@natemanache
जाणीव हा शब्द जरी ऐकण्यात, वाचनात येत असला, तरी मनुष्यात 'जाणीव' असेलच असं नाही. जाणीव ही देणगी आहे. ती ईश्वर देत असेल, अथवा नैसर्गिक असेल. जे असेल ते असेल; परंतु जाणीव अनमोल आहे. ती निसर्गत: बुद्धीप्रमाणे असावी लागते. धन, मान, सत्ता ही बुद्धीने कमावता येते; किंबहुना हा बुद्धीचाच व्यवहार आहे. व्यावहारिक सफलता म्हणजे जीवनाची सांगता नव्हे. रसिकता, समज, जाणीव या अलौकिक बाबी आहेत. सात्विक आनंदाचे ते स्रोत आहेत. पदार्थ गरज भागवतात, तहान भागवत नाहीत. जाणिवेत गरजा संपतात आणि तहान लागत नाही. तृप्त जीवन असतं. दिवस येतात आणि जातात. तो त्यांना धन्यवाद देत असतो. शक्ती जरी दिसत नसली, तरी जीवन सशक्त असतं. न दिसता विजेच्या कार्याची जाणीव असते; त्याचप्रमाणे, आत्मशक्तीची जाण असते. न काही मिळविण्याची इच्छा असते, न त्यागाची इच्छा असते. शिवाय जे काही जवळ आहे, ते दु:ख देत नाही. संसार हा जाणिवेला प्रतिबंधक नसतो, म्हणून त्यागाची इच्छा आणि भोगाचा द्वेषही नसतो. जीवनाचं कौतुक करत, इतरांना मान देत, जे मिळेल ते स्वीकारत पूर्णत्वाच्या दिशेनं जीवन प्रवाहित होत असतं. जाणीव असणारेच मोठे असतात. तेच या जगाचा आनंद घेतात. जाणीव जीवनाला सहज करते. निरहंकारी करते.
पृथ्वीवर रावणाइतका ज्ञानी झाला नाही. पूजा मात्र रामाची होते. रावणाकडे अमाप संपत्ती होती. मान हनुमंताला मिळतो. शरीरं मिळतात, प्रेम मिळत नाही. युद्ध हे राजाचं कर्तव्य मानलं जातं. राज्याचा त्याग करून बुद्ध सर्व जगावर कायमस्वरूपी राज्य करतात. अनेक उच्चविद्याविभूषित आहेत. आजही त्यांना माऊलींचे शब्द कळत नाहीत. शब्दाची जाण ज्यांना असते, ते डोंगरावर बसून गाथा निर्माण करतात. जे आधुनिक व पुरोगामी म्हणवून घेतात, त्यांच्या माथ्याला गाथा समजत नाही. जाणीव असणारे मोठे होतात. बुद्धिमान त्यांच्या हाताखाली काम करतात. जाणीव असणाऱ्यांचं जग वेगळं आहे. ग्रंथाचं ज्ञान असणं वेगळं आणि ज्ञानाची जाणीव ही वेगळी. ज्ञानेश्वरी ही ज्ञानाची जाणीव आहे. रसिकांचा आहार आहे. चातुर्याची समज आहे. समाधीचा मार्ग आहे. भक्तांचं प्रेम आणि संतांचा जिव्हाळा आहे. धन आणि मानाकडे जाणाऱ्यांचा हा विषयच नाही. महत्त्व कळणं, हेदेखील महत्त्वाचं असतं. महत्त्व कशाला द्यायचं, याचीही जाणीव असावी लागते. एखाद्याच भाग्यवंतात जाणीव असते. त्यालाच आनंदाची जाण आणि तो कशात आहे, हे समजत असते.
Credit goes to writer 🙏

वाचनात आलेलं छानसं काही...
'अलिप्त होण्यातलं सुख'
......... डॉ. अनुराधा पंडितराव
लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. 'माझी परडी', 'माझी फुलं' ह्या' मी' पणाचा भारी अभिमान वाटे.
एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, 'माझी फुलं' रहात नसून 'त्याची फुलं' होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे 'मी पणा' देखील नकळत देवाला अर्पण होत असे.
खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, 'माझ्या कळ्या' , 'माझी फुलं'. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!
आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो? एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.
मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. 'तिचं घर', 'तिचा मुलगा', 'तिचा संसार' सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या 'पझेसिव्ह' स्वभावाला जमत नाही. सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.
वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.
आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, 'गुंतणं'.
आयुष्यात 'सोडणं 'जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे.
आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना 'डिलीट' करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.
साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला 'लाइक' केलं पाहिजे. 'व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.
अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल. कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील.
रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा... अगदी रोज... कोणत्याही पाशात न अडकता... अलिप्तपणेच!

📖 !!••चिं•त•न••!! 📖
मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे
पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी त्या व्यक्ती ला विसरू नये कारण देव स्वतः भेटू शकत नाही मदत करू शकत नाही म्हणून अश्या व्यक्ती ला पाठवतो आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील...
Credit goes to writer🙏

*जाब*
"वहिनी,माझ्या आईला तू उलट कशी बोलू शकतेस?"
नणंद रेश्मा आईचा कैवार घेत मालतीशी भांडायला अगदी अर्ध्या दिवसाची रजा टाकून आली होती.
उन्हातून आली म्हणून मालतीने तिला माठातलं गार पाणी दिलं.
"आज लवकर सुटलं ऑफीस?" मालतीनं विचारलं
"हे असं आमच्याशी गोडगोड बोलतेस नि आमच्या अपरोक्ष आमच्या आईला..अगदी पोरक्यासारखी वागणूक देतेस. बरोबर ना."
जीजी डोळ्याला पदर लावून बसली. "बघ बाई आता तुच काय ते. तू झालीस तेंव्हा दुसरीपण पोरगीच झाली म्हणून हिणवलं सासूसासऱ्यांनी पण तुम्हा लेकींनाच गं माझी कणव."
"आई,तू अजिबात रडू नकोस. तुझी लेक जीवंत आहे अजून. खडसावून जाब विचारते की नाही बघ. कुणाचं मिंध रहायची गरज नाही तुला. पेंशन आहे चालू तुझी. यांच्या जीवावर नाही जगत तू." भरल्या गळ्याने रेश्मा आईचे डोळे पुसत म्हणाली.
"आत्या काय चाललय तुझं. खालपर्यंत आवाज येतोय," नुकतीच घरात पाऊल टाकत असलेली किमया आत्याजवळ आपली स्याक ठेवत म्हणाली.
"या पोरीला माझा आवाज सहन होत नाही गं रेशम. आता तुझाही सहन होत नाहीए बघ."जीजी असं म्हणत परत रडू लागली.
"एक मिनिट. हे काय चाललंय आणि आत्तू तू माझ्या आईवर का कावत होतीस मगाशी? पहाटे उठल्यापासनं आई घरात वावरतेय. एकतर कामवालीही मिळत नाहीए हल्लीच्या काळात. मिळाली होती एक धुणी धुवायला पण आजी रोज आपली चादर धुवायला टाकू लागली,कधीकधीच्या कपाटातल्या साड्या काढून तिला धू म्हणून सांगू लागली. ती बिचारी मावशी पळून गेली नंतर पोळ्या करायला बाई लावली तर तिच्या खनपटी बसू लागली..इतक्याच पातळ हव्या,एकसारख्या हव्या..तीही परागंदा झाली.
डॉक्टर म्हणतात,आजीला अल्झायमर झालाय. गोळ्या चालू केल्यात पण ही कधी घेते,कधी खिडकीतून फेकून देते. त्यादिवशी कुंडीतही सापडल्या हिच्या गोळ्या. कुठेही नाक शिंकरते,थुंकते..ते सगळं आई स्वच्छ करतेय. हल्ली तर अंथरुणातही..पण हे सारं एका शब्दाने आई बोलली का तुला!नाही नं. का तर तुला त्रास होईल. तू तुझ्या घरी सुखी रहावस म्हणून.
हल्ली ऐकूही कमी येऊ लागलय आजीला. डॉक्टर म्हणाले,आता या वयात ऑपरेशन नको. ही मोठमोठ्याने बोलते. मोठ्या आवाजात टिव्ही लावते. दोन खोल्यांचं घर आमचं. कसं अभ्यासात लक्ष लागणार गं आत्तू! तरी आई मला हिला काही बोलू देत नाही. तूच लायब्ररीत जाऊन अभ्यास कर म्हणून सांगते.
आजीला तेलकट कमी द्यायला स़ागितलय म्हणून घरात सगळ्यांनाच कमी तेलाचं,थोडसं अळणी स्वैंपाक का तर आजीला वाटू नये की आम्ही तिला टाकून चांगलंचुंगलं करुन खातोय. आजीचा मधुमेह वाढलाय म्हणून आजीसोबत आमचं सर्वांच गोडधोड बंद का तर तिला टाकून कसं खायचं!
आत्तू, माझी आई घरात रहाते म्हणून आजवर तुम्ही तिला ग्रुहित धरीत आलात. उन्हाळ्याची सुट्टी पडली की खुशाल तुझी नि मोठ्या आत्तुची मुलं आमच्याकडे. का तर मालतीवहिनी घरातच तर असते. घरात कसलं डोंबलाचं काम असतं एवढं.. नुसत्या झोपाच तर काढते!"
"किमया"..कपडे धुऊन ते वाळत घालण्यासाठी पिळे भरलेली बादली घेऊन आलेल्या मालतीने लेकीला दटावलं.
"आई, मी कधी आत्याच्या घरी रहायला गेली की आत्या असंच बोलायची तुझ्याबद्दल. घरात तर असते. अरे,हौस होती का माझ्या आईला घरी रहायची? तुमच्याइतकीच शिकलेली ती पण आजीने मला सांभाळण्यास नकार दिला होता. मला पाळणाघरात ठेवायचं नाही असंही बजावलं होतं..खिंडीतच पकडलं होतं तिला. राहिली मग ती घरात. घरी शिकवण्या घेऊ लागली तर तेही आवडत नसायचं आजीला. मुलांना शिकवायला बसली की काहीतरी कामं सांगून उठवायची. मुलांच्या आया मुलांना पाठवेनाशा झाल्या.
काही माणसं नं फक्त ऐकून घेण्यासाठीच जन्माला आलेली असतात त्यातलीच माझी आई. मला आठवतं,एकदा मावशीकडे मुंजीला जायचं होतं आईला आणि आईचा कैरीहार आजीने दडवून ठेवला. आई शोधूनशोधून रडकुंडीला आली. बाबाही तापले होते तिच्यावर. आजीला कोण हसू येत होतं. मला फाइव्हस्टॉर चॉकलेटसाठी पैसे देऊन माझं तोंड गप्प केलं होतं तिने तरी मी रात्री आईला आजीची करामत सांगितलीच. बाबा संतापले होते. तिला जाब विचारायला उठले तर आईनेच त्यांना शांत झोपायला लावलं होतं.
आताशी आजी फार चिडचिड करते. वाढलेलं ताट भिरकावून देते. आत्तू, खरंच माझी आई वाईट आहे असं धरुन चालुया आपण. तू घेऊन जा तुझ्या आईला. उगा या छळवादात नको ठेवूस तुझ्या माऊलीस."किमयाने आत्यापुढे हात जोडले.
"न्हेलं असतं गं पण..अतुलची फायनल एक्झाम आहे ना. आणि आमचं घर पडलं खाडीजलळ. तिथली हवा सहन होणार नाही तिला."
"बरं मग.."
"मग काय निघतेच मी. बराच वेळ झाला येऊन."
तेवढ्यात किचनमधून मालतीने आवाज दिला. वन्सं,आमटी केलीय चिंचगुळाची तुमच्या आवडीची नि नाचणीचे पापड तळतेय. एकत्रच बसू जेवायला. तुमचं चर्चासत्र संपलं तर हात धुवून घ्या. मी पानं वाढते.
"वहिनी,तुझं गं पान कुठेय?"
"आत्तु,हल्ली आजी नीट जेवत नाही ना म्हणून आई तिला कधीच्या जुन्या गोष्टी सांगत भरवते. चार घास जास्त जातात तिचे."
रेश्माच्या डोळ्यात पाणी आलं.

"अहं,आत्तू,भरल्या पानावर डोळ्यात पाणी आणू नाही,"आईच म्हणते असं. आत्तुचे डोळे पुसत किमया म्हणाली. कधीतरीची गोड आठवण सांगत सासूला घास भरवणाऱ्या आपल्या वहिनीकडे पाहून जेवणाआधीच त्या माहेरवाशिणीचं मन समाधानाने भरुन पावलं.
रेश्मा जायला निघाली तेंव्हा मालतीने तिला गुळपापडीचा डबा दिला. रेश्माला अजब वाटत होतं..कधीच उलट न बोलणारी आपली भाची आपल्याला आज एवढं का बरं सुनावत होती याचं. किमया तिला खाली सोडायला गेली..तिचा हात धरुन म्हणाली,"सॉरी आत्तू,आज जरा जास्तच बोलले तुला पण.."
"पण..काय?"
"अगं महिना झाला आईच्या अंगावर जातय. माझी परीक्षा चालू म्हणून कोणालाच बोलली नाही ती. आठ दिवसांपूर्वी चक्कर येऊन पडली. डॉक्टरकडे न्हेलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ञांची चिठ्ठी दिली. तिथे सगळ्या तपासण्या झाल्या. रिपोर्टस आलेत. गर्भाशयात ट्यूमर आहे. मला आजीचा राग येतोय. हीच तिला सणावाराला गोळ्या घेऊन पाळी पुढेमागे ढकलायला लावायची. माझ्या लेकी यायच्यात. तू बाहेरची झालीस तर त्यांचं कोण करणार..देवाचं कोण करणार? आता माझ्या आईचं कोण करणार गं आत्तु?"
रेश्मा आपल्या भाचीकडे पहात राहिली. एक लेक तिच्या आईबद्दल जाब विचारायला आली होती. जाताना एक लेक तिला जाब विचारत होती!
Credit Goes to Writer🙏

आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्या सोडून जाणारे पुढं कसं वागायचं ते शिकवतात, म्हणून माणसांचं महत्व आयुष्यात मोलाचं असतं...मग ते येणारे असोत की जाणारे...

बोध कथा...
एक दहा बारा वर्षाचा मुलगा उन्हाळ्याच्या सुटीत आईबाबा बरोबर त्याच्या आजी आजोबाकडे जायाचा..हा नेम कायम सुरू होता,
एकदा तो मुलगा बाबांना म्हणतो बाबा आता मी मोठा झालोय..मला सगळं समजत..या वर्षी मी एकट्याने प्रवास करणार आणि आजीकडे जाणार.बाबा त्याची हरप्रकारे समजूत काढतात पण तो पठ्ठ्या यावेळेला काही ऐकत नाही..शेवटी सर्व सुचना देऊन बाबा एकदाचे तयार होतात.
स्टेशनला त्याला गाडीत बसवून द्यायला ते येतात..खूप सुचना करतात.नीट जा .पहिल्यांदा एकटा जातोय.
गाडी सुटायच्या अगोदर ते त्याच्या खीशात एक चिठ्ठी टाकतात आणि त्याला सांगतात की हे बघ तुला भिती वाटली ...एकट वाटायला लागलं की मगच ही चिठ्ठी वाच...
गाडी सुरू होते.मुलाचा हा पहिलाच एकट्याने करायचा प्रवास.
जसा गाडीने वेग घेतला तो खिडकीतून गंमत बघायला लागला..पळती झाडे ..नदी डोंगर पाहून तो खुश झाला .
हळूहळू गर्दी वाढू लागली...अनोळखी लोकांच्या गराड्यात त्याला भिती वाटायला लागली.कुणीतरी आपल्याकडे एकटक बघतय अस त्याला उगाचच वाटायला लागलं .तो रडवेला झाला...
त्याला आता आईबाबा हवे होते अस वाटायला लागलं .
तेवाढ्यात त्याला आठवलं की बाबांनी सांगितलं होत..की अस काही वाटायला लागलं तर खीशातली चिठ्ठी वाच...
त्याने भितभितच ती बाबांनी दिलेली चिठ्ठी काढली..
त्यावर एकच ओळ लिहीली होती..
बाळ भिऊ नको...मी पुढल्या डब्यात बसून तुझ्या सोबतच प्रवास करतोय..
त्याचे डोळे डबडबले...केवढा धीर आला त्याला..हायस वाटल...भिती कुठल्याकुठे पळाली.
भगवंतानेही आपल्या सर्वाच्या खीशात अशी एक चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात प्रवासाला पाठवले आहे.या प्रवासात तो आपल्या सोबतच आहे...
मग कसली आता भिती.
हा प्रवास छान हसत,हसत करूया..ठरलं .

*जेवताना चव महत्त्वाची कि खडा*
एका रेस्टॉरंट मध्ये सुप्रसिद्ध शेफ ने उच्च प्रतीचा तांदूळ वापरून अतिशय चवदार पुलाव बनवला. पुलाव तयार होताच त्याचा सुगंध आसमंतात पसरला. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले.😋 सगळ्यांना त्या पुलावाची चव घेण्याची घाई लागली. जवळपास शंभर लोकांना रेस्टॉरंट मध्ये वेटरने पुलाव वाढला. 🥘 प्रत्येकजण पहिला घास हातात घेऊन तोंडात घालणार तोच शेफ ने येऊन सांगितले कि यात गारेचा ऐक खडा पडला आहे. तो तांदळाच्या रंगाचा आणि आकाराचा असल्याने मला सापडला नाही. तो कोणाला येईल सांगता येणार नाही. काळजी घ्या. कुणाच्या दाडेखाली आला तर इजा होऊ शकते म्हणून सांगितले. 🤔🤭😯
आता पुलावाचा स्वाद चांगला आहे…. चव उत्तम आहे…. तरी पण खाण्याची गंमत निघून गेली. प्रत्येकजण घास खाताना चवी कडे लक्ष न देता, याच घासात तर खडा नसेल ना या संशयाने एक एक घास ढकलत होता.😬
जो तो सावध झाल्याने गप्पागोष्टी विनोद काहीही झाले नाही. एकत्र जेवणाची मजाच गेली होती. सर्वजण एकत्र असूनही एक-एकटे विचादात पडले होते. सगळ्यांनी शेवटपर्यंत जेवण केले. अगदी शेवटचं घास देखील सावधपणे घेतला.🧐
सर्वांनी आपल्याला खडा न आल्याबद्दल सुसस्कारा सोडला. हात धुतले. तेव्हा कोणाच्यातरी लक्षात आले कि, अरेच्च्या? कुणालाच खडा आला नाही ??🤔😠
मग त्यांनी त्या शेफला बोलावले. त्याला विचारले तू तर म्हणाला होतास खडा येईल !🥵
तो शेफ म्हणाला मी बहुतेक सर्वच खडे काढले होते, परंतु न जाणो चुकून एखादा राहिला असेल तर आपल्याला सावध केलेले बरे म्हणून सांगितले !☹️
सगळे एकमेकांकडे बघू लागले. अतिशय उत्तम स्वादिष्ट झालेल्या पुलावाबद्दल चर्चाच झाली नाही. जेवण करून सगळे दमले होते. कारण प्रत्येक घास खाण्यातली सहजता गेली होती. सगळ्याच्या हालचालींची सहजता गेली होती. म्हणून भोजन करणे एवढे कष्टदायक झाले होते !!
🙃
एका रोगामुळे, सध्या आपली अवस्था पुलावातल्या खड्यासारखी झाली आहे. कोणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही. जगण्यातली सहजता गेली. अगदी मदत करणारा हात देखील, कोरोनाचा असेल का? दूधवाला, भाजीवाला, किराणावाला, जीवनावश्यक वस्तू घेताना, वस्तू बरोबर काय येईल याचीच जास्त चिंता घेऊन जगतोय आपण….!😷🤥🤤🤒
पूर्वी शिंक आली कि वाटायचं कुणीतरी आठवण काढली ! परंतु आता वाटते कि देवाने आपली फाईल बाहेर काढली कि काय…? माहिती नाही किती दिवस चालेल हे सर्व. परंतु त्या चविष्ट जेवणाप्रमाणे आपले आनंदी जीवन मात्र आता बेचव होऊ देऊ नये ही नम्र विनंती. नकारात्मक बातम्या, पोस्ट न वाचता, मनाला उत्साही करणा-या पोस्ट, माहिती, पुस्तक वाचा, छंद जोपासा आणि किलो किलोमधे आपल्याच कडून आनंद विकत घ्या !

प्रत्येकाने काही ना काही वेड घेतलेलं असतं. केवळ शरिराने जगणार्या माणसाच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात. मन नावाची ठिणगी आहे ती सातत्याने प्राण वायुच्या शोधात असते. पण तरीही आपण घेतलेल्या वेडाला ते वेड नसून शहाणपण आहे असं म्हणावं ही इच्छा असते. अश्या दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेने चालू . नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल, ह्याचं उत्तर पण नियती जवळच असतं.
Credit goes to writer🙏
Credit goes to writer🙏
Forwarded from Aaditya Pawar
शीर्षक :- धुंद आज वेली..🌺🌿
आठवांनी डोळे
अश्रूंनी भरली..
दिसता मनी तू
धुंद आज वेली..
आठवणीतही
राञ ही सरली..
दिसता स्वप्नी तू
धुंद आज वेली..
प्रेमाचे तरंग
धुंद आज वेली..
शहारले अंग
या भलतेवेळी..
स्पर्शुनी मनाला
तू प्रेम भरवी..
धुंद आज वेली
तुला बिलगावी..
करूनी प्रणय
मन तृप्त झाली..
तुझ्याच येण्याने
धुंद आज वेली..
प्रीत..❣️
०१/०३/२०२३
https://nisargpreet.blogspot.com/2023/03/blog-post.html