Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.4K photos
13.1K videos
2.65K files
7.45K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

गोमातेची सेवा केवळ धर्मकार्य नव्हे तर राष्ट्रकार्य!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली, सिंधुदुर्ग येथील 'गोवर्धन गोशाळा कोकणचा उदघाटन कार्यक्रम' येथे राज्यमाता गोमातेला चारा खाऊ घातला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #RajyamataGaumata
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आलेल्या 'गोवर्धन गोशाळा कोकण'च्या परिसराची पाहणी केली. कै. तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून व खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून गोवर्धन गोशाळा कोकण, हा पर्यावरणस्नेही प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. जातिवंत देशी गायींचे संगोपन आणि संवर्धन या गोशाळेत करण्यात येत आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या भाकड गायींची देखभालदेखील येथे करण्यात येणार आहे. गायींचे महत्त्व अधोरेखित करणे, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास ही गोवर्धन गोशाळेची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #RajyamataGaumata