Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.4K photos
13.1K videos
2.65K files
7.45K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आलेल्या 'गोवर्धन गोशाळा कोकण'च्या परिसराची पाहणी केली. कै. तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून व खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून गोवर्धन गोशाळा कोकण, हा पर्यावरणस्नेही प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. जातिवंत देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन या गोशाळेत करण्यात येत आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या भाकड गायींची देखभालदेखील येथे करण्यात येणार आहे. गायींचे महत्त्व अधोरेखित करणे, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास ही गोवर्धन गोशाळेची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #RajyamataGaumata
CMO Maharashtra Tweets:

📸Group Photo!

A group photo of CM Devendra Fadnavis with DCM Eknath Shinde, Minister Nitesh Rane, MP Narayan Rane, MLA Ravindra Chavan, MLC Ravindra Phatak and other dignitaries.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, आ. रविंद्र चव्हाण, आ. रविंद्र फाटक आणि इतर मान्यवरांसमवेत छायाचित्र.

#Maharashtra #DevendraFadnavis #RajyamataGaumata
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: ॐ आवाहयाभ्याम् देवीं, गां त्वां त्रैलोक्यामातरम् । यस्यां स्मरणमात्रेण, सर्वपाप प्रणाशनम् ।। 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'गोवर्धन गोशाला कोकण'…
CMO Maharashtra Tweets:

देशी गोमातेच्या संवर्धनाद्वारेच नैसर्गिक शेती शक्य!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कणकवली, सिंधुदुर्ग येथे 'गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किल्ले राजकोट येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात भव्य पुतळ्याचे पूजन केल्यानंतर येथे गोवर्धन गोशाळेचे उदघाटन होत आहे. खा. नारायण राणे यांनी गोवर्धन गोशाळेचा अतिशय सुंदर प्रकल्प उभा केला आहे. कोणतेही कार्य हाती घेतल्यानंतर ते अचूक आणि गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, अशी त्यांची कार्यपद्धती असते. गोवर्धन गोशाळेचा प्रकल्पदेखील अतिशय उत्तम आहे. गोवर्धन गोशाळा अनुसंधान केंद्रदेखील आहे. गोधनाद्वारे अर्थव्यवस्था तयार होऊ शकते, याचा वस्तुपाठ येथे निर्माण करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपला सनातन धर्म, सनातन संस्कृती केवळ मूर्तीपूजक नसून निसर्गपूजक आहे. यामध्ये गोमातेला अतिशय उच्च दर्जा दिलेला आहे. गोमातेला आपण आईसारखे मानतो, गोमातेत ईश्वर वास करतो, असे मानतो. कारण कृषि संस्कृतीत गोमातेला दुसरा कुठलाही पर्याय नाही. गोमातेचे महत्त्व जाणून घेतल्यानेच आपली शेती समृद्ध होती. गोमाता जन्मापासून मृत्युपर्यंत केवळ देत राहते. गोमाता देणारी आहे, घेणारी नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रासायनिक शेतीमुळे काही काळ उत्पादकता वाढली पण शेवटी जमिनीचा पोत खराब होऊ लागला, उत्पादकता कमी झाली. त्यातूनच नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल, असे लक्षात आले. विशेषतः शेतीत देशी गायीच्या शेणाचा वापर केल्यास उत्पादकता दीडपटीने, दोन पटीने वाढू लागली. म्हणूनच नैसर्गिक शेतीचे मिशन सुरु केले असून यामध्ये 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे ठरवण्यात आले. ती शेती गोमातेच्या संवर्धनाशिवाय करता येणार नाही. म्हणून गोमातेचे संवर्धन मोठ्या प्रमाणावर करत आहोत. राज्य शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. देशी गोमातेला चाऱ्यासाठीचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्याकडील देशी गायी चांगल्या होत्या. पण आपण विदेशी गायी आणल्या, त्यांच्यापासून संकरित जाती तयार केल्या. पण, आपल्या गीर, थारपारकर, साहिवाल गायींचे ब्राझीलने संवर्धन केले. गोवर्धन गोशाळा येथे सर्वच देशी गायी पाहायला मिळाल्या. देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला व शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो. शेणावर आधारित खते, गॅस, रंग तयार होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील घरात शेणापासून तयार केलेल्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. आम्हीही आमच्या विभागांमध्ये शेणाचा रंग वापरला पाहिजे. यासाठी आपण जास्तीतजास्त इन्सेन्टिव्ह देणार आहोत. कसायाकडे जाऊ शकणाऱ्या गायीदेखील येथे जिवंत राहणार आहेत. म्हणून हा अतिशय चांगला प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #RajyamataGaumata
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Govardhan Gaushala: A Model for Sustainable Rural Development!

Inaugurated 'Govardhan Gaushala Konkan' in Kankavli, Sindhudurg and inspected the premises of this newly established Gaushala. This eco-friendly initiative, launched by the Late Tatu Sitaram Rane Trust under the vision of MP Narayan Rane ji, is dedicated to the nurturing and conservation of pure indigenous cows. Govardhan Gaushala’s primary objectives include highlighting the importance of cows, generating employment, and ensuring the overall development of farmers.

Our Sanatan Dharma and ancient culture are rooted not just in idol worship but in nature worship, where Gaumata (the cow) holds the highest reverence. Seen as a mother and a symbol of divinity, she is vital to agrarian life—offering natural fertiliser and dairy support from birth to death.

While chemical farming short-term increased productivity, it ultimately degraded soil quality and reduced yields, prompting a renewed focus on natural farming. Consequently, a mission has been launched to bring 2.5 million hectares under natural farming, which relies on the preservation of Gaumata. The State Government has recognised her as Rajyamata and approved fodder subsidies for native breeds.

At Govardhan Gaushala, these native breeds are being conserved to achieve true agricultural self-reliance. Cow dung is being innovatively used not just for fertiliser, but also for biogas and eco-friendly paint—as seen in Hon Union Minister Nitin Gadkari ji’s Delhi residence. Promoting such eco-friendly solutions across Government departments will be supported through maximum incentives.

This initiative also ensures protection of cows from slaughter, making the project not only impactful but also deeply meaningful.

DCM Eknath Shinde ji, Minister Nitesh Rane, MP Narayan Rane ji, MLA Deepak Kesarkar, MLA Ravindra Chavan, MLA Nilesh Rane and other dignitaries were present.

#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata

https://x.com/Dev_Fadnavis/status/1921585054813499898?t=254yp_nPclb1qVPCL-ER2A&s=19
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अर्चन...
छत्रपति शिवाजी महाराज इनका देश के सबसे बड़े पुतले का अर्चन...

('गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन | सिंधुदुर्ग | 11-5-2025)
#Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj