Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.3K photos
13.1K videos
2.65K files
7.44K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

दोन्ही राज्यांनी परस्पर सहमतीने 'या' सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली...
दोनों राज्यों ने आपसी सहमति से 'इस' समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए...

(पत्रकार परिषद | भोपाल, मध्य प्रदेश | 10-5-2025)
#Maharashtra #MadhyaPradesh #Bhopal
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सरकार आल्यानंतर देशात आंतरराज्य पाणी करारांना बळ मिळाले...
देश में मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सरकार आने के बाद अंतरराज्यीय पानी के समझोतों को बल मिला...

(पत्रकार परिषद | भोपाल, मध्य प्रदेश | 10-5-2025)
#Maharashtra #MadhyaPradesh #Bhopal
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

दोन्ही राज्यांची अर्थव्यवस्था बदलणारा 'हा' आंतरराज्य प्रकल्प...
दोनों राज्यों की अर्थव्यवस्था को बदलने वाली 'यह' अंतरराज्यीय परियोजना...

(पत्रकार परिषद | भोपाल, मध्य प्रदेश | 10-5-2025)
#Maharashtra #MadhyaPradesh #Bhopal
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आंतरराज्य नियंत्रण मंडळाच्या बैठकीमुळे दोन्ही राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना फायदा होणार.
अंतरराज्यीय नियंत्रण मंडल की बैठक के माध्यम से दोनो राज्य के किसानों को और नागरिकों को फायदा होगा!

(पत्रकार परिषद | भोपाल, मध्य प्रदेश | 10-5-2025)
#Maharashtra #MadhyaPradesh #Bhopal
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Maharashtra CM Devendra Fadnavis and Madhya Pradesh CM Dr Mohan Yadav chair the '28th Meeting of Maharashtra - Madhya Pradesh Inter-State Control Board for Joint Irrigation and Hydro Electric Projects' 🔸महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र…
CMO Maharashtra Tweets:

ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला 5.78 लाख एकर सिंचनलाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली भोपाळ, मध्य प्रदेश येथे ‘संयुक्त सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी महाराष्ट्र - मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची 28वी बैठक' पार पडली. याप्रसंगी दोन्ही मुख्यमंत्री यांनी 'ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा'संदर्भात महाराष्ट्र - मध्य प्रदेश सरकारमधील ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या नेतृत्वात देशात पाण्याच्या संदर्भातील आंतरराज्यीय पाणी करारांबाबतच्या कामांना गती मिळाली. त्याचाच परिणाम म्हणून, 25 वर्षांनंतर महाराष्ट्र - मध्य प्रदेश आंतरराज्यीय मंडळाची बैठक आज पार पडली." या 'ताप्ती बेसिन मेगा रिचार्जयोजने' संदर्भातील सामंजस्य कराराला अभूतपूर्व गती दिल्याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे त्यांनी आभार मानले.
या मेगा रिचार्ज योजनेचा दोन्ही राज्यांना मोठा फायदा होणार आहे. मध्य प्रदेशातील 1,23,082 हेक्टर आणि महाराष्ट्रातील 2,34,706 हेक्टर जमिनीला सिंचन यामुळे प्राप्त होईल. याशिवाय, महाराष्ट्रातील अकोला, बुलढाणा आणि अमरावती यासारख्या खारपाण पट्टा असणाऱ्या जिल्ह्यांना याचा विशेष फायदा होईल आणि तेथील पिण्याच्या पाण्याची समस्याही कायमची सुटेल. यासंदर्भात दोन्ही राज्ये या प्रकल्पाबाबत केंद्र सरकारला 'केन-बेतवा आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पा'ला केंद्र जे सहकार्य देते ते मिळावे, यासाठी विनंती करणार असल्याचेही, मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
या बैठकीत महाराष्ट्राचे मुद्दे मांडले. त्यात डांगुर्ली बॅरेज, जामघाट असे महत्त्वाचे मुद्दे होते. या जामघाट प्रकल्पासाठी 28 वर्षांपूर्वी मी मध्यप्रदेशात तत्कालिन मुख्यमंत्र्यांसोबत आलो होतो. पण, आता त्यालाही गती मिळते आहे, याचा आनंद आहे. या जामघाटमुळे नागपूर शहरासाठी पुढच्या 30-40 वर्षांसाठी पाणी मिळणार आहे. आता ऑक्टोबरमध्ये पुढची बैठक घेण्यात येईल. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश कोणत्या क्षेत्रात एकत्रित काम करु शकते, यादृष्टीने सुद्धा अनेक बाबींवर यावेळी चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

असा आहे ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प :
🌊ताप्ती नदीवर मध्यप्रदेशातील खरिया गुटी घाट येथे धरण
🌊एकूण सिंचनाला लाभ : 3,57,788 हेक्टर
🌊महाराष्ट्राला लाभ : 2,34,706 हेक्टर (जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती) (म्हणजेच सुमारे 5.78 लाख एकर)
🌊मध्यप्रदेशला लाभ : 1,23,082 हेक्टर (बुर्‍हाणपूर, खंडवा)
🌊एकूण पाणीवापर : 31.13 टीएमसी
🌊महाराष्ट्र : 19.37 टीएमसी/मध्यप्रदेश : 11.76 टीएमसी
🌊योजनेची किंमत : ₹19,244 कोटी (2022-23 ची किंमत)

याप्रसंगी महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीष महाजन, मध्य प्रदेश सरकारचे मंत्री तुलसीराम सिलावट, आमदार अर्चना चिटणीस, महाराष्ट्र तथा मध्य प्रदेश सरकारचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #MadhyaPradesh
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

तापी बेसिन मेगा रिचार्ज परियोजना विश्व की सबसे बड़ी, नायाब एवं आश्चर्यकारक रिचार्ज स्कीम परियोजना!

भोपाल, मध्य प्रदेश में आज मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव जी के साथ 'संयुक्त सिंचाई एवं जलविद्युत परियोजनाओं के लिए महाराष्ट्र - मध्य प्रदेश अंतरराज्यीय नियंत्रण मंडल की 28वीं बैठक' में सहभागी हुआ। इस बैठक के बाद 'तापी बेसिन मेगा रिचार्ज परियोजना' के संबंध में महाराष्ट्र - मध्य प्रदेश सरकार के बीच लगभग ₹19,244 करोड़ के ऐतिहासिक समझौता ज्ञापन पर हमने संयुक्त रूप से हस्ताक्षर किये।

इसके संदर्भ में आयोजित संयुक्त पत्रकार परिषद में सहभागी होकर वहां उपस्थित अधिकारियों एवं पत्रकारों को संबोधित किया।

ताप्ती मेगा रिचार्ज दुनिया का एक अजूबा हैं क्योंकि एल्युवियम फॉल्ट के कारण जो बजाका फॉल्ट इससे तैयार होता है, वो तापी नदी के समानांतर बहकर अद्भुत रिचार्ज क्षमता उत्पन्न करता है। इसी रिचार्ज की शक्ति का प्रभाव है कि उस स्थान पर के कुए में नदी का असीम पानी गिरने के बाद भी वह कभी भरता नहीं। इस परियोजना के कारण महाराष्ट्र एवं मध्य प्रदेश की दोनों सरकारों को बड़ा फायदा होने वाला हैं और तकरीबन मध्य प्रदेश की 1,23,082 हेक्टर एवं महाराष्ट्र की 2,34,706 हेक्टर जमीन सिंचाई से लाभान्वित होगी। साथ ही अकोला, बुलढाणा एवं अमरावती सहित विदर्भ एवं उत्तर महाराष्ट्र के खारे पानी वाले क्षेत्रों को विशेष लाभ होगा। वहां की पेयजल की समस्या भी इससे सदैव के लिए दूर होगी। इससे दोनों राज्यों को बहुत लाभ होगा एवं उनकी विभिन्न प्रकार की पानी की जरूरतों को भी इससे पूरा करने में बड़ी मदत मिलेगी।

आज का दिन ऐतिहासिक है, क्योंकि कई वर्षों से लंबित तापी मेगा रिचार्ज परियोजना पर मध्य प्रदेश सरकार के साथ आपसी सहमति के बाद यह समझौता ज्ञापन (MoU) संभव हुआ। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सरकार केंद्र में आने के बाद वर्ष 2016 के उपरांत देश में अंतरराज्यीय जल समझौतों की प्रक्रिया को गति मिली है। करीब 25 वर्षों के अंतराल के बाद आयोजित यह अंतरराज्यीय नियंत्रण मंडल की बैठक उसी प्रयास का परिणाम है। मैं मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव जी का हृदय से आभार प्रगट करता हूँ जो इन्होंने इस समझौते को अभूतपूर्व गति प्रदान की।

इसके अलावा आज कई अन्य लंबित परियोजनाओं पर भी आपसी सहमति के द्वार खुले हैं, मैं इसलिए दोनों राज्यों के जलसंसाधन मंत्रीयों का आभार प्रगट करता हूँ। साथ ही मध्य प्रदेश के मुख्यमंत्री जी ने दोनों सरकारों के द्वारा आपसी सहयोग से अन्य संभावित क्षेत्रों के सहयोग की जो सकारात्मक मुद्दों पर मंथन किया, उससे दोनों राज्यों की जनता को भी बहुत फायदा होगा। विशेषकर डांगुर्ली बॅरेज, जामघाट, इत्यादि आगामी परियोजनाओं का लाभ नागपुर सहित महाराष्ट्र के अन्य क्षेत्रों को लंबे समय तक होगा।

तापी मेगा रिचार्ज परियोजना:
🔸मध्य प्रदेश में तापी नदी पर खरिया गुटी घाट पर बांध
🌊कुल सिंचाई लाभ : 3,57,788 हेक्टर
🌊कुल पानी की खपत : 31.13 टीएमसी
🌊महाराष्ट्र : 19.37 टीएमसी/मध्य प्रदेश : 11.76 टीएमसी
इस अवसर पर महाराष्ट्र सरकार के मंत्री गिरीष महाजन, मध्य प्रदेश सरकार के मंत्री तुलसीराम सिलावट, विधायक अर्चना चिटनिस, अन्य गणमान्य एवं अधिकारी उपस्थित थे।

#Maharashtra #MadhyaPradesh #TaptiBasinProject

https://x.com/Dev_Fadnavis/status/1921253296020615291?t=1XCGyTxztT_vCDAg0Nq70Q&s=19
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 10 मे 2025

📍पुणे
जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळा
https://mahasamvad.in/165475/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन
https://mahasamvad.in/165481/

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/165509/

#Maharashtra #DevendraFadnavis
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Greetings to all on Narasimha Jayanti!
May his divine power guide us through every challenge and protect us.
ॐ उग्रवीरं महाविष्णुं, ज्वलन्तं सर्वतो मुखम्। नृसिंह भीषणं भद्रं, मृत्यु मृत्युं नमाम्यहम्॥
भगवान श्री नृसिंह यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!

#NarsimhaJayanti #JaiSriNarasimha #maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Greetings to all on Narasimha Jayanti! Celebrating the fourth avatar of Vishnu and the divine protector of devotee Prahlad.
पराक्रमाचे देवता भगवान श्री नृसिंह यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

#NarsimhaJayanti #JaiSriNarasimha #maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Greetings to all on Narasimha Jayanti! May his fierce form destroy our fears and awaken the courage within.
श्री नृसिंह जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#NarsimhaJayanti #JaiSriNarasimha #maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

On this National Technology Day, let's salute the visionary leadership of Shraddheya Atal Bihari Vajpayee ji and the scientists behind the success of the Pokhran tests! Today, under the inspiring leadership of Hon. PM Narendra Modi ji, India is moving towards becoming a self-reliant, capable, and modern nation powered by AI, startups, and innovation. Greetings to all scientists, technologists, and innovators who are turning the gears for India's progress.
पोखरण चाचणी यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांना आणि माजी पंतप्रधान, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला सलाम! आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली, भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स् व नवोन्मेषाच्या बळावर, एक आत्मनिर्भर, सक्षम आणि आधुनिक भारत घडवण्याच्या दिशेने पुढे जात आहे. चला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अधिष्ठानावर सशक्त नव भारताचे स्वप्न साकारूया!
सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व तज्ज्ञांना राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#PokhranTest #NationalTechnologyDay #Maharashtra