रसाद लाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Ratnagiri