Devendra Fadnavis
4.22K subscribers
78.8K photos
12.9K videos
2.61K files
7.38K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे....

- 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
- ⁠5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
- ⁠5 जिल्हाधिकारी,
- ⁠5 पोलिस अधीक्षक,
- ⁠5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
- ⁠4 महापालिका आयुक्त,
- ⁠3 पोलिस आयुक्त,
- ⁠2 विभागीय आयुक्त आणि
- ⁠2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक
यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.

#महाराष्ट्रदिन #Maharashtra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.

गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.

एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. सविस्तर माहिती तुम्हाला http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.

#महाराष्ट्रदिन #Maharashtra
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: स्मरण हुतात्म्यांचे औचित्य महाराष्ट्र दिनाचे... 🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र…
CMO Maharashtra Tweets:

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारकास अभिवादन🚩

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून राज्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्राला भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते, अशी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करणारा महाराष्ट्र भारताच्या विकासात सातत्याने अग्रस्थान घेत आहे. त्यांनी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून सर्वांना सोबत घेऊन एक प्रगत आणि समावेशी महाराष्ट्र घडवायचा आहे, हा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा संकल्प नवी ऊर्जा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक, पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay
CMO Maharashtra Tweets:

जय महाराष्ट्र 🚩

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत माईक हँकी यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay