MPSC
354K subscribers
422 photos
38 files
1.93K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जाहिरात क्रमांक 235/2021 सहायक प्राध्यापक, शल्य चिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, गट ब संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, अंतिम निकाल/शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 165/2021 सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, गट अ संवर्गाकरीता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आयोगास शिफारस करणे शक्य झाले नाही.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 मध्ये उमेदवारांकडून होऊ शकणारे संभाव्य गैरप्रकार विचारात घेऊन आयोगाकडून सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेनंतर परीक्षेदरम्यानच्या चित्रीकरणाआधारे कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या तसेच परीक्षेकरीता नियुक्त कर्मचारी व आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनासंदर्भात आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक 48/2021, 90/2021, 94/2021, 114/2021, 121/2021, 127/2021, 129/2021, 158/2021, 160/2021, 178/2021, 182/2021, 189/2021, 204/2021, 211/2021, 192/2021, 227/2021, 229/2021 व 244/2021ची गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी/अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तसेच जा.क्र. 141/2021, 199/2021, 203/2021, 209/2021 व 246/2021 करीता पात्र उमेदवार न मिळाल्याने आयोगास शिफारस करणे शक्य झालेले नाही,यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे
जाहिरात क्रमांक 69/2021, 71/2021, 86/2021 व 161/2021 ची गुणवत्ता यादी व शिफारस पात्र उमेदवारांची यादी/अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक 031/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पाचही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपरची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021-स.क.अ.पेपर 2 (51/2022) व पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2021(52/2022) च्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.हरकती सादर करण्यासाठी दि.10/8/2022पर्यंत वेबलिंक सुरु करण्यात येत आहे.
जा.क्र.65/2021,70/2021,72/2021
,89/2021,92/2021, 142/2021,147/2021,152/2021,
180/2021,240/2021ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. जा.क्र. 147/2021करीता पात्र उमेदवार न मिळाल्याने आयोगास शिफारस करणे शक्य झाले नाही.
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले.

सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
आयोगामार्फत दिनांक 13 ऑगस्ट, 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 लिपिक टंकलेखक करिता लेखनिक आणि/अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.