हा दीपराज नावाचा मराठी ऍक्टर व्यक्तिमत्वावरून भयंकर ट्रोल झाला. आता त्यालाही मात देईल असा तगडा माल मार्केटात आला आहे, नाव आहे निपुण धर्माधिकारी.
नो बॉडी शेमिंग वगैरे ठीक आहे. पण लोकांनी माणशी दोनशे रुपये आणि आयुष्यातले चार ते पाच तास खर्च करून थिएटरात यायचं, तर बघायचं काय तर ही लोकं??? मराठी मुलांना छान व्यक्तिमत्व नसल्याचा शाप लागलाय की काय असा संशय यावा अशी मंडळी सिनेमात मुद्दाम घेतात बहुदा. आणि रंग रूप याबाबतीत मराठी प्रेक्षकांनी जितका समजूतदारपणा दाखवलाय ना, त्यापेक्षा कोणीही दाखवला नसेल. अशोक सराफ यांचा सिनेमा बघायला जाताना मनाशी खूणगाठ असायची की एका चतुरस्त्र अभिनेत्याला बघायला आंपण जातोय. पण म्हणून त्यातून मराठी सिनेमावाल्यांनी व्यक्तिमत्व हा विषय ऑप्शनला टाकलाय की काय असं वाटून जातं. हिंदीत परेश रावलला, पंकज त्रिपाठीला गेलाबाजार राजकुमार रावला बघायला लोक गेले किंवा मल्याळम लोक मोहनलालला, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात असामान्य काहीतरी होतंच ना!!! मुळात कुरूप असणारा घायलमधला ओम पुरी काही प्रसंगांमध्ये होता पण सनी देओलच्या तोडीस तोड होता.
मान्य चोखामेळा म्हणून गेले असतील, "काय भुललासी वरलीया रंगा" पण पॅकेजही नीट नसावं याला काय म्हणावं? यांना शिकायचं काहीच नाही आणि आम्ही अस्मिता या नावावर यांना बघायला जायचं. लोकांना मूर्ख बनवायलाही आपल्याकडे अक्कल लागते. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांना मूर्ख समजून चालत नाही.

नाव: अनंत अंबानी
वडिलांचे नाव: मुकेश अंबानी
वडिलांची संपत्ती: $116 अब्ज
जगातील सर्वात श्रीमंत रँक: 11 वा
लग्नाचा खर्च: 5,000 कोटी रुपये😱
एवढी मोठी संपत्ती असूनही हा व्यक्ती वयाच्या २९ व्या वर्षी टक्कल पडण्यापासून स्वतःला वाचवू शकला नाही. 😑
आणि तुम्ही "आदिवासी तेल" लावून तुमचे केस गळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहात का?🤔
कोणाच्याही फंदात पडू नका, बिकाऊ इन्फ्लुएंसरर्स, अभिनेत्यांपासून स्वतःला वाचवा, कारण कोणीतरी तुम्हाला फसवण्यासाठी त्यांना मोठी रक्कम देत आहे.🙏

रतन टाटा : एक दीपस्तंभ - शंतनू नायडू
https://amzn.to/3AnmCpi
आपल्या आयुष्यात कोण येणार हे नियती ठरवत असते. नियतीचे फासे फिरले की अशक्य गोष्टी शक्य होतात असं वाटतं. शंतनू नायडू या तरुणाबद्दल ऐकलं आणि वाटलं जगात चांगला विचार करून काम केलं की आपल्याला सहज न वाटणारी गोष्टही सहज भेटून जाते मग सगळं आयुष्य स्वप्नवत वाटावं असंच पुढे घडत जातं. आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर कोण आणि कधी भेटेल हे कुणीच सांगू शकत नाही. व्यक्ती निःस्वार्थ भावनेतुन भेटली की ती भेट आणि तो क्षण कायमस्वरूपी आनंददायी होतो. खरंतर आपल्याकडे डायरी लिहिण्याची सवय अनेकांना होती तीच ही डायरी आणि त्यातीलच हे प्रसंग आहे. आठवणीच्या गावी माणूस रमतो आणि ते आठवत असतांना त्याला जे गवसतं त्यात सच्चेपणा आणि साधेपणा असतो. असच काहीसं हे पुस्तक शंतनू नायडू याने लिहिलेले रतन टाटा : एक दीपस्तंभ लगेच वाचून झालं.
रतन टाटा एक दीपस्तंभ या पुस्तकातील २४० पानात कितीतरी सुंदर अनुभव शब्दबद्ध केले हे आपल्या प्रत्येकाला वाचतांना जाणवतं. प्रत्येकात एक शंतनू दडलेला आहे आणि रतन टाटा या नावाच्या कोंदणात राहून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे खरतरं कुणालाही शक्य नाही पण शंतनू नायडू याने ते केले आणि म्हणून तो टाटा या वलयात घडत गेला आणि घडतोय. बेघर कुत्र्यांप्रती असणाऱ्या समवेदनेतून शंतनूने मेल करणं काय किंवा मग बॉम्बे हाऊसला रतन टाटा यांना पहिल्यांदा भेटणं असो किंवा मग त्याच बाँबे हाऊसमधील कायमचा होणं काय हा प्रवास वाचून आपण समृद्ध होत जातो.
रतन टाटा यांच्याशी शंतनू नायडू याची झालेली पहिली भेट त्यातून पहिल्या भेटीचा फोटो आणि मग मैत्रीचं नातं. शंतनू त्यावेळी विशीतला तरुण होता आणि वेगाने धावणाऱ्या गाड्यांच्या चाकांखाली चिरडल्या जाणाऱ्या स्थानिक भटक्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्याने एक अभिनव योजना शोधून काढली. तो सगळा प्रवास मुळातून वाचण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. स्वतः रतन टाटांना भटक्या कुत्र्यांबद्दल अतोनात कणव असल्याने त्यांनी शंतनूच्या कृतीची दखल घेतली आणि तो संपूर्ण प्रवास वाचत असतांना वाचकाला प्रेरणा आणि समाज हितासाठी काही तरी करण्याची उर्मी देणारा अनुभव आपल्याला मिळतो. शंतनू याची काम करण्याची जिद्द आणि चिकाटी बघून टाटांनी प्रभावित होऊन त्यांनी शंतनूच्या व्यवसायात पैसे तर गुंतवलेच पण कालांतराने ते शंतनूचे गुरू, बॉस आणि अनपेक्षितपणे प्रिय मित्रसुद्धा झाले, पण हे एका रात्रीत किंवा स्वप्नवत वाटावं असं अजिबात नाही. प्रसंगी त्यालाही बोलणी खावी लागली, त्यालाही ओरडा खावा लागला तो पण अस्वस्थ झाला पण हे सगळं होत असताना त्याच्या बरोबर रतन टाटा हे अमृत होतं आणि रतन टाटांच्या परिसस्पर्श त्याला लाभत असतांना तो स्वतःत बदल करत होता. याच पुस्तकातील अनेक घटना प्रसंग मन स्पर्शून जाणाऱ्या आहे. नॅनोची संपूर्ण वाटचाल एका लेखात वाचतांना आपलीच आपल्याला लाज वाटते आणि नकळत डोळे पाणावतात.
रतन टाटा यांनी त्याला वेळोवेळी काही छान आणि प्रभावी विचार दिले, या पुस्तकात ते मुळातून वाचनीय आहे पण मला आवडलेला इथे देतोय ते त्याला म्हणाले आणि हे आपल्यापैकी प्रत्येकाला लागू होईल. 'शंतऽनू, हे बघ, कित्येकदा, आपली सगळी कामं होतील आणि बरेचदा तशी ती होणार नाहीत. जेव्हा तशी ती होणार नाहीत तेव्हा काहीही झालं तरी ते काम उरकून टाकायचंच असं मनात ठेवू नको. आलं लक्षात?' किती मोलाचा संदेश टाटांनी दिला.
एका संध्याकाळी शंतनू ने त्यांना सांगितलं की, ‘मी जेव्हा पुस्तक लिहिन तेव्हा त्यांची ही दुसरी बाजू त्यात मांडेन. ऐतिहासिक घटना किंवा व्यावसायिक क्षेत्रात मिळवलेलं यश याबद्दल त्यात लिहिणार नाही. आम्हा दोघांबद्दल, आम्ही एकत्र केलेल्या अनेक गोष्टींबद्दल मी लिहिन. माझ्या नजरेतून ते कसे दिसतात, जगाला अपरिचित असणारे त्यांच्या स्वभावाचे कंगोरे कोणते आहेत, अशा गोष्टी मी त्यात लिहिन. 'व्यावसायिक दिग्गज' या खंबीर पोलादी भिंतीमागचं आयुष्य मी पाहिलं होतं. लोकांच्या हे लक्षात येत नाही की त्यांनाही मन आहे. त्यांना हसू येतं, रडू येतं, ते उद्विग्न होऊ शकतात. त्यांची वृत्ती आणि भावभावना बदलू शकतात, चिंता त्यांना जाळू शकते, आनंद त्यांना सुखावू शकतो.’
त्याच्या बोलण्याला होकार देत ते म्हणाले, 'मुला, कुठलंही एक पुस्तक प्रत्येक बाजू समोर आणू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचे वेगळे आयाम असतात, लेखक वेगळे असतात, दृष्टिकोन वेगळे असतात. कदाचित तीन, चार, पाच... वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. हे बघ, तू तुझं काम कर. स्वतःचा दृष्टिकोन मांड. ' आणि शंतनूच्या दृष्टीकोनातून अनुभवलेले टाटा अनुभवण्यासाठी हे आवर्जून वाचायला हवे.

स्वतः शंतनू पुस्तकाबद्दल लिहितो, या पुस्तकाचं विचाराल तर मनापासून या पुस्तकाची निर्मिती झाली असून त्यामागे केवळ आणि केवळ नितांत प्रेमच आहे. अजूनही कितीतरी गोष्टी मी लिहिलेल्या नाहीत. त्यांच्याकडून शिकून घेण्याचा खरा सोहळा, देशासमोर असणारी जी आव्हानं ते सोडवू पाहतात त्याकडे पाहणं, त्यांच्याकडून किमान एखादं वाक्य तरी कानावर पडावं यासाठी सतत आतुर असणाऱ्या तरुणाईशी जोडून घेणं, मैत्रीभाव आणि परस्पर सहृदयता, त्यांच्या कीर्तीला, उज्वल यशाला अनुसरून शक्य त्या मार्गाने त्यांना साहाय्य करणं, व्यवसायाशी कमी निगडित असणारी आणि समाजाला अधिकाधिक मदत करणारी आणखी एक परंपरा निर्माण करणं; अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात असू शकतो. त्यांच्या संदर्भात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईतून ते तावून सुलाखून बाहेर आलेले त्याने पाहिलं आहे. त्यांचा डौल आणि प्रतिष्ठा त्यांनी कुठेही कमी होऊ दिलेली नाही. ते रागावलेले आणि संतापलेले त्याने पाहिलं आहे; पण दुःखी-कष्टी होऊन बसलेले फारच क्वचित पाहिले आहे. त्यांना शिटी वाजवताना पाहिलं आहे, मिश्कीलपणा करताना पाहिलं आहे. स्वतःच्या पूर्वानुभावांमध्ये हरवून जाताना पाहिलं आहे, त्यांच्या नजरेतली चमक पाहिली आहे. त्यांच्या दृष्टीत साठलेली समानुभूती पाहिली आहे. आकाशाकडे नजर टाकताना त्यांना पाहिलं आहे. आजवर केलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रवासात ते त्याच्याबरोबर होते, कित्येकदा तो पडला, धडपडला, सोडून दिलं; त्या प्रत्येक वेळेस ते बरोबर होते. त्यांच्यापासून अतोनात दूर असलेले देशवासी जेव्हा त्यांना खंबीर आणि तेजस्वी स्वरूपात पाहतात तेव्हा तो त्यांच्यासोबत होता. सातत्याने इतरांना मार्गदर्शन करणाऱ्या, प्रकाशशलाका भासणाऱ्या या व्यक्तीच्या संपर्कात ज्या दिवशी शंतनू आला, तो दिवस तो कधीच विसरू शकणार नाही. त्यांना पाहून त्याला दीपस्तंभाची आठवण झाली होती आणि रतन टाटा नावाचा दीपस्तंभ ज्या दिवशी त्याला गवसला होता तोच त्याचा सुदिन.
lरतन टाटा एक दीपस्तंभ अतिशय प्रामाणिक भावकथा आहे. एकविसाव्या शतकातला तरुण आणि ऐंशीच्या दशकातला तपस्वी यांच्यातल्या अनोख्या नात्याची वीण आपल्यासमोर येते आणि त्यातूनच भारताचा लाडका मेरूमणी आपल्यासमोर वेगळ्याच प्रकाशात झळकतो आणि रतन टाटा यांनी स्वतः या पुस्तकाचे संपूर्ण हस्तलिखित वाचले आहे. मूळ पुस्तक i came upon a lighthouse हे इंग्रजी आहे पण याचा स्वैर अनुवाद सुचिता नंदापुरकर यांनी देखणा आणि साजेसा केला आहे. मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात टाटा येणार आणि येतील आपल्यालाही शंतनू नक्की होता येईल फक्त तसे प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठीच रतन टाटा एक दीपस्तंभ वाचून संग्रही असावे असेच आहे आणि भेट देण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे.
सर्वेश फडणवीस

🏮🏮🧆🌮🧈🧆🌮🧈🏮
सस्नेह नमस्कार,
आज सणांचा
राजा असा दीपोत्सव आजपासून सुरु होत आहे .
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा व आनंदाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपणास व आपल्या परिवारास *आनंदी, भरभराटीची, प्रगतीची, आरोग्यदायी* जावो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

लाडू सांगतो एकीचे बळ
चकली म्हणते वळणावरती मागे न फिरता पळ
करंजी सांगते सगळं काही पोटात घ्या...
शंकरपाळी म्हणते चारी बाजूनी विचार करा...
चिवडा सांगतो तिखट मिठाशिवाय आयुष्याला नाही गोडवा...
रांगोळी म्हणते स्वप्नात सुध्दा रंग भरा...
आकाश कंदिल सांगतो घ्या आकाशात उंच भरारी ..
उटणे म्हणते सुगंध होवून दरवळत रहा...
पणती सांगते दुसर्यांसाठी स्वतः जळायला शिका, अंधारावर मात करा...
*आपल्याला व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*!! 🪔
*🙏🌹 🌹🙏*