वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा करीता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक संवर्गातील विविध विषयांच्या अनुक्रमे 5, 13, 17 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (108/2021 ते 142/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत सातारा, अलिबाग, नंदुरबार व सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी, गट-ब संवर्गातील 4 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (143/2021 ते 146/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
MPSC
4132.pdf
प्रस्तुत प्रसिद्धीपत्रकात नमूद सहायक कक्ष अधिकारी व राज्यकर निरीक्षक ही दोन्ही पदे अराजपत्रित गट-ब संवर्गाची असून राजपत्रित गट-ब पदांपासून वेगळेपण दाखविण्याकरीता व सांख्यिकीय सुलभतेसाठी हेतुपुरस्सर अशा प्रकारे दर्शवण्यात आली आहेत.
जाहीर पदसंख्या ही केवळ स्पर्धा परीक्षांकरीता प्राप्त मागणीपत्रांमधील असून अनुभव/विशेष अर्हतेवर आधारित सरळसेवा भरतीसाठी 2021 या वर्षाकरीता साधारणपणे 3800 पदांची मागणीपत्रे दिनांक 8 ऑक्टोबर,2021 पर्यंत प्राप्त झाली आहेत. मागणीपत्रांचा पदनिहाय तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता पुणे येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 व 6 ते 9 डिसेंबर 2021 या कालावधीत SRPF, गट क्रमांक 1 मैदान, रामटेकडी, पुणे येथे आयोजित करण्यात येईल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता नाशिक येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर 2021, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येईल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता कोल्हापूर येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर, 22 ते 25 नोव्हेंबर 2021 व 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत पोलीस मुख्यालय मैदान,कसबा बावडा,कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येईल.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या उद्या दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर आयोजित मुलाखतीस उमेदवारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी उपस्थित राहण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यास्तव, जे उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकत/इच्छित नाहीत, अशा उमेदवारांनी ईमेलद्वारे आयोगास विनंती केल्यास त्यांची मुलाखत इतर दिवशी आयोजित करण्यात येईल.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग करीता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक संवर्गातील विविध विषयांच्या अनुक्रमे 6,16,22 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (147/2021 ते 179/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार करीता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक संवर्गातील विविध विषयांच्या अनुक्रमे 6.14,17 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (180/2021 ते 212/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या मुंबई केंद्रावरील दिनांक 20 ते 22 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/4138
महाराष्ट्र-कर्नाटक विवादित सीमा भागातील 865 गावांमधील मागासवर्गीय उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता कोणतेही आरक्षण अनुज्ञेय नाही. तथापि, सदर उमेदवार अराखीव-सर्वसाधारण पदांवरील निवडीकरीता पात्र आहेत.
राज्यसेवा परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय आयोगाकडून घेण्यात आल्यास सदर बदल राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता लागू करण्यात येऊ शकत नाही. यास्तव, उमेदवारांनी परीक्षेच्या स्वरूपातील बदलाबाबत विविध माध्यमांमधून पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी O.A.No.718/2021 प्रकरणी दि. 28 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.