राजा शिवछत्रपती
359 subscribers
3 photos
3 files
6 links
जय शिवाजी ।।

जय जिजाऊ ।।

जय संभाजी ।।

जय महाराष्ट्र ।।

जय हिंद ।।

जय जगत् ।।
Download Telegram
🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
शिवजन्मोत्सव विशेष

युगपुरुष शहाजी राजे भोसले

राज्यव्याप्ती:- पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
पूर्ण नाव:- शहाजीराजे मालोजीराजे भोसले
पदव्या:- सरलष्कर
जन्म :- मार्च १५, इ.स. १५९४
मृत्यू :- जानेवारी २३,इ.स. १६६४
होदिगेरे (चन्नागरी जवळ)
उत्तराधिकारी:- व्यंकोजी भोसले तंजावुर
छत्रपती शिवाजीराजे भोसले, पुणे
वडील:- मालोजीराजे भोसले
आई:- उमाबाई
पत्नी:- जिजाबाई, तुकाबाई
संतती:- संभाजीराजे भोसले (थोरले),
छत्रपती शिवाजीराजे भोसले,
व्यंकोजी भोसले,
कोयाजी,
सन्ताजी
राजघराणे:- भोसले
चलन:- होन
शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.

जन्म :-
मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई(उमाबाई)हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी राजे भोसले यांची मुख्य राणी उम्मवा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.[१]

पार्श्वभूमी
राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. *त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली*. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

अहमदनगरच्या निजामशाहीत
मालोजीराजे भोसले आपला भाऊ विठोजीराजे भोसले इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहजींचे पिता मालोजीराजे यांनी लाखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली.

भातवडीचे युद्ध
मुघल शहेनशाहने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह निझामशाही संम्पवण्यासाठी दक्षिणेस पाठविले, त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १० हजार स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर्-दक्षिण वहाणा-य मेखरी नदीजवळ छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला काळजीपुर्वक असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वी छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.निजामशहीची अखेर
नन्तर निजामशही वझीर, जहान खानने, निजामाला मारले, आणि शहाजीराजाना निजामशहीत मिळवले. शहाजहानने दरम्यान सगळ्या निजामशहीतील पुरुषाना ठार करवले, जेणे करुन निजामशहीला वारस रहाणार नाही. तेव्हा शहाजीराजानी, निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादिवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला , व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. त्यानी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.

शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही, आदिलशही संपवण्यासाठी पाठवली तेव्हा घाबरुन आदिलशहा, शहाजहानला मिळाला. शहाजी व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजीने नेटाने लढा चालू ठेवला. दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहिल आणि शहाजी आदिलशहीत मिळेल. सावधगिरी म्हणुन शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जह
ागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तोही त्यांच्या कडेच् ठेवला.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यानी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्याना माण्डलिक ठेवले, जेणे करुन गरज पडली तेव्हा हे राजे त्यांच्या मदतीला आले.

हिंदवी स्वराज्य
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.

शिवाजी महाराजांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.तसेच जेव्हा अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा, अफझलखानाची दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज बिजापुर बाहेर खडी ठेवली होती.

शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही,मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,

इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ - आदिलशाही
इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ - निजामशाही
इ.स. १६३० ते इ.स. १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ - निजामशाही
इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ - आदिलशाही
पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे बांधली.

t.me/espardha
शिव दिनविशेष
२१ फेब्रुवरी १७०७

औरंगजेबाचा नगरला दुपारी साधारण १२ वाजता मृत्यू. खुल्दाबाद येथे कबर.
श्री शिवछत्रपतिंच्या मृत्यूनंतर दख्खनेमध्ये उतरलेला मुघल पादशहा अखेर २७ वर्षे झूंझुन महाराष्ट्राच्या माती मध्येच दफ़न झाला.
Forwarded from रोजगार संघ
Forever Shining Srat of Maharashtra: Chtrapati Shivaji Maharaj
-----------=-----------=------------=----------
शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. १८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
........NATHE GROUP
★★★ राजाशाहुछत्रपती ★★★

============================================

"The primary task of a leader is to bring a feeling of goodness into the people he leads. A true leader creates a renaissance – a reservoir of positivity that frees the best in people and allows them to achieve extraordinary results."

वरील वाक्याचा मराठी अर्थ म्हणजे “राजाशाहूछत्रपती”.
============================================

शाहू महाराज, म्हणजे मराठा साम्राज्याचे छत्रपती. शाहू महाराजांविषयी अनेक इतिहासकारांनी विविध पद्धतीने त्यांच्या इतिहासाची मांडणी केली. परंतु मला त्यांच्या छत्रपती म्हणून घडलेल्या इतिहासावर जास्त काही बोलायचं नाही. एखादा मनुष्य एवढे मोठे साम्राज्य उभे करतो त्याच बरोबर असंख्य सेनान्यांची फौज उभी करतो आणि त्यांच्याकडून असामान्य कर्तुत्व घडवून आणतो. यासाठी तो माणूस घडला कसा हे जाणून घेणं म्हत्वाच.

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ११ मार्च १६८९ रोजी झाली. परंतु मराठा राज्याची राजधानी रायगड काबीज केल्याशिवाय मराठयांच संकट संपूर्ण संपणार नाही याची जाण औरंगजेब बादशहास होती आणि त्याने झुल्फिकारखानास रायगडास वेढा देण्यास पाठवले.

२५ मार्च रोजी रायगडास वेढा पडला. किल्ला जोमाने लढवला, खजिन्यातला पैसा संपत होता, फौज मोडून पडत होती, अनुभवी माणसे मरून पडतं होती. किल्ला लढवणे शक्य नव्हते हे जेव्हा लक्षात आले त्यावेळी एक स्त्री जी खंबीरपणे निर्णय घेण्यास उभी राहिली ती म्हणजे "त्यागमूर्ती महाराणी येसूबाईसाहेब". पतीची झालेली क्रूर हत्या, राज्यात होत असलेल्या रयतेच्या कत्तली, पिकांची होत असलेली नासधूस, आणि खुद्द मोगल बादशहा औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी समोर उभा होता. स्वतःच पोरं (शाहू महाराज) ज्यांचे वय अवघे सात-आठ वर्षे आणि सावत्र दीर राजाराम महाराज यांचे वय एकोणविस. औरंगजेबाच्या हाती लागल्यावर जिवंत राहण्याची सूद्धा शक्यता नव्हती अशा वेळी महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांना किल्ल्याच्या बाहेर सोडण्याची धडपड सुरु केली.

अतिशय मुत्सद्दी झुल्फिकारखानाचा वेढा गडाला आहे. कधीही गड पडू शकतो याची जाण येसूबाईसाहेबांना होतीे. पतीला जाऊन एक महिना सूद्धा झाला नव्हता. काही महिन्यांपूर्वी मराठा राज्याची राणी असलेल्या येसूबाई आज तेच स्वराज्य वाचवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. काय मानसिकता असेल त्यांची. स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाच्या जीवाची काळजी न करता त्या आपले सावत्र दीर राजाराम महाराज यांना रायगडावरून बाहेर पडून कर्नाटकात जावून तिथून स्वराज्याचे कार्य चालू ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. व्यक्तिनिष्ठ असण्यापेक्षा राज्यनिष्ठ असावे हीच शिकवण शिवाजी महाराजांची होती जी पुढे येसूबाई साहेबांनी चालवली. परंतु येसूबाई साहेबांना मागे एकटे ठेवून जाण्यास नक्कीच राजराम महाराजांच्या जीवावर आले असणार ते म्हणतात,

“....राज्याचे अधिकारी शिवाजीराजे पूर्वीच तेच हे ऐसे लक्ष ठेवून, आम्ही कारभारी, आमचे आज्ञेत राहू .....”

शिवाजी महाराज आग्र्यातून सुटून येताना काळजावर दगड ठेवून शंभू महाराजांना गुप्तपणे तिथेच ठेवून राजगडास आले तसेच येसूबाईंनी स्वतःच्या मुलाला आणि स्वतःला कैद होणार हे माहित असूनही राजाराम महाराजांना निसटून जाऊन राज्य चालवावे अशी विचारसरणी ठेवतात. या दोन्ही घटनांना इतिहासात एकाच पातळीचं स्थान आहे हे विसरून चालणार नाही.

वरील प्रसंग पाहता सात-आठ वर्षांच्या त्या बाल शाहुंवर काय परिणाम झाले असतील याचा विचार होणे अतिशय महत्वाचे आहे. वडिलांची झालेली क्रूर हत्या, आईची राज्य वाचवण्यासाठी चालेली धडपड, काकांचे गडावरून जाणे. पुन्हा भेट होईल की नाही याची कल्पना सुद्धा नाही. ज्या वयात एक राजशिक्षण होणे जरुरू होते त्या कोवळ्या वयात शाहू महाराज ज्या परिस्थितीतून जात होते तीच परिस्थिती त्यांना मानसिक दृष्ट्या बळकट बनवत होती.

एकंदरीत मराठ्यांचा राजा शाहू आणि महाराणी येसूबाई यांची अशी दयनीय स्थिती झाली होती की ज्या राज्याचे ते स्वामी होते त्याच राज्यात त्यांना कैदी म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या आणि दुसऱ्याहून तिसऱ्या अशी भटकंती करावी लगत होते. तरीसूद्धा महाराणी येसूबाई यांनी स्वतःच्या आणि बालशाहुंच्या मानसिकतेवर जराही त्याचा परिणाम होऊ दिला नाही.

३ नोव्हेंबर १६८९ साली किल्ला मोगलांकडे गेला. मराठा राज्याची राजधानी त्याच राज्याची महाराणी एका कैद्याच्या रूपाने सोडावा? अशा परिस्थिती येसूबाई साहेबांचे शाहू महाराजांवरचे जे संस्कार होते आणि छत्रपती घराण्याचा वारसा ज्याला आपण रक्तातले गुण म्हणतो हे औरंगजेबाच्या कैदेत असताना सूद्धा दिसून येत होते. कैदेत असूनही राजाराम महाराजांना आपल्या वर्तमानाची बातमी पोहचेल अशी व्यवस्था लावून ठेवली होती आणि ती जबाबदारी भक्ताजी हुजरे व बांकी गायकवाड यांच्याकडे होती.

कुठेतरी येसूबाई साहेबांना एक आशा नक्कीच होती की राजाराम महाराज त्यांना
कैदेतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील आणि तो पुढे त्यांनी केला सूद्धा. परंतु आपले आणि राजारामाचे सबंध चांगले आहेत याची खबर औरंगजेबाला लागू नये याची काळजी सदैव त्यांना घ्यावी लागत असे. आणे हेच मुत्साद्दीचे वागणे शाहू महाराजांना या कोवळ्या वयात सूद्धा दिसून येते.

एकदा औरंगजेब बालशाहुंना म्हणतो, “राजे तुमचे वडील मारले असता तुम्ही नेकीने चालता, तुमचे चुलते यांनी तुमचे राज्य दौलत आटोपून आम्हासी ते लढता त्यास तुम्हास त्याजकडे लाऊन देतो जावे.” यावर बालशाहुंनी दिलेले उत्तर म्हणजे भविष्यातील छत्रपतीचा एक गुणच झळकतो. यावर शाहू उत्तर देतात,
शाहू म्हणतात:

“पूर्वी आमचे वडील हयात असता त्यास नजर बंदीत ठेवून आपण राज्य करावे असा राजारामाने बेत केला होता. त्याचे पश्चात आमचे इलाखा सूद्धा रायगडी टाकीत आपले काबिलेखसूद्धा निघोन गेले ... गाडी व शिक्के आपले नावे करून घेतले. आम्ही स्थानाकडे गेले असता आम्हांस नजरबंद ठेवतील. आपण (औरंगजेब) त्यांचे पारिपत्यकरून आम्हास राज्यावर बसवाल तेव्हा राज्य करू.”

औरंगजेब बादशहाशी बोलताना एवढी चतुराई आणि ते ही या बालवयात !!! यावरून येसूबाई साहेबांचे संस्कार आणि एकूण परिस्थितीची जाणीव आणि त्यानुसार आपली वागणूक ठरवणारे बालशाहू. आणि अशाच आपल्या निरलस वागणुकीने येसुबाईसाहेब आणि शाहूंनी बादशहा आणि बेगम (औरंगजेबाची मुलगी) यांची मर्जी संपादन केली होती. याचे उदाहरण म्हणजे शाहू महाराजांना अक्कलकोट, इंदापुर्म सुपे, बारामती व नेवासे या पाच परगण्यांची जहागीर करून दिली. एक सोन्याची तलवार, शिवाजी महाराजांची भवानी तलवार व अफझलखानची तलवार अशी बक्षिसे दिली. औरंगजेबाने शाहू महाराजांना सप्तहजारी मनसब दिली व येसुबाईंना कारभार पाहण्याचा अधिकार दिला. यासाठी येसूबाईसाहेबांना एक शिक्का दिला होता जो पारसीमध्ये होता.

“येसूबाई इ वालिदा शाहू राजा सन अहद” मराठीत “शाहू राजाची आई येसूबाई वर्ष पहिले”.

प्रशाषण आणि राज्यकारभार याचे शिक्षण येसूबाईसाहेब शाहू महाराजांना देत होत्या हे यावरून सिध्द होते. आणि एकूणच नाजूक परिस्थितीमध्ये योग्य ते शिक्षण व संस्कार घेवून शाहू महाराज घडत होते. कोणी एका सरदारामुळे किंवा प्रधानामुळे मराठा साम्राज्य उभे करण्यात शाहू महाराजांना यश आले असे म्हणणे ज्यांचे आहे त्यांनी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

एकंदरीत शाहूंचे कैदेतील जीवन हे पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे होते. त्यांना कुठेच बाहेर मोकळीक नव्हती. त्यांना औरंगजेबाने अनेक भेटवस्तू दिल्या परंतु पहारा हा सक्तच होता. जवळ-जवळ सर्व उमेदीचे आयुष्य हे कैदेत गेले परंतु येसूबाई साहेब ही एकमेव व्यक्ती होती जिने शाहूंना योग्य मार्गदर्शन करून स्वतःची ओळख विसरू दिली नाही.
४१ वर्षे राज्यकर्ते शाहू महाराज समजून घ्यायचे असेतील तर त्यांचे अटकेतील दिवस आणि येसूबाईसाहेबांचे संस्कार आणि त्यांची जडणघडण समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने शिवरायांना जिजाऊसाहेबांनी घडवले तसेच श्रेय येसूबाईसाहेबांना जात शाहू महाराजांना घडवण्यात.

राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांचे सबंध म्हणजे या जगाला एक नात्यातला गोडवा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे उदाहरण आहे, २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम महाराज मरण पावले. त्यावेळी रामचंद्रपंत त्यांच्या जवळ होते, त्यावेळी त्यांना महाराज म्हणतात,

“तुम्ही थोरले महाराजापासून राज्याचे साधनास श्रमसाहस करीत आलात व करीत आहात. आमचा तो काळ समीप आला. आमच्यामागे सर्वत्र मिळोनी हल्ली करता तसे करावे. शिवाजी महाराज (शाहू महाराज) सुटोन येत ते करावे ...” त्यांच्या एका पत्रात एक उल्लेख अगदी स्पष्ट आहे ...”कारण चिरंजीव राजश्री (शाहू) काळे करून तरी श्री देसी आणील .. ते (शाहू महाराज) मुख्य, सर्व राज्यास अधिकार, आम्ही करतो तरी ते त्याचे साठीच आहे.”

राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांच्यातील प्रेम दाखवणारी अजून एक घटना म्हणजे ज्यावेळी राजाराम महाराज गेले ही बातमी येसूबाईसाहेबांना आणि शाहू महाराजांना कळली त्यानंतर शाहू महाराजांना खूप ताप आला होता आणि आजारी पडले होते, हे ऐकून बेगम खूप घाबरली आणि त्यामुळे स्वतः औरंगजेब बादशहा शाहूंना भेटायला आला होता, त्यावेळी तो म्हणतो:

“मुमचा चिचा मर गया, उस वास्ते तुमरी ताबियेत बिघड गयी, आजार हुवा?” खरे कारण जरी हेच असले तरी शाहू महाराज अशा क्षणी सूद्धा अगदी मुत्सद्दीपणे औरंगजेबास उत्तर देतात ते म्हणतात “आमचा बाप व चीच्या आब खुदावंत! दुसरे कोणी ठाऊक नाही. जर आमचे काका असते तर आमचा कबिला रायगडी ठेवून का जाते?”.

हे ऐकून औरंगजेब खुश झाला आणि म्हणाला ..
“तुम चिंता मत करो, दख्खनमें सब चोर, तुम साहू तुमारा राज तुमकु देऊंगा. तुम हमारे बेटीके बेटे हो. कूच फिकीर मत करो|”

कोणत्याही परिस्थिती शाहू महाराजांनी त्यांचे व राजाराम महाराजांचे संबंध औरंगजेबाला समजू दिले नाहीत. नेहमी औरंगजेबाची मर्जी राखली. कारण औरंगजेब केव्हा काय करेल याची कल
्पना नव्हती. एखादा मनुष्य खडतर जीवनात यशस्वी होतो तो योग्य संस्कारांमुळे जर त्याला योग्य संस्कार मिळाले तर तो कोणत्याही संकटांना डगमगत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहू महाराज. कारण अशा बिकट परिस्थिती स्वतःला समतोल ठेवून वागावे लागते आणि यासाठी समतोल दृष्टी, धैर्य यांची गरज असते जे फ़क़्त संस्कारातून मिळते जे महाराणी येसूबाईसाहेबांनी केले.

याच काळात शाहू महाराजांनी आपली धर्मनिष्ठा दिसून येते, बेंद्रे म्हणतात इ.स. १७०० अखेरची नोंद अशी की, शाहूंबरोबर आलेले हिंदू कैदेत असताना शिजवलेले अन्न खात नाहीत. राजा शाहूही शिजवलेले अन्न न खाता फ़क़्त मेवामिठाईवरच जगतो. तेव्हा हमिदउद्दीन खानाबरोबर शाहू महाराजांना निरोप आला की, “तू कैदी नसून आपल्या घरीच राहत आहेस. तेव्हा तू अन्न शिजवून खाण्यास मोकळा आहेस. खाण्यात निर्बंद पाळण्याची आवश्यकता नाही.....” यावरून शाहू महाराज आणि इतर मंडळींनी आपला व्यवहार धर्मनिष्ठेने कसा करीत होते हे दिसून येते.

जसजसे शाहू मोठे होऊ लागले होते तसतसे त्यांच्यावर रखवाली करणे कठीण जाऊ लागले आणि हा धोका औरंगजेबास कळून आला आणि त्यावर एकच उपाय म्हणजे “धर्मांतर”.

९ मे १७०३ ची नोंद आहे. बादशाहने हमीदोद्धीनखानास सांगितले की “तुम्ही शाहुकडे जां, त्याला म्हणावे तू मुसलमान हो.” पण याचा कडाडून शाहू महाराजांनी विरोध केला आणि बादशाहने आज्ञा केली की “शाहुवर कडक नजर ठेवा.” धर्मांतराबाबत शाहू महाराज आणि महाराणी येसूबाईंनी बेगमची मदत घेऊन मध्यस्थी करावयास लावले. यावर औरंगजेबाने शाहू महाराज ऐवजी दुसरे दोन कोणीही प्रसिद्ध पुरुष जर धर्मांतरास तयार होत असतील तर शाहूपुरता हा निर्णय मी मागे घेतो असे सांगितले. धन्याच्या बचावासाठी खंडेराव गुजर व जगजीवन गुजर हे दोघे गुजर बंधू पुढे आले. १६ मे १७०३ रोजी मोहरमच्या मुहूर्तावर त्यांस मुसलमान केले आणि नावे अब्दुर्रहीम व अब्दूर्रहमान अशी ठेवली. हे उपकार शाहू महाराज विसरले नाहीत आणि पुढे साताऱ्यात आल्यावर त्यांना सालगाव हे गाव इनाम दिले. परळी (सातारा) येथे त्यांचे वंशज आजही आहेत.

( खंडेराव व जगजीवन गुजर म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजरांचे पुत्र होत. आणि छत्रपती #राजाराम महाराजांचे मेव्हणे.)

इथे फ़क़्त एकच विचार करा....”जर औरंगजेब शाहू महाराजांना मुसलमान करण्यात यशस्वी झाला असता तर इतिहास काय घडला असता” मगच या घटनेचे गांभीर्य कळेल.

असा ठाम निर्णय घ्यायची ताकत शाहूमहाराजांना कुठून आली असेल हो? त्याचा विचार करता आपले लक्ष जाते ते म्हणजे फ़क़्त महाराणी येसूबाई साहेबांवर ! सतत १८ वर्षे महाराणी येसूबाईसाहेब अगदी सावली सारख्या शाहू महाराजांबरोबर राहिल्या.

शाहू महाराजांचा कैदेतील १८ वर्षांचा काल यावर खरच एक पुस्तक लिहिता येईल एवढे काही आहे. पुढच्या पोस्टमध्ये वैचारिक शाहू मांडेन त्यावेळी शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू उजेडात येतील. एकंदरीत १८ वर्ष्यांच्या काळात त्यांच्यावर झालेले संस्कार आणि एकूण परिस्थितीचा पडलेला त्यांच्यावर प्रभाव व त्यातून झालेली त्यांची जडणघडण व त्यांची बनलेली वैचारिक दृष्टी राजनैतिक बैठक, त्यांच्या भावी आयुष्यास व मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली.

============================================

संदर्भ : शोध प्रबंध : "छत्रपती #शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा चिकित्सक अभ्यास: १६८२ ते १७४९"

संशोधक: दीपक वामनराव सूर्यवंशी.

#शाहुपर्व
#जागर_इतिहासाचा
#माझ्या_राजा_रं 👆
🔹 Samvidhan Videos Series Completed .
🔹 All Episodes Links here .
🔹 Click On the link and watch Episode .

1⃣ https://t.me/MissionM/3342 .

2⃣ https://t.me/MissionM/3453 .

3⃣ https://t.me/MissionM/3739 .

4⃣ https://t.me/MissionM/3767 .

5⃣ https://t.me/MissionM/3768 .

6⃣ https://t.me/MissionM/3775 .

7⃣ https://t.me/MissionM/3776 .

8⃣ https://t.me/MissionM/3779 .

9⃣ https://t.me/MissionM/3780 .

🔟 https://t.me/MissionM/3784 .


Share & Join For Daily Study Related Videos 👉 @MissionM .
👆

छत्रपती
#शिवाजी महाराजांचे व्यवस्थापनकौशल्य
वक्ते : निनादजी बेडेकर
Forwarded from Channel Closed
छावा - शिवाजी सावंत.epub
1.6 MB
छावा - शिवाजी सावंत .EPUB