Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.1K photos
13K videos
2.63K files
7.42K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸Inauguration of Maharashtra Cyber's innovative citizen-centric initiatives at the hands of CM Devendra Fadnavis
Maha cyber safe app
Artificial Intelligence (AI) bot
Cyber Awareness Documentary

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सायबरच्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमांचे उदघाटन
महा सायबर सेफ अ‍ॅप
आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) बॉट
सायबर जागरूकता माहिती पट

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से महाराष्ट्र साइबर की अभिनव नागरिक केंद्रित पहलों का उदघाटन
महा साइबर सेफ ऐप
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) बॉट
साइबर जागरूकता वृत्तचित्र

🕔 5.05pm | 8-5-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | संध्या. ५.०५ वा. | ८-५-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #MahaCyber
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis witnessed the MoU Signing and Exchange between Government of Maharashtra and Vidhi Center for Legal Policy on 'Decriminalisation'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यामध्ये 'डिक्रीमिनलायझेशन’ संदर्भात सामंजस्य करार
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में महाराष्ट्र सरकार और विधि सेंटर फॉर लीगल पॉलिसी के बीच 'डिक्रीमिनलायझेशन’ के संदर्भ में समझौता ज्ञापन

🕠 5.15pm | 8-5-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | संध्या. ५.१५ वा. | ८-५-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

अब कोई बेवकूफ नहीं बनेगा!
क्योंकि महाराष्ट्र साइबर पुलिस हमारे साथ है।
1945 डायल करें और Digital Arrest Scam से बचें।
ये वीडियो देखें और दूसरों को भी भेजें।

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of Maharashtra Cyber's innovative citizen-centric initiatives at the hands of CM Devendra Fadnavis Maha cyber safe app Artificial Intelligence (AI) bot Cyber Awareness Documentary 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
CMO Maharashtra Tweets:

'सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे 'महाराष्ट्र सायबरच्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमां'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचे उदघाटन करत उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर फसवणुकीसंबंधीचे कॉल्स मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे अशा कॉल्सना उत्तरे देणे व नागरिकांना माहिती मिळण्यासाठी चॅटबॉट व माहितीपट महत्त्वाचे ठरणार आहेत. सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. अशा कामात अभिनेते शरद केळकर व अभिनेत्री अमिषा पटेल यांनी सहभाग घेतल्यामुळे नागरिकांपर्यंत चांगला संदेश जाईल. नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेऊन विक्री करण्यासारख्या घटना रोखण्यासाठीही यापुढील काळात जनजागृती करावी. मानवी तस्करीमध्ये लोकांना वाईट पद्धतीने वागविले जाते. त्यामुळे यासारखे अमानुष प्रकार बंद करण्यासाठी जनजागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरने हाती घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष सायबर सुरक्षा विषयक माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. मराठी आणि हिंदी भाषेत असलेल्या या माहितीपटात अभिनेते शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल यांनी काम केले आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी, सायबर फसवणूक संबंधी जनजागृती करण्यात येणार आहे.

यावेळी अभिनेते शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis witnessed the MoU Signing and Exchange between Government of Maharashtra and Vidhi Center for Legal Policy on 'Decriminalisation' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि विधी…
CMO Maharashtra Tweets:

महाराष्ट्र शासन आणि विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे महाराष्ट्र शासन आणि विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश उद्योग व्यवसाय सुलभ करणे (Ease of Doing Business) आणि नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सुलभ व सोयीचे बनवणे हा आहे.

या करारानुसार राज्यातील कायद्यांतील तरतुदींचा अभ्यास करून उद्योग व्यवसायातील अडथळे दूर करणाऱ्या, कठीण व फौजदारी स्वरूपाच्या कायद्यांचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. यासाठी विधि सेंटर फॉर लीगल पॉलिसी राज्यातील विविध कायद्यांचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला सादर करणार आहे. या उपक्रमामुळे राज्यात उद्योग सुलभतेला गती मिळणार असून नागरिकांना दिलासा देणारे कायदेमान्य वातावरण निर्माण होणार आहे. या करारावर विधि व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले आणि विधि सेंटर फॉर लीगल पॉलिसीचे अर्घ्य सेनगुप्ता यांनी स्वाक्षरी केली. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of Nagpur Municipal Corporation and Maharashtra State Infrastructure Development Corporation (MSIDC) to discuss important issues 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'नागपूर महानगरपालिका…
CMO Maharashtra Tweets:

नागपूरच्या झिरो माईल येथे 'अखंड भारत एक्सपिरियन्स सेंटर'सह अनेक प्रकल्पांना मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नागपूर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा'शी (MSIDC) संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत बैठक पार पडली. यावेळी नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्पांना तत्वतः मंजुरी देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरो माईल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ₹45 कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. नागपूर हे अखंड भारताच्या केंद्रस्थानी कसे होते याबाबत माहिती देणारे ‘अखंड भारत एक्सपिरियन्स सेंटर’ येथे उभारले जाणार आहे. नैसर्गिक प्रकाशाचा वापर करत संग्रहालय, सोयी-सुविधा व वाहनतळ विकसित केला जाणार असून, भविष्यात महानगरपालिका याची देखभाल करणार आहे. तसेच नागपूरच्या ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पात 20,000 चौ.मी. जागेत परफॉर्मन्स गॅलरी तयार होणार असून, यामध्ये ‘ॲकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट’ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. एकूण 6.2 लाख चौ.फुट जागेच्या विकासास मंजुरी मिळाली असून त्यातील 1.2 लाख चौ.फुट जागेत सभागृह बांधण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बाबुलखेडा (ता. कामठी) येथे 81.6 एकर जागेवर नवीन कारागृह उभारण्याच्या प्रस्तावास देखील मान्यता दिली. यासाठी दिल्ली, पालघर व तळोदा येथील कारागृहांच्या आर्किटेक्चरल डिझाईनचा अभ्यास करून कार्यवाही केली जाणार आहे. तसेच, कारागृह सदनिकाही बांधण्यात येणार आहेत. या बैठकीमध्ये मोरभवन आणि गणेशपेठ येथील बस स्थानकांचा पुनर्विकास करण्यावर सविस्तर चर्चा झाली. मोरभवन येथे खाजगी व शहर बससेवा तर गणेशपेठ येथे एसटी व शहर बससेवेसाठी नव्या सोयीसुविधा तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय ‘नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास मुख्यमंत्री यांनी यावेळी तत्वतः मान्यता दिली.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

A Step Towards Ease of Doing Business!

Delighted to witness the MoU Signing and Exchange between the Government of Maharashtra and the Vidhi Centre for Legal Policy at Sahyadri Guest House, Mumbai.

Aimed at simplifying industrial and business operations (Ease of Doing Business) and enhancing citizens’ convenience, safety, and accessibility, this MoU focuses on reviewing the provisions of existing laws.

Through this collaboration, efforts will be made to foster a legally sound and citizen-friendly environment, accelerate industrial facilitation, and review stringent or criminally framed laws that hinder business processes.

To support this, the Vidhi Centre for Legal Policy will conduct a detailed study of relevant legal provisions in the state and submit a comprehensive report to the General Administration Department.

Senior officials and other dignitaries were present.

#Maharashtra #Mumbai #MoU

https://x.com/Dev_Fadnavis/status/1920496598112743716
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

AI and Awareness: Maharashtra Cyber’s Bold New Steps!

Inaugurated Maharashtra Cyber's innovative citizen-centric initiatives at Sahyadri Guest House, Mumbai.

While this, a powerful documentary on cyber security was showcased, featuring actors Sharad Kelkar and Ameesha Patel in Marathi and Hindi. Their contribution is truly commendable, as the film aims to raise vital awareness about cyber crime and fraud.

Maharashtra Cyber’s Command and Control Centre also unveiled an AI-based chatbot, now linked to their 1945 helpline. This tool provides essential information on cyber crimes and guides users on how to file complaints — a significant step towards public empowerment.

At this time a young man who had been rescued from a human trafficking operation shared his personal experience. He expressed heartfelt gratitude to Maharashtra Cyber Police for their efforts in rescuing 64 individuals who had been trafficked to Myanmar and Laos.

By combining technology, outreach, and creative media, these initiatives are essential for a safer, more informed society.

Actor Sharad Kelkar, Actor Ameesha Patel and other Police officials were present.

#Maharashtra #Mumbai #MahaCyber

https://x.com/Dev_Fadnavis/status/1920503170821992947