महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करीताच्या कोल्हापूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
मुख्य प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय पदाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील डेटा एन्ट्री ऑपरेटर, गट-क संवर्गातील पद भरतीकरीता दिनांक 31 ऑक्टोबर 2015 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात (जाहिरात क्रमांक 138/2015) प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करीताच्या पुणे केंद्रावर दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर, 2021 कालावधीत आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत आहे.
Online Application System will be in Scheduled Maintenance / Upgrade Mode from Saturday 20th November 2021 10 PM, to Sunday 21st November 2021 10 PM.
जाहिरात क्रमांक १०६/२०२१- राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २५१५८९ अर्ज प्राप्त झाले असून पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करीता नाशिक केंद्रावर दिनांक 29 नोव्हेंबर, 2021 ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखती मा. अध्यक्ष, मलोआ यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. शारीरिक चाचणी व मुलाखतीचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 करिता दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तरतालिका अधिक्रमित करण्यात येत असून सुधारित अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.