Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.4K photos
13.1K videos
2.65K files
7.45K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

Maharashtra’s Mega Energy Move:
38 GW Green Capacity, 7 Lakh Jobs!

Maharashtra is spearheading India's clean energy revolution under CM Devendra Fadnavis' leadership with an ambitious plan to add 38 GW of renewable capacity by 2030. Backed by ₹3.3 lakh crore in investments and 7 lakh new jobs, the state is blending affordability with sustainability. This is more than a transition — it’s a blueprint for inclusive, green growth!

#GreenMaharashtra #DevendraFadnavis #CleanEnergy

https://www.financialexpress.com/business/industry-hope-from-the-sun-maharashtras-energy-transition-shows-the-way-3840572/
CMO Maharashtra Tweets:

CM Devendra Fadnavis chairs a meeting at his official residence ‘Varsha’ in Mumbai, regarding Civil-Military Coordination with Indian Army’s General Officer Commanding Maharashtra, Gujarat and Goa Area, Indian Navy’s Flag Officer Commanding Maharashtra Naval Area, Indian Airforce’s Air Vice Marshal, Govt of Maharashtra’s Chief Secretary, DGP Maharashtra, senior officers from Home and various department.

DCM Eknath Shinde and DCM Ajit Pawar were also present.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक

अधिक समन्वयाने काम करणार: देवेंद्र फडणवीस

मुंबई, 12 मे
भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. भारतीय लष्करातर्फे लेफ्ट. जनरल पवन चढ्ढा, कर्नल संदीप सील, भारतीय नौदलातर्फे रियर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी, नौदल कमांडर नितेश गर्ग, भारतीय वायुदलातर्फे एअर वाईस मार्शल रजत मोहन हे बैठकीला उपस्थित होते. रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस, होमगार्ड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी घ्यायची यावर प्रामुख्याने चर्चा या बैठकीत झाली. संरक्षण दलांना राज्य सरकारतर्फे अपेक्षित सहकार्य आणि अधिक गतीची समन्वय यंत्रणा उभारण्यावर चर्चा झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय सैन्याने ज्या ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदुर राबविले, ते अभूतपूर्व आहे. संरक्षण दलाला मी सॅल्युट करतो. मुंबईसारखे शहर हे अतिशय महत्वपूर्ण आहे. भारताची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी मुंबईवर हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. येणार्‍या काळात संपूर्ण ताकदीने काम करावे लागेल. या स्थितीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. सायबर सुरक्षेबाबत सर्वांनाच अधिक काळजी घ्यावी लागेल. राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करुया.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री सचिवालयातील सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, राज्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, तसेच मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि इतर विभागांचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

LIVE | दि. महाराष्ट्र स्टेट कॉऑपरेटिव्ह बँक लि. आयोजित सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण या विषयीचा परिसंवाद

🕑 दु. १.५० वा. | १२-५-२०२५📍यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

#Maharashtra #Mumbai #Seminar

https://www.youtube.com/live/VqEwOl_isyE?si=SxKseIFSrxzWwtMg

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1211117800689367

https://x.com/Dev_Fadnavis/status/1921843079591698931
CMO Maharashtra Tweets:

Lt Gen Pawan Chadha (VSM General Officer Commanding, HQ-MG & G Area) presented a special commemorative memento to CM Devendra Fadnavis symbolising the Valour, Sacrifice and Strategic Acumen of the Indian Army and Chhatrapati Shivaji Maharaj.

लेफ्टनंट जनरल पवन चड्ढा (विशिष्ट सेवा पदक), जनरल ऑफिसर कमांडिंग, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा, यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय सेना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, समर्पण आणि धोरणात्मकतेचे प्रतीक असलेली विशेष स्मरणिका भेट दिली.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis arrives for the Discussion on 'Empowerment of Cooperatives and Government's Policy'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण या विषयीचा परिसंवाद' येथे आगमन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'सहकारिता का सशक्तिकरण और शासन की नीति इस विषय पर परिसंवाद' में आगमन

🕐12.45pm | 12-5-2025 📍Yashwantrao Chavan Centre, Mumbai | दु. १२. ४५ वा. | १२-५-२०२५📍यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि. आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण' या विषयावर परिसंवाद कार्यक्रम येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 'सार्थ अभिमान आम्हांस शिखर संस्था होण्याचा' या वार्षिक आर्थिक प्रगती पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. शरद पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: CM Devendra Fadnavis chairs a meeting at his official residence ‘Varsha’ in Mumbai, regarding Civil-Military Coordination with Indian Army’s General Officer Commanding Maharashtra, Gujarat and Goa Area, Indian Navy’s Flag Officer Commanding…
CMO Maharashtra Tweets:

संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यामध्ये 'नागरिक-सैन्य समन्वय' बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि आवश्यक खबरदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदुर’च्या अचूक आणि प्रभावी कामगिरीचे कौतुक करताना त्याला ‘अभूतपूर्व’ असे संबोधून संरक्षण दलाला सॅल्युट करतो, असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वी येथे झालेले दहशतवादी हल्ले हे आर्थिक पायाभूत रचनेवरचा थेट आघात होते. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी सायबर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यातील समन्वय अधिक सशक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नियमित संवाद आणि माहितीचे आदानप्रदान व्हावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लष्करातर्फे लेफ्टनंट जनरल आणि कर्नल, नौदलातर्फे रिअर अ‍ॅडमिरल आणि कमांडर, वायुदलातर्फे एअर वाईस मार्शल, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक आणि गृह व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, जेएनपीटी, बीपीटी, मुंबई स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, एटीएस आणि होमगार्ड यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai