Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.6K photos
12.9K videos
2.6K files
7.37K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis at the 'Pune Urban Dialogue : Challenges & Solutions' 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘पुणे अर्बन डायलॉग : आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'पुणे अर्बन डायलॉग…
CMO Maharashtra Tweets:

शहरी विकास आणि शहरी प्रशासनासाठी दिशादर्शक असा 'पुणे अर्बन डायलॉग: आव्हाने आणि उपाय' कार्यक्रम!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स. गो. बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पहिल्या 'पुणे अर्बन डायलॉग : आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी पुण्याचे पहिले प्रशासक स. गो. बर्वे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवी मुंबईपासून फरीदाबादपर्यंत विविध शहरांच्या विकासात स. गो. बर्वे यांचा मोलाचा वाटा आहे. शहरीकरणाच्या प्रक्रियेकडे दूरदृष्टीने पाहणारे अधिकारी म्हणून स. गो. बर्वे यांची ओळख आहे. प्रशासकापासून ते नेत्यापर्यंत अशी त्यांची कारकीर्द असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स. गो. बर्वे यांच्या 111 व्या जयंती निमित्त पुणे अर्बन डायलॉगचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची 50% लोकसंख्या ही सुमारे 500 शहरांमध्ये तर उर्वरित 50% लोकसंख्या सुमारे 40,000 गावांमध्ये राहते. जर आपण या 500 शहरांचा चेहरा बदलला, तर येथील नागरिकांना उत्तम जीवन आपण देऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे विचारमंथन होणे अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जगातील सर्व देशांचा विकास शहरीकरणाच्या मार्गातूनच झाला असून, एकाही देशाला शहरीकरण थांबवता आलेले नाही. मात्र, अर्थव्यवस्थेच्या विकासासोबत होणाऱ्या शहरीकरणाचे योग्य व्यवस्थापन केले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

1980 च्या दशकानंतर महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढले. 1990 नंतर शहरीकरणाचे व्यवस्थापन करण्याची सुरुवात झाली. शहरीकरणासाठी ज्या योजना आपण तयार करतो त्या योजनेची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असून मागील 10 वर्षांमध्ये शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी निधीच्या तरतुदीत एक गुणात्मक बदल घडून आलेला दिसतो. आज शहरांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असून विकास डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांसाठी विकास आराखडे तयार केले तसेच ते पूर्ण ही केले. शहरी वाहतुकीसाठी युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रांसपोर्ट अथॉरिटी कायदा व सिंगल तिकीट योजना व गुगल सोबत केलेल्या कराराची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

शहरी प्रशासनाबाबत पुनर्विचार करण्यासाठी हा पुणे अर्बन डायलॉग कार्यक्रम महत्त्वाचा असून फ्लॅश फ्लड्स ही शहरी भागासाठी अडचण असून नदी, नाल्यांवर अतिक्रमण व अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे येणारी आपत्ती ह्या संदर्भात विचार करणे गरजेचे असून शहरी विकास आणि शहरी प्रशासनासाठी अत्यंत दिशादर्शक असलेला अर्बन डायलॉगसारखे कार्यक्रम गरजेचे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, यशदाचे महासंचालक, पुणे महानगर पालिका आयुक्त, माजी मुख्य सचिव व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Reimagining Urban Maharashtra: Shaping the Future at the Pune Urban Dialogue

Glad to attend and address at 'Pune Urban Dialogue: Challenges and Solutions' in Pune, today. Offered my heartfelt tribute to the visionary administrator Late S. G. Barve on his 111th birth anniversary and also reflected on his immense contribution, whose visionary leadership shaped the development of cities like Navi Mumbai and Faridabad.

Congratulated the organisers for honouring Late S. G. Barve's legacy by hosting the Pune Urban Dialogue. Emphasised that today, about 50% of Maharashtra’s population lives across nearly 500 cities, while the remaining 50% lives in around 40,000 villages. If we can transform these 500 cities, we can significantly uplift the quality of life for millions. Initiatives like the Pune Urban Dialogue help us brainstorm ideas and find practical solutions for our cities' future.

Also, shared my thoughts on the global trend of urbanisation — how every developed nation has grown through it, and how resisting urbanisation is impossible. However, pointed out that rapid urban growth linked to economic progress has often not been properly managed. In Maharashtra, urbanisation accelerated post-1980, but serious efforts towards urban management only began after 1990. Over the past decade, we have seen a qualitative leap in infrastructure investments, and I’m proud that development plans for major areas have not only been prepared but also successfully implemented.

Discussed key initiatives we have introduced, such as the Unified Metropolitan Transport Authority Act, the Single Ticket Scheme for seamless urban transport, and our collaboration with Google for smarter urban planning.

While celebrating our progress, we also cautioned about challenges like flash floods, river and drain encroachments, and the growing risks associated with heavier rainfall. We must rethink our urban planning with these realities in mind, and this Urban Dialogue is a vital step in that direction.

Minister Chandrakant DadaPatil, MoS Madhuri Tai Misal, and other senior officials were present during this time.

#Maharashtra #Pune #Development

https://x.com/Dev_Fadnavis/status/1916458784056394165
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पुणे अर्बन डायलॉगच्या माध्यमातून शहरी नियोजन, शहरी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन...
पुणे अर्बन डायलॉग के माध्यम से शहरी नियोजन, शहरी प्रशासन, आपदा व्यवस्थापन...

(पुणे | 27-4-2025)
#Maharashtra #Pune #Urbanization
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

अधिकृत होर्डिंगवरच जाहिरात करावी.
औपचारिक होर्डिंग्स पर ही प्रचार करें।

(पुणे | 27-4-2025)
#Maharashtra #Pune #Urbanization
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'डीपी'ची मुदत कायमस्वरूपी काढलेली नाही...
'डीपी' का कार्यकाल स्थायी रूप से नहीं बढ़ाया...

(पुणे | 27-4-2025)
#Maharashtra #Pune #Development
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

एप्रिल-मे महिन्यात राज्यात मागील वर्षी 32% पाणीसाठा उपलब्ध होता, तर यावर्षी 38% पाणीसाठा उपलब्ध आहे.
अप्रैल-मई महिनों के दौरान राज्य में पिछले वर्ष 32% पानी भंडारण उपलब्ध था, जबकि इस वर्ष 38% पाणी भंडारण उपलब्ध है।

(पुणे | 27-4-2025)
#Maharashtra #Pune #WaterStorage
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही!
एक भी पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्र में नहीं रहेगा!

(पुणे | 27-4-2025)
#Maharashtra #Pune
CMO Maharashtra Tweets:

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते 'ट्रू - बीम युनिटचे उदघाटन व राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा इनके करकमलों से 'ट्रू - बीम युनिट का उदघाटन एवं राज्य कर्करोग संस्था के विस्तारीकरण का लोकार्पण'

राज्यात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू-बीम तंत्रज्ञानाद्वारे कर्करोग उपचार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथे 'ट्रू - बीम युनिटचे उदघाटन व राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण' पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीमसारखी कॅन्सरवरील उपचारासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. राज्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सरवर उपचारासाठी रेडिएशन, कीमोथेरपी यासारख्या पद्धती वापरल्या जात आहेत. मात्र, ट्रू बीमसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे केवळ संक्रमित भागावर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय कमीत कमी वेळात उपचार करणे आता शक्य झाले आहे. यापूर्वी या उपचारासाठी राज्यातील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. देशभरातून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या रुग्णांमुळे टाटा हॉस्पिटलवर प्रचंड ताण होता. मात्र, आता छत्रपती संभाजीनगर येथेही ही सेवा उपलब्ध झाल्याने मराठवाड्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ती एक वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

2016 साली या रुग्णालयाला राज्य कर्करोग रुग्णालयाचा दर्जा दिला होता. तेव्हापासून असंख्य रुग्णांना येथे चांगले उपचार मिळाले आहेत. आता ‘ट्रू-बीम’ सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचारांची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. तसेच ‘पेट स्कॅन’ (PET scan) सुविधेला मान्यता दिल्याने कर्करोगाच्या संपूर्ण निदान आणि उपचाराची सोय याठिकाणी उपलब्ध होणार आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाले, तर सर्व प्रकारचे कर्करोग पूर्णतः बरे करता येऊ शकतात. राज्य सरकार केवळ उपचारच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहिमाही राबवत आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षांत सुमारे 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी उपलब्ध जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी सुमारे ₹5000 कोटींचे कर्ज उभारण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यांतील सामान्य रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र नवीन सामान्य रुग्णालये उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून येत्या 3 ते 4 वर्षांत आरोग्य सेवांची त्रिस्तरीय यंत्रणा उभारली जाईल. यामुळे प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे आतापर्यंत 12 कोटी नागरिकांना 'आरोग्य विमा कवच' प्रदान करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, आ. संजय केनेकर, आ. अनुराधा चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

🕧 दु. १२.४५ वा. | २७-४-२०२५📍छत्रपती संभाजीनगर.

#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajiNagar