Devendra Fadnavis
4.38K subscribers
83.8K photos
14.7K videos
3K files
8.08K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Pained and shocked to know about Air India passenger flight incident at Ahmedabad airport.
Praying for everyone’s safety 🙏
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Slum Rehabilitation Authority
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक

🕑 2pm | 12-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २ वा. | १२-६-२०२५ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठकी'दरम्यान 'झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई'च्या मोबाईल ॲपचे उदघाटन केले. या अ‍ॅपद्वारे नागरिक, विकासक, आर्किटेक्ट्स आणि प्रकल्पग्रस्त व्यक्तींना योजनांची माहिती, अर्जाची स्थिती, सरकारी परिपत्रके आणि ताज्या घडामोडींची माहिती एका ठिकाणी सहजपणे मिळू शकते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'संकल्प 100 दिवसांचा ध्यास पुनर्विकासाचा' या पुस्तिकेचे प्रकाशन केले.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting to assess the progress of administrative and revised approvals for various Water Resources Department projects, along with MoUs related to the pump storage policy.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागातील विविध प्रकल्पांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता आणि सुधारित प्रशासकीय मान्यता तसेच पंप स्टोरेज धोरणासंदर्भात सामंजस्य करारांच्या प्रगतीची आढावा बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में जलसंपदा विभाग में विभिन्न परियोजनाओं को दी गई प्रशासकीय मान्यता, संशोधित प्रशासकीय मान्यता और पंप स्टोरेज नीति के संबंध में समझौता ज्ञापनों की प्रगति को लेकर समीक्षा बैठक

🕞 3.20pm | 12-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.२० वा. | १२-६-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #WaterResources
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding the MHADA Projects. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडा प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में म्हाडा परियोजनाओं…
CMO Maharashtra Tweets:

बीडीडी चाळ, पत्राचाळ व वसाहतींच्या पुनर्विकासाला गती; म्हाडाच्या सुधारणांचा नवा आराखडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे आज म्हाडाच्या विविध प्रकल्पांच्या आणि अधिनियमांतील सुधारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेसह मुंबईतील विविध वसाहती व प्रकल्पांचा प्रगतीचा समावेश होता. म्हाडाच्या अधिनियमांतर्गत सुधारणा करताना बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणाऱ्या विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करण्याचा तसेच अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर संक्रमण शिबिरासाठी किंवा सोडतीद्वारे विक्रीसाठी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. विनिमय 33(4), 33(5), 33(7), 33(9) आणि 33(24) अंतर्गत सुचवलेल्या सुधारणांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

वरळी बीडीडी चाळीत 9869 पुनर्वसन सदनिकांपैकी 3888 सदनिकांचे काम प्रगतीपथावर असून त्यापैकी 556 सदनिकांचे हस्तांतरण येत्या दोन आठवड्यांत होणार आहे. 1419 सदनिका सप्टेंबर 2025 पर्यंत आणि 1642 सदनिका ऑगस्ट 2027 पर्यंत हस्तांतरित होणार आहेत. नायगाव बीडीडी प्रकल्पात 3344 पैकी 1938 सदनिकांचे काम सुरू असून त्यातील 864 सदनिका सप्टेंबर 2025 मध्ये देण्यात येणार आहेत. ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीत 1241 सदनिकांचे काम सुरु असून त्यातील 342 सदनिका डिसेंबर 2025 पर्यंत हस्तांतरीत होणार आहेत. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर पत्राचाळ प्रकल्पातील मूळ 672 सभासदांना सदनिकांचे हस्तांतरण पूर्ण झाले असून 1243 नवीन सदनिकांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.

तसेच, सुरभी गृहनिर्माण संस्था, पोलीस वसाहती, आराम नगर, मोतीलाल नगर, अभुदय नगर, वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर, जीटीबी नगर सायन कोळीवाडा, पीएमजीपी वसाहत, पूनम नगर आणि मुंबई महानगर ग्रोथ हब या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांनी म्हाडाने अधिक परिणामकारक आणि नागरिकांना परवडणाऱ्या गृहनिर्माण संधी निर्माण करण्यासाठी त्वरित व योग्य सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #MHADA
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Slum Rehabilitation Authority 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण…
CMO Maharashtra Tweets:

डोंगरावरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक पार पडली. यावेळी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरावर बऱ्याच झोपडपट्ट्या आहेत. अशा झोपडपट्ट्या पावसाळ्याच्या दिवसात भूस्खलन तसेच दरड कोसळल्याने धोकादायक ठरतात. डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे व पात्र झोपडपट्टी धारकांचे त्यांच्या सध्याच्या निवासाच्या नजीकच पुनर्वसन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पात्र झोपडीधारकास प्रशस्त घर मिळून देत, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी कार्य करावे. प्राधिकरणाने आपल्या संकेतस्थळावर नागरिकांना आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून द्यावी. माहितीच्या अधिकारात कुणालाही माहिती मागण्याचे काम पडू नये, अशी व्यवस्था करावी.

अहमदाबाद येथील भास्कराचार्य अंतराळ अनुप्रयोग आणि भू - सूचना संस्थेच्या माध्यमातून विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन केंद्र (एमआरसॅक) च्या सहकार्याने
अतिक्रमणाबाबत अलर्ट देणारी यंत्रणा निर्माण करावी. ही कार्यप्रणाली कांदळवन अतिक्रमणबाबत पण लागू करावी. अशी यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असावी. अशा यंत्रणेमुळे अतिक्रमण करण्यास अटकाव करता येणे शक्य होईल. ही संगणकीय प्रणाली पीएम गतिशक्ती पोर्टलशी संलग्न असावी. तसेच संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासाठी कार्यान्वीत करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

बायोमेट्रिक पद्धतीवर आधारित घरोघरी सर्वेक्षणाचे काम डिसेंबर पर्यंत संपवावे. बंद असलेल्या झोपड्या 'रेकॉर्ड'वर आणाव्यात. नियोजन करताना अशा बंद झोपड्यांचा समावेश त्यामुळे करता येईल, पुनर्वसनाची योजना राबवताना संयुक्त भागीदारीतून विकासाला प्राधान्य द्यावे. यामध्ये यंत्रणांनी प्राधान्याने काम करावे. जर यंत्रणा काम करत नसेल, तर त्यांच्याकडून ते काढून नियमित तत्त्वावर पुनर्वसन योजना राबवावी. समूह पुनर्विकास योजनेमध्ये सर्व सुविधा देण्यात याव्यात. यासाठी चांगल्या सल्लागाराची नियुक्ती करावी. चटई निर्देशांक हा समूह विकासामध्ये वापरण्यासाठी देण्यात यावा. मुंबई महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सेल तयार करून या सेलच्या माध्यमातून समूह विकास (क्लस्टर) योजनेला गती द्यावी. रमाबाई आंबेडकर नगरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन लवकर पूर्ण करा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

समुद्राकडील जागेचा पुनर्वसनासाठी उपयोग करताना त्यातील अडथळे दूर करावे. पुणे शहरामध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. त्यांना भाडे पद्धतीने किंवा अन्य पर्यायांचा अवलंब करून घरे देण्यात यावीत. पुणे शहरातील नदी काठावरील नागरिकांना पुराच्या पाण्याचा नेहमी सामना करावा लागतो. अशा नागरिकांचे योजनेद्वारे पुनर्वसन करावे. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the demands of Matang Community
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मातंग समाज की मांगों को लेकर बैठक

मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न
बार्टीच्या धर्तीवर 'आर्टी' संस्थेचे सक्षमीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मातंग समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ (Annabhau Sathe Research and Training Institute) संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात येणार असून, मातंग समाजाच्या संघटनांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात बदर समितीकडे सादर कराव्यात. या समितीच्या अहवालात आपल्या मागण्या समाविष्ट करता येतील. सन 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरणात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत जामीनदाराच्या अटी शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 'आर्टी' संस्थेसाठी वेगळे लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून यासाठी पुरेसा निधी देण्यात येईल, तसेच आर्टी संस्थेचे मुख्यालय पुणे येथे करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी मंत्री गिरीश महाजन, आ. सुनील कांबळे, आ. नामदेव ससाने, आ. अमित गोरखे व मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🕓 3.50pm | 12-6-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.५० वा. | १२-६-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai