नातं म्हटलं की त्यात तीन गोष्टी प्रामुख्याने येतात. पहिली म्हणजे विश्वास, सहवास आणि समजूतदारपणा. जर विश्वासाचा पाया भक्कम असेल तर नात्याची इमारत उभी राहते. सहवासाचं कोंदण असेल तर नाते फुलते आणि समजूतदारपणा असेल तर संशय निर्माण होत नाही. समजूतदारपणा ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण आपल्यापेक्षा समोरच्याच्या मनाचा जास्त विचार करतो. या मध्ये दोन शक्यता असतात. त्यातली पहिली अशी की आपला समंजस स्वभाव हा कोणालाही आपलासा वाटतो आणि दुसरी शक्यता अशी असते, काही गोष्टी या पटल्या जरी नाही तरी सोडून द्याव्या लागतात. या वर आपले व.पु. म्हणतात, " शेवटी ज्या माणसाजवळ जास्त understanding आहे, त्यालाच आपला अट्टाहास काही प्रमाणात सोडावा लागतो.." अहो, नातं महत्वाचं असेल, व्यक्ती महत्वाची असेल तर या गोष्टी ओघाने कराव्याच लागतात. आपल्याला नेहमी वाटते, सर्व माणसं सुखात असावीत, त्या साठी आपण प्रयत्न देखील करतो पण प्रत्येकाची सुखाची, आयुष्य जगण्याची व्याख्या ही वेगळीच असते ना!! ती जर आपल्या व्याख्येनुसार नसेल तर तिथे मात्र आपला अट्टाहास सोडणं भाग असतं..
विवाह हा असा संस्कार आहे, ज्यामध्ये फक्त मुलगा मुलगीच नाही तर दोन कुटुंबं एकत्र येतात. जशी हाताची पाच बोटे सारखी नसतात तसंच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. त्यामुळे रुसवे फुगवे, मतभेद हे होत असतातच. पण मन सांभाळताना जेव्हा स्त्री किंवा पुरुष हे कात्रीत सापडतात तेव्हा समजूतदारपणा कुठे दाखवावा हा प्रश्न पडतो. स्त्रीच्या बाबतीत विचार केला तर तिला दोन्ही घरातील माणसं जपावी लागतात. या वर देखील व.पुं.नी मांडलेला विचार खरच चिंतनीय आहे, " ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षांचं प्रेम हवं असतं, त्यांचं घर कायम वणव्यात बांधलेलं असतं. आयुष्यभर होरपळणं.." आपण म्हणतो, समजूतदारपणा हा स्वभावात असावा, पण तो इतकाही असू नये की मनाने दिलेला कौल देखील ऐकू येणार नाही. समंजस व्यक्ती या बऱ्याचदा शांत असतात. पण त्यांची शांतता ही समजून घ्यावी लागते. व.पुं.नी हे जे काही लिखाणाचे भांडार आपल्यासाठी खुले केले आहे त्यामध्ये समजूतदारपणा म्हणजे काय? तो नात्यात किती असावा याचे सुरेख विश्लेषण केले आहे.
समजूतदारपणा सोबतच संसार कसा यशस्वी होतो या वर देखील व.पुं.नी अतिशय साजेसे विचार व्यक्त केले आहेत. दिवसभरात कितीही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या किंवा अपमानाचे प्रसंग आले तरी त्या गोष्टी त्याच दिवशी संपवून दुसरा दिवस हा नवी आशा घेऊन उगवतो हे या विचारावरुन पटते, " एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनानं स्वागत करायचं. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही.."
... मानसी देशपांडे

!! येत्या काही दिवसात संपुर्ण महाराष्ट्रात ऊन्हाळ्याचा पारा वाढणार आहे, शक्यतो सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळी घरातून बाहेर पडू नका.जरूरी असल्यास,घरातून बाहेर पडताना आपल्या उजव्या कानात कापसाचा एक छोटासा बोळा ठेवा . यामुळे डावी नाकपुडी सुरू होईल .ही चंद्रनाडी असल्याने शरीर थंड होण्यास मदत होईल. ऊन्हाने होणार्या मायग्रेन, हार्टस्ट्रोक , पित्त ,हाय बी.पी.चक्कर येणे ह्या सारख्या विकारा पासून तुम्हीं सुरक्षित रहाल. हा उपाय नक्की करा. जान हैं तो , जहांन हैं . !!
इवलंसं रोपटं मी तू म्हणालास तर मरून जाईन ओंजळभर पाणी दे मला आयुष्यभर तुझ्या कामा येईन दिलं जीवदान मला तर तुला जगायला प्राणवायू देईन जगवलंस मला तर तुझ्या देवांसाठी फुलं देईन फुलवलंस मला तर तुझ्या मुलांसाठी फळं देईन तळपत्या उन्हामध्ये तुझ्या कुटुंबाला सावली देईन तुझ्या सानुल्यांना खेळावया माझ्या खांद्यावर झोका देईन तुझ्या आवडत्या पाखरांना मायेचा मी खोपा देईन कधी पडला आजारी तर तुझ्या औषधाला कामा येईन झालो बेईमान जरी मी शेवटी तुझ्या सरणाला कामा येईन .... .. एक ईवलंसं रोपटं
गुलाबाची शेज
इतका मान कधीच मिळाला नाही,
असं नेमकं आज काय घडलंय?
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
बोलावून बोलावून थकले होते,
आज तर भाऊ, वहिनी ,भाच्या सहित घर भरलंय.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
आज कोणी चहासाठी उठवलं नाही.
जेवण बनवायला सांगितलं नाही.
अगदी बुट सुद्धा धुळखात पडले तरी कुणी रागवलं नाही.
आज तर सगळ्यांचंच वागणं मला खटकलंय.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
ज्या गालांवर अश्रूंचे सागर ओघळले,
त्या गालावर आज चुंबनांचा पाऊस पडतोय.
आटोप आटोप म्हणणारे आज,
चुड्या पैठणीचा आग्रह धरताय.
माझ्या सौंदर्याचं सगळ्यांनाच का पडलयं..?
उठून बघते तर शरीर माझं थंडगार पडलंय.
जग माझ्यासाठी कधीच नव्हतं रडलं.
मला तर खूप आनंद ,असं कधीच नव्हतं घडलं.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
किती त्या जबाबदाऱ्या ,
अन् डोक्यावर नेहमी टांगती तलवार.
पाकळ्यांवर झोपले आज, तरी नाही कुणाचा वार.
काट्या विना गुलाबाची शेज आज तर अनोखं घडलंय.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
हंबरडा फोडतांना आपले परके सगळेच दिसतायं.
तरीही पान्हा फुटत नाही आता बंधन नकोशी वाटतायं.
असं कसं आज मुक्त झाल्यासारखं वाटतंय.
उठून बघते तर शरीर थंडगार पडलंय.
- प्रतिभा पाटील... ( नाशिक )

चूक...
"चूक झाल्यावर सोडून तर सगळेच जात असतात...
"आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती अशी शोधा जे चूक झाल्यावर तुम्हाला समजून सांगेल अन् कायम साथ देईल"....!!
"आयुष्यामध्ये वापर करून घेणारे भरपूर भेटतील.अन् आयुष्याची दिशाभूल करणारे सुद्धा भरपूर भेटतील...
"पण चुका झाल्यानंतर समजून घेणारे अन् समजून सांगणारे फार खूप कमी असतात".....!!
"आयुष्यामध्ये योग्य वाट दाखवणारे फार कमी असतात"....!!
अन् आयुष्याची वाट लावणारे भरपूर असतात....
"जे निस्वार्थपणे कायम साथ देतात.अन् योग्य दिशा दाखवतात...
"अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवापाड जपावं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत"....!!