Devendra Fadnavis
4.22K subscribers
78.7K photos
12.9K videos
2.6K files
7.38K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महिलाकेंद्रीत परिवर्तनकारी योजनांमार्फत अधिकारिता...
महिला केंद्रित परिवर्तनकारी योजनाओं के माध्यम से अधिकारिता...

(ग्रामविकास व पंचायतराज विभाग कार्यशाळा | पुणे | 26-4-2025)
#Maharashtra #Pune #PanchayatRaj
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पहलगाम हमले में महाराष्ट्र के जिन भाइयों ने जान गंवाई उनके परिजनों को राज्य सरकार ₹50 लाख की आर्थिक मदद देगी। साथ ही, मृतकों के बच्चों की पढ़ाई का खर्च उठाया जाएगा और जिन परिवारों में कोई अन्य कमाने वाला नहीं है, उनके परिवार में एक सरकारी नौकरी दी जाएगी।

(मुंबई | 29-4-2025)
#Maharashtra #Mumbai #PahalgamAttack
CMO Maharashtra Tweets:

A massive project to light up lives and fuel growth! ⚡️

🔸 CM Devendra Fadnavis presided over the MoU Signing and Exchange between GoM's Water Resources Department and MAHAGENCO, Mahagenco Renewable Energy Limited and Avaada Group for Pumped Storage Projects
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड व अवाडा ग्रुप यांच्यामध्ये पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी सामंजस्य करार
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिती में जल संसाधन विभाग, महाराष्ट्र सरकार और महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड एवं अवाडा ग्रुप के बीच पंप्ड स्टोरेज परियोजना के लिए समझौता ज्ञापन

🕛 11.50am | 29-4-2025📍Mantralaya, Mumbai | स. ११.५० वा. | २९-४-२०२५📍मंत्रालय, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #PoweringMaharashtra
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 'महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना' या राज्यातील रस्ते आराखडा व धोरणासंबंधी पुस्तिकेचे तसेच महसूल विभागाचे त्रैमासिक 'महसूलपत्र'चे प्रकाशन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार रावल, मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

टेमघर प्रकल्प, ता. मुळशी, जि. पुणे येथील उर्वरित कामे व धरण गळती प्रतिबंधक कामासाठी ₹488.53 कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता (जलसंपदा)
मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम, 1951 अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियम, 1964 मधील नियम 27(ब) (3) मधील तरतूदीमध्ये सुधारणा. भिक्षागृहातील व्यक्तींना ₹5 ऐवजी आता ₹40 प्रतिदिन. 1964 नंतर प्रथमच बदल (महिला व बाल विकास)
PM-YASASVI या एकछत्री योजनेअंतर्गत ओ.बी.सी., ई.बी.सी. व डी.एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन 2021-22 ते 2025-26 या वर्षांकरिता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण)
हडपसर ते यवत राज्य मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग व अस्तित्वातील रस्त्याचे सहापदरी बांधकाम करण्यास मान्यता, ₹5262.36 कोटींचा मार्ग (सार्वजनिक बांधकाम)
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत महा इनविट (पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था) Maha InvIT (Infrastructure Investment Trust) स्थापन करण्यास मान्यता (सार्वजनिक बांधकाम)
महाराष्ट्र राज्यात जहाजबांधणी व जहाजदुरुस्ती सुविधा (Shipyard)आणि जहाज पुनर्वापर सुविधा
(Ship Recycling) विकसित करण्याबाबतच्या धोरणास मान्यता (परिवहन व बंदरे)
महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2025ला मान्यता (परिवहन व बंदरे)
ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक (Aggregator) धोरण (परिवहन व बंदरे)
सर्वसमावेशक पीकविमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवणार तसेच कृषि क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविणार (कृषी)
आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजबांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण)
म. रा. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा ₹10 लाखांवरून ₹15 लाख करण्याचा निर्णय (इतर मागास बहुजन कल्याण)

#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecisions
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: A massive project to light up lives and fuel growth! ⚡️ 🔸 CM Devendra Fadnavis presided over the MoU Signing and Exchange between GoM's Water Resources Department and MAHAGENCO, Mahagenco Renewable Energy Limited and Avaada Group…
CMO Maharashtra Tweets:

उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ₹57,260 कोटींची गुंतवणूक!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, व अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8,905 मेगावॅट वीजनिर्मिती, ₹57,260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

महाजनकोच्या माध्यमातून घाटघर (125 मेगावॅट), कोडाळी (220 मेगावॅट), वरसगाव (1200 मेगावॅट) व पानशेत (1600 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील. महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडकडून मुतखेड (110 मेगावॅट), निवे (1200 मेगावॅट) व वरंढघाट (800 मेगावॅट) येथे तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरीजकडून पवना फल्याण (2400 मेगावॅट) व सिरसाळा (1250 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील.

मुख्यमंत्री म्हणाले, “उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असून, त्याद्वारे शेती, उद्योग व व्यावसायिक गरजांची पूर्तता होईल आणि पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल. राज्याच्या ऊर्जा क्षमतेपैकी 50% अपारंपरिक स्त्रोतांतून निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे.”

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Energy
CMO Maharashtra Tweets:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'जनता' वृत्तपत्राच्या 3 खंडांचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या जनता वृत्तपत्राच्या खंड 7, 8, 9 सह इंग्रजी खंड 4चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड 2च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8, 9ची निर्मिती करण्यात आली आहे. 'जनता' हे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1930 ते 1956 पर्यंत ते प्रकाशित झाले होते. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनता वृत्तपत्राचे 6 खंड प्रकाशित केले आहेत.

जनता खंडांमध्ये काय असणार -
जनता खंड 7-
12 फेब्रुवारी 1938 ते 28 जानेवारी 1939 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश

जनता खंड 8-
4 फेब्रुवारी 1939 ते 27 जानेवारी 1940 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश

जनता खंड 9-
3 फेब्रुवारी 1940 ते 1 फेब्रुवारी 1941 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्य सचिव, समितीचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai