Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.5K photos
12.9K videos
2.6K files
7.36K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करणार्‍या राहुल गांधींना चपराक लगावल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे आभार...

(मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai #VeerSavarkar
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of Maharashtra Airport Development Company (MADC) Board of Directors
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनी (MADC) के निदेशक मंडल की बैठक

🕒 2.50pm | 25-4-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.५० वा. | २५-४-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महाराष्ट्र सरकार द्वारा प्रदेश में रह रहें पाकिस्तानी नागरिकों को पहचानकर उनके वीजा रद्द किया जा रहे हैं ताकि कोई भी वहाँ का नागरिक 48 घंटे से ज्यादा महाराष्ट्र में न रुक सकें...

(मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai #PahalgamTerroristAttack
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

- 232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले, आतापर्यंत 800 परत
- त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय


मुंबई, 25 एप्रिल
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. शत्रूचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात कायमच सर्व राजकीय पक्ष राहिले, असेच या देशात आजवर झाले. स्व. अटलजींनी स्व. इंदिराजींना संपूर्ण पाठिंबा दिला होता. पण, उबाठाने जे छोटे मन दाखविले, त्याला या देशातील जनता कधीच माफ करणार नाही.

दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर आज तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून 416 महाराष्ट्रातील पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवाय, सुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतील, तसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

भारतामध्ये असलेल्या 'त्या' पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द, तसेच त्यांना तात्काळ निघून जाण्याचे आदेश...

(माध्यमांशी संवाद | मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

भारत में रह रहें 'उन' पाकिस्तानी नागरिकों का वीजा रद्द, उन्हें तुरंत देश छोड़ने का आदेश...

(मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai #PahalgamAttack
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

काश्मीरमध्ये अडकलेल्या, घाबरलेल्या पर्यटकांना परत आणतो आहोत...

(मुंबई | 25-4-2025)
#Maharashtra #Mumbai #PahalgamAttack