राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या जुन्या संकेतस्थळावर खाते असलेल्या उमेदवारांनी नवीन संकेतस्थळावर नव्याने खाते तयार करण्याची आवश्यकता नाही. जुन्या संकेतस्थळावर खाते असताना नवीन खाते तयार करण्याचा प्रयत्न केल्यास प्रणालीद्वारे दोन्ही खाती गोठवली जाऊन उमेदवारास अर्ज करण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. नवीन संकेतस्थळावर पहिल्या वेळी खात्याचा वापर करणाऱ्या उमेदवारांनी अगोदर पासवर्ड अद्ययावत करावा व तदनंतर खाते अद्ययावत करावे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या मुंबई व औरंगाबाद केंद्रावरील मुलाखती अनुक्रमे दिनांक 20 ते 22 ऑक्टोबर, 2021 व 8 ते 11 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत घेण्यात येतील. मुलाखतीचा दिनांक, वेळ व ठिकाण स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.
लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे स्पर्धा परीक्षांसाठी लेखनिक व इतर सोयी- सवलती उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 5 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे सुधारित मार्गदर्शिका निर्गमित करण्यात आली आहे.
राज्यसेवा परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या पदांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नगरपालिका/नगरपरिषद मुख्याधिकारी गट-अ व मुख्याधिकारी गट-ब पदांचा पुन्हा समावेश करण्याबाबत शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यसेवा परीक्षा 2021 च्या जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा संबंधित नियमांमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार असून नमूद पदांकरिता पात्र ठरण्याकरीता संबंधित दिनांकास उमेदवारांचे वय विचारात घेण्यात येईल.
जाहिरात क्रमांक 13/2019 पशुधन विकास अधिकारी, गट-अ पदाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक 13/2019 पशुधन विकास अधिकारी, गट-अ पदाकरीताची गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील 9 पदांवरील भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जाहिरात क्रमांक 107/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा करीता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक संवर्गातील विविध विषयांच्या अनुक्रमे 5, 13, 17 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (108/2021 ते 142/2021) प्रसिद्ध करण्यात आली आहे.