Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.6K photos
13.1K videos
2.66K files
7.47K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ आयोजित भव्य तिरंगा यात्रेदरम्यान ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथील गांधी स्मृती स्तंभ 'क्रांती स्तंभा'ला पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री पंकजा मुंडे, आ. प्रविण दरेकर, आ. रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #TirangaYatra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

क्रूरतेच्या त्या धन्यांनाही सुगावा लागला,
या नभांना भेदणारा सूर्य तिरंगा उगवला... 🇮🇳

#Maharashtra #OperationSindoor #TirangaYatra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Maharashtra’s ₹5,127 Cr Historical MoU to Unlock 27,500+ Job Opportunities!

Witnessed a landmark MoU signing and exchange between the Government of Maharashtra and XSIO Logistics Parks & Horizon Industrial Parks (Blackstone Group) regarding the development of over 10 state-of-the-art Industrial and Logistics Parks across Maharashtra.

This MoU is for the development of modern industrial and multimodal logistics parks in key industrial and logistics areas of the state. As per the agreement, more than 10 modern industrial and logistics parks will be developed across Maharashtra.

These projects will cover a total area of 794.2 acres, with construction planned across 1.85 crore square feet of land. The total direct foreign investment for all these projects is ₹5,127 crore. This agreement is expected to generate a total of 27,500+ job opportunities, both direct and indirect.

These logistics parks will be set up in important locations like Nagpur, Bhiwandi, Chakan, Sinnar, and Panvel. The projects will be environment-friendly, equipped with digital infrastructure, and focused on promoting employment. They will also align with the Maharashtra Logistics Policy 2024.

This transformational partnership aims to build world-class, environmentally and socially responsible industrial and logistics hubs in places like Nagpur, Mumbai, Pune, and others, creating a strong foundation for excellence in manufacturing, warehousing, and supply chain operations in India.

DCM Eknath Shinde ji and other dignitaries were present.

#Maharashtra #Mumbai #MoU

https://x.com/Dev_Fadnavis/status/1922673927769542894?t=N7A-zZu--PMvjKUzBKQbGQ&s=19
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आयोजित 'तिरंगा यात्रे'च्या समारोपप्रसंगी गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे, आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर माजी सैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #Mumbai #OperationSindoor #TirangaYatra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

सुन ले बेटा पाकिस्तान,
बाप है तेरा हिंदुस्तान! 🇮🇳

#TirangaYatra
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे तिरंगा यात्रेदरम्यान धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #TirangaYatra
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🇮🇳 CM Devendra Fadnavis at the Tiranga Yatra in honour of Indian Army after the success of 'Operation Sindoor' 🇮🇳 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा…
CMO Maharashtra Tweets:

'लष्कराचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रा'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ, मुंबई येथे आयोजित तिरंगा यात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करणे यासाठी आज तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आले आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुडघे टेकावे लागले आहेत. भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

यात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनाही अभिवादन केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झालेली यात्रा गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली. समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले आणि टिळक स्मारकास अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे, आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर माजी सैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #Mumbai #OperationSindoor #TirangaYatra