Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.1K photos
13K videos
2.63K files
7.41K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: Another Step Towards Gadchiroli’s Steel City Future...! 🔸CM Devendra Fadnavis and Governor CP Radhakrishnan witness the signing and exchange of MoU between Gondwana University, Gadchiroli and Curtin University, Australia for various…
CMO Maharashtra Tweets:

उद्योग व शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक सहकार्य सुनिश्चित करणारा सामंजस्य करार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे मायनिंगचे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कर्टीन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ऐतिहासिक करारानिमित्त उपस्थितांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे एखाद्या राज्य विद्यापीठाशी थेट सहकार्य होणे हा पहिलाच आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. गेल्या आठवड्याभरात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या नामवंत विद्यापीठासमवेत आपण सामंजस्य करार करत आहोत. नुकत्याच पार पडलेल्या वेव्ह्ज 2025 मध्ये, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासमवेत नवी मुंबई येथे त्यांच्या कॅम्पसच्या स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नवी मुंबई येथे एज्यु सिटी उभारण्यात येत आहे. या जागतिक दर्जाच्या कॅम्पसचा उद्देश किमान 12 सर्वोच्च आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना येथे स्थापित करण्याचा आहे. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, आणि युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय यांसारख्या संस्थांनी आधीच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. एज्यु सिटी हे 80,000 ते 1,00,000 विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून उभे राहणार आहे, असे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस विशेष आहे कारण आपण जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय दुर्लक्षित राहिलेल्या भागात, म्हणजेच गडचिरोली येथे घेऊन जात आहोत. मागास जिल्हा म्हणून ओळखला गेलेला गडचिरोली आज महाराष्ट्रातील सर्वात वेगाने प्रगती करणारा जिल्हा बनला आहे. लॉइड्स कंपनीच्या पुढाकारामुळे गडचिरोली हे खाण व पोलाद उद्योगात भारताचे 'स्टील हब' म्हणून उदयास येत आहे. या विकासाला चालना देण्यासाठी शैक्षणिक सहकार्य अत्यावश्यक आहे. गोंडवाना विद्यापीठाने केवळ 12 वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. कर्टीन विद्यापीठासमवेत हा नव्याने झालेला करार संशोधन, कौशल्यविकास आणि औद्योगिक गरजांसोबत शिक्षणाची जोड मजबूत करेल आणि त्यामुळे गडचिरोलीसह संपूर्ण भारताच्या खाण व धातुशास्त्र क्षेत्राला बळकटी मिळेल.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. परिणय फुके, ऑस्ट्रेलियन कॉन्सुलेट जनरल पॉल मर्फी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #Mumbai #Education
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे महिला व बाल विकास विभागाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातील कामकाजाचा आढावा घेणाऱ्या 'दृष्टी, दिशा, आणि दृढनिश्चय 100 दिवसांची कहाणी' या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'ऑपरेशन सिंदूर' चलाकर कायर आतंकियों को मिटाने का काम भारत ने करके दिखाया!

पहलगाम हमले का पाकिस्तान को करारा और शक्तिशाली जवाब देने के लिए भारतीय सेना को मनःपूर्वक अभिनंदन और मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आपका बहुत-बहुत आभार!

(📍मुंबई | 7-5-2025)
#Maharashtra #Mumbai #OperationSindoor
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'ऑपरेशन सिंदूर'मार्फत दहशतवाद्यांचे 9 अड्डे उध्वस्त!

पहलगाम हल्ल्यावर देण्यात आलेल्या या अतिशय सबल आणि शक्तिशाली उत्तरासाठी भारतीय सैन्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार!

(📍मुंबई | 7-5-2025)
#Maharashtra #Mumbai #IndianArmy
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

New Education Policy allows us to bring the best of global education to India!
नवीन शैक्षणिक धोरणामुळे जगभरातील सर्वोत्तम शिक्षण भारतात आणता येईल.

(MoU between Gondwana University & Curtin University | Mumbai | 7-5-2025)
#Maharashtra #Mumbai #NewEducationPolicy
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

We are creating a great ecosystem for mining in Gadchiroli by making it India's Steel hub.
गडचिरोलीला भारताचे स्टील हब बनवून मायनिंगकरिता एक उत्तम इकोसिस्टम तयार करत आहोत.

(MoU between Gondwana University & Curtin University | Mumbai | 7-5-2025)
#Maharashtra #Mumbai #Gadchiroli
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Gondwana University in Gadchiroli is set to become a hub of research and excellence in mining, metallurgy, and allied sciences.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ मायनिंग, धातुशास्त्र आणि संबंधित विज्ञानातील संशोधन व उत्कृष्टतेचे केंद्र बनेल.

(MoU between Gondwana University & Curtin University | Mumbai | 7-5-2025)
#Maharashtra #Mumbai #Gadchiroli
CMO Maharashtra Tweets:

TECH- वारी: डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल...

🔸CM Devendra Fadnavis at the session on 'Redefining Governance through Frontier Technologies'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणे' या विषयावर व्याख्यान
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में 'फ्रंटियर टेक्नोलॉजी के माध्यम से शासन को पुनर्परिभाषित करने' के विषय पर व्याख्यान

🕔 4.45pm | 7-5-2025📍Mantralaya, Mumbai | संध्या. ४.४५ वा. | ७-५-२०२५📍मंत्रालय, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #MahaTechWari2025