मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
5.44K subscribers
889 photos
34 videos
1 file
210 links
मराठी स्पीक म्हणजे चावट, सेक्सी वायरल कॉल रेकॉर्डिंग.

https://t.me/Key_Network

Powered by - @Marathihotkatha1

🎧
Download Telegram
'Everything is Psychological' असलेल्या ह्या जगात मन कसे हाताळायचे याचे कुठेही प्रशिक्षण मिळत नाही. केव्हा कधी कसे काय करावे, याचे ज्ञान मिळत नाही. तसे त्याचे कुठलेही रेडीमेड Template नाही. माणूस प्रसंगानुरूप निर्णय घेत घडत जातो वा बिघडत जातो.
माणसाला नक्की कोणती बाब, गोष्ट आहे जी घडवते तर त्याच्या वाट्याला येणारी आव्हाने. ही आव्हानेच माणसाला त्याच्या आतील सर्व गुणांना, ताकदीला बाहेर काढत असतात. आव्हाने पेलायची म्हणजे कस लागतो, Comfort zone तर ब्रेक करावाच लागतो. आपल्यातील सारी ऊर्जा वापरावी लागते, जी आपण एरवी कधीच वापरलेली नसते, आव्हाने आली नसती तर वापरलीही नसती.
जसे, उपवासाने माणसाचे शरीर Autophagy मध्ये रुपांतरीत झाले की ते शरीरातील अतिरिक्त चरबी, अनावश्यक, खराब पेशी खाऊ लागते आणि माणसाला निरोगी, सुडौल बनवते. थोडक्यात शरीर स्वतःसाठी आवश्यक असलेली एनर्जी ज्या पेशी कधीच वापरल्या गेल्या नसत्या त्या वापरायला सुरुवात करून मिळवते.
तसेच आव्हाने आपल्यातल्या होत्या नव्हत्या अशा साऱ्या जमेच्या बाजू वापरून घेतात आणि माणसाला घडवत जातात.
म्हणून माणसाने आव्हानांना एक संधी म्हणूनच पाहिले पाहिजे. तसेही त्याला नाक मुरडून, दुर्लक्ष करुन काहीच मिळत नाही, उलट अडचणीत वाढच होते, त्यापेक्षा तोंड देणे कधीही श्रेयस्करच.
म्हणून मला नेहमी वाटते की आव्हानेच माणसाला घडवतात.
आणि अचानक आलेल्या आव्हानांतून, जीवनातील अनिश्चित घटनांमधून माणसे खऱ्या अर्थाने घडत असतात वा उध्वस्त होत असतात.
- निलेश अभंग, कल्याण.
#randomthoughts
#अनुभवजन्यलेखन