Niranjan's Blog☘️
16.7K subscribers
781 photos
7 videos
64 files
152 links
Personal blog of Niranjan Kadam, Asst. Commissioner of State Tax(GST)


#जगण

https://www.niranjanblog.in

Initiative for Financial Awareness👉 @arthyog2024
Download Telegram
Live stream started
Live stream finished (2 hours)
आज होत असलेल्या युपीएससी CSE/IFoS पुर्व परीक्षेसाठी खूप शुभेच्छा💐💐💐
The quality of your mind is a quality of your life.

-Naval Ravikant
#PSI Interview Session

पोलीस उपनिरीक्षक(PSI) पदासाठी लवकरच मुलाखती सुरू होणार असून या पदासाठी मुलाखतीती तयारी कशी करावी, विशेषतः पोलीस विभाग आणि संबंधित पदाच्या अनुषंगाने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी कशी तयारी करावी, यासाठी राज्यसेवा-2022 मधून DySP/ACP पदासाठी निवड झालेले आणि सध्या गोंदिया जिल्ह्यात PSI पदावर कार्यरत असलेले श्री. भारत पांढरे सर यांचे मुलाखत मार्गदर्शन सत्र आपल्या @Niranjan_Blog या टेलिग्राम चॅनेल वर उद्या दि.18 जून 2024 रोजी रात्री 9.30 वाजता होईल.

आपले काही प्रश्न असल्यास comments मध्ये add करून ठेऊ शकता.
Live stream started
Live stream finished (1 hour)
पोस्ट मिळवण्याच्या या धडपडीत एकदा का दोन-तीन वर्षे निघून गेली की जगणं घडवायला निघालेल्या गर्दीतला आणखी एक चेहरा बणून जातो आपण.. लाखोंच्या गर्दीतले एक जण.. या सगळ्यात कधीतरी गर्दीतल्या एकाकीपणाची ओळख होते.. कधीतरी तो एकाकीपणा खूप भयावह वाटतो, त्रासदायक वाटतो.. एवढं काय कमी म्हणून की काय मनाला तुलनेचा आजार जडतो.. मन नकळत तुलना करायला लागतं.. फक्त अभ्यासच नाही तर इतरांच्या तथाकथित lifestyle सोबतही.. या तुलनेला काहीच आधार नसतो तरीही आपण यावर बुद्धीने विचार न करता निव्वळ मनाच्या खेळात अडकून पडतो. आजुबाजूला असलेल्यांशी तुलना करणं काय कमी होतं की समाज माध्यमांनी आपल्या नात्यातल्या, शाळा कॉलेजातील सोबत्यांपासून पासून जुन्या अभ्यासिकेतल्या पर्यंत अगदी आपल्या अंगणात आणून ठेवलं.. त्यात post holder नावाची overrated identity नावापुढे लागलेले तर विशेष करून आलेच.. तर या सगळ्यांच्या आयुष्याशी आपण आपल्या आयुष्याची नकळत करत असलेली तुलना आपल्या मानसिक आरोग्याला खूप धोकादायक असते. प्रेरणा वेगळी गोष्ट आहे आणि तुलना वेगळी, यात गल्लत करून चालत नाही. कुणाशीही तुलना करताना परिस्थिती समान आहे हे पहायला हवं तसं नसेल तर आपल्या मनाला तुलनेचा खेळ बंद करायला लावला पाहिजे. आपल्याला हे जमत नसेल तर किमान सोशल मीडियावरचा आपला वावर बंद करून टाकायला हवा. त्यात अगदी टेलिग्रामही आलंच. आपण कितीही समान म्हटलो तरीही, आजही आपल्या प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, भावनिक परिस्थिती खूप वेगवेगळी आहे. अगदी एकाच पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही परिस्थिती सारखी असते असं मुळीच नाही. हे सर्व समजून घ्यायला हवं. मनाला समजवायला हवं. पुढे जाण्यासाठी प्रेरणा नक्कीच घ्यायला हवी परंतु त्यासाठी तुलना करत बसायचं नसतं तर मेहनत घ्यायची असते. गर्दीतला एक चेहरा ते स्वतःची स्वतंत्र ओळख असलेला एक चेहरा हा प्रवास करताना अशा अनेक गोष्टींवर सातत्याने काम करावं लागतं.. अभ्यासातल्या, परीक्षेतल्या चुका आपण नेहमीच शोधतो, त्यावर कामही करतो. त्याचप्रमाणे मानसिकतेल्या चुकाही शोधायच्या असतात, त्यावरही काम करायचं असतं. मनाची शांतता खूप गरजेची आहे. As they say, There is no success without peace of mind.

~निरंजन🌿
काहीतरी खरंखुरं productive घडवण्यासाठी कितीतरी रटाळवाण्या दिवसांमध्ये सकारात्मक राहून शांतपणे आपलं काम करीत रहावं लागतं.

@niranjan_blog
जसजशी परीक्षा जवळ येते तशी भितीची जागा curiosity ने घ्यायला हवी. We should be curious about the mains preparation
अडचणी, समस्या किंवा एकंदरीत परिस्थिती जशी आहे तसा तीचा स्वीकार करणे म्हणजे हतबल होऊन बसून राहणे नाही.. Acceptance is about peace of mind.. कारण जोपर्यंत मन शांत राहणार नाही तोपर्यंत आपण आजची परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी constructive करू शकत नाही. त्यामुळे problems सोबतचं मानसिक भांडण बंद करून शांतपणे परिस्थितीचा स्वीकार करणे, आपलं काम व्यवस्थित करीत राहणे, यातुनच आपल्याला आपली परिस्थिती बदलता येणार असते. वेळ लागतो पण जमतं सगळं.

@niranjan_blog🌿
परीक्षेच्या काळात शांत राहणं, सकारात्मक राहणं, खूप गरजेचं असतं. तुम्हाला यासाठी थोडी मदत व्हावी म्हणून उद्यापासून पुढचे काही दिवस रोज सकाळी 6 वाजता 10-15 मिनिटे बोलूयात.

#Morning_Routine
Live stream started
Live stream finished (24 minutes)
Live stream started
Live stream finished (22 minutes)